मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 उगवतीचे रंग अंधारापलीकडील प्रकाश – हेलन केलर यांची प्रेरणादायी गाथा  “दृष्टी नसणं वाईट आहेच, पण दृष्टी असूनही ध्येय नसणं अधिक वाईट आहे.” हे वाक्य आहे त्या स्त्रीचं जिनं आयुष्यभर अंधारात राहतही, इतरांच्या आयुष्यात प्रकाश पेरला. तिचं नाव हेलन केलर. तिचं जीवन म्हणजे अपार संघर्षाची गाथा आहे. जीवनात अशक्य असं काही नाही. तुमच्याकडे जर जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छा असेल, काही तरी भव्य दिव्य करून दाखवण्याची जिद्द असेल, तर होय, तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. हे आपल्या वागण्यातून सिद्ध करणारी महान विदुषी, वक्ता, लेखक आणि समाजसेविका हेलन केलर हिची ही अत्यंत प्रेरणादायी कहाणी तिच्या जन्मदिनानिमित्त आपल्यासमोर ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न.  पूर्वी मी आठवी नववीला इंग्रजी शिकवत असताना, कुठल्या तरी वर्गाच्या पाठ्यपुस्तकात हा पाठ इंग्रजीत दिलेला होता. तेव्हापासून या महान विदुषीने माझ्या मनात आदराचे स्थान पटकावले होते. तिची अफाट जिद्द मला स्तिमित करून गेली होती. ' अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला...' या कुसुमाग्रजांच्या ' कोलंबसाचे गर्वगीत ' या कवितेतील मला आठवत हो...

गार्निशिंग जीवनाचं...

 उगवतीचे रंग गार्निशिंग जीवनाचं... स्वयंपाकघरात एक गोडशी धावपळ सुरू होती. सौ. कुठलातरी छान पदार्थ बनवत होती. त्या पदार्थाचा मंद सुवास संपूर्ण घरभर पसरला होता. तिचा स्वयंपाक पूर्ण झाला आणि समोर आली ती एक सुंदर सजवलेली डिश. त्या पदार्थाचा मी कधी आस्वाद घेतो असे मला झाले.  खरंतर प्रत्येक घरामध्ये अशी एखादी गृहिणी आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी खास पदार्थ नेहमीच तयार करत असते. त्याच वेळेस ती गृहिणी एका शांत, ठाम दृष्टीने शेवटी दिसणाऱ्या थाळीकडे पाहत असते. कारण आपल्या माणसांसमोर तो पदार्थ सादर करताना तो शेवटी कसा दिसावा याचे चित्र तिच्या मनात असते. चव, पोत, रंग आणि सुगंध यांच्या चौकटीत एक सुंदर दृश्य ती मनातल्या मनात रंगवत असते. एखादा खास पदार्थ तयार करताना ती केवळ कृती करत नाही – ती एक स्वप्न घडवत असते. शेवटचा तो कोथिंबिरीचा साज, डाळीवरचा तुपाचा चमचमता थेंब, ताटात केलेली सुबक मांडणी – ही तिच्या दृष्टिकोनाची साक्ष असते. तिच्या डोळ्यांसमोर शेवट असतो – एक परिपूर्ण थाळी ! अशी ही सुंदर थाळी सजवून समोर ठेवणं म्हणजे गार्निशिंग. (  गार्निशिंग म्हणजे  एखाद्या पदार्थाला (मुख्यतः अन्...

ओल्या मातीला आकार देताना...

  उगवतीचे रंग  ओल्या मातीला आकार देताना... लता मंगेशकर यांच्या लहानपणीचा एक प्रसंग आहे. लता ही मंगेशकर भावंडांमध्ये मोठी होती. त्यावेळी त्यांची परिस्थिती चांगली होती आणि मास्टर दिनानाथ हयात होते. एकदा त्यांच्या घरातील साबण संपला. त्यांच्या घरातील नोकर समोरच्या दुकानात साबण आणण्यासाठी गेला. परंतु त्याच्या हातात त्यावेळी जे दोन पैशांचे नाणे होते ते नाणे खोटे आहे, असे म्हणून दुकानदाराने साबण देण्यास नकार दिला. जेव्हा छोट्या लताला ही गोष्ट कळली तेव्हा तिला अतिशय राग आला आणि तो दुकानदार साबण कसा देत नाही ते मी पाहते असे म्हणून तिने त्या नोकराकडून ते नाणे घेतले. त्या दुकानदाराकडे जाऊन त्याच्या गल्ल्यात ते भिरकावले आणि मी मास्टर दीनानाथ यांची मुलगी आहे. मला साबण हवा आहे असे सांगितले. आता त्या दुकानदाराची पंचाईत झाली. त्याला गल्ल्यातून खोटे नाणे शोधता येईना. शिवाय मास्टर दिनानाथांची मुलगी खोटं कशाला बोलेल असे त्याल वाटले. त्याने साबण दिला आणि तो साबण घेऊन लता आनंदाने घरी आली. जेव्हा मास्टर दिनानाथांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटले. त्यांनी तिला जवळ बोलावले आणि म्हटले,"...

