मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शब्दांच्या पाऊलखुणांतून देश जोडणारा तपस्वी

उगवतीचे रंग शब्दांच्या पाऊलखुणांतून देश जोडणारा तपस्वी माझं लहानपण एका खेड्यात गेलं. माझी आई फार शिकलेली नव्हती पण तिला लिहिता वाचता येत होतं. त्या जोरावर ती वाचायला शिकली. अनेक पुस्तके तिने वाचली. ती बहुश्रुत होती. बोलताना तिच्या तोंडातून सहज बोलीभाषेतील अर्थपूर्ण म्हणी आणि वाक्प्रचार बाहेर पडत. सुरुवातीला त्या म्हणींचा किंवा वाक्प्रचारांचा सखोल अर्थ कळण्याइतके माझे वय नव्हते. पण जसजशी समज वाढू लागली, तसतसा त्यांचा अर्थ कळू लागला. पानातली चटणी कशी चटकदार असते तशाच या छोट्याशा अर्थपूर्ण म्हणी. खेडेगावातील लोकही विशेष करून बायका अशा म्हणी वापरत. त्या सहजच कानावर पडत. त्यामुळे नाही म्हटलं तरी भाषिक जाण समृद्ध व्हायला मदत झाली.  हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे अशाच एका अवलियाची जन्मशताब्दी या वर्षी आहे. कोण बरं हा अवलिया ? तर त्याचं नाव आहे विश्वनाथ दिनकर नरवणे. संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी भारतीय कहावत कोष आणि भारतीय व्यवहार कोष तयार केला. तोही सोळा भाषांमध्ये. ज्या काळात संगणक, इंटरनेट यासारख्या गोष्टी आजच्यासारख्या उपलब्ध नव्हत्या त्या काळातील त्यांचे हे कार्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाण...

मनाचे श्लोक भाग ८१

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८१ मना मच्छरे नाम सांडू नको हो । अती आदरे हा निजध्यास राहो । समस्तांमधे नाम हे सार आहे । दुजी तूळणा तूळिता ही न साहे ।।८१।। अर्थ  हे मना, कोणत्याही प्रकारच्या मत्सराच्या आहारी जाऊन देवाचे नामस्मरण कधीही सोडू नकोस. इतरांचा हेवा करण्यात वेळ वाया घालवण्याऐवजी, अत्यंत आदराने व निष्ठेने भगवंताच्या नामाचा अखंड ध्यास घे. देवाचे नामस्मरण हेच सर्व श्रेष्ठ साधन आहे. त्याची तुलना अन्य कशाशीही करवत नाही. ( मच्छरे - मत्सराने, सांडू नको - सोडू नको, निजध्यास - मनाला ध्यास/ओढा लागणे, समस्तांमधे - ईश्वरप्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये, दुजी -दुसरी, तूळिता - तुलना करता ) विवेचन  या श्लोकातही समर्थ नामाचा महिमा आपल्याला सांगतात. आधीच्या श्लोकात निर्धारपूर्वक ज्या मत्सराचा त्याग करायला समर्थांनी आपल्याला सांगितले, त्याचा उल्लेख या ठिकाणी पुन्हा येतो. मानवी स्वभाव असा आहे की जी गोष्ट आपल्याकडे नाही पण दुसऱ्याकडे आहे असे पाहिल्यावर त्या व्यक्तीबद्दल पहिली प्रतिक्रिया मनात येते ती म्हणजे मत्सर. हा मत्सर वाढत गेला की अनर्थ घडतो. नको त्या गोष्टी माणसाच्या...

