मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

सुखी जीवनासाठी नवी एबीसीडीई...

 उगवतीचे रंग  सुखी जीवनासाठी नवी एबीसीडीई.. शाळेत असताना आपला आणि इंग्रजी मुळाक्षरांचा परिचय होतो. आपण शिकतो – A for Apple, B for Ball... पण मोठं झाल्यावर आयुष्य आपल्याला नवे धडे शिकवतं – आरोग्य टिकवण्यासाठी आणि मनःशांती राखण्यासाठी ‘नवी एबीसीडीई’ शिकणं आवश्यक होतं. आजच्या धकाधकीच्या काळात हीच एबीसीडीई नव्या अर्थानं समजून घेऊ या. ही एबीसीडीई मी सांगत नसून प्रसिद्ध डॉ. ह वि सरदेसाई यांनी ती त्यांच्या एका लेखातून एकदा सांगितली होती. त्यातच माझ्या परीने थोडीशी भर घालून आपल्यासमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.  A – Anxiety टाळा "चिंता आणि चिता यात फक्त एका अनुस्वाराचा फरक असतो – अति चिंता चितेकडे घेऊन जाते."  हे वाक्य फक्त केवळ लिहिण्यासाठी किंवा बोलण्यासाठी सुंदर आहे म्हणून नाही, तर ते जीवनातील वास्तवाचे निदर्शक आहे. सततची चिंता माणसाला पोखरत जाते. आपल्या लक्षात येत नाही पण  ती  हळूहळू व्यक्तीचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य झिजवत नेते. जीवनातील उत्तम कामगिरीसाठी थोडी चिंता, थोडा ताण आवश्यकच असतो. एखादी परीक्षा, कामाची डेडलाइन, नात्यातील ताण – या गोष्टींनी थोडा काळ...

रेषा – नात्यांचा आरसा

 उगवतीचे रंग   रेषा – नात्यांचा आरसा  शाळेत शिकताना आपण विविध प्रकारच्या रेषा अभ्यासतो. उदाहरणार्थ भूगोलातील अक्षांश-रेखांशाच्या उभ्या आडव्या रेषा. भूमितीतील विविध कोनांच्या रेषा. लहान मुलं वह्या पुस्तकांवर किंवा भिंतीवर रेषा मारून ठेवतात. शिक्षकही आपले पेपर किंवा वह्या तपासताना त्यावर बरोबर किंवा चूक असल्याच्या खुणा करतात. त्याही रेषाच असतात. पण या रेषा या फक्त भूगोलात किंवा गणितात नसतात. त्यांचा संबंध थेट मानवी जीवनाशी देखील असतो. त्या रेषा माणसांच्या मनात असतात. नात्यांमध्ये असतात. त्या भावनांच्या, सीमांच्या आणि समजुतीच्या असतात. रेषा म्हणजे एक वेध – कधी मोजमापाचा, कधी अंतराचा, तर कधी जिव्हाळ्याचा. आपण जगताना अशा अनेक रेषा चुकवतो, आखतो, पुसतो, आणि कधी कधी स्वतःभोवतीही आखून घेतो. रेषा तीन प्रकारच्या असतात असं एक सुंदर तत्त्वज्ञान सांगतं. पहिली — दगडावरची रेषा — जी कधीच पुसली जात नाही. ती कारागीर छिन्नी हातोड्याच्या साहाय्याने दगडावर कोरतो. किंवा कधी कधी नैसर्गिकरित्या देखील निर्माण झालेली असते.  दुसरी — वाळूवरची रेषा — जी काही वेळाने मिटते. वाहणारा वारा, माणसा...

जे सत्य सुंदर सर्वथा...

