मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रामकथा - भाग आठ ( उर्मिला )

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग आठ ( उर्मिला )  रामायणात जिच्यावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला नाही अशी एक व्यक्तिरेखा म्हणजे लक्ष्मणाच्या पत्नीची, उर्मिलाची आहे. शी इज द अनसंग हिरोईन ऑफ द रामायण. म्हणून आज तिच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेसे जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.  उर्मिला ही मिथिलेच्या राजा जनकाची कन्या आणि सीतेची लहान बहीण. जशी सीता ही रूप आणि गुणांची खाण आहे, तशीच उर्मिला देखील आहे. सीतेचा त्याग, समर्पण, प्रेम, महानता आणि पातिव्रत्य याबद्दल आपण नेहमी बोलतो. पण उर्मिलेचा देखील त्याग, समर्पण, प्रेम, महानता आणि पातिव्रत्य यापेक्षा तिळभर देखील कमी नव्हते. जशी सीता नवविवाहिता म्हणून अयोध्येच्या राजकुळात आली, तशीच आणि तिच्यासोबतच उर्मिला देखील. सोबतच भरत आणि शत्रुघ्न यांच्या नववधू मांडवी आणि श्रुतकिर्ती देखील होत्या. या चारही मिथिलेच्या कन्यांनी अयोध्येचे इक्श्वाकु कुळ धन्य केले.  रामाला वनवास झाल्यानंतर रामासोबत सीता आणि लक्ष्मण यांनी देखील वनात जायचे ठरवले. वनवास फक्त रामाला झाला होता. पण सीता आणि लक्ष्मण दोघेही रामाशिवाय राहू शकत नव्...

रामकथा - भाग सहा ( सीता )

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग सहा ( सीता )  आज एक अत्यंत पवित्र आणि भव्यदिव्य चरित्र आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ते म्हणजे सीतेचे. वाल्मीकींच्या लेखणीतून जी काही सुंदर आणि भव्यदिव्य अशी रामायणातील पात्रे प्रत्यक्षात आपल्यासमोर उतरली, त्यातील अनुपमेय असे हे सीतेचे पात्र. सीता ही अप्रतिम लावण्यवती होती, बुद्धिमान होती, आदर्श माता, आदर्श पत्नी, आदर्श सून आणि पातिव्रतेचा आदर्श असणारी एक भारतीय नारी . इतके सगळे गुण तिच्या ठायी एकवटले होते. चंद्रावर तरी डाग सापडेल, पण सीतेच्या चरित्रामध्ये तिच्या महत्तेला कमीपणा येईल अशी एकही गोष्ट सापडणार नाही. अशी ही गुणांची खाण असलेली सीता वाल्मिकींनी अयोनिज दाखवली आहे. म्हणजे मानवी उदरातून तिचा जन्म झालेला नाही. तिची आई कोण, वडील कोण माहिती नाही. ती भूमिकन्या आहे. मिथिलेचा राजा जनक याला ती शेत नांगरताना प्राप्त झाली आहे. विधात्याने सीतेच्या ठायी अनेक अनुपम गुणांचे चे दान भरभरून बहाल केले आहे, ते सांभाळण्यासाठी तशी पात्रता असणारे मातापिता देखील विधात्याने शोधून ठेवले आहे. अत्यंत पुण्यवान असा मिथिलेचा ...

