मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

' तेच ते...'

उगवतीचे रंग  ' तेच ते...'  बऱ्याच रसिकांना कविवर्य विंदा करंदीकर यांची  ' तेच ते...' ही कविता माहिती असेल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा विंदा चाळीसगावला आले होते. त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ही कविता ऐकण्याचा योग आला होता. त्यावेळी मी लहान असल्याने त्या कवितेतला गहन अर्थ कळला नव्हता. पण आपल्या जीवनात त्याच त्या असलेल्या गोष्टी सारख्या कराव्या लागत असल्याने येणारा वैताग मात्र बालसुलभ मनाला कळला होता. आज विंदा असते तर अजून भरपूर विषय त्यांना या कवितेत भर घालायला मिळाले असते.  साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीवरून कदाचित त्यांना असे वाटले असते -  तेच लोक, तीच निवड, तीच आवड तीच नावड  तेच विषय तेच वाद, वक्तव्याचे गंभीर पडसाद  तीच भाषणे, तेच हारतुरे तेच सत्कार त्याच शाली, तेच हॉल  तीच पुस्तके, तेच स्टॉल  कोरोनाच्या बाबतीत त्यांना वाटले असते -  तोच व्हायरस तेच हाल, तीच लोकांच्या जगण्याची कमाल  तोच मास्क तेच टास्क, सॅनिटायझर आणि रुमाल  तेच लॉकडाऊन तेच क्वारंटाईन  तीच नर्स तीच व्हॅक्सिन  त्याच परीक्षा ...

याचसाठी केला होता अट्टाहास...

 उगवतीचे रंग  याचसाठी केला होता अट्टाहास...  सोशल मीडिया म्हणजे दुधारी शस्त्र आहे. त्याचा आपण चांगला किंवा वाईट,जसा आपण वापर करू तसा करता येईल. काय करायचे हे आपल्या हातात असते. खरे म्हणजे ही सगळी वाक्ये आता आपली तोंडपाठ झाली आहेत. पण तरीही सत्य ते सत्यच ! ते पुन्हा सांगितले तर काय बिघडले ? म्हणून वाचक आता याबाबत मला क्षमा करतील. तर मंडळी, नमनालाच घडाभर तेल न वापरता सुरुवातच करतो विषयाला.  झालं असं की परवा मला कुणीतरी एक व्हिडीओ पाठवला होता. तुम्ही म्हणाल आता यात काय विशेष ! आम्हालाही रोज शेकड्यानी व्हिडीओ येत असतात. बरोबर आहे तुमचे. पण मंडळी त्यातले फार थोडे व्हिडीओ असे असतात की जे आपल्याला काहीतरी सांगून जातात, शिकवून जातात. आपल्या हृदयाला स्पर्शून जातात. असाच एक व्हिडिओ मी पाहिला होता. त्यात एका सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाला निरोप देतानाचा हृदयस्पर्शी प्रसंग दाखवला होता. तो व्हिडीओ पाहून मला डॉ राधाकृष्णन यांना निरोप देतानाही त्यांची गाडी विद्यार्थ्यांनी स्वतः ओढली होती या त्यांच्या जीवनातील प्रसंगाची आठवण झाली. मलाही माझ्या जीवनात घडलेल्या काही प्र...

चांदणे शब्दफुलांचे...

उगवतीचे रंग  चांदणे शब्दफुलांचे...  नारायण श्रीपाद राजहंस...! बस नामही काफी हैं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगणाऱ्या रसिकांना नारायणराव राजहंस म्हणजेच ' बालगंधर्व ' हे सांगावं लागत नाही. ' बालगंधर्व म्हणजे मराठी रसिकांच्या ' मर्मबंधातली ठेव ' ! बालगंधर्व म्हणजे मराठी नाट्यरसिकांचा, संगीतप्रेमींचा एक हळवा कोपरा ! या भूलोकीच्या गंधर्वावर अनेक पुस्तके लिहिली गेली. डॉक्युमेंटरीज,चित्रपट निघाला. ज्यांनी बालगंधर्वांना पाहिले, ऐकले अशा भाग्यवान लोकांपैकी फारच थोडे लोक आता हयात असतील. मी बालगंधर्वांना पाहिले किंवा ऐकले नाही. पण त्यांच्याबद्दल जेव्हा काही वाचायला मिळालं ते वाचलं. सुबोध भावेंनी भूमिका साकारलेला बालगंधर्व चित्रपट पाहिला. पुण्यातल्या रसिकांचं बालगंधर्व रंगमंदिराचं प्रेम अनुभवलं. कधी संधी मिळाली तर बालगंधर्वला जाऊन काही नाटकं पाहण्याचा आनंद घेतला. बालगंधर्व आणि मी यांच्यातलं नातं एवढंच मर्यादित ! मला ना गाता येत ना नाट्यसृष्टीशी मी कुठल्या तरी अंगाने निगडित ! पण या महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्राबाहेरचा जो तमाम मराठी रसिक आहे ना त्यांचा मी एक छो...

