मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उगवतीचे रंग कर्तव्याने घडतो माणूस

उगवतीचे रंग  कर्तव्याने घडतो माणूस   कधी कधी आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की माणूस अगदी खडबडून जागा होतो. स्वतःबद्द्दल फिरून विचार करायला लागतो. गेल्या आठवड्यात अशाच दोन घटना घडल्या. त्या घटना सांगण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी आपल्याला सांगणे आवश्यक आहे.  सध्या पावसाळा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही नुकतेच पुण्याहून आलो होतो. आमच्या भागात येथील नगरपालिकेने काही दिवसांपूर्वीच भूमिगत गटारांचे काम केले होते. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध खड्डे खोदून पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि चेंबर्स बांधण्यात आले होते. नगरपालिकेचे आणखी काही नियोजन असेल, ते माहिती नाही पण त्यांनी ते खोदलेले रस्ते नीट न करता वरवर केवळ माती लोटून ते भरले होते. व्हायचे ते झाले. आधीच रस्ते वेगवेगळ्या कारणांनी खराब झालेले होते. तशात हे काम. थोडाफार पाऊस झाला आणि रस्त्यांना चिखलाचे स्वरूप आले. एवढा प्रचंड गारा आणि चिखल झाला की गाड्या त्यात फसू लागल्या. काही टू व्हीलर चालवणारे तोल जाऊन पडले. घरासमोर इतका चिखल की पाय टाकण्याचीही पंचाईत. तेथून कसेबसे बाहेर पडावे तर चारही बाजूला रस्त्यांची तीच अवस्था....

उगवतीचे रंग संगीतकार मदन मोहन

  उगवतीचे रंग  संगीतकार मदन मोहन  गझलोका बादशहा असे बिरुद सार्थपणे मिरवणारा संगीतकार म्हणजे संगीतकार मदन मोहन. मदन मोहन यांनी तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्याकडून अनेक अविस्मरणीय अशा गझला गाऊन घेतल्या आहेत. पुर्वाश्रमात एक सैनिक असलेल्या मदन मोहन यांच्या भाग्यात एक सुप्रसिद्ध संगीतकार होण्याचे संकेत नियतीने आधीच दिले होते. बंदूक हाताळणाऱ्या हातांना वाद्ये वाजवणे अधिक आवडत होते. संगीताची जाण आणि आवड रक्तातच घेऊन हे बाळ जणू जन्मले होते. २५ जून १९२४ मध्ये बगदाद मध्ये त्यांचा जन्म झाला.  मदन मोहन यांचे वडील रायबहादूर चुनीलाल कोहली  हे बॉंबे टॉकीजचे मालक होते. पण फिल्मिस्तान मध्ये असलेल्या या पित्याला आपला पुत्र मात्र या क्षेत्रात यावा असे अजिबात वाटत नव्हते. पण नियतीच्या मनात या त्यांच्या मुलाला सर्वोत्कृष्ट संगीतकार करण्याचे जणू ठरलेलेच होते.  हा ' बडे बापका बेटा ' नंतर आपण निवडलेल्या मार्गानेच गेला. तो ही ' बडा ' झाला पण आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर. एक संगीतकार, गझलांचा बादशहा म्हणून त्याने जो लौकिक मिळवला, तो भल्याभल्यानाही अप्राप्य होता.  सुरुवातीला ...

