मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनाचे श्लोक भाग ३८

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३८ मना प्रार्थना तुजला एक आहे| रघुराज थक्कित होऊनि पाहे | अवज्ञा कदाही येदर्थी न कीजे| मना सज्जना राघवी वस्ती कीजे|३८| अर्थ  या श्लोकात समर्थ मनाला प्रार्थना करतात की राघवाला एकवार तू थक्क होऊन पहा ( म्हणजेच त्याला समजून आणि जाणून घे ).मनाने तू कायम भगवंताजवळच वस्ती कर. माझ्या या विनंतीचा अवमान म्हणजे अवज्ञा कधीही करू नकोस. ( थक्कित - आश्चर्ययुक्त/अद्भुत, येदर्थी - या बाबतीत ) विवेचन  आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये समर्थांनी मनाला उपदेश केला आहे. या श्लोकात मात्र ते मनाला प्रार्थना करतात की हे मना परमेश्वराकडे तू थक्क होऊन पहा. समर्थांचे हे सांगणे सुरुवातीला आपल्याला थोडे विचित्र वाटते. पण त्यात खूप गहन अर्थ भरलेला आहे. एखाद्या गोष्टीकडे आपण थक्क किंवा आश्चर्यचकित होऊन केव्हा पाहतो तर ज्यावेळी त्या गोष्टीचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही. आपल्या समजण्याच्या पलीकडे ती गोष्ट असते तेव्हा आपण त्या गोष्टीकडे एखादी अद्भुत गोष्ट म्हणून पाहतो. ज्यावेळी पहिल्यांदा वाफेवरचे पहिले रेल्वे इंजिन धावले आणि त्याच्या सहाय्याने रेल्वे धावली, त्य...

मनाचे श्लोक भाग ३७

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३७ सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा | उडी घालितो संकटी स्वामी तैसा | हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३७| अर्थ  चक्रवाक पक्षांना ज्याप्रमाणे सूर्य अंधारापासून मुक्ती देतो किंवा दिशा दाखवतो त्याचप्रमाणे त्याप्रमाणेच परमेश्वर सुद्धा भक्ताच्या संकटात त्वरित धावून जातो आणि त्याची संकटातून मुक्तता करतो. हरीभक्तीचा महिमा पावलो पावली ऐकू येतो. त्याची निशाणी गर्जते आहे. दासाभिमानी असलेला राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. ( मार्तंड - सूर्य, निशाण - एक रणवाद्य/डंका, घाव - त्या वाद्यावरील प्रहार ) विवेचन  भगवंत आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करण्यासाठी कशाप्रकारे धावून जातो हे सांगण्यासाठी समर्थ आपल्याला या श्लोकात चक्रवाक पक्षाचे उदाहरण देतात. चक्रवाक पक्षातील नर आणि मादी एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु अंधारामध्ये या पक्षांची एकमेकांपासून ताटातूट होते. अंधारात त्यांना काहीही दिसत नाही. फक्त ते एकमेकांना साद घालतात. त्यांचा आर्त आवाज फक्त एकमेकांना ऐकू येतो. सूर्योदयाची ते वाट पाहत असतात. एकदा का सूर्योदय झा...