डॉ जोनास साक : मानवतेचा पुजारी

उगवतीचे रंग  डॉ जोनास साक : मानवतेचा पुजारी  ' विटामिन जिंदगी ' हे ललित कुमार यांचे पुस्तक वाचायला नुकतीच सुरवात केली आहे. काही प्रकरणे वाचून झाली. ललितचं आयुष्य म्हणजे नियतीशी केलेला एक यशस्वी संघर्ष आहे. लहानपणीच पोलिओसारख्या दुर्धर आजारानं त्यांना सर्वसामान्यांपेक्षा वेगळं केलं. नियतीनं कठोर परीक्षा घेतली पण त्यांनी आपलं मनोबल आणि परिश्रम यांच्या जोरावर स्वतःला चारचौघांपेक्षा वेगळं सिद्ध केलं. त्यांच्या या जीवनप्रवासाची कहाणी सांगतं ' विटामिन जिंदगी ' हे पुस्तक. या पुस्तकाचं नावही जरा आगळंवेगळं आहे. आपल्या शरीराला जशी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते, तशीच आपल्या मनालाही आशा, आत्मविश्वास, जिद्द, हिंमत आणि प्रेरणा यासारख्या जीवनसत्त्वांची गरज असते. म्हणूनच या पुस्तकाचं नाव ' विटामिन जिंदगी. '  या पुस्तकाच्या सुरुवातीला ललित यांनी डॉ जोनास साक यांची थोडक्यात माहिती दिली आहे. ती माहिती मी वाचली आणि या डॉ जोनास यांच्याबद्दल जाणून घ्यायची मला उत्सुकता लागली. कोण होते हे डॉ जोनास साक ? हाच तो ध्येयवेडा माणूस की ज्याने पोलिओवरची लस शोधून काढली आणि करोडो बालकांचे प्राण व...

जंगल ...

उगवतीचे रंग  जंगल ...  ' जंगल ' एक तीन अक्षरी शब्द ! हा शब्द प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण करतो. जंगलात राहणारा आदिवासी असेल तर जंगल त्याचे घर आहे. जंगलातील त्याचे झोपडीवजा असलेलं घर, निरनिराळ्या झाडांपासून मिळणारे उत्पन्न, शिकार इ पासून त्याची होणारी उपजीविका त्याला आठवेल. जंगलात पावसाने, विजांनी केलेले घनघोर तांडव त्याला आठवेल. त्याच्या अनेक सुखद,  दुःखद स्मृती जंगलाशी निगडित असू शकतील. शहरात राहणारा तुमच्या माझ्यासारखा माणूस असेल तर जंगल हे त्याच्यासाठी आकर्षणाचे, पर्यटनाचे ठिकाण होऊ शकेल.  रोजच्या कंटाळवाण्या, धकाधकीच्या जीवनाचा कंटाळा आला की मग दोनचार दिवस आपल्याला जंगलाची वाट धरावीशी वाटते. मग वेळ काढून आपण जंगलात भ्रमंती करून येतो. जंगलातून जाणारा रस्ता मनाला किती सुखावतो नाही ! उंचच उंच वाढलेली झाडे, जंगलातील रस्त्यावर पडणारी त्यांची दाट, घनगर्द सावली, मधूनच येणारे पशुपक्ष्यांचे आवाज, पक्षी आणि प्राण्यांचे होणारे दर्शन या सगळ्या गोष्टी आपल्याला सुखावून जातात. आपण एखाद्या गाडीतून, बसमधून प्रवास करत असतो. सोबत आपली मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सदस्...