मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सात

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सात  ( नमस्कार. आज नववर्षाचा पहिला दिवस. २०२० हे वर्ष कोरोनाने ग्रासले होते. या नवीन वर्षावरही त्याचे सावट आहेच. त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्यासमोर त्याने उभ्या केल्या आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार या संदर्भात खूप काही करावे लागणार आहे. हा नववर्षाचा मंगल कलश नियतीने आज आपल्या हातात सोपवला आहे. त्याच्याकडे कसे पाहायचे ते आपल्या हातात आहे. पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा आहे हे ठरवण्याचं आपल्या हातात आहे. पण नवीन वर्ष नेहमीच नवीन आशा सोबत घेऊन येत असते. हा मंगल कलश आपण उत्साह, उमेद आणि सकारात्मक विचारांनी भरू या आणि दुःख, दैन्य, निराशा यांना हद्दपार करू या.  या वर्षात आपण सरदार पटेलांसारख्या महामानवाचे चरित्र पाहतो आहोत. सरदार पटेलांची देशभक्ती, निर्भयता, कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी, संकटांशी सामना करण्याची विजिगिषु वृत्ती आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल. त्यांचे चरित्र आपल्याला सांगते की संकटांशी सामना करण्यासाठी पोलादी मनगटाबरोबरच पोलादी मन हवे. ...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सहा

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग सहा   नागपूर सत्याग्रह, गुजरातमधील पूरपरिस्थीतीशी सामना आणि गुजरातमधील बोरसद आणि परिसरातील दरोडेखोरांचा बंदोबस्त या तीन यशस्वी लढ्यानंतर पटेलांचा चवथा लढा होता तो म्हणजे बार्डोली सत्याग्रहाचा. आजच्या या लेखात बार्डोलीच्या सत्याग्रहाचे हे लखलखीत आणि तेजस्वी पर्व आपल्याला समजून घ्यायचे आहे. या बार्डोलीच्या सत्याग्रहाने वल्लभभाई पटेलांना ' सरदार ' म्हणून ओळख मिळवून दिली.  गुजरातमधील बार्डोली  हे ठिकाण सुरत या शहरापासून अवघ्या बत्तीस किमी अंतरावर आहे. या सत्याग्रहाचे केंद्र बार्डोली होते म्हणून हा सत्याग्रह बार्डोलीचा सत्याग्रह म्हणून ओळखला जातो. तसा हा सत्याग्रह संपूर्ण गुजरातमध्येच पसरला होता. सुरत, भडोच, नाडियाद, अहमदाबाद इ शहरे त्याची प्रमुख केंद्रे होती. हा सत्याग्रह प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सत्याग्रह होता. या सत्याग्रहाचे बीजारोपण गांधीजींनीच केले होते. पण चौरीचौरा या गावात हा सत्याग्रह हिंसक बनला आणि जमावाने तेथील पोलिसचौकी जाळून टाकली. काही पोलीस त...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग पाच

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग पाच  सरदार पटेलांसारखे जे नेते असतात, त्यांना काही कौशल्ये जन्मजात लाभलेली असतात. एखादा प्रश्न मुळापासून सोडवणे, समस्या गंभीर होण्यापूर्वीच त्यावर उपाययोजना करून लोकांना दिलासा देणे, एखादा प्रश्न, समस्या किंवा योजना नियोजनबद्ध रीतीने मार्गी लावणे आणि असे करण्यात जर काही अडथळे येणार असतील तर त्यांची पर्वा न करता मोठ्या धाडसाने त्या गोष्टींना सामोरे जाणे ही त्यांची खासियत होती. असे नेते जनतेला लाभणे हे खरे म्हणजे जनतेचे भाग्यच ! १९२१ मध्ये अहमदाबादमध्ये जे काँग्रेसचे अधिवेशन भरले, त्यात पटेलांचे व्यवस्थापन कौशल्य प्रामुख्याने दिसून आले. या अधिवेशनाला तत्कालीन काँग्रेसचे प्रमुख नेते तर उपस्थित राहणारच होते पण देशाच्या विविध भागातून आणि ग्रामीण भागातून सुमारे पंधरा हजार लोक प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार होते. या अधिवेशनाचे नियोजन करण्याची जबाबदारी पटेलांनी घेतली. त्यांनी या अधिवेशनाचे इतके सुरेख नियोजन केले की कोणताही गोंधळ न होता हे अधिवेशन सुरळीतपणे पार पडले. शिवाय आपल्या ...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग चार

