मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक काळ ऐसा होता...

 उगवतीचे रंग एक काळ ऐसा होता… लिहिता लिहिता सहज काही ओळी सुचल्या… एक काळ असा होता— जेव्हा गुणवत्तेला मोल होते. एक काळ असा होता— जेव्हा कलेचे मोल होते, हृदयातून उमटलेले गाण्याचे बोल होते. एक काळ असा होता— जेव्हा पैसा होता छोटा, पण माणूस होता मोठा. एक काळ असा होता— विचारात मतभेद होते, पण माणसाबद्दलचा आदर अविचल होता. एक काळ असा होता— जात अन् धर्म किरकोळ होते, पण माणूस सर्वांत महत्त्वाचा होता. या ओळी सुचण्याचं कारण म्हणजे आज आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक घटना. तरीही, पूर्वी सर्व काही चांगलेच होते आणि आज सर्वच वाईट आहे, असा माझा हेतू अजिबात नाही. आजही इमानदार आणि आदर्शांनी जगणाऱ्या असंख्य माणसांमुळेच समाजाचा तोल टिकून आहे. फरक एवढाच आहे की त्यांचा आवाज गोंगाटात हरवून जातो. मला आठवतात—महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. विचारांत फरक असूनही एकमेकांबद्दलचा आदर कधीच ढळला नाही. नेहरू आणि सरदार पटेल—वेगवेगळ्या मतांचे, पण राष्ट्रकार्यासाठी परस्परांचा आदर राखणारे. सावरकर–सुभाषबाबू, सावरकर–गांधीजी—मतभेद असले तरी टीका कधीच वैयक्तिक पातळीवर गेली नाही. स्वातंत्र्याच्या काळात हे अग्रगण्य नेते ह...

वृक्षमाता सालूमरदा थिमक्का

  उगवतीचे रंग  वृक्षमाता सालूमरदा थिमक्का काही दिवसांपूर्वी  सालूमरदा थिमक्का गेल्याची बातमी आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचली असेल.  सालूमरदा हे त्याचं नाव नाही. कानडी भाषेत त्याचा अर्थ होतो ' झाडांची रांग.' रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडांची रांग या स्त्रीने उभी केली म्हणून ती सालुमरदा.  संत तुकारामांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या उक्तीचा अर्थ हजारो वर्षांनी एका अशिक्षित आणि गरीब स्त्रीने त्यांच्या रूपाने आपल्या कृतीने सिद्ध केला. औपचारिक शिक्षण नाही, पण पर्यावरणाचे सखोल ज्ञान उपजतच होतं.अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली आणि मोलमजुरी करणारी ही स्त्री. तिचा विवाह बिक्कल चिक्कय्या यांच्याशी झाला. पण दोघांनाही अनेक वर्ष मूल होऊ शकलं नाही. या गोष्टीला त्यांनी नियतीचा शाप न मानता, वृक्षांनाच अपत्य मानण्याचं ठरवलं. त्यांच्या पतीनेही त्यांना या कामात मनापासून साथ दिली. त्यांच्या गावाजवळून ९४ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जात होता. हुलीकल ते कुडूर या रस्त्यावर त्यांनी वडाची काही रोपे लावली. या रोपांना वाढवणे हा जणू त्यांच्या जीवनात कामचा एक भाग झाला. उन्हाळ्यात दूरवरून...

काय हवे ?विद्वत्ता की चातुर्य ?

उगवतीचे रंग  काय हवे:विद्वत्ता की चातुर्य ?  ​ माझे एक मित्र आहेत, नाव त्यांचे पंडित. आणि या पंडित नावाच्या मित्राचा जेव्हा जेव्हा फोन येतो, तेव्हा तेव्हा माझ्या मनात एक विचार येतो आणि लगेच कविवर्य मोरोपंतांच्या एका सुभाषितातल्या ओळींची आठवण होते: ​"केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार। शास्त्रग्रंथविलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार।।" मी स्वतःशीच हसतो, कारण मोरोपंतांनी 'पंडित मैत्री'तून मनुष्याला चातुर्य येतं असं सांगितलं आहे. गंमत थोडा वेळ बाजूला राहू देऊ पण माझ्या मनात एक प्रश्न नेहमी घोळत राहतो. तो हा की. मोरोपंत हे स्वतः इतके मोठे विद्वान असूनही त्यांनी या चार मार्गातून मिळणाऱ्या अंतिम फळाला 'विद्वत्ता'  न म्हणता, 'चातुर्य' (Practical Wisdom) असे का म्हटले असेल बरं? त्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षाही काहीतरी अधिक महत्त्वाचे सांगायचे आहे, हे निश्चित! ​येथेच विद्वत्ता आणि चातुर्य यातील सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक स्पष्ट होतो, जो जीवनातील यशाची गुरुकिल्ली आहे. विद्वत्ता आणि व्यावहारिक चातुर्य यातील फरक स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट बऱ्याच वेळा ...

