मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग २ )

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य ( भाग २ ) समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी  या भागात रवींद्रनाथ टागोरांना आपल्या घरातच समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी कशी लाभली ते आपण पाहणार आहोत. त्यातूनच त्यांचे विविधांगी आणि अत्यंत समृद्ध असे व्यक्तिमत्व कसे विकसित होत गेले हेही आपल्या लक्षात येईल.  टागोरांच्या काळात ब्रिटिश सत्ता भारतात स्थिरस्थावर झाली होती. बंगालमधील शहरी भागात इंग्रजांच्या अनेक गोष्टींचे अनुकरण करण्यात धन्यता मानणारा नवशिक्षित वर्ग होता. बंगालमधील लोककला, लोकनाट्ये, लोकगीते इ. गोष्टींना इंग्रजी नाटकांप्रमाणे अत्याधुनिक स्टेज, पडदे, सजावट आदी गोष्टी नव्हत्या. पण त्यातील कला, अभिनय आणि शब्दफेक मात्र पहिल्या दर्जाची होती आणि प्रेक्षकांच्या काळजाला हात घालणारी होती. पण इंग्रजांना याची जाण नसल्याने आणि त्यांना ते जाणून घ्यायचेही नसल्याने त्यांनी या ग्रामीण बंगालमधील लोककलांना ग्रामीण, उठवळ आणि रानटी अशा प्रकारचा शिक्का त्यावर मारला. इंग्रजी शिक्षण घेऊन नुकतेच शिक्षित झालेल्या शहरी लोकांना सुद्धा मग आपल्या देशातील, प्रांतातील ही लोककला ' क्रूड, अनपॉलीश्...

सावध ऐका पुढल्या हाका

उगवतीचे रंग  सावध ऐका पुढल्या हाका  काही घटनांनी समाजमन ढवळून निघते. असे काही घडले की या समाजाचे, देशाचे पुढे काय होणार असा विचार मनात येतो. केशवसुतांची ' तुतारी ' कविता आठवते. त्या कवितेतली ' सावध ऐका पुढल्या हाका ' ही ओळ तर प्रकर्षाने सारखी आठवत राहते. गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रात, समाजमाध्यमात ज्या दोन घटनांची प्रामुख्याने चर्चा सुरु आहे, त्या अशा. एका धनदांडग्याच्या एका मुजोर मुलाने दारूच्या नशेत वेगात मोटार चालवून दोन निष्पापांचा बळी घेतला. दुसऱ्या एका घटनेत एका हुक्का पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ३० मुलंमुली नको त्या अवस्थेत सापडले. त्यातील बहुसंख्य मुली या हिंदू समाजाच्या तर मुले मुस्लिम समाजातील असल्याचे जो व्हिडीओ समाजमाध्यमांवर फिरतो आहे, त्यातून लक्षात येतं. दोन्ही घटनात दोषी आहेत ते देशातील तरुण. या दोन्ही घटना ज्या शहराला आपण विद्येचं माहेरघर समजतो अशा पुणे शहरात घडलेल्या आहेत. पण शहर पुणे, मुंबई, दिल्ली यासारखे कोणतेही असो, या घटना तरुणाई ज्या दिशेने चालली आहे त्याच्या प्रातिनिधिक आहेत. ज्यांच्या हाती देश द्यायचा, त्यांची अशी अधोगती होताना प...