मनाचे श्लोक भाग ८०

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ८० धरा श्रीवरा त्या हरा अंतराते । तरा दुस्तरा त्या परा सागराते । सरा वीसरा त्या भरा दुर्भराते । करा नीकरा त्या खरा मछराते ।।८०।। अर्थ  हे मना, श्रीमहादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या सीतापती श्रीरामांना आपल्या हृदयात धारण कर. श्रीरामांना अखंड हृदयी धारण करून पार करण्यास अतिशय कठीण असा संसाररूपी सागर तरून जा. जे कितीही भरले तरी अपूर्णच राहते अशा पोटाला (संसाराला )विसरून जा. मत्सराशी निग्रहपूर्वक झगडून साधुसंतांनी सांगितलेल्या मार्गाने जा.  ( श्रीवरा - सीतापती श्रीराम /लक्ष्मीपती विष्णू, हरा अंतराते - महादेवांच्या अंतर्यामी वसलेल्या, दुस्तर - कठीण, परा - मोठा, सरा - अंश/छटा, दुर्भर - भरण्यास अतिशय कठीण, नीकरा - प्रयत्नपूर्वक/हट्टाने, खर - गाढव, मच्छराते - मत्सर ) या श्लोकाची रचना भाषिक दृष्टया फार सुंदर आहे. ' र ' या अक्षराची पुनरावृत्ती झाल्याने अनुप्रास अलंकार साधला गेला आहे. त्याशिवाय रचनेत सहजता आहे. श्रीवर म्हणजे भगवान विष्णू. श्री म्हणजे लक्ष्मी. राम हाही विष्णूचाच अवतार असल्याने येथे सीतापती राम असा देखील अर्थ घेता येतो. अशा य...

मनाचे श्लोक भाग ७९

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७९ मना पावना भावना राघवाची । धरी अंतरी सोडी चिंता भवाची । भवाची जिवा मानवा भूलि ठेली । नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली । अर्थ  हे मना श्रीरामांचे स्मरण पवित्र करणारे आहे. त्यांचे स्मरण कायम आपल्या अंतरात म्हणजे म्हणजे मनामध्ये ठेव. संसाराची चिंता सोडून दे. या संसाररूपी मायेची भूल मानवाला पडते. जी गोष्ट अस्तित्वातच नाही, अशा गोष्टीची कास धरणे व्यर्थ आहे.  ( पावना - पवित्र, भावना- विश्वास/स्मरण, धरी - धारण कर, भवाची - संसाराची, भूलि - भ्रम, वेर्थ - व्यर्थ ) आधीच्या श्लोकात आपल्याला समर्थांनी देह, संसाराची व्यर्थ चिंता वाहू नका असे सांगितले. या श्लोकात ते आपल्याला हा संसार कसा नश्वर आहे ते सांगत आहेत. आपल्या मनामध्ये नेहमीच या संसाराबद्दल एक आंतरिक ओढ किंवा ममत्व असते. शिक्षण, नोकरी, विवाह, मुलेबाळे, पैसा, जमीनजुमला यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे असे आपल्याला वाटते. माणूस आयुष्यभर त्यासाठी धडपडत राहतो. परंतु या संसाराची व्यर्थता त्याला शेवटी लक्षात येते. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते.  राघवाचे स्मरण, त्याच्यावरील दृढ श्रद्धा...

मनाचे श्लोक भाग ७८

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७८  अहो ज्या नरा रामविश्वास नाही । तया पामरा बाधिजे सर्व काही । महाराज तो स्वामी कैवल्यदाता । वृथा वाहने देहेसंसारचिंता ।।७८।। अर्थ  ज्या मनुष्याचा परमेश्वरावर विश्वास नाही, त्या माणसाला ( पामराला ) सर्व प्रकारची संकटे त्रास देतात. भगवंत महाराज म्हणजे राजांचा राजा आहे, या विश्वाचा स्वामी म्हणजे मालक आहे, तो कैवल्यदाता म्हणजे मोक्ष देणारा आहे. असा हा सर्वशक्तिमान परमेश्वर आपली काळजी वाहण्यास समर्थ असताना आपण उगाच देहाची आणि संसाराची चिंता करीत बसतो.  ( पामर - क्षुद्र /हीन /दीन /दुबळा, बाधणे - त्रास होणे, कैवल्यदाता - मोक्ष देणारा, वृथा - व्यर्थ ) विवेचन  आधीच्या श्लोकात समर्थांनी श्रीरामावर निष्काम श्रद्धा ठेवून त्याचे नामस्मरण केल्यास मनातील द्वंद्व नाहीसे होते. सर्व जीवांच्या मध्ये तो एकच परमात्मा व्यापून राहिला आहे असा साक्षात्कार होतो असे सांगितले आहे. या श्लोकात ज्याचा रामावर विश्वास नाही अशा माणसाचा खरपूस समाचार समर्थ घेतात. अशा माणसाला ते पामर म्हणतात. पामर म्हणजे क्षुद्र, हीन. गरीब आणि पामर यात फरक करता येतो. ग...