  उगवतीचे रंग  जे सत्य सुंदर सर्वथा... ' प्रकाश बाबा आमटे 'या चित्रपटातील हे गाणं मला फार आवडतं. ही एक प्रकारची परमेश्वराला प्रार्थना आहे की जे सत्य आणि सुंदर आहे, त्याचा आजन्म ध्यास मला लागू दे. पण खरंच आम्ही असा सत्याचा ध्यास घेतो का ? आम्ही आम्हाला सोयीस्कर असेल तेवढेच सत्य स्वीकारतो आणि इतर सत्य आणि वास्तव गोष्टींकडे दुर्लक्ष किंवा डोळेझाक करतो. खरं वाटत नाही ना ? पण हे अगदी खरं आहे ! उदाहरण दिलं की आपल्या लक्षात येईल. बऱ्याच वेळा बघा आपण टीव्ही पाहत असतो आणि त्या वेळेला आपल्याला सुखद किंवा आपल्याला हव्या तशा बातम्या आपल्याला पाहायच्या असतात. हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणाऱ्या स्त्रिया आपल्याला दिसतात. मग आपण चॅनल बदलतो. आपल्याकडे मात्र नळाचे पाणी वाया जात असते आंघोळीसाठी, गाडी धुण्यासाठी आपण मनसोक्त पाणी वापरत असतो. भांडी आणि कपडे धुण्यासाठी तर सतत नळ सोडलेला असतो. किती पाणी वाया जाते त्याचा हिशोब नसतो. पण जेव्हा हंडाभर पाण्यासाठी दूरवर राहणाऱ्या आमच्या भगिनी काट्याकुट्यात, चिखलात, उन्हात वणवण भटकतात तेव्हा आम्हाला ते बघवत नाही आणि आम्ही टीव्हीचे चॅनल बदलतो. जे सत...

विज्ञानमहर्षीच्या पाऊल खुणा

 उगवतीचे रंग  विज्ञानमहर्षीच्या पाऊलखुणा काही माणसांची आयुष्यात प्रत्यक्ष भेट झालेली नसली किंवा त्यांच्याशी काही बोलणे झालेले नसले तरी त्यांच्याबद्दल कायम ओढ, प्रेम आणि आदर वाटत राहतो. अशा व्यक्तींमध्ये डॉ जयंत नारळीकर यांची गणना करता येईल. आयुष्यभर विज्ञानाचा प्रसार, विज्ञानाची सेवा आणि विज्ञानाचा सर्वसामान्यांसाठी वापर कसा करता येईल याचा अहोरात्र विचार करणारा हा नंदादीप नुकताच मालवला. ( २० मे २०२५ ) डॉ नारळीकर म्हटले की मला १९७९- ८० मधील पुणे विद्यापीठातील काळ आठवतो. तेव्हा मी पुणे विद्यापीठात एम ए इंग्रजीसाठी प्रवेश घेतला होता. पुणे विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या माझ्या मामांकडे मी तेव्हा राहत होतो. आम्ही दोघेही न चुकता सकाळी आणि संध्याकाळी फिरायला जात असू. विद्यापीठाचे वातावरण मोठे रम्य होते. असेच सकाळी एकदा फिरायला निघालो असताना मामा मला म्हणाले, " दादा, ते बघ डॉ जयंत नारळीकर ! "  मी चपापलो. डॉ जयंत नारळीकरांचे नाव मी बरीच वर्षे आधीपासून ऐकून होतो. एवढा मोठा शास्त्रज्ञ आपल्याला पायी फिरताना असा समोर दिसेल असे कधी वाटले नव्हते. आणि पाहिले तर पांढराशुभ्र शर्ट आणि पायजमा ...