रामकथा - भाग - सात (रावण )

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव.  रामकथा - भाग सात  (रावण )  रावण हे रामायणातील महत्वाचे पात्र आहे. रावणाशिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही. राम, लक्ष्मण, सीता इ रामायणातील व्यक्तिरेखा जशा अमर झाल्या आहेत, तशीच रावणाची व्यक्तिरेखा त्यांच्यासोबत अमर झाली आहे. राम हा सद्गुणांचा प्रतिनिधी आहे. तर रावण हा दुर्गुणांचा. दुसऱ्या शब्दात बोलायचे तर राम  आणि रावण या प्रवृत्ती आहेत. सुष्ट आणि दुष्ट, चांगले आणि वाईट या त्या प्रवृत्ती. या प्रवृत्ती अनादिकालापासून चालत आल्या आहेत. फरक एवढाच आहे की प्रत्येक युगात त्यांचे प्रमाण कमी जास्त होत असते. कलियुगात मात्र या प्रवृत्तीचा प्रभाव वाढला आहे.  रावण हा रामायणकाळातील एक महापुरुष होता. ' महापुरुष ' हा शब्द येथे रावणाचा गौरव करण्यासाठी वापरला नाही. तर त्याचे त्या काळातील स्थान सांगण्यासाठी वापरला आहे. त्याला महापुरुष म्हणण्याचे कारण असे की तो अत्यंत विद्वान, शूर, बुद्धिमान, चार वेद आणि सहा उपनिषदे यात पारंगत असलेला होता. त्याला संगीताचे ज्ञान होते. रावणाच्या नावावर रावणसंहिता हा ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथ, कुम...

रामकथा - भाग पाच ( भरत -शत्रुघ्न )

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग पाच ( भरत -शत्रुघ्न ) मागच्या लेखात लक्ष्मणाचे भव्यदिव्य आणि उदात्त चरित्र आपण पाहिले. आजच्या या लेखात मी आपल्याला भरत आणि शत्रुघ्न यांचा थोडा परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. रामायणात जशी राम आणि लक्ष्मण ही भावांची एक जोडी आहे, तशीच दुसरी जोडी भरत आणि शत्रुघ्न यांची आहे. जसा रामासोबत नेहमीच प्रत्येक प्रसंगात लक्ष्मण असायचा, तसाच भरतासबोत शत्रुघ्न. रामाला वनवासात पाठवायच्या वेळी भरताबरोबर शत्रुघ्न सुद्धा आजोळी गेला होता. ते दोघे नंतर बरोबरच परत आले. जसे लक्ष्मणाचे रामावर निरतिशय प्रेम होते, तसेच भरताचे सुद्धा रामावर होते. रामाचेही तेवढेच प्रेम या सगळ्या भावंडांवर होते. त्यामुळे या बाबतीतही कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हे सांगता येणे कठीण आहे. सगळेच महान. सगळेच त्याग आणि चारित्र्याची मूर्ती. असे भाऊ फक्त रामायणातच आपल्याला आढळतील. शत्रुघ्नही अत्यंत शूर आणि बुद्धिमान होता. त्याने लवणासुराचा पराभव करून आपल्या सामर्थ्याचे दर्शन रामायणात घडवले आहे.  भरताची आई कैकेयी हीने भरतासाठी दशरथाकडून राज्य मागून घेतले खरे, पण तिने...

रामकथा - भाग चार - लक्ष्मण

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग चार  रामकथा आणि रामायण यामध्ये अवीट गोडी आहे. एखादं मधाचं पोळं असावं आणि त्यातून सतत मधुर, अमृतासमान मकरंद स्रवत असावा, तशी ही रामकथा आहे. अगदी माणिक वर्मांनी जे गीत गायलंय, ' अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.' अक्षरशः तशीच गोडी रामकथेची आहे. हिचं कितीही वाचन, श्रावण केलं तरी कंटाळा येत नाही. वाल्मिक ऋषींच्या लेखणीत एवढं सामर्थ्य आहे, की रामायणातलं प्रत्येक पात्र त्यांनी अजरामर केलं आहे. वाल्मिकींचा मानवी मनाचा सखोल अभ्यास आहे, त्याशिवाय हे शक्य नाही. रामायणात चार भावांचा उल्लेख येतो. राम , लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न. हे चारही भाऊ एकमेवाद्वितीय असेच आहेत. तिघं भावांचं रामावर अपार प्रेम आहे. आणि रामसुद्धा या तीनही भावांशिवाय राहू शकत नाही. रामायणात या भावांच्या दोन जोड्या आहेत. राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न. जिथे राम असेल तिथे लक्ष्मण असायचाच आणि जिथे भरत असेल तिथे शत्रुघ्न हमखास असणारच. आज आपण रामकथेतील एक अत्यंत महत्वाचे पात्र म्हणजे लक्ष्मण, त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.  लक्ष्मण म्हणजे रामाची सावली आ...

