मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 55

  उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 55 मैत्रीपर्व : गुरुदेव आणि पाश्चात्य विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे भारतातील महान व्यक्तींशी ज्याप्रमाणे स्नेहसंबंध होते, तशाच प्रकारचे मैत्रीपूर्ण संबंध त्यांचे पाश्चात्य जगतातील शास्त्रज्ञ आणि विचारवंतांशी होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन, एच जी वेल्स हे प्रख्यात लेखक, रोमा रोलाँ हे प्रसिद्ध लेखक आणि तत्त्वज्ञानी यांच्यासारख्या मान्यवरांचा समावेश आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन हे जर्मनीतील प्रख्यात सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ. अनेक महत्त्वाचे शोध त्यांच्या नावावर आहेत त्यापैकी विशेष सापेक्षता सिद्धांत, प्रकाशीय विद्युत परिणाम, क्वांटम मेकॅनिक्स यासारखे महत्त्वाचे शोध त्यांच्या नावावर आहेत.  जर्मनीमध्ये नाझींकडून जेव्हा ज्यू लोकांचा छळ झाला, त्याचे चटके त्यांनाही सहन करावे लागले आणि आपला मायदेश जर्मनी सोडून अमेरिकेत स्थलांतर करावे लागले. आईन्स्टाईन आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर ही दोघेही महान व्यक्तिमत्वे.  दोघांमध्ये काही साम्याचे आणि काही फरकाचे मुद्दे आहेत....

एक अफलातून गाणं

  उगवतीचे रंग  एक अफलातून गाणं  आठ नऊ वर्षांपासून एका गाण्यानं लोकांना वेड लावलं आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी हे गाणं असतं. बरं हे गाणं कोणत्याही चित्रपटातलं नाही, तरी ते लोकांच्या तोंडी आहे. असं कोणतं गाणं आहे बुवा हे ? तर हे गाणं आहे रोज आपल्या दाराशी येणाऱ्या आणि कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर वाजणारं ! ' गाडीवाला आया घरसे कचरा निकाल ' हेच ते जादुई गाणं. सकाळी एकदा त्याचे स्वर कानावर पडले की दिवसभर ते मनात घॊळत राहतं. आमच्या दारावर भाजी विकण्यासाठी येणारा एक भाजीवाला या चालीवर भाजी विकत घेण्यासाठी आवाहन करताना पाहून माझी एकदा मोठीच करमणूक झाली होती. तो म्हणायचा, ' भाजीवाला आया ताई पैसे निकाल '  सुरुवातीला तर हे गाणं ऐकून माझी मोठीच करमणूक झाली होती. या गाण्याचा आवाज मला अमिताभने गायलेल्या गाण्यासारखा वाटायचा. आणि संगीत तर अफलातूनच. मधूनच त्याला दिलेला, ' तो क्या करे भैय्या ' सारख्या शब्दांचा तडका त्याची मजा वाढवतो. साधी सोपी रचना लोकांना आवडते. ती लोकप्रिय होते आणि त्यांच्या लक्षातही राहते. माधुरी दीक्षितचं ते गाणं नाही का ? एक दो तीन चार पाच ... ' बाकी काही अ...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 54

  उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 54 मैत्रीपर्व : गुरुदेव, स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद  १९ व्या आणि २० व्या शतकाचे वैशिष्ट्य असे म्हणता येईल की १९ व्या शतकाच्या अखेरीस आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या देशात ज्या महापुरुषांनी जन्म घेतला, त्यामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबरच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, सुभाष बाबू यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा समावेश होता. या अर्थाने हे महापुरुषांचे युग होते असे म्हणता येईल. या सर्व महापुरुषांच्या वयात थोडेफार अंतर असले तरी ते सगळे समकालीनच होते. त्यापैकी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाष बाबू ही मंडळी भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी राजकीय कार्यात सक्रिय होती.  आपल्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि योगी अरविंद यांनी देखील भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता. योगी अरविंद तर क्रांतिकारक होते. परंतु नंतर त्यांच्या कार्याची आणि प्रयत्नांची दिशा बदलली. स्वामी विवेकानंद आणि गुरुदेव य...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 53

  उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 53 मैत्रीपर्व : गुरुदेव आणि महात्मा गांधी  गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी. थोर देशभक्त असलेल्या या दोन्ही नेत्यांची १९१५ च्या मार्च महिन्यात गाठ पडली आणि त्यांच्यामध्ये असलेल्या काही वैचारिक मतभेदांशिवायही मैत्री आयुष्यभर कायमस्वरूपी टिकून राहिली. गांधीजींना ' महात्मा ' म्हणून संबोधले ते गुरुदेवांनीच. आणि रवींद्रनाथांना ' गुरुदेव ' ही अतिशय सार्थ उपाधी दिली ती गांधीजींनी. या दोघांची महानता एवढी की त्यांनी एकमेकांना दिलेल्या उपाधी त्यांच्या मृत्यूनंतर आजही चिरंतन आहेत आणि कायम राहतील.  गांधीजी दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांची मुले तिथे त्यांच्याच फिनिक्स या आश्रमात शिकत होती. परंतु ते जेव्हा १९१५ मध्ये भारतात परत आले तेव्हा आपल्या मुलांच्या शिक्षणाचे कसे होईल याची काळजी त्यांना लागून राहिली होती. त्यावेळी दिनबंधू अँड्र्यूज यांनी त्यांना तुम्हाला अपेक्षित असे शिक्षण देणारी शिक्षणसंस्था भारतातच आहे आणि तिचे नाव शांतीनिकेतन असे सुचवले.  शिक्षणाबद्दल आपल्यासारखाच विचार करणारी कुणीतरी व्यक्ती भारता...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 52

  उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 52 मैत्रीपर्व : गुरुदेव आणि लोकमान्य टिळक सत्य, सुंदर आणि मंगलाचा शोध घेणाऱ्या गुरुदेवांनी आपल्या आनंदी स्वभावाने आणि सकारात्मक वृत्तीने अनेक माणसे जोडून ठेवली होती. अनेक व्यक्तींशी त्यांचे जिवाभावाचे नाते होते. ही सगळी नाती त्यांनी भेटीच्या किंवा पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आजन्म जपून ठेवली. अशा व्यक्तींमध्ये स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यासारखी महान व्यक्तिमत्वे होती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि लोकमान्य टिळक हे तसे समकालीन. त्यांच्या वयात केवळ पाच वर्षांचे अंतर होते. लोकमान्य त्यांच्या पेक्षा केवळ पाच वर्षांनी जेष्ठ होते पण दोघांमधील मैत्रीचे धागे मात्र घट्ट होते.  या दोन्ही महापुरुषांमध्ये तसे समानतेचे अनेक धागे होते. परंतु ते पाहण्याआधी या दोन्ही महापुरुषांची प्रत्यक्ष भेट कधी झाली ते पाहणे मनोरंजक ठरेल. कलकत्त्याला राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले होते (१९१७- १८ ). या अधिवेशनाच्या निमित्ताने महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, ऍनी बेझंट, पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासारखी मान्यवर मंडळी तिथ...

किर्तीकाव्यसरिता काव्यसंग्रह - अभिप्राय

 किर्तीकाव्यसरिता काव्यसंग्रह - अभिप्राय  डॉ. कीर्ती लोखंडे यांचा ' किर्तीकाव्यसरिता ' या काव्यसंग्रहाची सॉफ्ट कॉपी हाती आली आणि नुकत्याच उमललेल्या काव्यकुसुमांचा गंध मनाला स्पर्शून गेला. निसर्गातील आणि काव्यातील रूप, रस आणि गंध शब्दांच्या माध्यमातून त्यांच्या कवितांमध्ये अशा तऱ्हेने उतरला आहे की तो थेट मनाला भिडतो. एखादे गीत किंवा काव्य म्हणजे तरल संवेदनांची सुंदर अशी अभिव्यक्ती ! अशा तरल संवेदना शब्दांमध्ये पकडणे आणि सुंदर गेय रूपात वाचकांसमोर त्या प्रस्तुत करणे हे सिद्धहस्त कवीचेच काम ! त्यात डॉ कीर्ती लोखंडे या कमालीच्या यशस्वी झाल्या आहेत. या काव्यसंग्रहात विविध प्रकारच्या कवितांचा नजराणा त्यांनी रसिकांना पेश केला आहे. एकूण १०१ कविता असलेल्या या संग्रहात कवितांचे दहा विभाग आहेत. त्यामध्ये पावसाची गाणी, लहान मुलांची गाणी, सणांची गाणी, देवीदेवतांची व आध्यात्मिक गाणी, समारंभाची गाणी, नात्यांच्या कविता, राष्ट्रप्रेमाची गाणी, लेवा गणबोली गीते, निसर्ग पर्यावरण कविता, कलेसंबंधी भावनांची गाणी असे विविध विभाग आहेत. असे वेगवेगळे कवितांचे भाग केल्यामुळे रसिकांना आपल्या आवडीनुसार तो ...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 51