मनाचे श्लोक भाग ३६

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३६ सदा सर्वदा देव सन्निध आहे | कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे| सुखानंद आनंद कैवल्यदानी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३६| अर्थ  परमेश्वर कायम आपल्याजवळच आहे. फक्त तो आपली परीक्षा आणि धैर्य पाहतो. सुख, आनंद आणि कैवल्य यांचा तो दाता आहे. असा हा परमेश्वर आपल्या भक्तांचा अभिमानी असून त्यांच्याकडे तो कधीही दुर्लक्ष करत नाही. ( सन्निध - समीप/जवळ, अल्प धारिष्ट - परीक्षा/कसोटी, कैवल्य - मोक्ष ) विवेचन  आधीच्या श्लोकात समर्थ परमेश्वर आपल्या कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते आपल्याला सांगतात. तर या श्लोकात हा परमेश्वर कोठे आहे, त्याचा वास कोठे आहे हे ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे म्हणजे जवळच आहे. व्यवहारामध्ये आपण सन्निध या शब्दाचा अर्थ जवळ किंवा समीप असा घेतो परंतु अध्यात्मामध्ये सन्निध म्हणजे अंतर्यामी. त्या परमेश्वराला शोधायला दूर कुठेही जावे लागत नाही. त्याचा वास आपल्या अंतर्यामीच असतो. आणि तिथे तो सदा सर्वदा म्हणजे कायमस्वरूपी असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वर आणि आपण वेगळे नाहीच आहोत.  असे जर आहे तर...

मनाचे श्लोक भाग ३५

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३५ असे हो जया अंतरी भाव जैसा|  वसे हो तयार अंतरी देव तैसा | अनन्यास रक्षीतसे चापपाणी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३५| अर्थ  आपल्या मनात परमेश्वराबद्दलचा जसा भाव असेल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या अंतरामध्ये वसतो म्हणजे त्याचे अस्तित्व जाणवते. अनन्यभावाने परमेश्वराला जो शरण जातो त्याचे रक्षण हा धनुर्धारी राम नक्कीच करतो. आपल्या भक्तांची तो कधीही उपेक्षा करत नाही. ( अनन्य - एकनिष्ठ, चापपाणी - हाती धनुष्य धारण केलेला /भगवंत ) विवेचन  आधीच्या श्लोकात समर्थ देव आपल्या भक्तांचे रक्षण करतो असे आपल्याला सांगतात. या श्लोकात ते आपल्याला परमेश्वर कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते सांगतात. परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो. परंतु त्याच्याबद्दलची आपली जाणीव किती तीव्र आहे यावर आपल्याला त्याची होणारी अनुभूती ठरते. भगवंताविषयीची भावना जर आपल्या अंतःकरणात तीव्र असेल तर तो प्रकट होण्यास वेळ लागत नाही. या श्लोकात 'भाव ' हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसा भाव तसा देव किंवा देव भावाचा भुकेला असे आपण ...

मनाचे श्लोक ३४

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३४ उपेक्षा कदा रामरुपी असेना| जिवा मानवां निश्चयो तो वसेना| शिरी भार वाहेन बोले पुराणी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३४| अर्थ  ( आतापर्यंतच्या उदाहरणांवरून समर्थांनी आपल्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की ) भगवंत आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. परंतु ( आपण असे दुर्दैवी जीव आहोत की ) त्याची भक्ती करण्याचा आपला निश्चयच होत नाही. भक्तांची सारी काळजी मी वाहतो असे पुराणात त्याने वचन दिले आहे. दासाभिमानी असलेला श्रीराम आपल्या दासांची म्हणजेच भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. ( रामरुपी - भगवंताजवळ, जिवां मानवां - जीवरूपी म्हणजेच सामान्य माणसाला ) विवेचन  आपल्या भक्ताची भगवंत कधीच उपेक्षा करीत नाही. त्याचा संपूर्ण भार तो वाहतो. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता. परंतु त्याच्या पित्याला त्याची विष्णूभक्ती मान्य नव्हती. तो देवांना आपले शत्रू मानत असे. विष्णू भक्ती करू नये म्हणून सुरुवातीला त्याने प्रल्हादाला समजावून पाहिले. परंतु तो जेव्हा ऐकत नाही असे दिसले तेव्हा त्याने विविध प्रकारे प्रल्हादाला ठार म...

