मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खरोखरच आपण सुखी आहोत का ?

उगवतीचे रंग   खरोखरच आपण सुखी आहोत का ?  खरोखरच आपण सुखी आहोत का असा प्रश्न जेव्हा आपण स्वतःला विचारतो, तेव्हा खरं तर आपण त्याबद्दल साशंक असतो. मानवी जीवनात सुख आणि दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच असतो. कधी कधी तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशीही परिस्थिती असते. पण परिस्थिती कशीही असली तरी आनंदी राहणे, समाधानी राहणे आपल्याच हातात असते. सुख आणि दुःख हे बाहेरील घटनांवर जरी अवलंबून असले तरी सुख आणि दुःख या आपल्या मनाच्या अवस्था आहेत. सुख आणि दुःख या गोष्टी सापेक्ष आहेत. एका व्यक्तीला ज्या परिस्थितीत सुख वाटेल, त्यात दुसऱ्याला वाटेलच असे नाही. उदाहरण सांगायचं झालं तर मला प्रवास आवडतो, गाणी ऐकायला आवडतात. पण सगळ्यांना या गोष्टी आवडतीलच असे नाही.  पण आपण सुखी आहोत का यापेक्षा आपण समाधानी आहोत का असा प्रश्न खरं तर आपण स्वतःला विचारायला हवा. कारण आपल्या सुखाच्या कल्पना याच बहुधा आपल्याला त्रासदायक ठरतात. सुखाचा पाठलाग कधीच संपत नाही. पण समाधान मात्र कोणत्याही परिस्थितीत मिळू शकते. आज  सायकल ही माझी गरज आहे. ती मिळाली की मी आनंदी होईन असे मला वाटते. मला सायकल मि...

आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग चार

उगवतीचे रंग   आमची पहिलीवहिली युरोपवारी - भाग चार  भाग तीनमध्ये लंडन शहराचे दर्शन आपण घेतलं. लंडनच्या थेम्स नदीचा नेत्रसुखद नजारा, बेकर स्ट्रीट, बकिंगहॅम पॅलेस, मादाम तुसाँ वॅक्स म्युझियम पाहिलं. बर्ड आय व्ह्यू सारखा लंडन आय मधून दिसणारा मनमोहक नजारा न्याहाळला. संध्याकाळी मस्तपैकी क्रूझमधून थेम्सनदीच्या परिसरात भ्रमंती केली. काही गोष्टी बसमधून ओरिएन्टेशन टूरचा एक भाग म्हणून पाहिल्या. हॉटेल मुमताज मध्ये भारतीय पद्धतीचे जेवण घेतलं. खूप काही पाहिलं आणि खूप काही पाहायचं राहिलं ही काहीशी सुखद आणि काहीशी हुरहूर लावणारी भावना सोबत घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच लंडनला बाय बाय करणार होतो. दिवसभराचे दमलेले आम्ही आता हॉटेल मॅरिएट मध्ये छानपैकी आराम करू असे मनाशी ठरवले होते. पण ट्रीपच्या वेळापत्रकाप्रमाणे आम्हाला वागावंच लागणार होतं. आमचे सहल व्यवस्थापक राहुल देसाई यांनी सांगितलं की उद्या सकाळी सगळ्यांनी अडीच वाजताच उठून तयार होऊन ३. २० ला बसमध्ये बसायचं आहे. लंडन स्टेशनवरून आम्ही फ्रान्सला जाण्यासाठी युरोस्टार ट्रेन पकडणार होतो. सुदैवानं या वेळी वीणा वर्ल्डला युरोस्टार ट्रेनची तिक...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ११