रवींद्रनाथ टागोर : वारसा, कार्य आणि परंपरा ( भाग १ )

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य  ( भाग १ ) कौटुंबिक पार्श्वभूमी  प्रख्यात लेखक पु ल देशपांडे यांचे ' रवींद्रनाथ : तीन व्याख्याने ' या नावाचे एक छोटेखानी सुंदर पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर पुलंच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाची आपल्याला कल्पना येते. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या पुलंनी केवळ विनोदी साहित्य निर्माण केले नाही तर आपल्याला विचारप्रवण करील अशा प्रकारची साहित्य निर्मिती देखील त्यांनी केली आहे याची साक्ष हे पुस्तक देते. त्या पुस्तकाच्या केलेल्या वाचनातून, काही माझ्या विचारातून आणि अन्य काही माहितीच्या आधारे रवींद्रनाथ, त्यांना लाभलेला वारसा आणि त्यांचे कार्य विशेषतः शांतिनिकेतनाच्या संदर्भात आपल्यासमोर काही भागातून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.   टागोर हे मुळात ठाकूर. इंग्रजांनी त्या नावाचा उच्चार ' टागोर ' असा केला आणि ते ठाकूरचे टागोर झाले. रवींद्रनाथ हा माणूस काय नव्हता ! कवी, लेखक, देशभक्त, तत्वज्ञ, शिक्षक, चित्रकार, शिक्षणतज्ज्ञ, संगीताचे जाणकार आणि खरं सांगायचं तर एक अत्यंत समृद्ध व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती. भारत आणि बांगलादेश या द...

जीना यहाँ मरना यहाँ

उगवतीचे रंग  जीना यहाँ मरना यहाँ   असं म्हणतात की सिद्धार्थ म्हणजेच गौतम बुद्धाला त्याच्या वडिलांनी जीवनातील दुःखाचं  दर्शन घडू नये म्हणून त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला हवी ती सगळी सुखं दिली. पण जीवनातील सत्याला प्रत्येकाला सामोरं जावेच लागतं. तसे त्यालाही जावं लागलं. पण काही काळ का होईना पण सिद्धार्थला जीवनातील दुःखांपासून दूर ठेवण्यात शुद्धोधन यशस्वी झाला. कारण तो राजा होता. पण आज आपल्याला मात्र असे करणे शक्य नाही. जीवनातील चांगले आणि वाईट, सत्य आणि असत्य, सुंदर आणि बीभत्स अशा सगळ्याच गोष्टी नित्यनियमाने काहीशा एकत्रितपणे आपण अनुभवत असतो. ' जिंदगी के रंग कई रे ' असं एक सुंदर गाणं आदमी और इन्सान या चित्रपटात आहे. खरोखरच डोळे उघडे ठेवले तर आयुष्याचे अनेक रंग अनुभवायला मिळतात. काही रंग आनंद देणारे, काही उदास करणारे, काही भीतीदायक तर काही धीर देणारे.  झालं असं की परवा एका लग्नानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत समारंभासाठी गेलो होतो. बड्या घरचं कार्य असल्यानं एका भव्य अशा फार्महाऊसमध्ये सोहळ्याचं आयोजन केलं होतं. प्रवेशद्वारापासूनच कार्यक्रमाची श्र...

मी फुल तृणातील इवले

उगवतीचे रंग   मी फुल तृणातील इवले  सध्या मे महिना सुरु आहे. वैशाख वणवा अंगाची लाही लाही करतो आहे. माणूस, झाडे, वेली, पशुपक्षी सारेच या दाहक वातावरणात होरपळत आहेत. मी गावाहून आलो तेव्हा माझ्या बागेतील गुलाब, जास्वंद आणि इतर फुलझाडे कोमेजून गेलेली दिसली.  जणू ती मला म्हणत होती, ' तुम्ही छान ए सी, फॅन किंवा कुलर मध्ये बसता. थंडगार पाणी,  सरबत, लस्सी, आईस्क्रीम खाता. आम्हाला काही पर्याय आहे का ? आम्हाला जागेवरून हलताही येत नाही. बागेत झाडांच्या बाजूला लावलेली इवली इवली लिलीची फुले तर कोमेजून गेली होती. मला आठवली ती मंगेश पाडगावकर यांची एक सुंदर कविता. ' मी फुल तृणातील इवले...'  पाडगावकर खरोखरच एक सिद्धहस्त कवी. जीवनावर प्रेम करायला शिकवणारा, निसर्गावर प्रेम करायला शिकवणारा. प्रेमाची परिभाषा सांगणारा, प्रेम कुणावरही करावं असं सांगणारा. प्रेम करताना कुठलाही भेदभाव नसतो. तुमचं अन आमचं सेम असतं असं म्हणताच सगळ्या भेदांच्या भिंती गळून पडतात. ' सलाम ' सादर करताना त्यांच्यातील बंडखोरपणा आणि वेगळी वृत्ती आपल्याला भावते. अशा त्यांच्या विविध कविता आपलं जीवन अन भावविश्व स...