आणि बिबट्या पळाला...

उगवतीचे रंग  आणि बिबट्या पळाला... ​रात्री टीव्हीवर बातम्या पाहत असताना नाशिक आणि नगर भागात बिबट्याने किती थैमान घातले ते दाखवत होते. बिबट्याच्या दहशतीने लोक घाबरले होते. त्या बातम्या पाहतच मी झोपी गेलो.  मी गाढ झोपलो असताना अचानक मला एक भीतीदायक डरकाळी ऐकू आली. मी दचकून जागा झालो. पाहतो तर काय समोर चक्क एक बिबट्या! त्याचे डोळे अंधारात चमकत होते.   तो अगदी समोर आणि मी त्याच्या शिकारीच्या टप्प्यात. बापरे ! आता काही खरं नाही. माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्यात कुठून एवढे बळ आले कुणास ठाऊक, पण भीती वाटण्याऐवजी माझ्या डोक्यात काहीतरी केमिकल लोचा झाला आणि मला थेट 'शोले' चित्रपटच आठवला. समोर साक्षात मृत्यू उभा होता आणि माझ्यातला 'गब्बर सिंग' जागा झाला होता. ​बिबट्याने पुन्हा एकदा गुरगुरत माझ्याकडे पाहिले. मी थरथरत्या हाताने चादर सावरली आणि मनातल्या मनात म्हणालो, "जो डर गया, समझो मर गया!" ​बिबट्या एक पाऊल पुढे आला. त्याचा पवित्रा पाहून मला वाटलं तो आता झडप घालणार. पण मी ही काय कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. मी बेडवर उभा राहिलो आणि पूर्ण ताकदीने ओरडलो, "अरे ओ सांब...

त्या मुलांच्या गंधकोषी

  उगवतीचे रंग  त्या ' मुलांच्या ' गंधकोषी काही वर्षांपूर्वी मी अमरावतीच्या शाश्वत स्कूल या शाळेला भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या टेबलवर एक बोर्ड होता. त्यावर लिहिले होते Every child is unique. ' तारे जमीपर ' हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. त्यातील ईशान अवस्थी आठवतो का ? त्याला जेव्हा होस्टेलमध्ये दाखल केले जाते तेव्हा तो अतिशय दुःखी होतो आणि कोणाशीही बोलत नाही कारण तो आपल्या घरापासून आणि आईपासून तुटतो. या ईशानला डिस्लेक्सिया नावाची एक व्याधी आहे. तो b आणि d, 6 आणि 9 यासारख्या गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही. पण ही व्याधी बुद्धिमत्तेशी संबंधित नाही. अशा मुलांना समजून घेणे जरुरीचे असते. या चित्रपटातील शिक्षकाचे काम आमिर खान या गुणी नटाने केले आहे. तो त्या मुलाला समजून घेतो आणि त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देतो. त्याला असे आढळून येते की ईशान हा चित्रकलेमध्ये अतिशय प्रगती करू शकेल आणि तो त्याच्या त्या गुणांना प्रोत्साहन देतो. आणि होतेही तसेच. पुढे जी चित्रकला स्पर्धा घेतले जाते, त्यात ईशानच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळते....

