उगवतीचे रंग होय, आम्ही आहोत कृतघ्न देव्हाऱ्यात ठेवलेल्या मूर्तींची करायची असते पूजा नसते कधी विचारायचे त्या खऱ्या आहेत की खोट्या ? पूजा असते बांधायची त्यांच्या विचारांची गायची असतात स्तोत्रे त्यांच्या पराक्रमाची पण आम्ही शोधत बसतो कुठे दिसतात का त्यांचे दोष जणू भलतेच आदर्श आम्ही त्यांच्या नावाने करतो कंठशोष दोषारोप करण्यात आम्ही भलतेच मग्न म्हणून तर म्हणावे लागते होय, आम्ही आहोत कृतघ्न ! आमच्या देव्हाऱ्यात असतात नेहरू गांधी टिळक कधी कधी थोडीफार स्वातंत्र्यवीरांची झलक पूजा मांडलेली असती छत्रपतींची सुद्धा करतो साजऱ्या जोशात जयंत्या अन पुण्यतिथ्या कुठले त्यांचे कार्य अन कुठला त्यांचा विचार ? कारण आम्ही तर असतो आमच्यातच मग्न म्हणूनच म्हणतो दोस्तहो होय, आम्ही आहोत कृतघ्न. नसतात आठवायची त्यांनी दिलेली माफीपत्रे आठवायची असते ती त्यांनी समुद्रात घेतलेली उडी अंदमानच्या काळकोठडीत अंगावरची बेडी. आठवायचे असतात ...