स्वदेशीची जादू - भाग सहा समृद्ध प्राचीन वारसा - ग्रामीण उद्योग

 उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग सहा  समृद्ध प्राचीन वारसा - ग्रामीण उद्योग  सोपानराव मुलांना आपल्या गावात फेरफटका मारून आणत होते. श्यामराव आणि श्यामलाताई सोबत होत्याच. रामू लोहाराचे काम पाहून ते खाली उतरत असताना शामराव गमतीने पिंकी आणि राजेशला म्हणाले, ' हे लोहाराचे काम पाहताना मला लहानपणी शिकलेल्या दोन म्हणी आठवल्या बरं का ? '  ' श्यामराव, आम्हाला पण जरा कळू द्या की तुम्हाला काय आठवलं ते ? हसत हसत सोपानराव म्हणाले.  ' अरे श्याम, आपल्या वर्गाला त्या भागवत बाई मराठी शिकवायच्या, त्या आठवतात का ? '  ' व्हय की. चांगल्या लक्षात हायेत त्या. मला शुद्धलेखन चुकले म्हणून त्यांनी दररोज दहा ओळी शुद्धलेखन लिहून आणायला सांगितलं होतं. '  ' पण सोपान अजूनही बाई भेटल्या तर तुला शुद्धलेखनावरून शिक्षा करतील बरं ! ' श्यामरावांनी असं म्हणताच हास्याचा स्फोट झाला. सगळेच त्यात सामील झाले.  ' हां, तर मला आठवल्या त्या म्हणी त्यांनी सांगितलेल्या. भागवत बाई म्हणायच्या, ' संस्कार आणि परिस्थिती माणसाला घडवते. मुशीत जसे सोने उजळून निघते, तसाच परिस्थितीमुळे माणूस. जसं राम...

स्वदेशीची जादू - भाग पाच समृद्ध प्राचीन वारसा - ग्रामीण उद्योग

उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग पाच   समृद्ध प्राचीन वारसा - ग्रामीण उद्योग  हेमाडपंती मंदिर पाहिल्यानंतर पिंकी आणि राजेश खुशीत होते. त्यातच खूप दिवसांनी उसाचा रस प्यायल्याने त्यांना आनंद झाला होता. गाडी घनदाट अशा अभयारण्यातून जात असल्याने प्रवासाची मजा काही औरच होती. एका ठिकाणी विश्रांतीसाठी जागा पाहून श्यामरावांनी गाडी थांबवली. ते ठिकाण डोंगरापासून अगदी जवळ होते. झाडांच्या गर्द सावलीत मध्यभागी मोकळी जागा होती. समोरच्या बाजूस असलेल्या भव्य डोंगररांगा लक्ष वेधून घेत होत्या. निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज कानावर पडत होते. मधूनच झाडांवर असलेली माकडे इकडून तिकडे मजेत उड्या मारीत होती. आपल्या छोट्या पिल्लाला छातीशी कवटाळून माकडिणी सुद्धा झाडांवर उड्या घेत होत्या. ते सगळे पाहून पिंकी आणि राजेशला खूपच गंमत वाटली. त्यांनी आपल्याजवळील बिस्किटे, घरून आणलेल्या नारळाच्या वड्या त्यांना खाण्यासाठी दिल्या.  मोकळी हवा, गर्द झाडी, प्रदूषणरहित आणि शांत वातावरण मन प्रसन्न करीत होते. श्यामरावांनी आपल्याजवळील कॅमेऱ्याने भोवतालच्या निसर्गाचे सुरेख चित्रीकरण केले. आता सगळ्यांनी झाडांच...