मनाचे श्लोक भाग ७७

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७७ करी काम नि:काम या राघवाचे । करी रूप स्वरूप सर्वा जिवांचे । करी छंद निर्द्वंद्व हे गूण गाता । हरिकीर्तनी वृत्तिविश्वास होता ।।७७।। अर्थ  या राघवाच्या प्राप्तीची मनापासून कामना कर. सकल प्राणिमात्रांच्या ठायी असलेले त्याचे रूप स्वत:मध्येही पहा. त्याचे गुणगान करण्याचा छंद लागला की सारे भेद, द्वंद्व नाहिसे होतील.  ( नि:काम -निष्काम होऊन/निरिच्छ वृत्तीने, निर्द्वंद्व - सुखदुःखाच्या पलीकडे जाणे /द्वैतभाव नष्ट होणे, हरिकीर्तन - परमेश्वराचे गुणगान करणे ) विवेचन  परमेश्वर प्राप्तीची इच्छा असणाऱ्या साधकाने कसे वागावे ते समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतात. आपण सामान्य प्रापंचिक माणसे आहोत. आपल्या मनात निरनिराळ्या इच्छा, वासना वेळोवेळी उद्भवत असतात. जोपर्यंत वासना आहेत, तोपर्यंत परमेश्वर प्राप्ती होणार नाही. आपण परमेश्वराची प्रार्थना, ध्यान करतो ते सुद्धा मनात काहीतरी इच्छा ठेवूनच. त्यामुळे एक वेळ आपल्या त्या कामना पूर्ण होतील पण ईश्वर मात्र आपल्यापासून दूरच राहील. म्हणून इतर सर्व वासनांचा त्याग करून मला अन्य काही नको. फक्त परमेश...

मनाचे श्लोक भाग ७६

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७६ नव्हे कर्म ना धर्म ना योग काही । नव्हे भोग ना त्याग ना सांग पाही । म्हणे दास विश्वास नामी धरावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७६।। अर्थ  आपल्या हातून कर्म, धर्म किंवा योग यातील एकही गोष्ट व्यवस्थित होत नाही. माणूस पूर्णपणे भोगातही रमत नाही किंवा पूर्णपणे त्यागही त्याच्या हातून घडत नाही. अशा परिस्थितीत समर्थ म्हणतात नामावर विश्वास ठेवा. पहाटेच्या वेळी श्रीरामाचे चिंतन करा.  ( त्याग -विरक्ती, सांग - यथासांग/व्यवस्थितपणे ) विवेचन  प्रभाते मनी राम चिंतीत जावा या श्लोकमालिकेतील हा शेवटचा श्लोक. या दहा श्लोकांच्या गटात समर्थांनी भगवंताच्या नामाचा महिमा निरनिराळ्या प्रकारे वर्णन केला आहे. प्रत्येक श्लोकाचा शेवट ' प्रभाते मनी राम चिंतीत जावा ' या ओळीने झाला आहे. या श्लोकांनी नामस्मरणाचे आणि प्रभात समयी श्रीरामाच्या चिंतनाचे महत्व आपल्या मनावर ठसवले आहे.  आपण प्रापंचिक माणसे. जसे जमेल तसे आपल्या वाट्याला आलेले कर्म करण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु मतमतांच्या गलबल्यात आपण एवढे हरवून किंवा गोंधळून जातो की हाती आलेल्या कर्म...

