मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्वप्न नवे पाहू...

  उगवतीचे रंग स्वप्न नवे पाहू... कॅलेंडरची पाने वाऱ्यावर फडफडतात. पक्षी उडून जावेत तसे दिवस, आठवडे आणि महिने भराभर निघून जातात. भिंतीवरच्या कॅलेंडरची पाने पलटत जातात. मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ओळी आठवतात.  रंगांच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी... खरोखरच पक्षी उडून जावेत तसे भराभर महिने निघून जातात आणि वर्ष संपत येते. या गेलेल्या महिन्यांसोबत उडून जातात ते आठवणींचे पक्षी ! या आठवणींनाही रंग असतात. पक्ष्यांसारखे, फुलपाखरांच्या पंखावरील विविध रंगछटांसारखे ! रंग जसे विविध तशा आठवणी सुद्धा ! आठवणी गोड आणि कडू, सुखद आणि दुःखद. आठवणी मनावर हळुवार फुंकर घालणाऱ्या आणि आठवणी अनामिक भावनांच्या... वेढून टाकणाऱ्या.  एखादी आठवण नको तेव्हा जखमेवरची खपली उचकटून काढते आणि मग रक्ताळलेल्या, वेदना देणाऱ्या आठवणी जाग्या होतात. पण दुसऱ्याही आठवणी असतातच की त्या मनाला आश्वस्त करतात, जखमेवरती मलमपट्टी करतात आणि सांगतात की असा दु:खी होऊ नकोस कारण हेही दिवस जातील. तुमच्या आणि माझ्या आयुष्यातील अशी कितीतरी वर्षे फुलपाखरासारखी उडून गेली आहेत, आपल्या कडू गोड आठवणी मागे ठेवून ! पण प्रत्येक वेळ...

ज्ञानतपस्वी...

 उगवतीचे रंग ज्ञानतपस्वी... गुरुवर्य आबासाहेब अमृतकार हे आपल्या वयाची ८५ वर्षे पूर्ण करीत आहेत ही आम्हा सर्व शिष्यगणांसाठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्यापेक्षाही अधिक वय असलेले आणि निवृत्त होऊन अनेक वर्ष झालेले त्यांचे विद्यार्थी आजही त्यांच्याबद्दल आदराने बोलतात. सरांची भेट झाली तर आदराने वाकून नमस्कार करतात. आपण म्हणतो की ज्या पायांवर डोके ठेवावे असे पाय आज दिसत नाहीत. परंतु आमचे गुरुवर्य आबासाहेब अमृतकार सर हे या वाक्याला अपवाद ठरावे असे व्यक्तिमत्व ! त्यांनी असे विद्यार्थी घडवले की ते विद्यार्थी या गुरुसमोर आपोआपच नतमस्तक होतात. उंच, सडपातळ शरीरयष्टी, अंगावर साधेच पण स्वच्छ कपडे आणि चेहऱ्यावर विद्वत्तेचे तेज असे आमचे आबासाहेब त्यांनी वर्गात प्रवेश केला की वर्गातील मुले आपोआप शांत होत. आज त्यांच्याकडून नवीन काय ऐकायला मिळते किंवा शिकायला मिळते अशी उत्सुकता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच असायची. विषय कोणताही असो तो विद्यार्थ्यांच्या पातळीवर जाऊन त्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवणे यात आबासाहेबांचा हातखंडा. वाणी तर अतिशय शुद्ध. त्यांच्या आडनावात असलेल्या अमृत शब्दाप्रमाणेच त्यांची अम...

कोचिंग क्लासेस आणि पालकांची हतबलता

 उगवतीचे रंग  कोचिंग क्लासेस आणि पालकांची हतबलता ​आजकाल कोणत्याही शहरात गेले की कोचिंग क्लासेसचे बोर्ड बघायला मिळतात. टॉपर्स आणि रँकर्सचे फोटो. त्यांचे स्पर्धा परीक्षेतील सुयश म्हणजे टक्केवारी ! यालाच तुम्ही आम्ही शिक्षण म्हणतो. परंतु हे शिक्षण नव्हे किंवा संस्कारही नव्हेत. हे फक्त प्रमाणित करणे आहे. एखादा विद्यार्थी एवढं एवढं शिकला आहे किंवा हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे हेच त्यातून सिद्ध होतं. पण त्याने ज्ञानार्जन किती केले आहे किंवा त्याच्यावर संस्कार किती झाले आहेत, एक माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या काही उपयुक्त गोष्टी आहेत त्या तो शिकला आहे का या प्रश्नांचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थी येते.  परंतु आजकाल वातावरणच असे निर्माण झाले आहे. या सगळ्या कोचिंग क्लासेसच्या जाहिराती पाहून पालकांना सुद्धा आपल्या मुलांना अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेस मध्ये घालावे असे वाटते. त्यातही ज्या चांगल्या संस्था असतात त्यांची फी भरमसाठ असते. अनेक पालकांना ती परवडत नाही. प्रसंगी कर्ज काढून पालक आपल्या मुलाला अशा कोचिंग क्लासेसमध्ये दाखल करतात. उद्देश एकच असतो की त्याने परीक्षेमध्य...

