मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव

 उगवतीचे रंग  संगीत देवबाभळी : एक थरारून सोडणारा नाट्यानुभव  देवबाभळीअसे निरस नाव असलेलं एखादं नाटक असेल असं कधी वाटलं नव्हतं, त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते संगीत नाटक असेल आणि त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे तो एक थरारून टाकणारा नाट्यानुभव असेल असंही कधी वाटले नव्हते. पण म्हणतात ना Truth is stranger than fiction. तसंच काहीसं माझं या नाटकाच्या बाबतीत झालं आहे. पुण्यातील वास्तव्यात हे नाटक पाहण्याचा योग आला आणि जे पाहिले त्यामुळे भरून पावलो. हे नाटक पाहिलं नसतं तर एका चांगल्या आनंदाला निश्चितच मुकलो असतो.  खरं तर हे नाटक आहे संत तुकारामांची पत्नी आवली आणि विठूरायाची पत्नी देवी रुख्मिणी यांच्यावर. या नाटकात केवळ या दोघींच्याच भूमिका आहेत. तुकाराम महाराज आणि विठ्ठल यांचा उल्लेख वारंवार झाला तरी या नाटकात पात्र म्हणून प्रत्यक्षात रंगमंचावर ते कधीच येत नाहीत पण ते अवघे नाटक व्यापून उरले आहेत. त्यांचे अस्तित्व सतत जाणवत राहते. मग प्रश्न असा आहे की देवबाभळी हे नाव आले तरी कसे ?  यासाठी नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या प्राजक्त देशमुख यांना त्याचे श्रेय द्यावे लाग...

मी प्रतिज्ञा करतो की...

उगवतीचे रंग  मी प्रतिज्ञा करतो की...  शालेय पाठ्यपुस्तकात सुरुवातीला एक प्रतिज्ञा दिलेली असते. ती उजवा हात सरळ समोर पुढे करून म्हणायची असते. आपल्या साऱ्यांनाच ती परिचित आहे. ' भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.' ही प्रतिज्ञा करावयाची असते केवळ म्हणायची नसते. नित्यनियमाने प्रतिज्ञा म्हणणे ही एक औपचारिकता झाली आहे. शाळेची प्रार्थना असो की प्रतिज्ञा, ती अर्थ लक्षात घेऊन मनापासून म्हणायची असते. एकदा एखादी प्रतिज्ञा केली की ती जीवापलीकडे जपायची असते, पाळायची असते. महाभारत वाचताना भीष्माचार्यांनी आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची आणि हस्तिनापूरशी एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेतली होती असे आपण वाचतो. ती त्यांनी शेवटपर्यंत पाळली. त्यामुळे एखादी प्रतिज्ञा करून जो ती कसोशीने पाळतो, त्याला भीष्मप्रतिज्ञा असे नाव पडले.  आजची आमची प्रतिज्ञा म्हणजे ' शब्द बापुडे केविलवाणे ' अशी अवस्था झाली आहे. प्रतिज्ञेमध्ये आपण ' सारे भारतीय माझे बांधव आहेत ' असे म्हणतो खरे पण ते कितपत गांभीर्याने घेतो ? खरंच मानतो का आपण सगळ्यांना आपले बांधव ? मला जॉर्ज ऑरवेलच्या ' ऍनिमल फार्म ...

निसर्गरूपे - भाग चार रात्र

उगवतीचे रंग  निसर्गरूपे - भाग चार  रात्र   निसर्गरूपे या लेखमालेचा आज शेवटचा भाग. या आधीच्या तीन लेखात निसर्गातील पहाट किंवा सकाळ, दुपार आणि रात्र या तीन वेळात दिसणाऱ्या निसर्गरुपांचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला. आज रात्रीच्या विविध रूपांबद्दल आपण बोलू या.  मी फक्त या चार वेळातील निसर्गरूपांबद्दल बोलत असलो तरी निसर्ग प्रत्येकच क्षणाला आपले रूप बदलत असतो. प्रत्येक क्षणाला, घडीला, प्रत्येक दिवसाला निसर्गरूपे वेगवेगळीच असतात. आपल्याला फक्त ती पाहता आली पाहिजेत. याचे प्रत्यंतर आपल्याला आपण जेव्हा हिमालयासारख्या एखाद्या पर्वतरांगांच्या ठिकाणी जातो, तेव्हा येते. तिथे निसर्ग क्षणाक्षणाला आपले रूप बदलत असतो. पर्वतशिखरांवर ढग आलेले दिसतात, लगेच त्या ढगांचे आच्छादन दूर होऊन सोनेरी प्रकाशात हिमशिखरे झळाळून उठतात. तर दुसऱ्या क्षणाला पाऊस अचानक सुरु होऊन वातावरण बदलून टाकतो. अशी ही सुंदर निसर्गचित्रे ! अशा वेळी मुकेश यांनी गायिलेले ' ये कौन चित्रकार हैं...' अशा गाण्यांचे शब्द मनात रुंजी घालू लागतात.  अशीच सुंदर आहेत रात्रीची विविध रूपे. चांदण्याची रात्र, अमावस्येची रात्...

