मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उगवतीचे रंग - आनंदाची गुढी

उगवतीचे रंग  आनंदाची गुढी  फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो. पण तो नुसता येत नाही. आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो. तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता. या चैत्र महिन्यात किती तरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो. वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं. वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही. या वसंतात सृष्टी गंधवती होते. झाडं आपली जुनी वस्त्रं टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात. तांबूस कोवळी, पोपटी, हिरवीकंच पाने जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात. निरनिराळी फूल फुलून आलेली असतात. गुलाब, मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात. आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर, वातावरण धुंद करीत असतो. कोकिळेचा पंचम स्वर आसमंतात निनादत असतो. अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो. घराघरांवर गुढ्या उभारल्या जातात.  रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा ...

उगवतीचे रंग साहित्य अभिवाचनाची पंढरी : चाळीसगाव नगरी

उगवतीचे रंग   साहित्य अभिवाचनाची पंढरी  : चाळीसगाव नगरी  फेब्रुवारी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. या सांस्कृतिक महोत्सवाला जसे देशभरातून साहित्यिक आणि साहित्य रसिक हजेरी लावतात, मायमराठीचा जागर होतो, विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, वाङ्मयीन चर्चा होतात आणि तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांची सांगता होऊन उपस्थित असणारे सगळेच काहीतरी मौल्यवान असे देऊन जातात आणि घेऊनही जातात ; अगदो तसाच अभिवाचनाचा महोत्सव दरवर्षी चाळीसगावला भरतो आणि साहित्य अभिवाचनाच्या वारकऱ्यांची पाऊले चाळीसगाव नगरीच्या दिशेने वळतात. यावर्षी हा  सांस्कृतिक महोत्सव २४, २५ आणि २६ फेब्रुवारीला चाळीसगावमध्ये नुकताच संपन्न झाला. जी संस्था दरवर्षी ही सांस्कृतिक यात्रा भरवते, त्या संस्थेचं नाव आहे रंगगंध कलासक्त न्यास. संस्थेचं नाव जेवढं सुंदर आणि अर्थपूर्ण आहे, तेवढंच संस्थेचं कार्यही. चाळीसगावमधील ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ मुकुंद करंबेळकर हे या संस्थेचे प्रमुख आणि सर्वेसर्वा. हसतमुख, प्रसन्न आणि मृदू व्यक्तिमत्वाचे धनी असल...