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 51 गुरुदेवांची स्वतंत्र राजकीय विचारसरणी  गुरुदेवांचे जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांची राजकीय विचारधाराही लक्षात घेतली पाहिजे. ते टिळक युग आणि गांधी युग  या दोन्हींचेही साक्षीदार होते. पण राष्ट्र, राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि राष्ट्रहित याबाबतीत त्यांचे विचार काहीसे वेगळे होते. अतिरेकी राष्ट्रवाद त्यांना मान्य नव्हता. त्यांना त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी जेव्हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी त्यांच्यासोबत या पुरस्कारासाठी ऑस्ट्रियातील  कवी पीटर रॉसेगर यांचाही विचार केला जात होता. परंतु पीटर रॉसेगर हे प्रखर राष्ट्रवादी असल्याने त्यांचे नाव या स्पर्धेत मागे पडले आणि गुरुदेवांना हा पुरस्कार जाहीर झाला असे असले तरी नंतर पाश्चात्य देशांनी प्रखर राष्ट्रवादाचीच कास धरली आणि पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. पहिल्या महायुद्धातूनच दुसऱ्या महायुद्धाची बीजे रोवली गेली. सारे जग युद्धाच्या खाईत लोटले गेले. पाश्चात्य देशात प्रबळ झालेला राष्ट्रवाद सर्वांनाच विनाशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे असे त्यांना वाटत होत...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ५०

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ५०  दिव्यत्वाची जेथ प्रचिती... ( गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या विषयीचे 49 लेख लिहून झाले आणि पुढील भाग कोणता लिहावा अशा विचारात असताना याविषयीचे हे काही विचार मला मध्यरात्रीनंतर स्फुरले. हे विचार म्हणजे गुरुदवांचे जीवनकार्यच जणू ! ते आपल्या समोर ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्न ) अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या डोळ्यांसमोर साकार झाले ते पश्चिम बंगालचे विशाल आकाश  आणि त्या आकाशाच्या विस्तीर्ण पटावर चमकू लागले अनंत तारे.  कोणी घोष, कोणी मुखर्जी, कोणी चटर्जी, कोणी बॅनर्जी, कोणी उपाध्याय, कोणी बंदोपाध्याय, कोणी दत्त, कोणी चक्रवर्ती, कोणी रॉय... प्रत्येकाचे तेज वेगळे होते पण त्या सगळ्या ताऱ्यांमध्ये उठून दिसणारा तारा होता रवींद्रनाथ टागोर या नावाचा आणि त्या ताऱ्याने पश्चिम बंगालचे आकाश उजळून निघाले होते. त्याच्या उगवतीच्या रंगात पूर्व दिशा न्हाऊन निघाली होती. सुरुवातीला छोटा असणारा हा बालरवी पाहता पाहता विशाल झाला आणि अवघे गगन त्याने व्यापले.  जे न देखे रवी ते देखे कवी असे म्हटले जात असताना हा रवी त्याला जणू अप...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४९

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४९ गुरुदेवांची सजीव शिल्पे  गुरुदेवांसारखी प्रतिभासंपन्न माणसे युगायुगातून क्वचितच जन्म घेतात. अशा व्यक्तींचा परिस्पर्श ज्या ज्या गोष्टींना लाभतो, त्या त्या गोष्टींचे सोने होते. मग त्या गोष्टी सजीव असोत की निर्जीव ! त्यांच्या स्पर्शाने निर्जीव गोष्टींमध्ये देखील प्राण फुंकले जातात. शांतिनिकेतन, विश्वनिकेतन आणि श्रीनिकेतन या त्यांच्या संस्था म्हणजे गुरुदेवांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे आणि शिक्षणविषयक विचारांचे मूर्त रूप होत्या. त्या केवळ दगडमातीच्या इमारती राहिल्या नाहीत तर त्यांच्यातून वर्षानुवर्षे चैतन्य खेळत राहिले. शेतीचे, शिक्षणाचे नवनवीन प्रयोग झाले. शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीची पहाट झाली. क्रांती ही केवळ शस्त्रांनीच होत नसते. गुरुदेवांसारखी माणसे आपल्या विचारातून, कार्यातून आणि लेखणीच्या माध्यमातून क्रांती घडवून आणतात. मनामनात जी परिवर्तन घडवून आणते ती खरी क्रांती !  गुरुदेवांच्या विचारांचा वारसा घेऊन अनेक ध्येयवादी विद्यार्थी या संस्थांमधून बाहेर पडले. अनेक शिक्षक आणि संशोधक त्यांच्या विचारांनी भारले गेल...