रामकथा - भाग तीन - गुरु शिष्य संबंध

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग तीन ( गुरु शिष्य संबंध )  रामकथा भाग एक मध्ये रामायणाचे महत्व आपण पहिले. भाग दोन मध्ये श्रीरामांच्या माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी, राजा दशरथ, लक्ष्मण आणि सीता यांच्यातील मनोज्ञ नात्यांची गुंफण आपण पाहिली. मला याची जाणीव आहे की भाग एक आणि भाग दोन मध्ये मी जे काही आपल्याला श्रीराम आणि त्यांच्या माता , बंधू, पिता आणि पत्नी यांच्याबद्दल बोललो, ते अत्यंत त्रोटक आहे. पण माझा उद्देश या नात्यांचे विविध पदर उलगडणे आणि त्या पात्रांचे स्वभाव आणि गुणदर्शन घडवणे आणि त्या अनुषंगाने श्रीरामाचे गुण वर्णन करणे असा आहे. श्रीरामांचे आपल्या आईशी वागणे, वडिलांशी वागणे, आपल्या बंधू आणि गुरूंशी वागणे हे अत्यंत अनुकरणीय आहे. खास करून आजच्या पिढीला आवर्जून बघावी, वाचावी अशी ही रामकथा आहे.   रामायणात श्रीरामाचा वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्याशी गुरु म्हणून संबंध येतो. श्रीरामाचे त्यांच्याशी आणि त्यांचे गुरु म्हणून श्रीराम लक्ष्मण आणि आपल्या शिष्यांशी वागणे अत्यंत आदर्शवत आहे. हे दोन्ही गुरु अतिशय तेजस्वी आहेत. गुरु कसा असावा य...

रामकथा - भाग दोन

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग दोन  श्रीरामाची पुण्यपावन कथा आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलो आहोत. रामायण आणि राम या गोष्टी आपल्या जीवनाच्या एक भाग झाल्या आहेत. एखाद्या गोष्टीत काही अर्थ उरला नाही तर आपण त्यात काही राम राहिला नाही असे म्हणतो. एखाद्याला बरेच समजावूनही कळले नाही, तर एवढे रामायण झाले तरी तुला कळले नाही का असे आपण म्हणतो. सकाळच्या शांत, पवित्र वेळेला रामप्रहर असे आपण म्हणतो. शहरातली माणसे एकमेकांना भेटल्यावर नमस्कार म्हणत असली तरी आपल्या ग्रामीण भागातील मंडळी आजही राम राम म्हणून एकमेकांचं स्वागत करतात. राम हा प्रत्येकाच्या अंतर्यामी आहे. प्रत्येकाच्या मनात आहे. ' हे रोम रोम मे बसनेवाले राम ...' असं एक सुंदर गाणं एका हिंदी चित्रपटात आहे. असा हा राम आपल्या रोमरोमात वसत असताना रामायणात त्याने जे आदर्श आपल्यापुढे ठेवले त्याकडे मात्र आपले दुर्लक्ष होते. कसा आहे हा राम  ?  रामायण लिहिण्यापूर्वी वाल्मिकींनी नारद मुनींना विचारले होते की भूतलावर अशी कोणती व्यक्ती आहे की जी शूरवीर आहे, धैर्यवान, चारित्र्यवान आहे, जिची शत्रूलाच काय पण कळिक...