मनाचे श्लोक भाग ७५

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७५  समस्तामध्ये सार साचार आहे । कळेना तरी सर्व शोधून पाहे । जिवा संशयो वाउगा तो तजावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७५।। अर्थ  परमेश्वर प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये भगवंताचे नाम हेच सार ( उत्कृष्ट साधन ) आहे. जर हे समजत नसेल तर श्रुती, स्मृती, पुराणे, वेद, उपनिषदे आणि संतांची वचने यांचा अभ्यास करून पहा. भगवंताच्या नामाबद्दल विनाकारण येणाऱ्या संशयाचा त्याग कर. पहाट समयी भगवंताचे चिंतन कर. ( समस्तामध्ये - भगवंत प्राप्तीच्या साधनांमध्ये, सार - महत्वाचे/शाश्वत सत्य, साचार - खरोखरच /आचरणात आणण्याजोगे, वाउगा -व्यर्थ/निरर्थक, तजावा - त्याग करावा ) विवेचन  समर्थ पुन्हा पुन्हा भगवंताच्या नामाची महती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पटवून देत आहेत. आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी इतर साधनांपेक्षा रामनाम हे घेण्यासाठी किती सोपे आहे हे समजावून सांगितले. या श्लोकात ते म्हणतात की रामनाम हेच सार आहे. बाकी सर्व असार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, " सार सार सार विठोबा, नाम तुझे सार, म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार." बा विठ्ठला, तुझे नाम हेच...

मनाचे श्लोक भाग ७४

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७४  बहुतांपरी संकटे साधनाची । व्रते दान उद्यापने ते धनाची । दिनाचा दयाळू मनी आठवावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ७४।। अर्थ  परमेश्वर प्राप्तीच्या साधनांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. व्रते, दानधर्म, उद्यापन करणे या गोष्टींसाठी गाठीशी पैसा लागतो. परंतु दिनांसाठी दयाळू असणाऱ्या भगवंताला आठवण्यासाठी यापैकी कशाची जरुरी नाही. म्हणून अशा या भगवंताचे पहाटेच्या सुमारास चिंतन करावे.  ( बहुतांपरी - अनेक प्रकारचे, साधनांची - ईश्वर प्राप्तीच्या विविध मार्गांची, उद्यापन - एखाद्या व्रताच्या अखेरीस केलेला धार्मिक विधी ) विवेचन  ईश्वरप्राप्तीचे अनेकविध मार्ग आहेत. त्यासाठी कोणी व्रतवैकल्ये करतो, कोणी एखादे अनुष्ठान करतो, तर कोणी दानधर्माचा मार्ग अनुसरतो. आपण कोणता मार्ग निवडायचा याचे स्वातंत्र्य अर्थातच साधकाला असते. तरी समर्थ या मार्गातील धोके आणि अडचणी आपल्या निदर्शनास आणून देतात. या सगळ्या गोष्टींसाठी धनाची जरुरी असते. व्रत करायचे म्हटले तर काही तरी नियम आलाच. त्यानुसार शरीराला पडणारे कष्टही आले. शिवाय व्रताचे काही नियम अस...

मनाचे श्लोक भाग ७३

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७३ देहेदंडणेचे महा दुःख आहे । महादुःख ते नाम घेता न राहे । सदाशिव चिंतीतसे देव देवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७३।। अर्थ  देहाला कष्ट दिल्याने मोठया यातना होतात. परंतु रामनाम घेतल्याने या यातना राहत नाहीत. प्रत्यक्ष भगवान शंकर देखील देवाधिदेव म्हणजेच श्रीरामाचे चिंतन करतात. अशा श्रीरामाचे प्रभात समयी आपण चिंतन करावे.  ( देहेदंडणे - देहाला कष्ट/यातना देणे ) अनेक लोक परमेश्वर प्राप्तीसाठी उपासतापास, नवस, तीर्थयात्रा आदी गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टींनी देहाला कष्ट होतात. त्याच्या यातना किंवा दुःख भयंकर असते. सर्वांनाच या गोष्टी शक्य होतील असेही नाही. नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते. परंतु सर्वांनाच ते शक्य होईल अशातला भाग नाही. बद्रीनाथ, केदारनाथ ही अत्यंत पवित्र धामे आहेत. पण जर शारीरिक क्षमता नसेल तर त्यांची यात्रा करणे कठीण होते. देहाला त्रास देणारी होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप:साधना करीत असत. त्यासाठी एकांतात जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत. कोणी एका पायावर उभे राहून तप करीत असे तर कोणी नदीच्या प...