उगवतीचे रंग   रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ११  टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी एक सुंदर आणि हळवी कहाणी मागील दहा भागात आपण रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी होत गेली ते आणि त्यांच्या शिक्षणविषयक कल्पना त्यांनी शांतिनिकेतनमध्ये प्रत्यक्षात कशा आणल्या, त्याबद्दल सविस्तर चर्चा केली. यापुढील काही भागात आपण टागोरांच्या साहित्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याआधी रवींद्रनाथांच्या जीवनात ज्या एका घटनेचा महत्वाचा संबंध आहे, ती घटना जाणून घेणार आहोत. या गोष्टीचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हीच गोष्ट महाराष्ट्र आणि प. बंगालमधील एक दुवा आहे. टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी ही एक सुंदर आणि हळवी कहाणी. काहीशी हुरहूर लावून जाणारी.  शाळेत रवींद्रनाथांचं लक्ष लागत नव्हतं. इतर विद्यार्थी आणि हा जन्मजात प्रतिभेचं देणं घेऊन आलेला विद्यार्थी यांच्यामध्ये जमीनअस्मानाचं अंतर होतं. शिक्षणाच्या तत्कालीन पारंपरिक चौकटीत बसणारं हे व्यक्तिमत्व नव्हतं. पण रवींद्रनाथांचा कौटुंबिक वारसा अतिशय उज्ज्वल आणि संपन्न होता हे आपण मागील काह...

आमची पहिलीवहिली युरोप वारी - भाग ३

 उगवतीचे रंग  आमची पहिलीवहिली युरोप वारी - भाग ३  दिवसभराच्या प्रवासाने गाढ झोप लागली होती पण सकाळी लवकर उठून लंडन शहर पाहण्यास जायचे असल्यामुळे पाच वाजेचा अलार्म लावला होता. सात वाजेपर्यंत सर्व आवरून खाली नाश्त्यासाठी गेलो. एवढ्या सकाळी नाश्ता करण्याची सवय नव्हती परंतु लंडन शहर पाहण्यासाठी जायचे असल्यामुळे नाश्ता करावा लागला. कारण जेवण केव्हा मिळेल ते सांगता येत नव्हते. खाली हॉलमध्ये नाश्त्याची व्यवस्था केलेली होती. सकाळचे प्रसन्न वातावरण होते. विविध गौरवर्णीय, कृष्णवर्णीय आणि पर्यटनासाठी आलेल्या लोकांची त्या ठिकाणी धावपळ सुरू होती. नाश्त्यासाठी ब्रेडचे विविध पदार्थ होते त्याचप्रमाणे चहा, कॉफी, दूध त्याचप्रमाणे विविध प्रकारचे कॉर्न फ्लेक्स ब्रेकफास्टसाठी ठेवलेले होते. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज पदार्थही उपलब्ध होते. आठ वाजेपर्यंत आम्ही सर्व आवरून आमच्या मर्सिडीज बेंझ या सुंदर अशा बसमध्ये जाऊन बसलो आणि आमची बस लंडन शहराची सफर सुरू झाली. स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला होता. सर्वत्र अतिशय प्रसन्न वातावरण होते. स्वच्छ सूर्यप्रकाश असला की लंडनमधील लोक कमालीचे खुश असतात. बरेच ...

आमची पहिलीवहिली युरोपवारी ( भाग २ )

  उगवतीचे रंग  आमची पहिलीवहिली युरोपवारी ( भाग २ ) मुंबई विमानतळावरून सुटलेले विमान लंडनच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. तसे काही विमानात पहिल्यांदाच बसलो होतो असे नव्हे. यापूर्वी भूतानला जाताना, तसेच राजस्थान, बंगलोर आदी ट्रीप करताना विमानप्रवास झाला होता. तरी असा लांबचा प्रवास पहिल्यांदाच होत होता. आपण मुंबईहून केवळ साडेनऊ तासात चक्क लंडनला पोहोचणार याची एक वेगळीच भावना मनात येऊन एक प्रकारची उत्सुकता आणि अनोख्या आनंदाची भावना होती. पूर्वीच्या काळी जेव्हा जलमार्गाने प्रवास होत होता, तेव्हा अशा ठिकाणी पोहोचण्यास चक्क काही महिने लागत. आज तो प्रवास एका दिवसात नव्हे तर काही तासात होणार होता.  विमानातील सर्व सीट प्रवाशांनी भरले होते. बसण्यासाठीची जागाही तशी फार ऐसपैस नव्हती. त्यामुळे साडेनऊ तास कसे जाणार हा प्रश्न होता. पण तसे काही फारसे जाणवले नाही. बसल्याजागी थोडावेळ डुलकी घेतली. विमानात हवाई सुंदरींची लगबग चालू होती. वेळोवेळी चहापाणी, नास्ता आणि जेवण अगत्यपूर्वक दिले जात होते. प्रत्येक व्यक्तीच्या पुढे एक छोटासा टीव्ही स्क्रीन होता. त्यावर विविध चॅनल्स, सिनेमा आदी करमणुकीच...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग १० )

  उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग १० )  सहजता ' हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण मी आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलं. पण रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार मलाही अंतर्मुख करून गेले. आपले डोळे आणि कान उघडे असतील,तर माणूस आयुष्यभर शिकतच असतो. आणि असंच आपण शिकलं पाहिजे असं रवींद्रनाथांना वाटायचं. एकदा शांतिनिकेतनात आलेली मुलं आपलं शिक्षण पूर्ण करून शांतिनिकेतनच्या बाहेर पडली तरी मनानं त्यांनी तेथेच असावं. आयुष्यभर विद्यार्थीच राहावं आणि नवनवीन गोष्टी आत्मसात करीत राहाव्यात असं त्यांना वाटायचं. लहान मुलांपासून ते विश्वविद्यालयात शिक्षण घेणारी सर्व प्रकारची मुले त्यांच्या शांतिनिकेतन आणि विश्वभारतीत होती. मुलांनी शिक्षण घेता घेता त्यांचे आपापसातील भेद मावळावेत, आपण सर्व एक आहोत अशा प्रकारची बंधुत्वाची जाणीव त्यांच्यात निर्माण व्हावी अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे   हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर आपणचि जाला ।। अशीच त्यांचीही भावना होती. त्यासाठीच विश्वभारतीची स्थापना त्यांनी केली हो...

आमची पहिलीवहिली युरोपवारी ( भाग १ )

  उगवतीचे रंग आमची पहिलीवहिली युरोपवारी ( भाग १ ) आयुष्यात एकदा तरी युरोपला जावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण सगळ्यानांच ते शक्य होईल असं नाही. माझ्या मनात अनेक वर्षांपासून युरोपवारीचे स्वप्न घोळत होते. त्यासाठीच्या पैशाची व्यवस्था कशी करावी याचा मोठा प्रश्न होता. युरोपवारी म्हणजे किमान काही लाख रुपयांचा खर्च ! पण जायचं हे तर मनात होतंच. सुदैवाने तो योग जुळून आला. आणि मग परदेशवारीच्या स्वप्नांना पंख फुटले. सुरुवातीला सिंगापूर, मलेशिया, थायलंड ही ट्रीप करावी असे वाटत होते पण मुलांनी त्याऐवजी आम्ही युरोप ट्रीपलाच जावे असा आग्रह धरला आणि आमची त्यासाठीची संशोधन मोहीम सुरु झाली. मग वीणा वर्ल्डची जाहिरात पाहण्यात आली. त्यात साधारणपणे दहा दिवसात युरोपातील चार देश दाखवणार होते. इंग्लंड, फ्रांस, स्वित्झर्लंड आणि इटली. आम्ही या ट्रीपची निवड केली. ट्रीप २ जून ते १० जून २०२४ अशी होती. सुरुवातीचे पैसे भरले. आणि मग पुढील धावपळ सुरु झाली. या देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता असते. त्यासाठी त्याआधी तुमचा पासपोर्ट तयार असावा लागतो. आमच्याकडे तो होता. आम्ही पुण्यातूनच बुकिंग केले होते. व्हिसा...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ९ )

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ९ ) कमालीचा साधेपणा  आणि  मनाची श्रीमंती महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि इतर काही महत्वाच्या नेत्यांनी  स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन लोकांना केले होते. त्याची सुरुवात बंगालमध्येच कलकत्याच्या टाऊन हॉलमध्ये ऑगस्ट १९०५ मध्ये अधिकृतपणे झाली. बंगालच्या फाळणीला लोकांचा विरोध होता. हा विरोध लोकांनी ' वंदे मातरम ' गाऊन व्यक्त केला. एकतेचा निर्धार केला. या प्रसंगी रवींद्रनाथांनी ' आमार शोनार बांगला ' या गीताची रचना केली. पुढे हे गीत बांगला देशाचे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विदेशातून आलेले कापड वापरायचे नाही असा निर्धार केला.  रवींद्रनाथ आणि त्यांचे सहकारी शांतिनिकेतनमध्ये स्वदेशी वापरावरच भर देत होते. स्थानिक कारागिरांनी हातमागावर तयार केलेले कापड रवींद्रनाथ, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी वापरत असत. त्या कापडावर स्थानिक कारागिरांनी सुरेख असे नक्षीकाम केलेले असे. टागोरांच्या शांतिनिकेतनात श्रीमंती आणि ऐश्वर्याला स्थान नव्हते. पण तेथील लोकांची मनाची श्रीमंती इत...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - ( भाग ८ )