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग चार  आजच्या या भागात सरदार पटेल खेडा सत्याग्रहातून एक नेते म्हणून कसे पुढे आले हे आपण पाहणार आहोत. गुजरातमधील खेडा सत्याग्रह ही जशी भारताच्या  स्वातंत्र्य इतिहासातील एक अतिशय महत्वाची घटना आहे , तशीच सरदार पटेलांच्या जीवनातील सुद्धा. या लढ्याने त्यांना भारतीय स्तरावर नेते म्हणून एक वेगळी ओळख मिळवून दिली .  गांधीजींची आणि सरदार पटेलांची भेट झाली तेव्हा सरदार पटेल हे ४२ वर्षांचे होते, तर गांधीजी ४८ वर्षांचे. त्यावेळी गांधीजी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परत आले होतेआणि भारतात त्यांचे प्रचंड स्वागत झाले होते. अनेकांनी गांधीजींचे शिष्यत्व पत्करले होते. त्यात पंडित नेहरू, सी राजगोपालचारी यांच्यासारखे नेते तर होतेच पण सर्वसामान्य जनताही गांधीजींची अनुयायी बनली होती. काही मंडळी गांधीजींच्या कार्याने भारावून जाऊन त्यांची अनुयायी झाली होती, तर काही विचारपूर्वक. सरदार पटेलांनी गांधीजींचे शिष्यत्व विचारपूर्वक स्वीकारले. त्यांची वकिली ऐन भरात असताना आणि त्यांच्यावर त्यांच्या...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग तीन

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग तीन  वल्लभभाई बोरसदला वकिली करत असताना त्या ठिकाणी कधी कधी इंग्लंडहून कायद्याचे उच्च शिक्षण घेऊन आलेले बॅरिस्टर खटला चालवण्यासाठी येत असत. त्यांचा रुबाब काही वेगळाच असे. इतर सामान्य वकिलांना ते तुच्छ समजत. शिवाय ते इतर वकिलांपेक्षा जास्त फी आकारत. त्यांचे हे वागणे वल्लभभाईंना सहन होणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्यांनीही बॅरिस्टर बनण्याचा निर्धार केला. वल्लभभाईंनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की त्यापासून त्यांना कोणी परावृत्त करू शकत नसे. शिवाय ते अत्यंत कमी बोलत. आपण काय करायचे ठरवले आहे याची जाहीर वाच्यता ते कधीच करत नसत. त्यामुळे त्यांच्या बॅरिस्टर बनण्याच्या निर्णयापासून घरची मंडळी देखील अनभिज्ञ होती.  त्यांच्याजवळ बॅरिस्टर होण्यासाठी लागणारी कुशाग्र बुद्धिमत्ता होती. पण सामान्य कुटुंबातून आल्यामुळे पैशाचा अभाव होता.  बॅरिस्टर होण्यासाठी त्यांना इंग्लंडला जावे लागणार होते. त्यासाठी त्या काळात किमान दहा हजार रुपयांची आवश्यकता होती. त्यांनी आपल्या खर्चात काटक...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दोन

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग दोन  सरदार पटेलांचा जन्म नाडियाड या त्यांचं आजोळ असलेल्या गावी झाला. ३१ ऑक्टोबर १८७५ ही त्यांची जन्मतारीख. पटेलांच्या जन्माचा काळ भारतीय स्वातंत्र्याच्या दृष्टीने धामधुमीचा होता. स्वातंत्र्य चळवळींनी आणि घडामोडींनी मंतरलेला होता. त्यांचे वडील झव्हेरीभाई हे देशभक्त होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात त्यांनी भाग घेतलेला होता. १८७५ मध्येच बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदेमातरम लिहून अनेक देशभक्तांना प्रेरणा दिली होती. १८८५ मध्ये अॅलन ह्यूम यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली होती. अशा या काळात सरदार पटेलांचा जन्म झाला.  त्यांचं मूळ गाव होतं आणंद जवळील करमसाद. या गावी त्यांची वडिलोपार्जित शेती होती. असे असले तरी पटेलांचे कुटुंब सामान्य परिस्थितीतच दिवस कंठत होते. सरदार पटेलांना चार भाऊ होते. त्यांच्यापेक्षा मोठे तीन आणि एक लहान भाऊ. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण करमसाद या त्यांच्या गावीच झाले. पुढे मात्र ते शिक्षणासाठी नडियादला आणि त्यानंतर बडोद्याला गेले.  त्यांचे वडी...