मनाचे श्लोक भाग ७२

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७२  न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही । मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही । महा घोर संसार शत्रू जिणावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७२।। अर्थ  रामनाम घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. मुखाने रामनाम घेताना काही कष्ट पडत नाहीत. या रामनामाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा संसाररूपी शत्रूवर मात करता येते. त्यासाठी प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.  ( न वेचे - खर्च करावे लागत नाहीत, ग्रंथीचे - पदरचे, अर्थ - पैसा, घोर - कठीण, जिणावा - जिंकावा ) विवेचन  माणसाची देहबुद्धी फार प्रबळ असते. देहासाठी आणि देहाच्या सुखासाठी जे जे लागेल, ते मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस असतो. सगळी ऐहिक सुखे उपभोगण्यासाठी पैशाची मोठी गरज असते. त्यामुळे माणूस पैशाला फार जपतो. प्रसंगी देहापेक्षाही पैशाला महत्व देणारी माणसे व्यवहारात पाहायला मिळतात. आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून ती पैसा मिळवण्याच्या मागे लागलेली असते. सामान्य माणूस स्वतःच्या मौजमजेसाठी हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतो पण दानधर्माची वेळ आली की हात आखडता घेतो. सर्वसामान्य माणसांची...

मनाचे श्लोक भाग ७१

 उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७१ जयाचेनि नामें महादोष जाती । जयाचेनि नामें गती पाविजेती । जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७१।। अर्थ  भगवंताच्या नामस्मरणाने मोठमोठी पापे नाहीशी होतात. साधकाला उत्तम अवस्था प्राप्त होते. पुण्याचा संचय होत जातो. असे सर्व काही ज्यामुळे प्राप्त होते त्या भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन पहाटेच्या वेळी करावे.  ( महादोष - मोठमोठी पापे/पातके/दोष, गती - अवस्था/मुक्ती/मोक्ष ) विवेचन  भगवंताच्या नामाचा महिमा अपार आहे. सतत नामस्मरण केल्याने महादोष म्हणजे महापापे नाहीशी होतात. भगवंतांचे नाम आपले अंतःकरण शुद्ध करते. वाईट गोष्टी, पापकर्म करण्याची इच्छाच होत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, हत्या करणे, अपेयपान ( दारू )करणे या सारख्या गोष्टी या महापाप मानल्या जातात. परंतु सतत भगवंताचे नाम घेत राहिल्याने या गोष्टी करण्याची इच्छाच नाहीशी होते. व्यक्ती सदाचारी बनते. वाल्या कोळ्याचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. वाटमारी करणे, हत्या करणे यासारखी महापापे त्याच्या हातून घडली होती. परंतु महर्षी नारद ...

मनाचे श्लोक भाग ७०

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ७० सदा रामनामे वदा पूर्णकामे । कदा बाधिजेनापदा नित्यनेमे । मदालस्य हा सर्व सोडूनि द्यावा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।७०।। अर्थ  अगदी मनापासून रामनाम घ्यावे. नित्यनेमाने नाम घेणाऱ्यास संकटांचा त्रास होत नाही. अहंकार आणि आळस या दुर्गुणांचा त्याग करावा. आणि प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.  ( वदा - म्हणा, पूर्णकामे - अगदी मनापासून, बाधणे - त्रास होणे, आपदा - संकट, मद - अहंकार, आलस्य - आळस ) विवेचन  या श्लोकात भगवंताचे नाम अगदी मनापासून घ्यावे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत. त्यासाठी त्यांनी ' पूर्णकामे ' हा सुंदर शब्द वापरला आहे. व्यवहारात कोणतीही गोष्ट आपण केली तर आपल्याला तिचे काय फळ मिळेल याकडे आपले लक्ष असते. फळाची अपेक्षा ठेवूनच आपण कर्म करीत असतो. पण जेव्हा रामनाम किंवा भगवंताचे नाम आपण घेतो तेव्हा त्यापासून आपल्याला काय फळ मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. नाम फक्त नामासाठीच किंवा भगवंतासाठीच घ्यावे. असे नाम जेव्हा आपण घेऊ त्यावेळी इतर सर्व अपेक्षा आपोआपच नाहीशा होतील. ते नाम मग मनापासून घेतले जाईल म्हणजेच समर्थ सांगता...

