मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फिटे अंधाराचे जाळे

  उगवतीचे रंग फिटे अंधाराचे जाळे आपण कौतुकाने एखादे झाड लावतो. कधी एखादी वेल लावतो. आपण लावतो तेव्हा ते किती नाजूक असते ! किती काळजी घ्यावी लागते, किती जपावे लागते ! अशीच एक वेल सांगलीच्या करमरकर कुटुंबीयांनी लावली. ती मोठी व्हावी म्हणून जीवापाड जपले. या वेलीचं नावच वल्लरी. तिची कहाणी मोठी रोचक आणि प्रेरणादायी आहे. या रोमहर्षक कहाणीपर्यंत मी योगायोगानेच पोहोचलो. त्याचे झाले असे की माझा ' सावळबाधा ' या नावाचा लेख सांगलीचे श्री भालचंद्र करमरकर यांना व्हाट्सअपवर वाचायला मिळाला. त्यांना तो आवडल्याने त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी लेख आवडल्याचे सांगून माझी चौकशी केली. मी त्यांना सहज विचारले ' आपण काय करता ? ' ते म्हणाले, ' मी शिक्षक होतो. आता माझे वय ९४ वर्षे आहे. ' हे ऐकून मी उडालोच. वयाच्या ९४ व्या वर्षी व्हाट्सअपवर एखाद्याचा लेख वाचून त्याला प्रत्युत्तर देणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने तरी आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद आहे. मी या पितृतुल्य व्यक्तीला फोनवरूनच नमस्कार केला. त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचे माझे कुतूहल शमले नव्हते. मग ते सांगू लागले की माझी पत्नी...

निसर्गरूपे ( भाग दोन ) दुपार

  उगवतीचे रंग निसर्गरूपे ( भाग दोन ) दुपार निसर्गाची विविध रूपे मला भावतात. सगळीच रूपे तशी मनोहर असतात. अर्थात तशी दृष्टी तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला दुपार सुद्धा आवडेल. पौर्णिमेची रात्र तर सर्वांना आवडतेच पण निसर्गावर प्रेम करणाऱ्यांना अमावास्येची रात्र सुद्धा तेवढीच आवडते. पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाश प्रकाशमान करतो. समुद्राला भरती येते. रुपेरी चंद्रप्रकाश अवघे विश्व व्यापून टाकतो. कवी, लेखकांच्या प्रतिभेला बहर येतो. पण अमावास्येची रात्रही तेवढीच सुंदर असते. त्यावेळी आकाश म्हणजे जणू चंद्रकळा ल्यालेली एखादी घरंदाज गृहिणी वाटते. चांदण्याची नक्षी तिच्या साडीला जडवलेली असते. हा जरीपट खूप शोभून दिसतो. खरा निसर्गप्रेमी कोकिळेवर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम कावळ्यावर आणि घुबडावर सुद्धा करतो. अशीच निसर्गाच्या प्रेमात पडलेली व्यक्ती दुपार हे निसर्गाचेच रूप आहे हे समजून त्याचा आनंद घेते. गुलाब, जाईजुई, मोगरा ही फुले मला आवडतातच पण सदाफुली आणि गवतफुलासारखी फुलंसुद्धा मन मोहून घेतात. तेही निसर्गाचेच सुंदर अविष्कार आहेत. बहुतेक सगळ्या कवी, लेखकांनी पहाटेच्या वेळेचं रम्य वर्णन केलं आहे. संध्य...