नव्वदितही वसंत फुललेलाच !

  उगवतीचे रंग  नव्वदितही ' वसंत ' फुललेलाच ! वसंत ऋतु वर्षातून एकदाच येतो आणि सर्वांना आनंद, हर्ष, उल्हास प्रदान करतो. परंतु आज मी अशा एका व्यक्तिमत्त्वाचा परिचय आपल्याला करून देणार आहे की जी व्यक्ती नव्वदित असतानाही तरुणांनाही लाजवेल अशा प्रकारचे काम करते आहे. या वसंताचा बहर अजूनही ओसरला नाही. होय, हे खरे आहे. या व्यक्तीचे नाव आहे वसंतराव चंद्रात्रे. चाळीसगाव आणि परिसरातील लोक त्यांना ' योगाचार्य ' म्हणून ओळखतात.  वामन मूर्ती, योग आणि व्यायामाने कसलेले प्रमाणबद्ध शरीर, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे विलसणारे तेज, सदैव प्रसन्न आणि हसतमुख असे असलेले हे व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तीला आकर्षित करून घेते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडल्याशिवाय राहत नाही. लोक प्रेमाने आणि आदराने त्यांना बाबा म्हणतात. त्यांना भेटणारी व्यक्ती आदराने वाकून त्यांना नमस्कार केल्याशिवाय राहत नाही आणि नमस्कार करणाऱ्यांच्या पाठीवर बाबांची कौतुकाची आणि आशीर्वादाची थाप पडल्याशिवाय राहत नाही. अनुभवाचा आणि आठवणींचा मोठा खजिना त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारणे ही एक पर्वणी...

( सहन )शीलं परमं भूषणम्

 उगवतीचे रंग  ( सहन )शीलं परमं भूषणम् – सहनशीलतेतून तेज निर्माण करणारे जीवनमूल्य परवा सहज मनशक्ती मासिकाचा जून महिन्याचा (२०२५ ) अंक चाळत होतो. त्यात जीवनगीता या नावाचे एक सदर आहे. त्यात श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारतातील युद्धाच्या वेळेस एक फार सुंदर उपदेश केला. श्रीकृष्ण म्हणतो, " अर्जुना, तू सहन करायला शिक. आयुष्यात तुला देह मिळाला आहे. या देहासकट काही दुःख भोगायला शिक. शील हे सगळ्यात उत्तम असतं. पण सगळ्यात मोठं शील म्हणजे सहनशील होणं. मला दुःख झालं, त्रास झाला, तरी, सगळे लोक असेच वागतात, असं म्हणू नको. हे तुझ्या कर्माचं फळ आहे. शांत रीतीनं, भव्य रीतीनं तुला देहाचं सोनं करायचं असेल, तर सहन करायला शिक. "  हे वाचून मी आश्चर्यचकित झालो. सगळ्यात मोठं शील म्हणजे सहनशीलता असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. इंग्रजीत शील या शब्दाला ' character ' असा शब्द आहे. आपण मराठीत तो ' चारित्र्य ' या अर्थीही वापरतो. ' चारित्र्य ' ही संज्ञा तशी खूप व्यापक आहे. अनेक गोष्टींचा अंतर्भाव त्यात होतो. सचोटी, प्रामाणिकपणा, पारदर्शक व्यवहार आणि नातेसंबंध, निष्ठा आदी अनेक गोष्टी त्...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...

