मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
उगवतीचे रंग  ढाई अक्षर प्रेम का...   माझ्या वाचक मित्रांसाठी मी परवा माझा ' एक जगावेगळा वनस्पती शास्त्रज्ञ ' हा ल्युथर बरबँक या वनस्पतींवर प्रेम करणाऱ्या वनस्पती शास्त्रज्ञाचा लेख पाठवला होता. तो वाचून मला मुंबईतील एका ज्येष्ठ व्यक्तीचा फोन आला. डॉ अकबर इनामदार हे त्यांचं नाव. ते सुफी पंथाचे असून अध्यात्मिक साधना करतात. ते मला म्हणाले की माझे एक गुरुबंधू अनेक वर्षांपासून असा प्रयोग करीत होते. डॉ कपूर हे त्यांचं नाव. ते आपल्या बागेतील झाडे, वृक्षवेलींशी बोलत असत. एकदा त्यांना काही कामासाठी दोन वर्षे कॅनडाला जावे लागले. त्यावेळी जाताना ते आपल्या माळ्याला आपल्या बागेची काळजी घेण्यासाठी सांगून गेले. माझ्या गैरहजेरीत माझ्या बागेची काळजी घे. झाडांना वेळच्या वेळी पाणी, खते आणि मशागत करत जा असे त्यांनी त्या माळ्याला सांगितले. मग ते आपल्या कामासाठी परदेशी निघून गेले.  दोन वर्षांनी ते परत आल्यानंतर ते जेव्हा आपल्या बागेत आले तेव्हा बागेतील झाडे अक्षरशः आनंदाने नाचू लागली, डोलू लागली. त्यांना आपल्या जागेवरून हलता येत नव्हते नाहीतर त्यांनी डॉ कपूर यांना मिठीच मारली असती. डॉ...

मागे वळून पाहताना...

 उगवतीचे रंग  मागे वळून पाहताना...  लवकरच २०२१ ला आपण निरोप देणार आहोत. अशा वेळी साहजिकच मनात या वर्षी घडलेल्या भल्याबुऱ्या घटनांचा विचार येतो. सिंह सुद्धा पुढे जाताना मागे वळून पाहतो. आपणही बघायला हवे. मागच्या पाऊलखुणा पुढची वाट प्रशस्त करत असतात. घडून गेलेल्या घटना पुढच्या वाटचालीची दिशा दाखवतात. त्या दृष्टीने २०२१ हे वर्ष खूपच वेगळे आहे. हे एक स्थित्यंतराचे वर्ष आहे. २०१९ मध्ये सुरु झालेला कोरोना नावाचा महाभयंकर आजार आपली अशुभ दृष्टी २०२० आणि २०२१ या वर्षांवरही टाकून गेला. या सगळ्या दोन वर्षांच्या कालावधीत बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर या वर्षात घडलेल्या घटनांनी आपल्याला अनेक नवनवीन धडे दिले आहेत. अर्थात या वर्षात सगळेच वाईट होते असे नाही. वाईटातूनही चांगले घडते. निराशेच्या काळ्या ढगाला सुद्धा आशेची रुपेरी किनार असते. हे वर्ष त्यामुळे आपल्याला खूप काही शिकवून पण गेले.  या वर्षात मिळालेला सगळ्यात पहिला धडा म्हणजे ' राजा, रात्र वैऱ्याची आहे. सावध राहा ' हा इशारा. कोरोना आला त्याप्रमाणे त्याचे व्हेरियंट्स आले. ओमायक्रॉन आला. अजून...
 उगवतीचे रंग  कवितांच्या गावा जावे...  उगवतीचे रंग कवितांच्यागावा जावे... साहित्यातला एक सुंदर, नाजूक, भावनाप्रधान प्रकार म्हणजे कविता ! आद्यकवी वाल्मिकी, भवभूती, कालिदास, वेदव्यास हे सगळे संस्कृत कवी,  ज्ञानेश्वर, तुकाराम रामदास यांच्यासारखे अनेक संत कवी, पोवाडे, लावण्या आदी लिहिणारे तंत कवी या सगळ्यांपासून  ते अगदी  आजपर्यंतच्या भा रा तांबे, कुसुमाग्रज, बा भ बोरकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, संदीप खरे आदी अनेक कवींच्या कविता  रसिक मनाला रिझवत आल्या आहेत. बहिणाबाई, पद्मा गोळे, शांता शेळके, अरुणा ढेरे आदी स्त्री साहित्यिकांनी सुध्दा मराठी कवितेला समृद्ध केले आहे. मला तर कविता म्हणजे साहित्यातलं मूर्तिमंत स्त्रीरुपचं वाटतं. कधी ती शालूसारखे भरजरी वस्त्र लेऊन येते एखाद्या कुलीन घरंदाज स्त्रीसारखी. कधी कधी ती असते लंकेची पार्वती. कवी जसं ठरवेल तशी ती आपल्यापुढे येते.  कधी ती आपल्याला कल्पनेतील गावाला घेऊन जाते. कधी आपल्या मनाला रिझवते, कधी जोजवते, कधी मनमुराद हसवते तर रडवते. कधी कधी ती कारुण्याची मूर्ती होते. कधी शहाणपणाचे दोन शब्द सांगते तर कधी ...

