मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ये दिल मांगे ( नो ) मोअर...

उगवतीचे रंग  ये दिल मांगे ( नो ) मोअर...  दृश्य एक  भारतातील कोणत्याही राज्यातील कुठलंही एक छोटंसं खेडं.  दिवस उन्हाळ्याचे. तोंडाला कोरड पडलेली. जीव पाणी पाणी करतोय. घरून आणलेलं बाटलीतलं पाणी संपलंय किंवा गरम झालंय. तुम्हाला हवंय थंडगार पाणी. जवळच्या हॉटेलात तुम्ही पाण्यासाठी जाताय. हॉटेलवाला सांगतोय गार पाणी नाही साहेब. त्या गावातल्या लोकांना पिण्याचं पाणी मिळायची मारामार आहे. गावातील स्त्रिया लांबून कुठून तरी एक दीड किमी वरून पाणी आणतात. पण त्या हॉटेलवाल्याच्या फ्रिजमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आहेत. बिसलरी किंवा कुठला तरी पाण्याचा लोकल ब्रँड. त्याशिवाय कोका कोला, थम्स अप, पेप्सी, स्प्राईट इ. शीतपेयांनी फ्रिज भरलेला आहे. बाईकवर बसून दोन जण येतात. कोका कोलाची बाटली विकत घेऊन तोंडाला लावतात.  दृश्य दोन  कोणत्याही मोठया शहरातील पिझ्झा, बर्गर वगैरे मिळते असे ठिकाण. तरुणाईची गर्दी. निरनिराळ्या प्रकारचे पिझ्झा, बर्गर वगैरे ऑर्डर केलेले. पाणी कुठेही मिळत नाही. पाण्याची काही सोयच नाही. फ्रिजमध्ये देखील निरनिराळ्या प्रकारचे फक्त कोल्ड्रिंक्...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

हम बोलेगा तो...

उगवतीचे रंग  हम बोलेगा तो...  ' कसौटी ' या चित्रपटात अभिनेता प्राणच्या  तोंडी एक गाणे आहे. ' हम बोलेगा तो बोलोगे के बोलता हैं ...' किशोरकुमार या हरहुन्नरी गायकाने हे गाणे मोठे बहारदार म्हटले आहे आणि प्राण यांनी आपल्या अभिनयाने ते जिवंत केले आहे. या गाण्यात ' हम कुछ नही बोलेगा...' असे म्हणत तो बरेच काही सांगून जातो. प्रत्येक वेळेला सगळं बोललंच पाहिजे असं कुठे आहे ! कधी कधी मोजक्या शब्दांत तर कधी शांत राहण्यातही एक वेगळा आनंद असतो. तीही एक अभिव्यक्ती असते. प्रत्येक वेळी अभिव्यक्तीसाठी शब्दच हवेत असे नाही. आणखी एक छान गाणं हिंदी चित्रपटात आहे. ' कुछ ना कहो, कुछ भी ना कहो . ' अशा वेळी बोलण्याची आवश्यकताच नसते.  पण आपल्याकडे बोलणे हे एक व्यसन झाले आहे. बोलताना लोकांना आवरणे ही एक मोठीच कौशल्याची गोष्ट झाली आहे. अगदी संसदेपासून ते ग्रामपंचायतीच्या सभेपर्यंत आणि विविध संस्थांच्या वार्षिक सभांपासून ते गृहसंकुलांच्या वार्षिक सभांपर्यंत. ज्याला संधी मिळेल तो तावातावाने बोलत असतो. संधी मिळाली नाही तर ती घेतली जाते. माझेच म्हणणे कसे बरोबर, मला किती माहिती आहे...! अस...

' आनंदाच्या गावा जावे ' या पुस्तकासाठीचे मनोगत

' आनंदाच्या गावा जावे ' या पुस्तकासाठीचे मनोगत  माझ्या ललित लेखांवर आधारित विश्वकर्मा प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारे हे चौथे पुस्तक. या मनोगतात सर्वात आधी मी माझ्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या सर्व वाचकांना उदंड धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी वेळोवेळी दिलेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळेच माझे लिखाण मी सुरु ठेवू शकलो.   ' आनंदाच्या गावा जावे ' या पुस्तकात आपल्याला विविध विषयांवर आधारित असे चाळीस  लेख वाचायला मिळतील.  प्रत्येकाच्या जीवनात संकटं आणि दुःख तर पाचवीला पुजल्यासारखी असतातच. पण ती पचवूनही इतरांसाठी आनंदाचा गाव उभा करणाऱ्या राहुल देशमुख, अविनाश आणि नंदिनी बर्वे हे दाम्पत्य, ज्या गोष्टी शिकण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील अशा गोष्टी एकाच जन्मात शिकणाऱ्या डॉ शारदा बापट, भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ अभिजित सोनवणे या सगळ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या कथा आपल्याला प्रेरणा देतील.  ' अनंत अमुची ध्येयासक्ती ' या लेखातून स्वतः अंध असणाऱ्या पण डोळसांनाही लाजवेल असे कार्य करणाऱ्या सेब्री टेंबरकेन यांच्या असामान्य जिद्दीची कहाणी आपल्याला व...