स्वदेशीची जादू - भाग चार समृद्ध प्राचीन वारसा

उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग चार  समृद्ध प्राचीन वारसा   श्यामराव, श्यामलाताई , पिंकी आणि राजेश यांची जंगल सफारी मजेत सुरु होती. पिंकी आणि राजेश तर अतिशय खुश होते. बऱ्याच दिवसांनी आई बाबांबरोबर गाडीतून ते सहलीसाठी जात होते. तेथून जवळच एक प्राचीन हेमाडपंती शिवमंदिर होते. ते मुलांना दाखवावे म्हणून श्यामराव त्यांना तिथे घेऊन जात होते. सगळ्यांची वटवृक्षाखाली खाणं आणि थोडी विश्रांती झाली होती. त्यामुळे सगळ्यांचा मूड फ्रेश होता. गाडीत बाबांनी ' जय जय शिव शंकर ' गाणं लावलं होतं आणि त्या तालावर त्यांचं डोलणं आणि गुणगुणणं सुरु होतं. रस्त्यावर एके ठिकाणी प्राचीन शिवमंदिराकडे असा बोर्ड त्यांना लावलेला आढळला. मुख्य रस्त्याला सोडून गाडी आतमधील छोट्या कच्च्या रस्त्याकडे वळली. थोडेसे अंतर गेल्यानंतर लगेच शिवमंदिर होते. श्यामरावांनी एका लिंबाच्या झाडाच्या दाट सावलीत गाडी पार्क केली. सगळे खाली उतरले.  तिथे एका बाजूला काही माणसे फुले, हार, बेलपत्रे आदी विक्रीसाठी घेऊन बसली होती. शामलाताईंनी एका बाईजवळून बिल्वपत्रे विकत घेतली. दुरूनच शिवमंदिराची दगडी हेमाडपंती बांधणी लक्ष वेध...

स्वदेशीची जादू- भाग तीन वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...

उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू- भाग तीन   वृक्षवल्ली  आम्हा सोयरी वनचरे...  रेडिओवर तुकोबांचा अभंग लागला होता. लताबाई गात होत्या. त्या गाण्याच्या तालावर श्यामरावांनी ठेका धरला होता. तेही गुणगुणू लागले होते, ' वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...' एवढ्यात राजेशने त्यांची तंद्री भंग केली.. ' बाबा, ऐका ना मी काय म्हणतोय ते...? ' श्यामराव आपल्या तंद्रीतून बाहेर येत म्हणाले, ' हं, बोला राजे. ' राजेश म्हणाला, ' बाबा, हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना ? ' श्यामराव राजेशच्या ज्ञानावर खुश होत म्हणाले, ' अगदी बरोबर., तुला आवडला का हा अभंग ? लता मंगेशकरांनी फार सुंदर गायला आहे. ' ' अहो बाबा, अभंग तर सुदंर आहेच. पण मला विचारायचे ते वेगळेच आहे. ' ' बोल बोल काय विचारायचे आहे तुला ? ' बाबा म्हणाले.. राजेश म्हणाला, ' बाबा, आता जसे शाळेत पर्यावरणाचे महत्व शिकवतात. झाडे लावा वगैरे सांगतात. तसे तुकाराम महाराजांच्या काळी पण सांगत असावेत का ? ' हा प्रश्न ऐकल्याबरोबर बाबांना हसू फुटले. तशी पिंकी मध्ये येत म्हणाली, ' बाबा, हा राजेश ना काय विचारेल का...

जरा थांबा, विचार करा - पुस्तक परीक्षण

  उगवतीचे रंग  जरा  थांबा, विचार करा - पुस्तक परीक्षण  बऱ्याच दिवसांनी एक सुंदर पुस्तक हाती लागले. हे पुस्तक आहे अलका काकडे यांचं. पुस्तकाचं नाव आहे ' जरा थांबा, विचार करा ! ' हे पुस्तक उन्मेष प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. साधारणपणे १७० पानी असणारे हे पुस्तक कमी वेळात वाचून पूर्ण होऊ शकते. पण त्यातील आशय मात्र विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे नुसतेच वाचून सोडून देण्यासारखे हे पुस्तक नाही. त्यातील अनेक लेख आपल्याला आपल्या स्वतःशीच संबंधित आहेत असे वाटतात. त्यामुळे हे लेख पुन्हा पुन्हा वाचून विचार करण्यासारखे आहेत. असे असले तरी पुस्तकाची भाषा ओघवती आणि वाचकांशी संवाद साधणारी आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळवाणे होत नाही. मानसशास्त्राच्या अभ्यासक असणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून समुपदेशन करणाऱ्या अलकाताई यांनी हे पुस्तक कुठेही कंटाळवाणे, क्लिष्ट, निरस होणार नाही याची काळजी घेतली आहे. सुरुवातीला या पुस्तकातील लेख दै. संचार मधील ' विचारयात्रा ' या सदरात प्रसिद्ध  झाले. नंतर ते लेख आपल्यासमोर पुस्तकरूपाने आले आहेत.  अगदी मुखपृष्ठापासूनच हे पुस्तक आपले ...

