उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४२ भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ - भाग तीन जगभरातील विविध देशात रवींद्रनाथ भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणून आपला ठसा उमटवत होते. बऱ्याच ठिकाणी त्यांची व्याख्याने होत होती. युरोपातील बऱ्याच ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरली आणि त्यांच्या चित्रकलेच्या वेगळ्या शैलीने लोकांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी आणखीही एक महत्त्वाची गोष्ट घडली. ते इंग्लंडमध्ये असताना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तेथे होणाऱ्या प्रतिष्ठित अशा हिबर्ट व्याख्यानमालेसाठी रवींद्रनाथांना आमंत्रित केले. यावेळी त्यांचे वय ६९ वर्षे होते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य असे होते की ही व्याख्याने युरोपातील विद्वान अशा तत्वज्ञ लोकांसाठी होत असत. या व्याख्यानांमध्ये बोलणारी व्यक्ती देखील अत्यंत विद्वान तत्वज्ञ असावी अशी परंपरा होती. परंतु भारताच्या दृष्टीने एक सुखद आश्चर्य असे घडले की आतापर्यंत साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ख्याती असलेल्या रवींद्रनाथांना या व्याख्यानमालेसाठी तत्वज्ञ म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्यांना या व्याख्यानांसाठी आमं...