निसर्गरूपे ( भाग एक ) पहाट

उगवतीचे रंग  निसर्गरूपे ( भाग एक ) पहाट   निसर्गाची सगळीच रूपे मला भावतात. पहाट, सकाळ, दुपार आणि दुपारच्या आधीची आणि नंतरची वेळा, संध्याकाळची विविध रूपे आणि नंतर येणारी रात्र. ऋतू कोणताही असो, त्यातील विविध प्रहरांची ही विविध रूपे मला सारखीच आकर्षित करतात. प्रत्येकच प्रहर काहीतरी नवीन घेऊन येतो. कोणीतरी एखादं छानसं गिफ्ट आकर्षक रूपात गुंडाळलेलं घेऊन यावं, ते उघडून पाहिल्याशिवाय त्यात काय आहे ही उत्सुकता जशी शमत नाही, तशाच या वेळा अनुभवल्याशिवाय त्या आपल्यासाठी काय घेऊन येतात हे नाही कळायचं. अशाच या निसर्गवेळा मला जशा भावल्या, तशा तुमच्यासमोर ठेवणार आहे. शब्दांचाच रूपाने त्यातील रूप, रस आणि गंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.  प्रभाती सूर नभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती... ही सुंदर भूपाळी आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाची असेल. रमेश अणावकर यांचे सुंदर शब्द आशा भोसलेंनी अमर केले आहेत. या गीतात ' पानोपानी अमृत शिंपीत उषा हासरी हसते धुंदीत ' असे शब्द आहेत. मला वाटतं ही प्रभात वेळा जशी पानोपानी अमृत शिंपीत येते, तसेच अमृत आशाताईंच्या स्वरातून जणू आपल्याव...

Ramayan: Mahatva ani Vyaktivishesh - Foreword

 Foreword  It delights me that Prof Dr Meena Shrivastav has translated my book ' Ramayana : Mahatva ani Vyaktivishesh ' in Hindi as well as in English. Since ages the great epic Ramayana has inspired us. The Valmiki Ramayan cas also be seen as history. Maharshi Valmiki was contemporary of the Shriram Age. He was a witness of all the things that happened during the period of Ramayana.  The Ramayana is our one of the most precious treasures. It is not only a mythical book. I regard it as a school or university that can inculcate good human values among children. Almost all the characters in the Ramayana put  great examples before us of their divine and selfless love for one another, their sacrifice for the sake of others. They are the living examples of great human values. Even all the kings in the Ikshwasu Vansh or dynasty were the great examples of a high  moral character. The society, the education and the government system at the time of the Ramayana are ideal...
उगवतीचे रंग  अस्तित्व  आजचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल गाव. महाभारतातील कौरव पांडवांच्या काळातील एकचक्र नगरी. एके काळची जुनी बाजारपेठ. ऐतिहासिक गाव. या इतिहासाच्या खुणा आज भग्नावस्थेत का होईना पण एके काळच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. वेगवेगळे जुने ऐतिहासिक दरवाजे, वाडे, बुरुज, बारव आजही गतवैभवाच्या खुणा अंगाखांद्यावर मिरवत आहेत. गावात प्राचीन मंदिरे आहेत. राम मंदिर, केशवराज मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. जवळच पद्मालय म्हणून एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या ठिकाणी श्री गणेशाचे जागृत असे देवस्थान आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे एकाच ठिकाणी उजव्या सोंडेचा आणि डाव्या सोंडेचा अशा दोन गणेश मूर्ती आहेत. मंदिराबाहेर ४४० किलो वजन असलेली एक पंचधातूची प्रचंड मोठी घंटा आहे. तिचा आवाज अनेक किमी पर्यंत दूर ऐकू जातो असे म्हणतात. मंदिरासमोर असलेल्या तळ्यात सुंदर कमळे उमललेली असतात. म्हणूनच पद्मालय असे सार्थ नाव या पवित्र ठिकाणाला आहे. श्री गणरायाला रोज कमलपुष्पे अर्पण केली जातात. येथे अंगारकी, संकष्टी चतुर्थी आणि सुट्यांच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते. येथून जवळच भीमाने बकास...

उगवतीचे रंग चला एका अनोख्या सफरीवर...

