उगवतीचे रंग जो हुकूम मेरे आका... अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा मला आठवण्याचं एक कारण झालं. माझं जीमेल ओपन केलं की मला वरच्या चौकटीत ठळक लाल अक्षरात एक मेसेज दिसायचा. तो म्हणजे तुमचे स्टोरेज संपले असल्याचा. मग दोन पर्याय यायचे. पहिला पर्याय म्हणजे manage storage आणि दुसरा पर्याय buy storage. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला गोंधळात टाकणारी ही स्थिती. कारण एक तर आम्ही प्रयत्नांती हे सगळं वापरायला शिकलो. त्यामुळे चुकत जायचं आणि शिकत जायचं अशी परिस्थिती. मग एक दोन मित्रांना विचारलं. ते म्हणाले, ' स्टोरेज विकत वगैरे घेऊ नका. तुम्हाला न लागणारे फोटो, इमेल्स, व्हिडीओ वगैरे डिलीट करा. ' मग आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार पहिला पर्याय निवडला. तो म्हणजे manage storage चा. नको असलेल्या इमेजेस, व्हिडीओ, इमेल्स धडाधड डिलीट मारल्या. बरेच एम बी, जीबी वगैरे काय असेल तो डेटा डिलीट झाला. पण ती सूचना काही जाईना. त्या जिनचे समाधान होईना. तो आपला समोर सारखा उभा राहायचा. मी डिलीट कर म्हटलं की जो हुकूम मेरे आका म्हणून लगेच डिलीट करायचा. बरंच काही डिलीट करून झालं. अगदी आठवण म्हणून जपून ठेवाव्य...