माझी मराठी माय

 माझी अभिजात मराठी माय  अंगावर तिच्या होता शालू भरजरी  हाती होता तिच्या कलश अमृताचा. शालू असला भरजरी   तरी झाला होता जीर्ण दुर्लक्ष अन् उपेक्षेने झाली होती मनी खिन्न. पाहून तिची अवस्था  अश्रू नयनी दाटले. तिजसाठी काही करावे महाराष्ट्र सरकारला वाटले. अभिजातता तिची तर  पूर्वापारच होती सामर्थ्याबद्दल तिच्या  मनी जराही शंका नव्हती. तीच झाली होती  बोल अमृताचा तिच्यामुळे शब्द श्रीमंत  माझ्या ज्ञानिया तुकयाचा. करण्या विराजमान तिला पुन्हा वैभवाच्या शिरी  महाराष्ट्र शासनाने  गाठली केंद्राची पायरी. केंद्रालाही होतीच  माझ्या मायमराठीच्या  श्रीमंतीची जाणीव. अभिजाततेचा दर्जा देऊन  केली दूर उणीव. आभार केंद्राचे आभार राज्याचे उजळेल भाग्य आता माझ्या मायमराठीचे. © विश्वास देशपांडे, चाळीसगाव  ६/३/२०२५ भ्रमणध्वनी ९४०३७४९९३२

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग ४८

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग ४८ कर्मयोगी रवींद्रनाथ कॅलिडोस्कोप किंवा शोभादर्शक यंत्र आपण सर्वांनी पाहिले असेल किंवा हाताळले असेल. ते आपण जसजसे फिरवू, तसतश्या वेगवेगळ्या नयनरम्य मनोहर आकृत्या दिसायला लागतात. प्रत्येक वेळी वेगळी आकृती ! गुरुदेव रवींद्रनाथांचे व्यक्तिमत्व देखील मला असेच कॅलिडोस्कोपसारखे वाटते. प्रत्येक वेळी वेगळे दिसते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपण शोध घेऊ तेवढा कमी. सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या आकाशात दिसणाऱ्या सगळ्या रंगछटा कागदावर प्रकट करणे थोडेच शक्य असते ! तसाच हा ' रवी ' ! त्याची किरणे इतकी विविध रंगांची आणि मनोहारी की शब्दात पकडणे अवघडच !  तुकाराम महाराजांच्या शब्दात त्यांच्याबद्दल बोलायचे तर ' बोले तैसा चाले 'असे हे व्यक्तिमत्व होते. समाजात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा असणारा, शिक्षणात क्रांतिकारक बदल घडवून आणणारा, ग्रामविकासाचे विविध प्रकल्प हाती घेणारा, शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदोदित प्रयत्नशील असणारा, साहित्यक्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारा, संगीत क्षेत्रातील जुन्या नव्या परंपरांची स...

पुलंचे एक अप्रतिम व्यक्तीचित्र - विनोद दा

 उगवतीचे रंग  पुलंचे एक अप्रतिम व्यक्तीचित्र - विनोद दा पुलंच्या सिद्धहस्त लखणीतून जे जे काही कागदावर उतरले, ते ते अजरामर झाले असेच म्हणावे लागेल. पुलंच्या अनेक व्यक्तीचित्रांशी आपण परिचित असतो. नारायण, हरीतात्या, सखाराम गटणे, अण्णा वडगावकर, चितळे मास्तर, नामू परिट यासारख्या त्यांच्या अनेक व्यक्तीचित्रांशी मराठी माणसाचे हृदयाचे नाते जुळले आहे. ही माणसे आपल्याला आपल्यातीलच एक वाटतात. हे त्यांचे शब्दचित्र रेखाटतानाचे कौशल्य आहे. त्या कथा वाचताना किंवा पुलंच्या तोंडून ऐकताना, ती माणसे अक्षरशः जिवंत होतात आणि आपल्या मनात कायमचे स्थान पटकावतात. पुलंच्या सिद्धहस्त लेखणीचा परिसस्पर्श ज्या ज्या विषयांना झाला, त्यांचे सोने झाले. त्यांचे असेच एक फारसे परिचित नसलेले व्यक्तीचित्र आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे व्यक्तिचित्र आहे विनोद दांचे. ' वंगचित्रे ' हे त्यांचे पुस्तक वाचत असताना हे विनोद दा आपल्याला भेटतात आणि कायमचे आपल्या हृदयात स्थान मिळवतात. आपल्याकडे आपण आपल्यापेक्षा वयाने जेष्ठ असलेल्या व्यक्तीला दादा असे सर्वसाधारणपणे म्हणतो. परंतु बंगालमध्ये साधारणपणे ' दा ...