मनाचे श्लोक भाग ६९

उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ६९ सुखानंदकारी निवारी भयाते । जगीं भक्तिभावे भजावे तयाते । विवेके तजावा अनाचार हेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।६९।। अर्थ  भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आणि भयाचे निवारण करणारा आहे. त्याला भक्तिभावाने आराधना करावी. विवेकाच्या साहाय्याने अनाचार म्हणजे अनीतीने वागणे आणि इतरांचा हेवा किंवा द्वेष यांचा त्याग करावा. प्रभात समयी श्रीरामाचे ( भगवंताचे ) चिंतन करावे.  ( सुखानंदकारी - सुख आणि आनंद देणारा, तजावा - सोडून द्यावा, अनाचार -अनीतीचे वागणे ) विवेचन  भगवंताचे गुण वर्णन करताना समर्थ म्हणतात की भगवंत हा सुख आणि आनंद देणारा आहे. सुख आणि आनंद हे शब्द आपण सामान्यपणे समानार्थी समजतो पण त्यात फरक आहे. सुख हे क्षणिक असून इंद्रिये आणि भौतिक गोष्टींवर अवलंबून असते. माणूस आयुष्यभर या सुखाच्या मागे धावत असतो. आनंद ही एक वृत्ती किंवा मानसिक अवस्था असून ती दीर्घकाळ टिकणारी आहे. ती परिस्थितीवर अवलंबून नसते. जो स्वस्वरुपी स्थिर असतो, त्याच्याकडे कायमच आनंदी वृत्ती असते. भगवंत या दोन्हींचा दाता आहे. तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. दुःख हर...

माझ्या कल्पनेच्या भराऱ्या

 उगवतीचे रंग माझ्या कल्पनेच्या भराऱ्या  'वऱ्हाड निघालं लंडनला' मध्ये बाप्पा काशिनाथला एकदा चिडून म्हणतो, "असं काही बी बोलत जाऊ नको, काशिनाथ. आमच्या टकुऱ्यात काही बी येतं ना !" असं कधी कधी आमच्या बी टकुऱ्यात काही येतं. आता इथं बाप्पा नाही, नाहीतर त्याचे बोलणे ऐकावे लागले असते. त्यामुळे बोलायला काही हरकत नाही. फार तर तुम्ही हसाल, नावं ठेवाल ! पण जाऊ द्या. जे मनात येतं ते माणसानं सांगून मोकळं व्हावं. एकदा झालं असं की आम्ही एका पेशंटला भेटण्यासाठी एका हॉस्पिटलात गेलो होतो बरं का ! असे उन्हाळ्याचेच दिवस होते. ज्याला भेटायला गेलो त्याचं कसलंतरी ऑपरेशन झालं होतं. तेवढं एक सोडलं तर बाकी गड्याची प्रकृती उत्तम होती. लोक त्याला भेटायला येत होते. येताना फळं, नारळपाणी असं काही ना काही घेऊन येत होते. तो गडीही सर्वांशी हसून संवाद साधत होता. मी याच हॉस्पिटलमध्ये का आलो, डॉक्टर किती हुशार आहेत, नर्स वगैरे सगळे वेळच्या वेळी कसे लक्ष देतात, डॉक्टरांचे किती अन केव्हा राउंड होतात अशा अनेक गोष्टी तो रसभरीत वर्णन करून सांगत होता. मला त्याचा हेवा वाटला. जिथे सगळे लोक दवाखाना नको म्हणून म्हणत...