' रंगसोहळा ' या पुस्तकासाठी मनोगत

' रंगसोहळा ' या पुस्तकासाठी मनोगत  ' रंगसोहळा ' या पुस्तकाच्या नावाप्रमाणेच या पुस्तकात आपल्या विविध रंगांचे विषय आढळतील. विविध रंगांचे ललित लेख आढळतील. काही वैचारिक असतील, तर काही काल्पनिक. पण वैचारिक वा काल्पनिक असले तरी त्यांना वर्तमानाची, वस्तुस्थितीची पार्श्वभूमी नक्कीच असते. एखादा चित्रकार जसा विविध प्रकारची चित्रे काढतो आणि रंगांच्या विविध छटांचा वापर करून त्यात रंग भरतो,  तसेच काहीसे लेखकांचे, कवींचे काम असते मला वाटते. चित्र हे शब्दांविना बोलते तर कविता, लेख इ वाङ्मयप्रकार शब्दांचा वापर करून त्यात रंग भरतात.  या पुस्तकातील विविध विषय विविध वेळी वेगवेगळ्या कारणाने सुचले आहेत. नीरक्षीरविवेक हा लेख ' तान्हाजी : द अनसंग हिरो ' हा चित्रपट पाहून सुचला. श्रेयस की प्रेयस हा लेख ' विष्णुपुराण ' ही टीव्हीवरील मालिका पाहताना सुचलेला आहे. माझ्या घरासमोर झोपलेल्या एका वृद्ध, निराधार व्यक्तीला पाहून ' नित्य नवा दिस जागृतीचा ' हा लेख लिहिला गेला. ऊन, वारा, पाऊस, प्राणी, पक्षी, निसर्गरम्य ठिकाणे आदींनी माझ्या ' निसर्गायन ' लिहिण्याला चालना दिली ...

मनोगत : अष्टदीप या पुस्तकासाठी

मनोगत : अष्टदीप या पुस्तकासाठी   आपला भारत देश म्हणजे नररत्नांची खाण आहे. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी वेचले पण ते करताना देशहित, समाजहित आणि अखिल मानवजातीचे हित नजरेआड होऊ दिले नाही अशी असंख्य नररत्ने आपल्या देशात जन्मली. आपल्या दीर्घोद्योगाने, सततच्या अखंड प्रयत्नाने त्यांनी यशाची शिखरे पादाक्रांत केली. भारतमातेच्या गळ्यातील मोतीहारातले हे सगळे तेजस्वी मोतीच ! आज यशोशिखरावर पोहोचल्यानंतर सगळ्यांना या मंडळींचे यश दिसते. त्यांची प्रसिद्धी दिसते. पण त्यासाठी त्या पदापर्यंत पोहोचताना त्यांना किती कष्ट पडले असतील याची कल्पना फारच थोड्याना असते.  कोणतेही यश हे कधीच एकाएकी मिळत नसते. त्यासाठी प्रयत्नांच्या पायघड्या घालाव्या लागतात. निराश न होता अखंड परिश्रम करावे लागतात. जिद्द, एकाग्रता, साहस, धैर्य, चिकाटी, संयम, सहनशीलता यासारख्या गुणांचा कस यावेळी लागतो. असं म्हटलं जातं की स्वप्न तीच असतात की जी जागेपणी पाहिली जातात. त्याच स्वप्नांचा पाठपुरावा आयुष्यभर जिद्दीने करावा लागतो. मग झोपेतही तीच स्वप्ने दिसतात. उद्दिष्ट एकदा निश्चित असले की...

एक रात्र मंतरलेली...

 उगवतीचे रंग  एक रात्र मंतरलेली...  जोपर्यंत आपण जगत असतो, तोपर्यंत जीवनाचा प्रवास अखंड सुरूच असतो. या वाटेवर ऊन, पाऊस, वादळवारा यांचाही सामना करावा लागतो. पण याच प्रवासात काही काही विश्रांतीची अशी काही ठिकाणं येतात की प्रवासाचा सगळा शीण कुठल्या कुठे पळून जातो. रखरखत्या उन्हात काही झाडं भेटतात दाट सावली देणारी. त्यांच्या शीतल छायेत बसलं की सगळा थकवा निघून जातो. ही झाडं पुढील प्रवासासाठी आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. आज मी मला भेटलेल्या अशाच एका झाडाबद्दल बोलणार आहे. या झाडाचं नाव आहे विभाताई. विभाताई देशपांडे, राहणार मुंबई.  साधारण वर्ष दीड वर्ष झालं असेल तिच्या आणि माझ्या भेटीला. अर्थात प्रत्यक्ष भेट नाहीच. माझा कुठलासा लेख तिच्या कधीतरी वाचनात आला असावा. मग त्यावर प्रतिक्रिया देताना ' विश्वासदा...' अशा गोड शब्दांनी सुरुवात. व्हाट्सअँपवर तिचा एक ग्रुप होता, म्हणजे आहे. ' मनमंदिर ' या सुरेख नावाचा. मला तिने त्यात सामील करून घेतले. मग कधी कधी मी काढलेले फोटो पाहून ' चित्र छायाचित्र ' या आणखी एका ग्रुपमध्ये सामील करून घेतले. आणि मग नियमितपणे आमचे संभाषण सुरु झाले. काह...