स्वदेशीची जादू - भाग दोन

उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग दोन    योग आणि आयुर्वेद  आपल्या देशात आणि आपल्या राज्यात स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या वस्तू, वनस्पती, फळे, फुले या सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात. म्हणूनच जाहिरातबाजीच्या मागे लागून विदेशी वस्तू वापरण्यापेक्षा स्वदेशी वस्तू वापरणे कधीही चांगलेच. स्वदेशी चळवळीचे एक महान प्रचारक आणि अभ्यासक राजीव दीक्षित आपले संपूर्ण आयुष्यच त्यासाठी वाहून घेतले होते. स्वदेशी चळवळीला त्यांनी योग आणि आयुर्वेद यांची जोड दिली होती. घरात विशेषतः स्वयंपाकघरात असणाऱ्या अनेक वस्तूंचा आपल्या आरोग्यप्राप्तीसाठी वापर कसा करून घेता येईल हे त्यांनी अनेक रुग्णांवर प्रयोग करून सप्रमाण सिद्ध केले. घरात असणाऱ्या दालचिनी, मिरी, लवंग या सारख्या मसाल्याच्या वस्तू तसेच मेथी, खाण्याचा चुना, मीठ यासारख्या अनेक गोष्टींचे अनेक आजारांवर उपयोगी पडणारे गुणधर्म सांगितले. मीठ, साखर,बेकरी पदार्थ, फ्रिज आणि फ्रिजमधील वस्तू  यासारख्या गोष्टींच्या अतिवापरापासून दूर राहा असे निक्षून सांगितले. आजचे आधुनिक संशोधन सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर आरोग्यासाठी चांगला न...

स्वदेशीची जादू - भाग एक

उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू  - भाग एक   जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती हैं बसेरा, वो भारत देश हैं मेरा. माझ्या देशातल्या मातीत, पानोपानी सोने आहे. पण त्याची जाणीव तुम्हा आम्हाला नसते. चमकणाऱ्या विदेशी वस्तू आम्हाला आकर्षित करतात. पण जे चकाकते ते सगळेच सोने नसते ही गोष्ट आम्ही सोयीस्कर विसरतो. जेव्हा आमच्या हळदीवर, बासमती तांदळावर, कडुलिंबाच्या औषधी उपयोगांवर दुसऱ्या देशांनी पेटंट घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा कुठे आम्हाला जाग आली. अन्यथा आपल्या गोष्टींचे महत्व आम्हाला कुठे ? पूर्वी आमच्या दंतमंजनात कोळसा आणि मीठ आहे म्हणून हिणवणाऱ्या विदेशी कंपन्या आज मोठ्या गर्वाने आमच्या टूथपेस्टमध्ये कोळसा, मीठ वगैरे आहे म्हणून टेंभा मिरवतात. तेव्हा आम्हाला त्याचे महत्व कळते. एखादी गोष्ट जोपर्यंत दुसरे लोक सांगत नाहीत, तोपर्यंत आम्हाला त्याचे महत्व कसे बरे पटावे ? वस्तूंच्या बाबतीतच काय, पण माणसांच्या बाबतीत सुद्धा आम्ही असेच वागतो. स्वामी विवेकानंद जोपर्यंत अमेरिकेतील शिकागो येथे आपले विचार प्रकट करून जगन्मान्य होत नाहीत, तोपर्यंत आम्हाला सुद्धा त्यांचे महत्व कळत नाही. स्वदेश...