मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उगवतीचे रंग एक संवाद बाबासाहेबांशी...

उगवतीचे रंग  एक  संवाद बाबासाहेबांशी...  आदरणीय बाबासाहेब,  प्रथम आपल्याला मानाचा मुजरा ! खरं म्हणजे तुम्हाला भेटण्याची,तुमच्याशी बोलण्याची आणि तुमचा पदस्पर्श करून आशीर्वाद घेण्याची इच्छा होती. पण ते सगळं अपूर्णच राहिलं. तुम्ही इतक्या लगेच निरोप घ्याल असं वाटलं नाही. म्हणून आता पत्रातूनच आपल्याशी संवाद साधतो. पत्र हे भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. आपण जरी आता देहरूपाने आमच्यात नसलात तरी आपली ओजस्वी वाणी, पल्लेदार लेखणी आणि शिवमय आठवणी आमच्यासोबत आहेतच. पुढच्या अनेक पिढ्या हा वारसा जपतील. त्यावर पोसल्या जातील हा विश्वास आहे.  तुमच्या अजोड, अद्वितीय कार्याचा गौरव कोणी केला नाही ! अगदी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, आताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर या सगळ्यांनी तुमची मुक्तकंठाने स्तुती केली. तुमचं कार्यच इतकं अफाट आहे की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील.  मागच्या वर्षी  तुमचा ९९ वा वाढदिवस झाला. आम्हाला तुमचा केवढा अभिमान... ! म्हटलं बाबासाहेब आता शंभरीत पदार्पण करता आहे...

तात्या आणि सोमनाथ

उगवतीचे रंग तात्या आणि सोमनाथ... कधी कधी आपल्याला अत्यंत साधी वाटणारी माणसेही काही तरी शिकवून जातात. आपण नेहमी वरच्या रंगरूपाला भुलणारी माणसं. पण कधी कधी वरवरचे हे रंगरूप फसवं पण असू शकतं. संत चोखामेळा म्हणतात, ' ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा...' हेअगदी खरे आहे. कधी कधी बाजारात आपण भाजी घ्यायला जातो. तेथे पाणी मारलेल्या भाज्या, रासायनिक खते वापरून वाढवलेल्या भाज्या किंवा हायब्रीड भाज्या अगदी हिरव्यागार, ताज्या टवटवीत दिसतात. पण आरोग्याच्या दृष्टीने त्या चांगल्या नसतात. याउलट सेंद्रिय भाज्या, गावाराणी भाज्या दिसायला आकर्षक दिसत नाहीत पण त्या आरोग्याला चांगल्या असतात. अशीच माझी गाठ अगदी साध्या दिसणाऱ्या , फारसे न शिकलेल्या माणसांच्या एका जोडीशी पडली.  झाले असे की काही दिवसांपूर्वी मी माझ्या घराच्या दुरुस्तीचे थोडेसे काम काढले होते. जुना किचन ओटा पाडून नवीन करायचा होता आणि इतरही काही किरकोळ कामे होती.  या कामासाठी मी माझ्या परिचयातल्या सोमनाथ नावाच्या मिस्त्रीला बोलावलं होतं. चाळीसगाव जवळच असलेले तांबोळे नावाचे त्याचे गाव. तिथून तो कामासाठी यायचा. सकाळी नऊ ...