मनाचे श्लोक भाग ३३

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३३ वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा| शशी सूर्य तारांगणे मेघमाला| चिरंजीव केले जनी दास दोन्ही | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३३| अर्थ  ही सृष्टी म्हणजे भगवंताची लीला आहे. त्यासृष्टीत मेरूमांदार आदी पर्वत आहेत. चंद्र, सूर्य आणि तारांगणे आहेत. मेघमाला आहेत. ही सृष्टी आहे तोपर्यंत हनुमान आणि बिभीषण दोन्ही चिरंजीव आहेत. प्रभू रामचंद्रांनी आपल्या या दोन्ही दासांना चिरंजीव केले आहे.  दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाही. ( मेरू - स्वर्ग, मत्यू, पाताळ यांना आधारभूत असलेला सोन्याचा पर्वत. मांदार - समुद्रमंथनाचे वेळी या पर्वताचा रवी म्हणून वापर केला गेला ) विवेचन  समर्थांनी आपल्याला मागील श्लोकात भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करून सांगितले आहे या श्लोकात ते आपल्याला सांगतात की आपल्याला ही जी सृष्टी दिसते आहे ती म्हणजे केवळ भगवंताची लीला मात्र आहे. मेरू आणि मांदार हे दोन्ही पर्वत, चंद्र, सूर्य, अगणित तारे आणि तारका, असंख्य अशा आकाशमाला, बरसणारे ढग या सगळ्या गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत.  मेरू ...

मनाचे श्लोक भाग ३२

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३२ अहिल्या शिळा राघवे मुक्त केली| पदी लागता दिव्य होऊन गेली | जया वर्णिता शीणली वेदवाणी |नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३२| अर्थ  श्रीरामांच्या पदाचा स्पर्श होताच शिळा झालेली शापित अहिल्या मुक्त झाली. त्यांच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. अशा या भगवंताचे वर्णन करताना वेद सुद्धा शीणले आहेत म्हणजे थकले आहेत किंवा त्याचे वर्णन ते करू शकत नाहीत. असा हा अहिल्येचा उद्धार करणारा भगवंत आपला देखील उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. विवेचन  या श्लोकांमध्ये समर्थ भगवंताच्या पराक्रमाचे आणि गुणांचे वर्णन करत आहेत आणि आपल्या भक्तांना तो कशाप्रकारे तारतो हेच यातून आपल्या मनावर ठसवत आहेत. आधीच्या श्लोकामध्ये भगवान रामाने रावणाच्या बंदिवासात असलेल्या देवांना मुक्त केले असे समर्थांनी सांगितले. या श्लोकात श्रीरामांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा कसा उद्धार झाला ही गोष्ट ते आपल्याला सांगत आहेत. अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी अत्यंत रुपवती आणि शीलवती होती तसेच ती महान साध्वी आणि पतिव्रता होती. इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला आणि गौतम ऋषींचे रूप घेऊन त्या...

मनाचे श्लोक भाग ३१

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३१ महा संकटी सोडिले देव जेणे| प्रतापे बळें आगळा सर्वगूणें| जयाते स्मरे शैलजा शूलपाणी| नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३१| अर्थ  सर्व देवांवर जेव्हा अत्यंत कठीण संकट आले तेव्हा प्रभू रामचंद्राने त्यांना त्यातून सोडवले. असा तो श्रीराम पराक्रमाने, बळाने आणि सर्व गुणांनी संपन्न आहे. प्रत्यक्ष भगवान शंकर आणि पार्वती त्याचे स्मरण करतात. असा हा दासाभिमानी असलेला भगवंत आपल्या दासाची म्हणजेच भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही. विवेचन  मागील श्लोकात भगवंताचे सेवक असलेल्या व्यक्तीकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाची हिंमत नाही असे समर्थांनी सांगितले आहे. या श्लोकात तो भगवंत कसा श्रेष्ठ आहे ते सांगताना त्याच्या गुणांचे किंवा चरित्राचे गुणवर्णन समर्थ करतात. रावण हा महापराक्रमी होता परंतु आपल्या सामर्थ्याचा त्याने दुरुपयोग केला आपल्या सामर्थ्याच्या बळावर त्याने देवांनाही बंदिवान केले. हे म्हणजे देवांवर आलेले मोठे संकट होते. श्रीरामांनी रावणाशी युद्ध करून सीतेची सुटका केली, अनितीने वागणाऱ्या रावणाचा वध केला आणि त्याच्या बंदीवासात असलेल्या देवांना मुक्...