नार्सिस आणि आपण..

  उगवतीचे रंग  नार्सिस आणि आपण... ग्रीक पुराणातील नार्सिसची (Narcissus) गोष्ट मोठी मजेशीर आणि बोधप्रद आहे.  नार्सिस अत्यंत देखणा आणि बांधेसूद शरीराचा आहे. तो शिकारी आहे. तो इतका देखणा आहे की स्त्रियाच काय परंतु पुरुष देखील त्याच्यावर मोहित होतात. परंतु आपल्या रूपाचा आणि शरीरसौष्ठवाचा त्याला अहंकार होतो. हा अहंकार इतक्या पराकोटीला पोहोचतो की तो समोर येईल त्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आणि तिरस्कार करायला लागतो. एकदा तो जंगलात शिकार करत असताना एका तळ्याकाठी येतो. तिथे त्याला इको ही अप्सरा भेटते. ती अत्यंत सुंदर असते पण तिला देखील तो तिरस्कार आणि दूर लोटतो. या इकोची कहाणी सुद्धा मोठी मजेशीर आहे. ग्रीक देवांचा राजा झ्युस (Zeus) हा भोगविलासी असतो. तो नेहमी अप्सरांच्या बरोबर वेळ घालवत असतो. त्याच्या नाचगाण्यात मग्न असतो. अशावेळी बऱ्याचदा त्याची पत्नी हेरा (Hera)येते आणि त्याच्या नाचगाण्यात आनंदात व्यत्यय येतो. ती त्याला त्यापासून परावृत करण्याचा प्रयत्न करते. झ्युसला ही गोष्ट आवडत नाही आणि तो हेराला दूर ठेवण्यासाठी इकोची मदत घेतो. इको ही खूप बोलणारी आणि गप्पिष्ट असते. ती आपल्या ...

विळखा ऑनलाइन गेम्सचा

 उगवतीचे रंग  विळखा ऑनलाइन गेम्सचा... परवा एका मित्राच्या घरी गेलो. तो एकटाच होता. वहिनी दिसत नव्हत्या. त्याला म्हटलं," काय रे, वहिनी गावाला गेल्या आहेत का ?" तो म्हणाला, " हो अरे, ती मयुरीकडे गेली आहे. आता तीन महिने तिकडेच राहणार. " मयुरी म्हणजे माझ्या मित्राची मुलगी पुण्यात असते. आता तिचा मुलगा दहावीला आहे. मार्चमध्ये त्याची परीक्षा आहे. परंतु तो मुलगा अभ्यास करण्यापेक्षा मोबाईल जास्त पाहतो, सतत ऑनलाईन गेम्स खेळत असतो. मित्राच्या मुलीला आणि जावयाला असे वाटते की या सगळ्याचा परिणाम त्याच्या परीक्षेतील गुणवत्तेवर होऊ नये म्हणून त्यांनी त्याच्या आजीला दोन-तीन महिने बोलावून घेतले आहे. कारण ते दोघे नोकरी निमित्ताने बाहेर असतात. मग घरी त्याच्यावर लक्ष कोण ठेवणार ? ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. मुलांचे ऑनलाईन गेम्सच्या आहारी जाणे खरोखरच काळजी वाटावी इतके वाढले आहे. अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत आणि काही मोठी माणसे सुद्धा या व्हिडिओ गेम्स आणि ऑनलाईन गेम्सच्या आहारी गेली आहेत. कुठेही गेले तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो आणि कोणीतरी काहीतरी ऑनलाईन गेम किंवा व्हिडिओ...