अंतर...

उगवतीचे रंग  अंतर...   माझ्या ओळखीतल्या एका गृहस्थांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्या लग्नाचं आमंत्रण आणि पत्रिका देण्यासाठी ते अगदी उभ्या उभ्या माझ्या घरी येऊन गेले. त्यांना म्हटलं, ' अहो, दोन मिनिट बसा तरी. ' ते म्हणाले, ' छे छे, बसायला वेळच नाही. या एवढ्या पत्रिका वाटायच्या आहेत. जवळच्या लोकांनाच फक्त देतो आहे. बाहेरगावच्या पाठवून झाल्या. आता काही ठिकाणी जायचं आहे. तेवढं ' उरकून ' घेतो. '  किती अंतर पडलं माणसामाणसांमध्ये ! जवळच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनाही जे आमंत्रण प्रेमाने द्यायचं असतं, ते असं ' उरकून ' घ्यावं लागतं. मग ज्यांना आमंत्रण दिलं आहे ती मंडळीही लग्नाला जाताना ' आता आमंत्रण आलंच आहे तर जावं लागेल. संबंध पडतात ना..' या भावनेने जाताना दिसतात. एकंदरीत सगळाच उपचार झाला आहे.  याला कारण म्हणजे आपल्यात पडलेलं अंतर. आजकाल ' अंतर ' या शब्दाचा वापर मोठा मजेशीर होताना दिसतो आहे. लोक रांगेत उभे असतील तर एकमेकांमध्ये ' अंतर ' ठेवायला सांगितले जाते. मराठी शब्द ' सामाजिक अंतर ' हा आहे पण त्यापेक्षाही सोशल डिस्टन्स हे इं...

उगवतीचे रंग शब्दमाधुर्य, नादमाधुर्य, गीतमाधुर्य...

उगवतीचे रंग  शब्दमाधुर्य, नादमाधुर्य, गीतमाधुर्य...   संगीत, गाणी आणि शब्द. तसं पाहिलं तर अमूर्त...! नादब्रह्मच ते ! डोळ्यांनी दाखवा म्हटलं तर नाही दिसायचं. पण अनुभव मात्र घेता येतो. कान तृप्त होतात. मनही तृप्त होतं. निराश झालेल्या मनाला उभारी देण्याची शक्ती या नादब्रह्मात असते. एक प्रकारे परमेश्वराच्या अस्तित्वाचीच ती अनुभूती असते. म्हणून तर मंदिरात गेल्यावर, ध्यान केल्यावर मनाला जी शांती, प्रसन्नता लाभते, तीच शांती, प्रसन्नता हे नादब्रह्म आपल्याला प्रदान करतं. तुम्ही तल्लीन होऊन ऐकलंत तर सहजच तुमची सहज समाधी लागते. मग अशा वेळी आजूबाजूला काय सुरु याकडे सुद्धा आपलं लक्ष राहत नाही.  परवा एक दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली. सी डी एस जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टरच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. सारा देश हळहळला. देशानं एक सच्चा सुपुत्र गमावला. केवळ जनरल बिपीन रावतच नव्हे तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नीसह अन्य १२ व्यक्तींचाही या अपघातात मृत्यू झाला. खरं म्हणजे या लेखात हा उल्लेख कसा काय हा प्रश्न आपल्याला पडेल. पण त्याचे कारणही तसेच आहे. त्यांच्या निधनाने...