मनाचे श्लोक भाग ३०

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ३० समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे ? जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३०| अर्थ  एकदा का आपण भगवंताचे सेवक झालो की आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहण्याची कोणाचीही हिंमत नाही, (अगदी कळीकाळाची देखील नाही.) अशा या समर्थाची म्हणजेच भगवंताची स्तुती तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ करीत असतात. असा हा भगवंत आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही. विवेचन  "नुपेक्षी कदा राम दासाभिमानी"या श्लोकांच्या मालिकेतील हा अतिशय सुंदर श्लोक आहे. या ठिकाणी समर्थ आपल्याला भगवंत आपल्या भक्ताची किती काळजी घेतात हे पुन्हा आपल्या मनावर ठसवतात. मात्र त्यासाठी समर्थाचा म्हणजे भगवंताचा सेवक आपण झाले पाहिजे.  सेवक म्हणजे नोकर असे समजायचे का ? या दोन शब्दातील अर्थांमध्ये फरक आहे. सेवक म्हणजे अशी व्यक्ती की जी निरपेक्ष भावाने सेवा करते आणि नोकर म्हणजे जो पगाराच्या अपेक्षेने काम करतो. भगवंताची अशी निरपेक्ष भावाने सेवा करणारा सेवक आपल्याला व्हायचे आहे. ही अपेक्षा या ठिकाणी आहे. यासाठी आपण श्रीरामांचा नि...

मनाचे श्लोक भाग २९

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २९ पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे | बळें भक्तरीपूशिरी काम्बि वाजे | पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं| नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|२९| अर्थ : आपल्या भक्तांचे रक्षण करणारा हे त्या राघवाचे वचन पदोपदी गाजत आहे म्हणजेच त्याचा जयघोष सर्वत्र ऐकू येतो. त्याच्या भक्तांच्या शत्रूवर ( त्यांच्या डोक्यावर ) तो जोराने आपल्या धनुष्य दंडाचा प्रहार करतो. प्रभू रामचंद्रांनी ( आणि श्रीकृष्णांनी सुद्धा ) आपल्या नागरिकांना आपल्या सोबत ( त्यांच्या रक्षणासाठी )विमानात बसवून नेले. असा हा परमेश्वर ( राम ) तुझी कधीही उपेक्षा करणार नाही. ( ब्रीद - प्रतिज्ञा, रिपु - शत्रू, कांबी - धनुष्याची कांबीट/कामठा, पुरी - नगरी) विवेचन: मागील श्लोकात समर्थांनी धनुष्य धारण ( कोदंडधारी ) केलेला राम आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ कसा सज्ज आहे हे सांगितले. या श्लोकामध्ये भक्तांचे रक्षण करणे हे परमेश्वराचे ब्रीदच आहे हे समर्थ परत ठामपणे आपल्या मनावर बिंबवतात. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या निर्दालनासाठी भगवंत अवतार धारण करतात. जगामध्ये सामान्य माणसे, संत महंत आणि परमेश्वराचे कार्य करण्य...

