मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ज्योत दिव्याची मंद तेवते

 उगवतीचे रंग  ज्योत दिव्याची मंद तेवते....   वेळ संध्याकाळची. थोडा अंधार पडायला लागला होता. घरातले दिवे लावले. पण देवाजवळही दिवा लावल्याशिवाय बरं वाटत नाही. किंबहुना आपली परंपराच आहे ती ! थोडा वेळ दिवा लावून देवाजवळच शांत बसून राहावं. त्याच्यासारखं सुख नाही. देवाजवळच्या समईच्या वातींना थोडा गुल ( कार्बन ) आला होता. तो बाजूला केला. समईत थोडं तेल घातलं आणि काडी पेटवली. वातींनी पेट घेतला. समईच्या ज्योतीकडे पाहिलं. सुरुवातीला ज्योत काही क्षण निळसर भासली. नंतर ती पिवळ्या सोनेरी रंगाची झाली. काही वेळानं समईतलं तेल संपल्यानंतर ती जेव्हा मालवली तेव्हा किंचित काळ लालसर होऊन शांत झाली.  या ज्योतीकडे पाहत असताना मानवी जीवनासंबंधी मनात विविध विचार आले. सुरुवातीला ती ज्योत निळसर दिसली. हा निळा रंग म्हणजे आपले बाल्य. ती ज्योत जशी क्षण दोन क्षण निळी दिसते तसेच आपले बाल्यही रम्य असते. अल्पकाळ टिकणारे असते. कधी संपते ते कळत नाही. म्हणून तर बालपणीचा काळ सुखाचा असे आपण म्हणतो. निळ्या रंगाचे हे पक्षी केव्हा भुर्रकन उडून जातात ते कळत नाही. पण आठवणी मात्र जन्मभरासाठी ठेवून जातात....

स्वदेशीची जादू - भाग चौदा स्वयंपूर्ण ग्रामीण भारत

  उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग चौदा  स्वयंपूर्ण ग्रामीण  भारत  श्यामरावांकडे आलेल्या भार्गवी वहिनी, भगवानराव तसेच चैतन्य आणि पिंकी आणि राजेश यांची छान गप्पा मारत जेवणं झाली. सगळ्यांची जेवणं झाल्यावर सगळे श्यामरावांच्या गच्चीवर आले. श्यामरावांनी गच्चीवर छान बाग केली होती. गच्चीवर सुंदर लाईट्स बसवले होते. श्यामलाताई आणि भार्गवी वहिनी झोपाळ्यावर बसल्या. मुलांनी छानपैकी बुद्धिबळाचा डाव मांडला होता. श्यामराव आणि भगवानराव यांच्याही कुठल्यातरी विषयावर चर्चा सुरु होती. पिंकीने भार्गवी काकूंच्या अंगावरील साडी पाहिली. तिला ती खूपच आवडली होती. ती म्हणाली, ' काकू, ही साडी किती सुंदर आहे ! तुमच्या रंगाला अगदी खुलून दिसते. '  भार्गवी वहिनी म्हणाल्या, ' पिंकी, या साडीला कांचीपुरम किंवा कांजीवरम साडी म्हणतात. मागे काका तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेले होते ना , तेव्हा त्यांनी येताना ही साडी आणली. आज एका ठिकाणी लग्नानिमित्त आयोजित केलेल्या स्वागत समारंभाला जायचे होते म्हणून ही साडी नेसून आले. '  ' खरंच,  किती तलम आणि नक्षीदार साडी आहे ! या साड्या तिकडेच तयार होतात...

होय, मला शिक्षक व्हायचं आहे

  उगवतीचे रंग  होय, मला शिक्षक व्हायचं आहे  मी शाळेत शिकत असतानाची गोष्ट. आमच्या वर्गावर मराठीचा तास घेणारे अमृतकार सर इतके तन्मयतेने शिकवायचे की आम्ही त्यात रंगून जायचो. तास कधी संपला हे कळायचे नाही. त्यातूनच आमची मराठीच्या अवांतर वाचनाची आवडही त्यांनी फुलवली. कधी कधी भा. ल. कोतकर सरही आम्हाला मराठी शिकवायचे. अमृतकर सर आम्हाला इंग्रजीही शिकवायचे. गणिताचे के पी वाणी शिक्षक कठीण समीकरणे, प्रमेये अशा काही खुबीने शिकवायचे की घरी ते सोडवताना मजा यायची. विक्रम पाटील, करंदीकर सर विज्ञानाचे शिक्षक कधी प्रयोगातून तर फळ्यावर काढलेल्या आकृतीतून एखादा विषय छान समजावून द्यायचे आणि ते कायमस्वरूपी लक्षात राहायचे. रावशास्त्री म्हणजे संस्कृतचे विद्वान. असे सगळेच शिक्षक उत्तम शिकवत. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पी बी देशपांडे सर तर लीलया कुठलाही विषय शिकवू शकायचे. पण एखाद्या कार्यक्रमाच्या दिवशी सगळ्या विद्यार्थ्यांना उद्देशून ते जे भाषण करीत असत, ते मला आजही आठवते. ते म्हणायचे, ' माझ्या शाळेत तुम्ही फक्त मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान शिकण्यासाठी येत नाहीत. ते तर तुम्हाला शिकायचं आहेच पण त्...

स्वदेशीची जादू - भाग तेरा स्वयंपूर्ण ग्रामीण भारत

  उगवतीचे रंग  स्वदेशीची जादू - भाग तेरा  स्वयंपूर्ण ग्रामीण भारत  श्यामराव, श्यामलाताई, पिंकी आणि राजेश हे एक आदर्श कुटुंब होते. सतत नवनवीन गोष्टी शिकणे, निसर्गाचा आनंद घेणे याकडे त्यांचा नेहमी ओढा असे. गावातील लोक श्यामराव आणि श्यामलाताईंना एक आदर्श आईवडील म्हणून ओळखत असत तर पिंकी आणि राजेश यांची प्रसिद्धी आदर्श आणि आज्ञाधारक मुले म्हणून होती. गावातीलच रोटरी क्लबच्या वतीने श्यामराव आणि श्यामलाताईंचा आदर्श पालक म्हणून सत्कार करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना श्यामराव म्हणाले, ' आपण आज आमचा आदर्श पालक म्हणून सन्मान केला आहे त्याबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, आईवडील होणे सोपे असते पण आदर्श पालक होणे ही कठीण गोष्ट आहे. मुलांना घडवायचं असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासूनच होते असं मी मानतो. आमची मुलं  पिंकी आणि राजेश यांना आम्ही ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत याची जाणीव ठेवून वाढवतो. त्यांना ज्या गोष्टींची आवड आहे, त्या करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य देतो पण त्याचबरोबर त्यातील फायदेतोटे त्यांना समजावून सांगतो. महत्वाचे म्हणजे आम्ही कधीच त्यांना हे...