रामकथा - भाग एक

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग एक  परवा कोणीतरी मला व्हाट्सअँपवर एक व्हिडीओ पाठवला होता. रामायण मालिकेच्या उत्तर रामायणातील लव कुश म्हणतात ' हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की ' त्या गाण्याचा हा व्हिडीओ होता. त्याचे विशेष असे की अमेरिकेतील मुलांनी ते गीत गायिलेले दाखवले होते. त्या व्हिडिओवर कोणी असं म्हटलं की हा फेक व्हिडीओ आहे. मला त्याविषयी काही बोलायचे नाही. तो खरा असेल किंवा खोटा. क्षणभर असे मानू या की तो व्हिडीओ खोटा आहे. पण आमची रामकथा त्यांना आपण सादर करावीअसं वाटणं हे सुद्धा खूप अभिमानास्पद आहे.  गीत रामायणातील ' स्वये श्री रामप्रभू ऐकती ' हे गदिमांचं गीत असो की रामायण मालिकेतील ' हम कथा सुनाते है ' गीत असो, ते  ऐकताना माझे डोळे नकळत प्रेमभराने ओले होतात. मूळ रामायणच अतिशय गोड, त्यात या लहान बालकांच्या तोंडून ही रामकथा ऐकताना तर रामायणातील सगळा गोडवा या गाण्यात एकत्र आणून हे गाणे तयार केले की काय असे वाटावे.  या लेखात आणि पुढच्या भागात मला काही सगळी रामकथा सविस्तरपणे सांगायची नाही. रामायणावर मी काही लिहावं एवढा माझा अभ्यासही...

महानायक आजारी पडतो तेव्हा...

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  महानायक आजारी पडतो तेव्हा...  चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ अर्थात बिग बी स्मॉल बी, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांच्यासह  कोरोनाची बाधा झाल्यामुळे  मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. या प्रसंगी त्याला राजकारणी आणि सिने क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती भेटायला येतात. त्यांच्यामध्ये काय काय संवाद होतात ते बघा.  सुरुवातीला नानावतीचे डॉक्टर, ' बच्चनसाब, आपका बेड कहा लगवा दु ? '  ' ये भी कोई पुछनेकी बात है डॉक्टरसाहब ? आप तो जानते है की हम जहाँ खडे ( अब पडे  ) होते है, लाईन वहींसे शुरु होती है.'  अमिताभला स्पेशल रूम दिली जाते. तो बेडवर पडलेलाच असतो तेवढ्यात त्याला भेटायला राजेश खन्ना येतो.  ' ए बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये. लंबी नही ये तो मेरा डायलॉग है. मेरी जगह तुमने कैसे ले ली बाबू मोशाय.? मै जानता हूं तुम्हे कुछ नही होगा. भगवान तुम्हारे सारे दुख मुझे दे दे और तुम्हे लंबी आयु दे. '  तो जात नाही तोपर्यंत शशी कपूर येतो. अमिताभला बेडवर पाहून त्याला वाईट वाटते. तो म्हणतो...

हास्यरंग...

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  हास्यरंग...  कधी कधी दैनंदिन जीवनात आपले काम करीत असताना अजाणतेपणी काही विनोद घडतात, तर काही माणसांजवळ मुळातच विनोदबुद्धी असते. कधी कधी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असेल तेव्हा अशी विनोदबुद्धी असलेली  माणसे आपल्या विनोदाने वातावरण हलकेफुलके करतात आणि सगळा तणाव निघून जातो. अशी दोन्ही प्रकारची काही उदाहरणे आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातील कोणताही प्रसंग काल्पनिक नाही. मी शाळेत काम करीत असताना घडलेले हे किस्से. काही मुलांचे, काही शिक्षकांचे तर काही मुख्याध्यापकांचे...!  एकदा एका वर्गात मी इंग्रजीचे अध्यापन करीत होतो. एका कवितेत माणसाला जे बुद्धीचे वरदान लाभले आहे, त्याबद्दल कवीने लिहिले होते. मी ती कविता शिकवायला घेतली. सुरुवातीला प्रस्तावना म्हणून मुलांना एक प्रश्न विचारला. तो प्रश्न असा होता, ' माणूस आणि इतर प्राणी यांच्यात कोणता फरक आहे ? ' वर्गामधली मुले साधारण घरातली होती. त्यांना इंग्रजीत उत्तर देणे जमत नव्हते. तेव्हा मी त्यांना मराठीत उत्तर देण्याची मुभा दिली. माझी अपेक्षा होती की माणसाला इतर प्र...