मनाचे श्लोक भाग २८

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग २८ दिनानाथ हा राम कोदंडधारी | पुढे देखता काळ पोटी थरारी | जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी | नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |२८| अर्थ: श्रीराम हा दीनांचा कैवारी/रक्षणकर्ता आहे. धनुर्धारी रामाला समोर पाहिल्यानंतर प्रत्यक्ष काळ म्हणजे यमराजाला देखील धडकी भरते. हे वाक्य सत्य समजा की भगवंत आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आणि त्याचे रक्षण करणारा आहे. तो त्याची कधीही उपेक्षा करत नाही. ( कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण केलेला, वाक्य - वचन, नेमस्त - निश्चितपणे ) मागील श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी म्हणजे प्रपंचाच्या भीतीने हे मानवा तू का घाबरतोस ? या श्लोकात ते भगवंत आपला रक्षणकर्ता कसा आहे आणि तो आपल्या भक्तांची उपेक्षा कशी करीत नाही हे समर्थ निरनिराळ्या प्रकारे आपल्या मनावर बिंबवतात. त्यासाठीच भगवंत आपल्या दासाची/भक्ताची उपेक्षा करीत नाही हे सांगणारे ( नुपेक्षी कदा राम दासाभिमानी )हे पालुपद असलेले बरेच श्लोक आहेत. मनुष्य अनेक अर्थाने दुबळा किंवा परावलंबी असतो. संकटप्रसंगी त्याला कोणाचा तरी आधार हवा असतो. कधी कधी हा आधार...

दारावरची विद्यापीठ

उगवतीचे रंग दारावरची विद्यापीठे चाळीसगावसारख्या छोट्या शहरात राहण्याचे एक विशेष सुख आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दार उघडे ठेवले तरी मस्त मनोरंजन होत राहते. टीव्हीची गरज नाही, OTT ची गरज नाही. फक्त कान उघडे ठेवा आणि बसा एन्जॉय करत. बॅकग्राऊंडला मोकाट कुत्र्यांच्या ओरडण्याचे संगीत असतेच ! माझ्या घरासमोरून रोज जे विक्रेते जातात, त्यांनी मला गेल्या काही वर्षांत असे काही शिकवले आहे, जे कोणत्याही विद्यापीठाने शिकवले नसते. सकाळचे नऊ वाजले की पहिला भंगारवाला हजर. तो ओरडतो  "वह्या... पोस्तके... रद्दी... भंगार..." आता "पोस्तके" हा शब्द ऐकला की माझ्या मनात एक प्रश्न येतो की पोस्तके म्हणजे नक्की काय? पोस्टाने आलेली पत्रे? की पुस्तकांचे कुठले नवे अपभ्रंशित कुळ? मला तर एकदा त्याला थांबवून विचारावेसे वाटले, "अरे बाबा, पुस्तके म्हण की — पोस्तके काय प्रकार आहे?" पण मग विचार केला जाऊ द्या. उगाच त्याच्या व्यवसायात भाषेचा हस्तक्षेप नको. दुसरा भंगारवाला प्लॅस्टिकची मोडतोड करणारा. तो ओरडतो — "पलॅस्टिक भंगार... पलॅस्टिक..." "प्लास्टिक" या शब्दातील...

मनाचे श्लोक भाग २७

 उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग २७ भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासि सांडी । रघुनायकासारिखा स्वामी शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।।२७।। अर्थ : हे मना, एखाद्या भित्र्या माणसासारखा तू प्रपंचाला का घाबरतोस? भीती सोडून धैर्य धारण कर. कारण तुझ्या पाठीशी रघुनायकासारखा स्वामी असताना घाबरण्याचे काहीच कारण नाही. अगदी यमाचा कोप झाला तरी तो तुला कधीही सोडणार नाही, तुझी उपेक्षा करणार नाही. (भव – प्रपंच, लंडी – भित्रा/कमजोर मनाचा, दंडधारी – यम) विवेचन : मानवी जीवन हे अनेक अनिश्चिततांनी भरलेले आहे. उद्या काय होईल याची चिंता, नोकरीची काळजी, मुलाबाळांचे भविष्य, आरोग्य, आर्थिक स्थिती अशा असंख्य विचारांनी मन व्यापलेले असते. त्यामुळे माणूस आतून अस्वस्थ आणि भयग्रस्त होतो. प्रपंचाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे, पण त्या भीतीने खचून जाणे योग्य नाही. म्हणून समर्थ या ठिकाणी आपल्या मनाला धीर देतात “धरी रे मना धीर, धाकासि सांडी”  हे मना, तू भीती झटकून टाक आणि धैर्याने उभा रहा. आपले जीवन हे जर एक रणांगण मानले, तर या रणांगणावर शूरवीराप्रमाणे लढणे आवश्यक आहे. हातात तलवार...