उगवतीचे रंग   रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग ८ ) शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच रवींद्रनाथांच्या काळातील एक प्रसंग आहे. बिहारमध्ये एकदा एका मोठ्या शाळेच्या इमारतीची पायाभरणी होती. या कार्यक्रमाला तत्कालीन व्हॉईसरॉय साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. या कार्यक्रमात बोलताना त्या साहेबांनी म्हटले की उत्तम शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी शाळेची इमारत उत्तम हवी. सर्व भौतिक सुविधांनी युक्त असं ते ठिकाण असायला हवं. अर्थातच रवींद्रनाथ व्हॉईसरॉय साहेबांच्या या मताशी अजिबात सहमत नव्हते. या साहेबांच्या विधानावर टीका करताना त्यांनी फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, ' जेवणासाठी चांदीचे ताट असले तर उत्तमच ! पण महत्वाचे असतात ते ताटातील पदार्थ. ते पदार्थ उत्तम आणि स्वादिष्ट असतील तर जेवणासाठी केळीचे पान सुद्धा चालते. भारतातील लोकांना याची चांगली जाण आहे. श्रीमंत असो वा गरीब, केळीच्या पानावरही ते आनंदाने जेवतात. जेवण सुग्रास आणि रुचकर असलं म्हणजे झालं.  दुर्दैवानं रवींद्रनाथांनी जे अनेक वर्षांपूर्वी सांगितलं ते आजही जसंच्या तसं आमच्या काही शाळांना आणि आमच्या मनोवृत्तीला ल...

मी का लिहितो ?

  उगवतीचे रंग मी का लिहितो ? मध्यंतरी मला कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की मी का लिहितो ? हा प्रश्न म्हणजे मी अन्न का खातो, मी पाणी का पितो, मी श्वास का घेतो असे विचारण्यासारखे आहे. मी का खातो, का पितो आणि का श्वास घेतो या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. आणि ते म्हणजे जगण्यासाठी. जगण्यासाठी या तीन गोष्टी जर आवश्यक असतील तर माझ्या दृष्टीने आणखी काही गोष्टींची भर त्यात घातली पाहिजे. त्या म्हणजे वाचणे, लिहिणे, साहित्याचा आस्वाद घेणे, मनमुराद भटकंती करणे, संगीत ऐकणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे समोरच्याशी संवाद साधणे . मला माहिती आहे की, या सगळ्या गोष्टी नाही केल्या तरी माणूस जगू शकेल. ' लेकिन ये जीना भी कोई जीना है ' अशी आपली अवस्था होईल. इतर प्राणी आणि माणसाच्या जगण्यात फरक राहणार नाही. ज्याला मन आहे तो माणूस. आणि आपण माणूस आहोत. एक चिनी म्हण आहे, ' तुम्हाला दोन पैसे सापडले तर, एक पैशाची भाकरी घ्या आणि एका पैशाचे गुलाबाचे फुल घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल , आणि कसे आणि का जगायचे हे गुलाबाचं फुल शिकवेल. काय शिकवतं बरं गुलाबाचं फुल आपल्याला ? गुलाब काट्यांवर फुलतो. काट्यांची पर...

वस्त्र विणिले पांडुरंगे...