मोहिनी स्वरगंधर्वाची

 उगवतीचे रंग  मोहिनी स्वरगंधर्वाची  नुकताच प्रदर्शित झालेला ' स्वरगंधर्व सुधीर फडके ' हा चित्रपट परवा पाहिला आणि खूप दिवसांनी एक अप्रतिम चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले. लता मंगेशकर, आशा भोसले, पं भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे अशा दिग्गज मराठी गायकांच्या मांदियाळीत आपल्या कर्तृत्वाने एक आगळेवेगळे आणि मानाचे स्थान प्राप्त करणारा गायक म्हणजे सुधीर फडके उर्फ बाबूजी. त्यांचे मूळ नाव रामचंद्र. बालगंधर्व, पु ल देशपांडे, आचार्य अत्रे यासारख्या कलाकार आणि साहित्यिकांनी मराठी रसिकांच्या हृदयाकाशात जे मानाचे स्थान पटकावले आहे, त्यातीलच विलक्षण तेजाने तळपणारा एक ध्रुवतारा म्हणजे बाबूजी.  अशा एखाद्या व्यक्तिमत्वावर चित्रपट काढणे आणि तो रसिकांच्या पसंतीला उतरणे ही गोष्ट तशी दिव्यच म्हणावी लागेल. अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करणे हे त्या त्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार यांच्यासाठी एक प्रकारचे आव्हानच असते. पण हे आव्हान सुरेखरित्या पेलण्यात ' स्वरगंधर्व सुधीर फडके ' हा चित्रपट यशस्वी झाला आहे. मराठी संस्कृती, मराठी माती, मराठी संगीत, मराठी साहित्य यासारख्या गो...

पिओ तो जानो...

उगवतीचे रंग   पिओ तो जानो...  " दादा, इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला याल का ? " माझी लेक आणि जावई मला पुण्यातील चांदणी चौकात असलेल्या इराणी कॅफेमध्ये जाण्यासाठी आग्रह करीत होते. मग एके दिवशी सकाळी आम्ही चौघं तिथं गेलो. पाहिलं तर तिथे तरुणाईची ही गर्दी. ! इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी सकाळी सकाळी एवढी गर्दी पाहून मला आश्चर्य वाटलं. मग मला कळलं की हे हॉटेल अष्टौप्रहर सुरु असतं. चहाच्या अशा काही ठराविक दुकानांवर प्रचंड गर्दी कायम असते.  मी विचार करू लागलो. प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरींनी ' एकच प्याला ' हे संगीत नाटक दारूचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी लिहिले आणि ते अजरामर झाले. त्या वेळी तळीरामांचे प्रमाण समाजात वाढले होते. ( आजची परिस्थिती मला माहिती नाही. कारण मी त्या वाटेला जात नाही.नाहीतर  काही मंडळी उगीचच आज काय हे प्रमाण कमी आहे का असे म्हणतील. )  शंभर दीडशे वर्षांपूर्वी भारतात फार कमी लोकांना चहा माहिती होता. इंग्रजांनी भारतात ज्या काही चांगल्या ( ? ) गोष्टी आणल्या, त्यात चहाचा पण समावेश करायला हवा. तर शंभर दीडशे वर्षांपूर्वी ज्यांना चहा माहित...