उगवतीचे रंग  चला एका अनोख्या सफरीवर...  दोस्तांनो, नमस्कार. कसे आहात ? मला माहिती आहे की तुम्ही नक्कीच आनंदात असणार ! का म्हणून काय विचारताय ? लेकांनो, अरे तुम्हाला सध्या सुटी आहे. मे महिना म्हणजे धमाल मस्तीचा, आनंदाचा. शाळेची वणवण नाही, पालकांची तणतण नाही. म्हणून तर म्हणतोय की तुम्ही आनंदात असणार. खरं तर मला खूप दिवस झाले तुमच्याशी बोलायचं होतंच. पण काय करणार ? तुम्ही तुमची शाळा, परीक्षा, निकाल यात बिझी आणि मी माझ्या कामात. पण ' ऋतुपर्ण ' मासिकाचे संपादक असलेल्या सुरेंद्रकाका गोगटेंचा मला फोन आला. मला म्हणाले छोट्या दोस्तांसाठी विशेषांक काढतोय सर आणि तुम्ही मुलांसाठी काहीतरी लिहा. त्यामुळे तुमच्याशी बोलण्याची ही संधी मला त्यांनी मिळवून दिली.  मी आज तुमच्याशी मनमोकळं बोलणार आहे. असा काही खास कुठलाही विषय नाही. आपल्याला फक्त गप्पा मारायच्या आहेत. तुमच्याशी बोलताना मला माझे लहानपणीचे दिवस आठवतात. एका अगदी लहान खेडेगावात माझं शिक्षण झालं. आमची ती शाळा जिल्हा परिषदेची होती. शाळेची इमारत कौलारू आणि जुन्या पद्धतीची होती. वर्गातल्या जमिनीवर फरशीसुद्धा नव्हती बरं का दोस्तांनो !...
 उगवतीचे रंग  असे देश असे नेते - भाग तीन   सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू    पंतप्रधान ली आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने सिंगापूर आणि सिंगापूरवासियांसाठी अनेक कल्याणकारी योजना कल्पकतेने राबवल्या. अमेरिका आणि इतर युरोपीय देशात लोक आरोग्य विमा काढत, त्याचे हप्ते भरत. अशा व्यक्तींना मग डॉक्टर सुद्धा नको ती औषधे देऊन हॉस्पिटलचा खर्च वाढवत. ली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवले की लोक प्रॉव्हिडंड फंडासाठी जसे पैसे भरतात तसेच आपल्या पुढील काळात साधारणपणे दोन टक्के एवढी रक्कम त्यांनी आपल्या आरोग्य खर्चासाठी म्हणून मेडिफंड मध्ये भरावी. ही त्यांची योजना खूपच यशस्वी ठरली. सरकारी दवाखाने अत्याधुनिक सामुग्री आणि औषधांनी सुसज्ज करण्यात आले. त्यांचा दर्जा सुधारण्यात आला. आवश्यक ते उपचार सगळ्या रुग्णांना मिळू लागले. अत्यावश्यक सोयीसुविधा, औषधे आणि डॉक्टर्स सर्वांसाठी समान होते. त्याव्यतिरिक्त आणखी काही सुविधा हव्या असतील तर त्यासाठी रुग्णांनी वेगळे पैसे मोजावेत. यामुळे सर्वसामान्यांना आवश्यक ते उपचार मिळू लागले. रुग्णालयातील प्रचंड रांगा कमी झाल्या. निवृत्तिवेतनासाठीही कर...

असे देश असे नेते - भाग दोन सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू

  उगवतीचे रंग असे देश असे नेते - भाग दोन सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू सिंगापूरला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या पंतप्रधानपदाची जबाबदारी ली यांच्यावर आपसूकच आली. आधीपासून ते लोकांच्या समस्या सोडवणारे नेते होतेच. केम्ब्रिजमधून कायद्याची पदवी गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या ली यांनी काही काळ वकिलीही केली. पण नंतर स्वतंत्र झालेल्या सिंगापूरसाठी स्वतःला वाहून घेतले. सिंगापूरच्या प्रगतीसाठी काय करता येईल, त्याला जागतिक स्तरावर एक राष्ट्र म्हणून मानाचे स्थान कसे प्राप्त करून या विचारांनी त्यांना पछाडले होते. सिंगापूरसमोर अनेक समस्या आ वासून उभ्या होत्या. शेतीसाठी पुरेशी सुपीक जमीन नव्हती, नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभाव होता. गरिबी, अस्वच्छता, भ्रष्टाचाराने देश बरबटलेला होता. विविध वंशीय आणि विविध भाषा बोलणारे लोक सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते. पण ली यांनी धैर्याने या सगळ्या संकटांचा सामना करायचे ठरवले. एकेक पाऊल ते विश्वासानं आणि निर्धारानं टाकत गेले. सिंगापूरवासी नागरिक मेहनती होते. पण या विविध धर्म, वंशाच्या लोकांना एकत्र आणणे, त्यांच्यात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे सोपे ...