पावसाची शाळा

 उगवतीचे रंग  पावसाची शाळा  सात जूनला भरली पावसाची शाळा, शाळेसाठी भला मोठा आभाळाचा फळा! ढगांच्या गडगडाची वाजली घंटा, वीज चमकून म्हणाली, “सारे वर्गात बसा आता!” जमले आता लहान थोर सारे  गार गार वारा गाऊ लागला गाणे काळा कोट घालून गुरुजी तिथे आले  वर्गावर्गात जाऊन मुलांना शिकवू लागले. शिकवताना बरसतात पावसाचे थेंब पावसाच्या धारात विद्यार्थी चिंब. पावसाच्या या शाळेला नाही नियमित वेळ, इतर वेळी खेळत असतो ऊन-सावलीचा खेळ! विजांचे संगीत आणि जलधारांचे शब्द  शिकताना भान विसरून सारे झाले स्तब्ध. जमिनीवर चालेल मयूर नर्तन छान  फुलवुनी पिसारा घेतो मस्त तान. वेलीचे रंगीत क्रेयॉन्स, झाडांची वही, थेंबांची ही अक्षरं, कोणीच विसरले नाही! इंद्रधनूचे रंग असतात पाठातील धडा, पानाफुलात वाजतो पावसाचा सडा  ही पावसाची शाळा नाही चुकवत कोणी उघड्या मनाने येतात निसर्ग आणि प्राणी.  थोडं चिंब व्हावं, थोडं डुंबावं या शब्दांमध्ये, पावसाची शाळा उघडते मनाच्या दारामध्ये. जोवर असतो पावसाळा तोवर भरते पावसाची शाळा  आगळ्या या शाळेमध्ये मनसोक्त बागडा, नाचा खेळा. © विश्वास देशपांडे, चा...

सुखी जीवनासाठी नवी एबीसीडी भाग २

 उगवतीचे रंग सुखी जीवनासाठी नवीन एबीसीडीई - भाग दोन  A to E पर्यंतची मुळाक्षरे सुखी जीवनासाठीच्या कोणत्या गोष्टींचे प्रतिनिधित्व करतात हे आपण मागील पहिल्या भागात पाहिले. तो लेख वाचल्यानंतर अनेक वाचकांनी इच्छा व्यक्त केली की ही एबीसीडी ...म्हणजेचA टू Z पर्यंतची वर्णमाला पूर्ण करावी. त्यातूनच हा आजचा लेख. या वर्णमालेतील पुढील अक्षरे कोणत्या  मौल्यवान गोष्टी आपल्याला सांगतात हे जाणून घेऊया.  F – Friends (मित्र) आणि Faith (श्रद्धा) आपल्या जीवनात सत्ता आणि संपत्ती यापेक्षाही अधिक महत्त्व मित्रांचे असते ज्याला खरे मित्र लाभले तो खरोखर भाग्यवान ! मन:स्वास्थ्य टिकवण्यासाठी खरे, सच्चे मित्र हे मानसिक टॉनिकसारखे असतात. संवाद, आधार आणि प्रसन्नता यांचं मूळ मैत्रीत दडलेलं असतं.  तसंच F हे अक्षर Faith म्हणजे श्रद्धा या एका अत्यंत महत्त्वाच्या जीवनमूल्याचे देखील प्रतिनिधित्व करते. स्वतःवर, जीवनावर आणि एका सकारात्मक शक्तीवर असलेली श्रद्धा मनाला आधार देते, जीवन जगण्याची ऊर्जा देते. G – Gratitude (कृतज्ञता) आणि Goals (ध्येय) दररोज कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे मानसिक स्वच्छताच. कृत...

' माणूस ' भेटतो तेव्हा..

उगवतीचे रंग   ' माणूस ' भेटतो तेव्हा..  परवाच्या दिवशी मला स्वप्नात एक माणूस भेटला. काय ? विश्वास नाही बसत ? अहो, खरंच सांगतोय ! मी त्याला म्हटलं सुद्धा की तू कोण आहेस ? म्हणाला, " नाही ओळखलंस ना मला ? अरे, मी माणूस आहे माणूस ! " मी जरा हसलोच. म्हटलं जरा वेडाच दिसतो. मग त्याला म्हटलं, " अच्छा, तू माणूस आहेस होय ? मला वाटलं की अजून कोणी वेगळा प्राणी ! "तो जरा हसला आणि म्हणाला, " माणूसच आहे मी. चक्क माणूस. नीट बघ माझ्याकडे. "  मी हसलो. म्हणालो, " त्यात काय बघायचं ? अरे, भल्या माणसा, चार माणसांसारखाच माणूस तू ! वेगळं काय आहे तुझ्यात ? दोन हात, दोन पाय, डोकं, डोळे .. सगळं सगळं तर माणसासारखंच तर आहे. आणि मी पण तुझ्यासारखा माणूसच आहे ना ! " तो पुन्हा हसला. म्हणाला, " तू आणि माणूस ? तोंड बघा नुसतं ! " आता माझी तर पूर्ण खात्रीच झाली की याचं जरा फिरलेलंच दिसतं. पण आता काही इलाज नाही. गाठ पडलीच आहे तर बोलावंच लागणार. मी म्हटलं, " अरे असं काय बोलतोस ? काय कमी आहे माझ्यात ? मी पण तुझ्यासारखा माणूसच आहे. हां, आता तुझ्या चेहऱ्यावरील तेज ...