नॉर्मल कझिन्स :मूर्तीमंत सकारात्मकता

  उगवतीचे रंग नॉर्मन कझिन्स : मूर्तिमंत सकारात्मकता  नॉर्मन कझिन्स हा एक अमेरिकन पत्रकार, प्राध्यापक आणि जागतिक शांततेचा खंदा पुरस्कर्ता ! त्याची कथा मोठी विलक्षण आणि प्रेरणा देणारी आहे. अमेरिकेतून निघणाऱ्या The Saturday Review चे ते दीर्घकाळ संपादक होते. त्यांची दोन पुस्तके म्हणजे कोणत्याही कारणाने आयुष्यात निराश झालेल्या माणसाला मार्ग दाखवणारा दीपस्तंभ. The Anatomy of Illness, Head First आणि The Healing Heart ही त्यांची गाजलेली पुस्तके.  या पुस्तकातून त्यांची जीवनगाथा लोकांसमोर आली.  नियती एखाद्या माणसाची किती कठोर परीक्षा घेऊ शकते ते नॉर्मन कझिन्स यांच्या आयुष्याकडे पाहिले म्हणजे लक्षात येते. १९६४ मध्ये त्यांना अँकीलोझिंग स्पॉन्डीलाईटीस हा दुर्मिळ आणि दुर्धर आजार झाला.स्नायू आणि सांध्यांच्या आजाराने या माणसाला बिछान्याला जखडून ठेवले. आपल्या कामात नेहमी कार्यरत राहणाऱ्या या उत्साही माणसाला अंथरुणाला खिळून राहावे लागले. डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे निदान केले आणि त्यांना सांगितले की हा अत्यंत दुर्मिळ आणि दुर्धर असा आजार आहे यातून बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी. पाचश...

अदृश्य अस्त्रांचा धोका ( भाग दोन)

  उगवतीचे रंग  अदृश्य अस्त्रांचा धोका (भाग दोन ) पहिल्या महायुद्धातच रसायन अस्त्र आणि वायू अस्त्र वापरण्याची स्पर्धा जर्मनी आणि दोस्त राष्ट्रांमध्ये सुरू झाली. क्लोरीन वायूला तरी वास आणि रंगरूप असते. तो ओळखला जाऊन त्याविरुद्ध काहीतरी प्रतिबंधक योजना करता येते. त्यामुळे जर्मनीने त्यापुढे जाऊन अशा वायूचे संशोधन करायचे ठरवले की ज्याला वास किंवा रंगरूप नसेल आणि त्याची मारक क्षमता क्लोरीन पेक्षा अधिक असेल. जर्मन संशोधकांनी फॉस्जेन हा वायू शोधला. या वायूला रंग रूप आणि गंध नव्हता. तो हुंगला तरी सुरुवातीला लक्षात येत नव्हते. या वायूची मारक क्षमता अफाट होती. ज्या ज्या परिसरात तो सोडला गेला, त्या परिसरातील माणसे, प्राणी एवढेच काय परंतु वनस्पती जीवन देखील नष्ट झाले. पुढे दोस्त राष्ट्रांनी देखील आपापल्या प्रयोगशाळेत हा वायू तयार केला. त्यांनी त्याचा वापर जर्मन सैन्यावर केला.अशा या वायूंच्या संशोधन काळात त्यांच्या मारक क्षमतेचे प्रयोग निरपराध अशा प्राण्यांवर केले जात होते. या चाचण्यांमध्ये अनेक प्राण्यांचे बळी गेले. आपल्यावरील हल्ल्यामुळे जर्मनी सावध झाले त्यांनी आणखी अतिसंहारक अस्त्र बनव...

लता अजून गाते...

उगवतीचे रंग लता अजून गाते... तसं तर लताचा आज जन्मदिन नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग मी का लिहितो तिच्यावर ? तर माझ्यासाठी ती अजूनही गातच असते. दिवसभरात कानावर तिची कुठली ना कुठली तरी गाणी पडत असतात. त्या माध्यमातून ती माझ्याशी बोलत असते आणि गातही असते. आता तुम्ही म्हणाल की लतासाठी एकेरी शब्द वापरणारा हा कोण शहाणा ? पण खरं सांगू ? आपल्या जवळच्या माणसाला कोणी आहो जाहो करतं का ? आपली आई आपल्याला सगळ्यात जवळची असते. तिला करतो का आपण आहो जाहो ? तशीच आहे लता माझ्यासाठी !  खरंतर आज ती आपल्यात नाही. पण असं कधीच वाटत नाही. ती अजूनही गात असते. तिचं कोणतेही गाणं कानावर पडलं की मन त्यात हरवून जातं. ते गाणं पूर्वी जरी ऐकलं असलं तरी आता ते ऐकताना त्यातील नवीन अर्थ, नवीन सौंदर्य प्रतीत होतं. त्यातून ती जणू बोलतच असते माझ्याशी ! हा अबोल संवाद असतो.  आणि बऱ्याच वेळा एकतर्फी. ती बोलत असते आणि मी ऐकत असतो. तो दैवी स्वर, त्यातील भावभावना जिवंत होऊन हृदयाला हात घालतात. ( लताचं लहानपणीच नाव हृदया होतं असं म्हणतात. किती सार्थ नाव ! ) गाणं ऐकताना कधी कधी डोळे नकळत पाणावतात, हातही नकळत जोडले जातात. त...