चोरी... एक प्रतिष्ठित व्यवसाय

उगवतीचे रंग  चोरी... एक प्रतिष्ठित व्यवसाय  सहज आपले ते नायगावकर आठवले. विनोदी कवितावाले. सध्या चोरीला फार प्रतिष्ठा झाली आहे. म्हणजे उघड उघड नाही पण ' चोरी चोरी. ' नायगावकरांनी यावर खास कविता केली असती आणि त्यांच्या खास शैलीत वाचूनही दाखवली असती. " चोरी म्हणजे काय सांगायचं ? लोक उगीचच नावं ठेवतात. पण जे बोलत नाहीत, करून दाखवतात ते सुखाने जगतात. किती उदाहरणं सांगायची ? " मग त्यांनी अनेक प्रतिष्ठितांचे दाखले उदाहरणासहित दिले असते. पण आपण अजूनही अडाणीच राहिलो. साहित्यिकांनी एवढे सांगूनही आपण काही लक्षात घ्यायलाच तयार नाही. आपले ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. त्यांनी तर ' चोरांचे संमेलन ' या नावाचा लेखच लिहिला होता. बरं एवढेच नव्हे तर आमच्याकडील शिक्षणतज्ज्ञांनी तो पाठ्यपुस्तकात अंतर्भूत करून केवढी दूरदृष्टी दाखवली होती ! पण छे ! लक्षात कोण घेतो !  एक वाक्य कुठेतरी वाचनात आलं होतं. ' ज्याचं मन स्वच्छ, त्याची चोरी पवित्र !' कोणाचं आहे माहिती नाही. लगेच याला चोरी म्हणू नका. आता नाही माहिती त्याला काय करणार ? हल्ली ना खरं सांगायची पण सोय राहिली नाही. तर असो. पण ...

प्रामाणिकपणाचे मूल्य

उगवतीचे रंग   प्रामाणिकपणाचे मूल्य  आपण स्वतःशी प्रामाणिक असलो आणि दृष्टी खुली ठेवली तर आपण नकळत अनेक गोष्टी शिकत जातो. माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो याचा अनुभव पदोपदी येतो. जीवनातील अनेक अनुभव आपल्याला शहाणे करून जाण्यासाठीच आलेले असतात. या अनुभवाच्या शाळेतून जो शिकतो, तो समृद्ध होत जातो. त्या अनुभवातून प्राप्त झालेल्या मूल्यांची जोपासना मग आयुष्यभरासाठी करणे म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणे.  मी शिक्षक म्हणून नुकताच लागलो होतो, त्या वर्षीचा एक प्रसंग ! मी शिक्षक  म्हणून नेमणूक होण्यासाठी आवश्यक असलेली बी एडची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो होतो. पण शिक्षक म्हणून माझ्यातील मूर्ती अजून घडायची होती. एखाद्या डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसायाची पदवी असली तरी जोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण त्याच्या हाताखालून जात नाहीत तोपर्यंत तो अनुभवसंपन्न आणि निष्णात होत नाही. शिक्षकाचेही तसेच असते. अनुभवातूनच तो घडत जातो.  माझ्या नेमणुकीला काही महिने झाले असतील. तोच शाळेतील एक महत्वाची परीक्षा सुरु झाली. या परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घ्यायची होती. मा...
उगवतीचे रंग  तेजोनिधी लोहगोल...   ' तेजोनिधी लोहगोल ' हे पं वसंतराव देशपांडे यांनी गायिलेलं नाट्यगीत अतिशय सुंदर आहे. सूर्यदेवाची महती या गीतात फार सुंदर सांगितली आहे. ' कोटी कोटी किरण तुझे अनलशरा उधळिती ' , अमृतकण परी होऊन अणुरेणू उजळिती, दाहक परी संजीवक यासारखी सुंदर शब्दरचना या गीताचे सौंदर्य वाढवते. रोज सकाळी उठलो की सूर्यनारायणाचे आवर्जून दर्शन घेतो. एखाद्या दिवशी ' नभ मेघांनी आक्रमिलें ' असेल तर दर्शन होत नाही. अशा वेळी मग काहीतरी राहून गेल्याची हुरहूर लागते. सकाळी सूर्याचे दर्शन घेणारे, त्याला अर्घ्य वाहणारे, नमस्कार करणारे असंख्य. मीही त्यातलाच एक. असं म्हणतात की लोक उगवत्या सूर्यालाच वंदन करतात. म्हणजे ज्याची परिस्थिती उत्तम आहे, ज्याच्याजवळ वाढते वैभव, सुखसमृद्धी आहे, अशांना महत्व देणं ही तर जगाची रीत ! पण मला मावळत्या दिनकराचे दर्शन जेव्हा जेव्हा होते, तेव्हा तेव्हा मी तेवढ्याच भक्तिभावाने त्याला वंदन करतो. मावळता दिनकर तर आपले जीवन सार्थकी लावून अस्ताला जात असतो. त्याची ही दोन्हीही रूपं मला सारखीच वंदनीय. उगवतीचे रंग आणि मावळतीचे रंग दोन्हीही मनमोहक....