एज इज जस्ट अ नंबर

  उगवतीचे रंग एज इज जस्ट अ नंबर  ऐंशी नव्वदीच्या वयातही काही माणसे एवढ्या कार्यक्षमतेने काम करताना दिसतात की त्यांचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही ! लेखनामुळे माझा अशा अनेक व्यक्तींशी योगायोगाने संबंध आला. आणि त्यांच्यासोबतचे नाते कायमचे जोडले गेले. ही सगळी मंडळी पितृतुल्य आणि मातृतुल्य आहेत. त्यांचे वागणे, बोलणे, त्यांची स्मरणशक्ती, त्यांचे लिखाण करणे या सगळ्या गोष्टी पाहिल्या की आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आयुष्याच्या संध्याकाळी देखील आपली ऊर्जा त्यांनी राखून ठेवली आहे. आपल्या वागण्या बोलण्यातून आजही ते इतरांना आनंद देत आहेत. या मंडळींजवळ ज्ञानाचा आणि अनुभवाचा मोठा खजिना आहे आणि जो जो त्यांच्या जवळ जाईल त्याला ते मुक्तहस्ताने तो वाटत असतात. कधी कधी त्यांचे हे वागणे पाहून स्वतःचीच लाज वाटते की आपले वय त्यांच्यापेक्षा बरेच कमी असताना खूप काही विसरतो, अनेक गोष्टी करायच्या राहतात, अनेक गोष्टी करायचा कंटाळा करतो. पण जेव्हा या व्यक्तींशी बोलणे होते तेव्हा मात्र एक नवीन ऊर्जा प्राप्त होते. मग मी नव्या उत्साहाने कामाला लागतो. पाच सहा वर्षांपूर्वी माझा एक लेख इंदापूर येथील आदरणी...

विवाह : ' संस्कार ' की इव्हेंट मॅनेजमेंट ?

उगवतीचे रंग  विवाह : ' संस्कार ' की इव्हेंट मॅनेजमेंट ?  एका लग्नसमारंभाला उपस्थित राहायचं म्हणून गेलो होतो. मोठया घरचं लग्न होतं. वधू वर उच्चशिक्षित होते. समाजातील उच्चभ्रू मंडळी कार्यक्रमासाठी हजर होती. होमाचा विधी सुरु होता. वधुवर होमाला प्रदक्षिणा करत होते. गुरुजींचा मंत्रघोष सुरु होता. दोन फोटोग्राफर एक फोटो काढणारा आणि दुसरा व्हिडीओ शूटिंग करणारा यांची धावपळ सुरु होती. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशचा लखलखाट चालू होता. होमाचा विधी आपल्याला कॅमेऱ्यात कशा प्रकारे बंदिस्त करता येईल याची धडपड चालली होती. त्यामुळे मध्येच गुरुजींना थांबावे लागत होते. त्याबद्दलची नाराजी गुरुजींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. पण सगळ्यांपुढे गुरुजी अगतिक झालेले दिसत होते.   फोटोग्राफर्स वधूवरांना विविध सूचना देत होते. " थोडं उजवीकडे बघा. मान सरळ आणि समोर. थोडं हसा. इ. " वधूवरांना देखील त्या विधीपेक्षा त्या चाललेल्या चित्रीकरणात जास्त आनंद दिसत होता. माझ्या मनात आलं की या सगळ्या आधुनिकीकरणाच्या गडबडीत आपण आपल्या चांगल्या विधीपरंपरांची वाट लावली, नाही का ? आपल्या हिंदू संस्कृतीत ज्यांना सोळा संस...

वारसा : काय आणि कितीचा

उगवतीचे रंग  वारसा : काय आणि कितीचा   एका उद्योगपतीचं निधन झालं तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेच्या प्रसंगी जमलेली मंडळी चर्चा करीत होती की त्यानं किती धन मागे ठेवलंय ? करोडोंचा बँक बॅलन्स, कित्येक किलो सोनं, कारखाने, बंगले, गाड्या इ. लोकांच्या दृष्टीनं ' किती ' ही गोष्ट महत्वाची होती. एखादा भ्रष्ट राजकारणी देखील आपल्या आयुष्यात प्रचंड ' माया ' कमावतो. ' प्रेम ' नाही. तो गेल्यानंतर लोकांमध्ये चर्चा सुरु होते की त्याने ' किती ' धन मागे ठेवलंय ? लोकांच्या दृष्टीनं ' किती ' महत्वाचा ! खरं तर ' काय ' आणि ' किती ' हे केवळ प्रश्नार्थक शब्द नाहीत. ती जीवनमूल्ये आहेत. एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यानं ' काय ' मागे ठेवलंय हे कितीपेक्षा अधिक महत्वाचं.  एका व्यक्तीला वाचनाची प्रचंड आवड होती. प्रचंड ग्रंथसंग्रह त्याने जमवला. आयुष्यात फारसे धन त्याने कमवले नाही. पण हे ग्रंथरूपी धन मात्र त्याच्याकडे भरपूर होते. आपल्या अंत्यसमयी त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितले, " बाळा, मी तुझ्यासाठी फारशी संपत्ती ठेवू शकलो नाही. पण ही पुस्तके आह...