भारतरत्नावली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एक

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  भारतरत्नावली  लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल - भाग एक  कालच म्हणजे १५ डिसेंबरला सरदार पटेलांची पुण्यतिथी होती. आजपासून आपण त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा आढावा घेणार आहोत. भारताचे पहिले गृहमंत्री, उपपंतप्रधान, एक सच्चे स्वातंत्र्यसैनिक आणि त्यावेळच्या राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणजे सरदार पटेल. त्यांच्याविषयी मी जसजसे वाचू लागलो, तसतसे या व्यक्तिमत्वाने मला अधिकाधिक प्रभावित केले. मग त्यांचा गुजरातमधील अलीकडेच उभारण्यात आलेला पुतळा ' द स्टॅच्यू ऑफ युनिटी ' माझ्या डोळ्यांसमोर आला. त्यांचे कार्य आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे यथार्थ प्रतीक म्हणजे स्टॅचू ऑफ युनिटी.  स्वातंत्र्यपूर्वकाळ आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड म्हटला की काही ठळक नावे आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यात प्रामुख्याने पंडित नेहरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यासारख्या व्यक्ती प्रमुख आहेत. या सगळ्या महान पुरुषांच्या यादीत सरदार पटेलांचे नाव घेतल्याशिवाय कोणताही इतिहासाचा लेख पूर्ण होऊ शकणार नाही, एवढे मोठे कर्तृत्व सरद...

भारतरत्नावली अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग पाच - अंतिम )

उगवतीच रंग  भारतरत्नावली  अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग पाच - अंतिम ) मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत - पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले  गुंजी हिंदी विश्वमें  स्वप्न हुआ साकार  राष्ट्रसंघ...

भारतरत्नावली अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग चार )

 उगवतीचे रंग  भारतरत्नावली  अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग चार ) अटलजींसारखा नेता म्हणजे भारतमातेला लाभलेलं दुर्मिळ रत्न..! राजकारणातल्या दलदलीत राहूनही हे कमळ फुलत राहिलं. त्यांचं सगळं जीवन म्हणजे कमलपत्रासारखं निर्लेप, निर्मोही. पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त, चिखल, दलदलीत राहूनही त्या सगळ्यांपासून अलिप्त. केवळ आनंद देणं हेच त्याचं काम. हे कमलपुष्प भारतमातेच्या चरणी जन्मापासूनच अर्पित झालं होतं, म्हणून तर अटलजी आजन्म अविवाहित राहिले. आपलं सगळं आयुष्य या महापुरुषाने भारतमातेच्या सेवेत व्यतीत केलं.  अनेकांच्या जीवनात चढउतार येतात, अपयशाचे कडू घोटही घशाखाली रिचवावे लागतात. तसे अटलजींनीही रिचवले. अनेकदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणिबाणीसारख्या प्रसंगी कारागृहात राहावे लागले. या काळात तब्येतीच्या अनेक तक्रारींनाही तोंड द्यावे लागले. 'की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने । जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।'या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे हे सतीचे वाण त्यांनी हेतुपुरस्सर स्वी...

