मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वकर्मकुसुमांची पूजा

उगवतीचे रंग    स्वकर्मकुसुमांची पूजा  योगप्रकाश या मासिकाचा नुकताच आलेला दिवाळी अंक हातात घेतला. त्यातील सुरुवातीच्या एका जाहिरातीने लक्ष वेधून घेतले. त्या जाहिरातीत वरच्या बाजूला ज्यांनी आयुष्यभर योगाचा प्रचार आणि प्रसार केला, त्या जनार्दन स्वामींचा फोटो होता आणि त्याखाली ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील काही ओव्या दिल्या होत्या. त्या ओव्यांनी मला मोहिनी घातली आणि मग दिवसभर, रात्रभर त्याच ओळी माझ्या मनात घर करून राहिल्या. दिवाळी तर नुकतीच संपली आहे, पण माउलींच्या या ओळी कधीही वाचल्या तरी ज्ञानाची आणि आनंदाची दिवाळी अक्षय दिवाळी अनुभवाला येते. त्या ओळी अशा आहेत...  जेणे जग हे समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित । जाले आहे दीपजात । तेजे जैसे ।। तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा । पूजा केली होय अपारा । तोषालागी ।। माउलींच्या या ओव्या म्हणजे जीवनाचे आणि परमार्थाचे सारच ! ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला आणि पसायदानात सुद्धा माउली ज्या सर्वात्मक ईश्वराला प्रार्थना करतात, त्याच सर्वात्मक म्हणजे सर्वांच्या ठायी असलेल्या ईश्वराला या ओव्यांमध्ये काय आवडते ते अर्जुनाला या ...

नातं रक्तापलीकडचं - भाग दोन

उगवतीचे रंग   नातं रक्तापलीकडचं - भाग दोन  अनाथ लेकरांसाठी आपले सर्वस्व झोकून देणाऱ्या संतोष गर्जे यांच्याबद्दल मी माझ्या आधीच्या एका लेखात सविस्तर लिहिलं होतं. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात गेवराई गावापासून तीन किमी अंतरावर संतोष गर्जे यांचे बालग्राम वसलेले आहे. माझा हा लेख वाचल्यानंतर संतोष गर्जे यांच्या कार्याशी परिचित असणाऱ्या काही वाचकांनी माझ्याशी संपर्क करून त्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. पण एक खंत माझ्या मनात होती. ती ही की अशा या आगळंवेगळं काम करणाऱ्या माणसाचं कार्य प्रत्यक्ष पाहण्याचा योग मला आला नव्हता. एकदा संतोषजी साधारणपणे पाच वर्षांपूर्वी चाळीसगावला एका व्याख्यानासाठी येऊन गेले होते, तेवढाच माझा त्यांचा परिचय. त्यानंतर आम्ही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होतो.  या दिवाळीसाठी आम्ही आमच्या व्याह्यांकडे सोलापूरला गेलो होतो. तेथून चाळीसगावला परतताना आपण गेवराईला जावं आणि संतोषजींच बालग्राम प्रत्यक्ष पाहावं असा विचार मनात आला. निघण्याच्या आदल्या दिवशी संतोषजींना फोन केला. त्यांना म्हटलं, ' संतोषजी, आम्ही दोघं तुमची संस्था पाहण्यासाठी उद्या येऊ इच्छितो. ...

इये मराठीचिये नगरी

  उगवतीचे रंग  इये मराठीचिये नगरी  कानडीने केला मऱ्हाठा  भ्रतार । एकाचे उत्तर एका नये ।।असा जगद्गुरू तुकोबारायांचा एक अभंग आहे. एका कानडी स्त्रीने मराठी नवरा केला. ती काय बोलते ते नवऱ्याला समजेना आणि नवरा काय म्हणतो ते तिला समजेना. सगळाच सावळा गोंधळ ! ' एक दुजे के लिये ' हा हिंदी चित्रपट सगळ्यांना आठवत असेल. त्यात ती नटी हिंदी आणि तिचा प्रियकर तमिळ ! त्यांच्यातही अशीच गमतीदार परिस्थिती निर्माण होते. त्यांच्या भाषेतील मजेदार गोंधळ ' हम बने तुम बने एक दुजे के लिये ' या गाण्यात अतिशय मनोरंजक पद्धतीने दाखवला आहे आणि ते गाणं गायलही अतिशय सुंदर आहे ! लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांनी हे गीत अजरामर केलं आहे. ' तुम हो बुद्दू जान लो, यु आर हँडसम मान लो...' हे ऐकताना आपल्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही.  आपल्या मराठीच्या नगरीतही सध्या अशीच गोंधळाची परिस्थिती आहे. काय बरोबर आणि काय चूक हेच कळेनासं झालंय. इंग्लिश विंग्लिश मराठीत ' मिंग्लिश ' झालंय, तर कुठे हिंदीमुळे ' हिंग्लिश ' झालंय आणि तज्ज्ञांच्या ' टिंगलीस ' वाव मिळाला आहे. आता ब...