तुम पुकार लो...

  तुम पुकार लो...  ' तुम पुकार लो...'हे गीत कानावर पडलं की आठवण येते ती सदाबहार गीते देणाऱ्या हेमंतकुमारची. या आवाजात एक वेगळाच गोडवा आणि खुमारी आहे. साथ सत्तरच्या दशकात हेमंतकुमारच्या गाण्यांनी तरुणाईला वेड लावले होते. बीस साल बाद, खामोशी, नागीन, कोहरा यासारख्या त्यांच्या चित्रपटातील गाण्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली होती. एखाद्या कार्यक्रमात एखाद्या तरुणाला किंवा तरुणीला गायला सांगितले तर हेमंतकुमारांच्या चित्रपटातील गाणी त्यांच्या सहजच ओठांवर येत. अशी प्रचंड लोकप्रियता मिळवणारा संगीतकार आणि गायक विरळा.  त्या काळात तरुण गायकांवर त्या वेळच्या प्रसिद्ध गायक असलेल्या कुंदनलाल सैगल यांचा जबरदस्त प्रभाव होता. कोणत्याही गायकाला आपण के एल सैगल यांच्यासारखे गावे , त्यांच्यासारखी लोकप्रियता मिळवावी असे वाटत असे. हेमंतकुमार देखील त्याला अपवाद नव्हते. साधारणपणे चाळीसच्या दशकात हेमंतदा मुंबईत आले आणि त्यांची भेट झाली ती प्रख्यात संगीतकार नौशाद यांच्याशी. सैगल यांचा प्रचंड प्रभाव असलेल्या हेमंतदा यांनी काही गाणी नौशाद यांना म्हणून दाखवली. हेमंतदा यांच्या गायकीवर नौशाद फिदा झाले आणि त...

निसर्गरूपे - भाग तीन - संध्याकाळ

उगवतीचे रंग  निसर्गरूपे - भाग तीन  संध्याकाळ  दिवस आणि रात्रीच्या सीमारेषेवरचा काळ म्हणजे संध्याकाळ.  यावेळी निसर्गाचे रूप पालटते. एखाद्या हॉलमध्ये एखादे लँडस्केप किंवा सुंदर निसर्गदृश्य लावलेले असावे आणि काही वेळाने ते बदलून त्या जागी दुसरे लावावे, तशी ही संध्याकाळ वेगळे रूप घेऊन येते. या लेखाच्या निमित्ताने संध्याकाळच्या वेळेचा संगीतमय आणि हृद्य असा आढावा घेण्याचा प्रयत्न करू या. ही संगीतमय सफर तुम्हाला नक्कीच आवडेल. दिवसभराच्या श्रमाने थकलेले सूर्यदेव आता अस्ताला जाण्याच्या तयारीत असतात. पण त्यांचा सकाळचा तोच रुबाब, तेच सौंदर्य कायम असते. एक सुंदर संस्कृत सुभाषित आहे  उदये सविता रक्तो रक्त:श्चास्तमये तथा। सम्पत्तौ च विपत्तौ च महतामेकरूपता॥ याचा अर्थ असा की सूर्यबिंब उगवताना जसे लाल रंगाचे असते, तसेच मावळतानाही. थोर पुरुषांचेही वागणे सर्व परिस्थितीत एकसारखे असते. श्रीकृष्णांनी गीतेत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत, तसेच त्यांचे वागणे असते. थोर पुरुष सुखात आणि दुःखातही विचलित होत नाहीत. मला कवीवर्य भा रा तांब्यांची ' मावळत्या दिनकरा ' ही कविता खूप आवडते. त्...