स्वामीकृपा

श्री स्वामी समर्थ  स्वामीकृपा  अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी तालुक्यातील एकरूखे हे छोटंसं गाव. या गावात शेतकरी, शेतमजुरी करणारी बहुतेक कुटुंबे गुण्यागोविंदाने नांदत होती. अशा कुटुंबांपैकी एक होतं देशमुख कुटुंब. या कुटूंबात आईवडील, एक मुलगा, एक मुलगी आणि आजी आजोबा असे सहा जण. वडील साहेबराव तलाठी म्हणून काम करीत. आई गृहिणी होती. मोठी मुलगी रेश्मा आणि तिच्यापेक्षा लहान असलेला राहुल. नाही म्हणायला देशमुख कुटुंबीयांची थोडीशी शेती होती, पण त्यातून फारसे उत्पन्न हाती लागत नव्हते. पण अशा सामान्य परिस्थितीतही देशमुख कुटुंबीयांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून खूप प्रयत्न केले होते. त्यांना शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत म्हणून आई घरखर्चात काटकसर करून पैसे वाचवायची. वडीलही बाहेरची दोन कामे जास्त कामे करून दोन पैसे अधिक मिळावेत म्हणून धडपडत असत. देशमुख कुटुंबीयांची परिस्थिती सामान्य असली तरी संस्काराची श्रीमंती मोठी होती. आपल्या कष्टाच्या कमाईचाच पैसा घरात यावा यासाठी साहेबराव दक्ष असत. घरातले वातावरण धार्मिक होते. रेश्माच्या आईची स्वामी समर्थांवर अपार श्रद्धा होती. रेश्माच्या आई...

स्वा सावरकर आणि येसुवहिनी - भाग दोन

उगवतीचे रंग स्वा. सावरकर आणि येसूवहिनी ( भाग दोन ) परवाच्या लेखात सावरकरांच्या कार्यावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला होता. सावरकरांची त्रिखंडात गाजलेली उडी यानिमित्ताने हा लेखन प्रपंच घडला. सावरकरांवर लिहिताना त्यांच्या मातेसमान असलेल्या येसूवहिनींच्या कार्यावर लिहावं असं वाटलं. आणि त्यातून हा आजचा लेख आपल्यासमोर ठेवतो आहे. आपली भारतीय संस्कृती थोर. आपल्याकडे मोठ्या वहिनीला आईचा मान दिला जातो. तसाच मान सावरकरांनी आपल्या मोठ्या वहिनींना दिला. सावरकरांची आई तर ते लहान असतानाच त्यांना सोडून देवाघरी गेली होती. आईचे प्रेम फारसे लाभले नाही. ती उणीव भरून काढली येसूवहिनींनी. ' जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी ' असे म्हटले जाते. म्हणजे जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही महान आहेत. सावरकरांच्या बाबतीत यात आणखी त्यांच्या वहिनींची भर घालावी लागेल. १९०९ मध्ये बाबाराव सावरकर म्हणजे सावरकरांच्या मोठ्या बंधूंवर खटला होऊन त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यावेळी येसूवहिनींवर जणू आभाळच कोसळले. खरं तर ' सुख ' या शब्दाशी येसूवहिनींची भेट कधी झालीच नाही. ...