मनाचे श्लोक भाग २६

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग २६ देहे रक्षणाकारणे येत्न केला । परी सेवटी काळ घेऊनि गेला । करी रे मना भक्ती या राघवाची । पुढे अंतरी सोडी चिंता भवाची ।।२६।। अर्थ : मनुष्य आपल्या देहाचे रक्षण व्हावे म्हणून खूप प्रयत्न करतो, त्याची काळजी घेतो. परंतु शेवटी काळ (मृत्यू) त्याला घेऊन जातोच. म्हणून हे मना, तू राघवाची भक्ती कर आणि मनातील संसाराची ( भवाची )चिंता सोडून दे. विवेचन : मागील श्लोकात समर्थांनी सुख-दुःखाच्या चक्राचे वास्तव आपल्यासमोर ठेवले. या श्लोकात त्याच विचाराला पुढे नेत ते देहाभिमानाचे वास्तव आपल्यासमोर मांडतात. आपण आयुष्यभर देहाच्या रक्षणासाठी झटत असतो. देहबुद्धी इतकी प्रबळ असते की देहसुखालाच आपण खरे सुख मानतो. शरीराला आनंद मिळावा म्हणून माणूस विविध भोग-विलासात रमतो. काही जण तर केवळ खाणे-पिणे आणि मौजमजा हाच जीवनाचा उद्देश समजतात. पूर्वी चार्वाकांनीही “यावत् जीवेत् सुखं जीवेत्” असा भोगवाद मांडला होता. आज अनेकजण नकळत त्याच विचारसरणीचा स्वीकार करताना दिसतात. पण येथे समर्थांचा हेतू देहरक्षणाला नाकारण्याचा नाही. देहाची काळजी घेऊ नये असे ते म्हणत नाहीत. उलट, देह ही एक मौ...

मुगल ए आजम

मुगले आजम - पुस्तक परिचय डॉ मीना श्रीवास्तव हे नाव माझ्या माहितीनुसार बहुतेक मराठी वाचकांना परिचित आहे. त्यांची लेखनशैली आवडणारे अनेक वाचक आहेत. माझ्या आजपर्यंत प्रकाशित झालेल्या सर्व पुस्तकांवर त्यांनी अत्यंत ओघवत्या आणि लालित्यपूर्ण भाषेत परीक्षणे लिहिली आहेत. त्याचप्रमाणे माझ्या लेखावर त्यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रतिक्रिया वाचक वर्गाची दाद घेऊन गेल्या आहेत. माझ्या ' रामायण महत्व आणि व्यक्तीविशेष' या आणि 'महर्षी वाल्मिकी' या दोन्ही पुस्तकांचे त्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये केलेले अनुवाद रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. तसेच प्रा. हेमंत सामंत यांच्या मराठी लेखांवर आधारित त्यांची दोन हिंदी अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचे लेखन वाचताना वैद्यकीय व्यवसायात असलेली ही व्यक्ती इतके सुंदर मराठी लेखन करू शकते याचेही आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मुगले आजम म्हणजे काळाच्या पडद्यावर अमिट ठसा उमटवून गेलेली अजरामर कलाकृती. हा चित्रपट १९६० मध्ये प्रदर्शित झालेला असला तरी त्यातील कथा आजही ताजी आणि टवटवीत वाटते. ही प्रेम कथा म्हणजे कलेच्या प्रांतातील सगळ्याच...