भारतरत्नावली अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग तीन )

 उगवतीचे रंग  भारतरत्नावली  अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग तीन ) राजकारणासारख्या रुक्ष वातावरणात राहूनही अटलजींनी आपली काव्यप्रतिभा कधी कोमेजू दिली नाही. त्यांच्यातला लेखक आणि कवी त्यांच्यातल्या राजकारणी व्यक्तीला सदैव मार्गदर्शन करीत राहिला. त्यामुळे इतर राजकारणी व्यक्तींप्रमाणे अटलजींनी बोलताना कधी आपली मर्यादा ओलांडली नाही. देशभक्ती तर त्यांच्या नसानसात भिनली होती. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना अटकही झाली होती. पुढे ज्या संघाचं काम ते करीत होते, त्या संघावरही बंदी आली.  पण अटलजी विचलित झाले नाहीत. आपल्या ' कदम मिलाकर चलना ' होगा या कवितेत ते म्हणतात  बाधाए आती हैं आए,  घिरे प्रलय की घोर घटाए  पावोंके नीचे अंगारे  सिर पर बरसे यदी ज्वालाये,  निज हाथोंसे हसते हसते, आग लगाकर जलना होगा ! कदम मिलाकर चलना होगा ! हाच बाणा आणि हीच आग त्यांनी आयुष्यभर पेटती ठेवली. वेगळे वागणे त्यांना शक्यच नव्हते. याच सुमाराला अटलजी एक प्रभावी वक्ता म्हणून प्रसिद्धीस येत होते. आपल्या विदवत्तापूर्ण वक्तृत्वाने त्यांनी संघामध्ये एक वेगळ...

भारतरत्नावली अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग दोन )

 उगवतीचे रंग  भारतरत्नावली  अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग दोन ) अटलजी ग्वाल्हेरच्या कॉलेजातून हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या तीनही विषयात विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. अशा हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना तेव्हा ग्वाल्हेर संस्थानची शिष्यवृत्ती मिळत असे. ती अटलजींना सुद्धा मिळाली. पण अशा विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर संस्थानात काही काळ नोकरी करावी लागे. पण अटलजी ज्या निष्ठेने संघाच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य करीत होते, ते पाहून त्यांच्यासाठी ही अट  शिथिल करण्यात आली. या पुढील शिक्षणासाठी अटलजींनी कानपूरला जाण्याचे ठरवले. कानपूरला जाऊन एकाच वेळी एम ए आणि एल एल बी करण्याचा त्यांचा मानस होता.  पण यावेळी एक गमतीदार गोष्ट घडली. अटलजींच्या वडलांनी देखील त्यांच्या सोबत लॉ ला प्रवेश घेण्याचे ठरवले. एकाच वेळी वकिलीचे शिक्षण घेणारे हे बहुधा पहिलेच पिता पुत्र असावेत. ते एकत्र एकाच होस्टेलवर राहत आणि एकाच वर्गात बसत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष ही जोडी आकर्षून घेत असे. एम ए च्या परीक्षेत अटलजींनी विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवला. पण एक आश्चर्याची गोष्ट घडली...

भारतरत्नावली अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग एक )

उगवतीचे रंग  भारतरत्नावली  अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग एक ) अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातलं एक निर्मळ आणि शुद्ध व्यक्तिमत्व. धर्म, जातपात, भाषा आदींच्या पलीकडे खऱ्या अर्थाने जाऊन अटलजींनी काम केले. राजकारणात ४५ वर्षे घालवून सुद्धा त्यांचे विरोधक देखील एकही आरोप त्यांच्यावर करू शकले नाहीत. मेणाहूनि मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. या तुकाराम महाराजांच्या उक्ती अटलजींच्या व्यक्तिमत्वाचं सार्थ वर्णन करतात. त्यांच्या या स्वभावाचे आणि निष्कलंक चारित्र्याचे मूळ त्यांच्यावर बालपणी झालेल्या सुसंस्कारात आहे. ग्वाल्हेर येथे त्यांचे शिक्षण झाले असले तरी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे त्यांचे मूळ गाव. याच ठिकाणी त्यांचे आजोबा आणि पणजोबा राहत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा हे अत्यंत विद्वान आणि धार्मिक होते. त्याच संस्कारात अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाढले. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी ,  लेखक ,  पत्रकार ,  राजकीय नेते असंअष्टपैलू व्यक्तिमत्व अ...