मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
उगवतीचे रंग  आनंद आणि उत्साहमूर्ती : श्री गुरुमूर्ती सर   आपल्या जीवनात आपल्याला अशा काही व्यक्ती भेटतात की एकदा भेटल्यानंतर त्या आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन राहतात. आम्हाला अशीच भेटलेली एक व्यक्ती म्हणजे कर्नाटकातील होस्पेट येथील श्री ए एम गुरुमूर्ती सर. खरे तर सी ए असलेली माझी मुलगी सारिका आणि जावई श्री सतीशराव यांच्या ते परिचयाचे. त्यांच्या माध्यमातूनच आमची आणि त्यांची भेट, ओळख झाली. त्यानंतर गुरुमूर्ती सर म्हणजे आमच्या कुटुंबाचा एक भाग होऊन गेले. त्यांच्या आणि आमच्या परिचयाला आठ दहा वर्षे तरी झाली असतील. आमच्या कुटुंबात कोणताही अगदी छोटासा घरगुती कार्यक्रम असला तरी आम्हाला गुरुमूर्ती सरांची आठवण हटकून येते. आम्ही त्यांना हक्काने आणि प्रेमाने बोलावतो आणि तेही अगत्याने आमच्या कार्यक्रमाला येतात. ते चाळीसगाव सारख्या माझ्या गावी छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने दोन तीन वेळा येऊन गेले. पुण्यातही आमच्याकडे अनेकदा ते येऊन गेले. माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी एकदा ते चाळीसगावात आणि एप्रिल २०२२ मध्ये पुण्यात उपस्थित होते.  गावातल्या गावातही एखाद्या कार्यक्र...

मनोरथा चल त्या नगरीला...!

उगवतीचे रंग  मनोरथा चल त्या नगरीला...!  कर्नाटकमध्ये विजयनगर जिल्ह्यात होस्पेट ( ज्याचे नावही आता विजयनगर करण्यात आले आहे ) नावाचं छोटंसं गाव आहे. या होस्पेट गावाजवळ हंपी नावाचं ठिकाण आहे. माझे एक स्नेही श्री ए एम गुरुमूर्ती हे होस्पेटला राहतात. ते बऱ्याच वर्षांपासून आम्हाला त्यांच्याकडे यावं म्हणून आग्रही होते. अखेर ४ जून २०२२ ला तो योग जुळून आला. कर्नाटकातच बदामी येथे असलेली शाकंभरी देवी ही आमची कुलदेवता असल्याने तिच्या दर्शनासाठी आम्ही बदामीला गेलो. मी, माझी पत्नी सौ श्रद्धा, मुलगी सारिका आणि नातू स्वराज असे आम्ही चौघेजण कारने आधी सोलापूरला आणि मग दुसऱ्या दिवशी बदामीला गेलो. बदामीचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. जवळच पट्टदकल आणि ऐहोळ येथील पुरातन मंदिरे व  लेणी आहेत. आम्ही देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडतो न पडतो तोच आम्हाला घ्यायला श्री गुरुमूर्ती सर होस्पेटहून तिथे  हजर होते. गुरुमूर्ती सरांबद्दल मी पुढच्या भागात सविस्तर लिहिणार आहे. एक अतिशय लोभस आणि हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे गुरुमूर्ती ! त्यांच्यामुळेच हंपी हे पुन्हा एकदा पाहण्याचा योग जुळून आला.  ...