बाळा, मला समजून घेशील ना...?

उगवतीचे रंग  बाळा, मला समजून घेशील ना...?  रात्रीची शांत वेळ. शहरातली वर्दळ आता कमी झाली होती. रस्ते मोकळा श्वास घेऊ लागले होते. कधी कधी रात्रीची शांत वेळ मला फिरण्यासाठी योग्य वाटते. बऱ्याच वेळा मी या गोदावरीच्या काठी येऊन बसतो. गोदामैया शांतपणे वाहत असते. तिच्या पात्रामध्ये दिव्यांचे छान प्रतिबिंब पडलेले असते. आजबाजूला असणाऱ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर गॊदामैयाचे हे रूप मला भावते. दिवसभर तिच्या काठाशीही वर्दळ असते. भाविक येतात, व्यापारी येतात,श्रीमंत, गरीब, लहान थोर सारे सारे गोदामाईचा आश्रय घेतात. पण रात्री आपापल्या मुक्कामी निघून जातात. गोदामाई काही म्हणत नाही. पण रात्रीच्या शांत वेळी तिच्या तीरावर जाऊन बसावं. ती यावेळी निवांत असते. दिवसा तिला काही बोलावसं वाटत नसलं तरी यावेळी ती आपलं मन मोकळं करते.  असाच मी तिच्या कुशीत जाऊन बसलो. अंमळ थंडीच होती. पण तिच्याजवळ बसलं की सगळं काही विसरायला होतं. माई म्हणाली, ' आलास. ये. बैस जरा. तुला खूप काही सांगायचं आहे. पण त्या आधी तिकडे पलीकडे माझी सखी उभी आहे. आम्ही दिसायला वेगवेगळ्या असलो तरी माझा आणि तिचा आत्मा एकच आहे. तू म...

उगवतीचे रंग अजूनही चांद रात आहे...

उगवतीचे रंग  अजूनही चांद रात आहे...  परवा मला कुणीतरी एक व्हिडीओ पाठवला. त्यात एक कुटुंब एक सण साजरा करतंय. व्हिडीओ बहुधा अमेरिकेतला असावा. त्या सणाला ते थँक्स गिव्हिंग डे म्हणतात. आपण त्याला कृतज्ञता दिन म्हणू या. साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी हा सण साजरा करतात. या दिवशी राष्टीय सुटी असते. शेतीचा हंगाम निघालेला असतो. वर्षही लवकरच संपणार असते. या पार्श्वभूमीवर सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा होतो. या वेळी कुटुंबातले सर्व जण एकत्र येऊन हा सण साजरा करतात अशी पद्धत आहे. या सणाशी अनेक आख्यायिका निगडित आहेत. आपल्याला त्याच्या खोलात जायचे नाही. फक्त संदर्भ लक्षात यावा म्हणून हे सर्व सांगितलं. त्या व्हिडिओत एक तरुण मुलगा, त्याची आई आणि आजोबा अशी पात्रं आहेत. आजोबा एकटेच राहतात. मुलगा सगळ्या आधुनिक  ( पण नको त्या ) गोष्टींचं वेड लागून बिघडला आहे. त्याला खाण्यासाठी चमचमीत हवं असतं. वेळ घालवण्यासाठी मोबाईल हवा आहे. झोपण्यासाठी अत्याधुनिक बेडरूम, गाद्या इ गोष्टी हव्या आहेत.  होतं असं की एकदा आजोबांच्या घरी हा थॅंक्सगिविंग का...