  उगवतीचे रंग  वस्त्र विणिले पांडुरंगे...  कवी पी सावळाराम यांचं  ' धागा धागा अखंड विणू या ' हे अतिशय अप्रतिम गाणं आशा भोसले यांनी इतकं गोड आणि जीव ओतून म्हटलं आहे की त्यातील भाव थेट मनाला भिडतो. कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकत राहावंसं वाटतं. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे  अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे  विविधरंगी वसुंधरेचे वस्त्र   विणिले पांडुरंगे  पांडुरंगाचं केलेलं हे वर्णन आपल्या भारतवर्षाला फार चपखल लागू पडतं. केवढा विशाल हा देश ! आसेतु हिमाचल पसरलेला. विविध राज्यं, विविध भाषा, विविध संस्कृती. पण विठ्ठलरूपी धाग्यानं हा देश अखंड जोडला गेला आहे. आषाढी एकादशी जसजशी जवळ येते, तसतसे वारकऱ्यांना वेध ते विठुरायाच्या दर्शनाचे. आणि या वारीने भारतदेश जोडला गेला आहे. पंढरपूर महाराष्ट्रात आहे, आणि वारीही होते महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर. पण म्हणून केवळ महाराष्ट्रातीलच लोक वारीला जातात असा आपला समज असेल तर तो चुकीचा आहे. म्हणूनच वरील गीतात म्हटल्याप्रमाणे या देश विठ्ठलभक्तीचा उभ्या आडव्या धाग्यांनी जोडला गेला आहे. विठ्ठलानेच हे सुंदर वस...

जाते थे जापान..

 उगवतीचे रंग  जाते थे जापान... ' चलती का नाम गाडी ' या चित्रपटात किशोरकुमारचं एक धमाल मस्ती गाणं आहे. तशी त्या चित्रपटातील सगळीच गाणी अप्रतिम. अगदी ' हाल कैसा हैं जनाब का...' पासून. मधुबाला, किशोरकुमार यांचा अप्रतिम अभिनय आणि एस डी बर्मन यांचं कर्णमधुर संगीत. या त्रिकुटाचा फॉर्म्युला एखाद्या घट्ट बासुंदीसारखा जमून आला आहे. आपण फक्त वाटी तोंडाला लावायची. किशोरदांच्या जोडीला आशा भोसलेंचा खेळकर, अल्लड आणि चंचल आवाज. चित्रपट संगीताच्या रसिकांना आणखी काय हवं ? ऐकणाऱ्याचे कान १००% तृप्त होणारच याची फुल गॅरंटी ! पण तुम्हाला सांगू का मला या चित्रपटाबद्दल किंवा या गाण्यांबद्दल मुळीच बोलायचं नाही. मग तुम्ही म्हणाल ' जाते थे जापान पहुंच गये चीन समझ गये ना...' या गाण्याचा सुरुवातीलाच उल्लेख करायचं काय कारण ? या गाण्याची आठवण का आली ? खरं तर केवळ याच गाण्याची नाही तर ' ज ' वरून जी जी गाणी आहेत, ती ती आम्हाला आठवायला लागली. नव्हे डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागली. तुम्ही म्हणाल आता जी काय भानगड आहे ती जरा स्पष्ट करून सांगा की.  हो हो, काळजी करू नका. ' जे आहे ते '...

‘ प्लॅस्टिक मुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल...’

(आज आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन आहे त्यानिमित्ताने...) ‘ प्लॅस्टिक मुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल...’ एखाद्या गोष्टीचे दुष्परिणाम कळल्यानंतरही आपण काही वेळा ती गोष्ट करण्याचे सोडत नाही. आपल्या महाराष्ट्र राज्याने सुद्धा काही वर्षांपूर्वी प्लास्टिक मुक्तीची घोषणा केली होती. त्यामुळे काही काळापुरता का होईना पण प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद झाला होता. खरोखर प्रश्न असा पडतो की कुठलीही गोष्ट कायद्याचा बडगा उगारला की मगच आपण का करतो ? अशा गोष्टी स्वयंस्फूर्तीने आपण  का करीत नाही ? काही काळासाठी बंद झालेला हा प्लास्टिक पिशव्यांचा वापर आता मोठ्या प्रमाणावर पुन्हा सुरू झाला आहे आणि प्लास्टिक पिशव्या बंदीची ही चळवळ पुन्हा हाती घेण्याची आवश्यकता आहे. खरं तर प्लास्टिकचे दुष्परिणाम आपल्याला अनेक वर्षांपासून लक्षात आले आहेत. शेकडो वर्षे ते नष्ट होत नाही. त्याचे विघटन होत नाही वगैरे. तरीही आम्ही वापरायला सोयीस्कर म्हणून त्याचा वापर करीतच राहतो. कोणत्याही दुकानात गेलो की दुकानदाराला आपणच ‘ अहो, प्लीज कॅरी बॅग द्या ना ‘ म्हणून आपणच मागे लागतो. घरी मग अशा प्लास्टिक पिशव्यांचा ढीग साचत असत...