बहारो फुल बरसाओ

  उगवतीचे रंग  बहारो फुल बरसाओ... १९६६ मध्ये आलेल्या ' सुरज ' या चित्रपटातील ' बहारो फुल बरसाओ, मेरा महबूब आया है...' या गीताची खुमारी काय वर्णन करावी ! गीतातील नायक त्याची प्रेमिका आल्यानंतर निसर्गातील विविध घटकांना तिच्यासाठी जे आवाहन करतो ते खरोखरच रम्य आणि काव्यात्मक आहे. मग निसर्गाने तिच्यावर फुलांची बरसात करावी, फुलांनी तिच्या हातामध्ये मेहंदीचा लाल रंग लावावा वगैरे वगैरे...! मो रफी यांनी आपल्या अजरामर आणि जादुई आवाजाने हे गाणे जिवंत केले आहे.  पण गेल्या ५०- ६० वर्षांपासून कोणत्याही लग्नात गेलो की लग्न लागण्यापूर्वी नवरदेवाची वरात आली की हमखास हे गाणे लागतेच लागते. किंबहुना असे म्हणावे लागेल की कोणतेच लग्न हे गीत सुरू झाल्याशिवाय लागत नाही आणि लागणे शक्य नाही. मला प्रश्न असा पडतो की समजा हे गाणे निर्माण झाले नसते तर लग्न लावणाऱ्यांची किती पंचाईत झाली असती ! ऐन वेळी त्यांनी काय केले असते ? नवरदेवाचे आगमन झाले हे कसे सुचित केले असते ? मोठा प्रश्न आहे...!  अगदी माझ्या लग्नाच्या आधीपासून ते आजपर्यंत प्रत्येक लग्नात मी हे गाणे ऐकत आलो आहे. ' मेरा मेहबूब आया है......
उगवतीचे रंग अद्भूत, अदम्य, अनुपम, अनुकरणीय... ! मंजिल उन्हीको मिलती हैं जिनके सपनोमें जान होती हैं  पंखोसे कुछ नहीं होता, हौसलोंसे उडान होती हैं  ।। या ओळींचा प्रत्यय यावा अशी बातमी रविवार दिनांक ४मे २०२५ च्या लोकसत्तेत वाचायला मिळाली आणि आश्चर्याला पारावर राहिला नाही. अशी कोणती बातमी होती ती ? ती बातमी होती अमूर फाल्कन या पक्ष्याबद्दल. मूळचा सैबेरियातील अमूर नदीकाठचा हा पक्षी. म्हणून अमूर फाल्कन ! कबूरतरापेक्षा किंचित मोठा. रंग राखाडी आणि लाल रंगाचे पाय नर आणि मादी यांच्या दिसण्यात किंचित फरक केला आहे. शिकारी पक्षांमधील सर्वात लांब स्थलांतर करणारे हे पक्षी !   सैबेरियातून प्रचंड अंतर पार करून भारतात हा पक्षी येतो. या पक्ष्याला भारतीय वन्यजीव संस्थेने उपग्रह टॅगिंग केले होते. त्यामुळे त्याची सविस्तर माहिती मिळणे शक्य झाले. सहनशक्ती आणि उल्लेखनीय पराक्रमासाठी ओळखला जाणारा हा पक्षी सोमालियाहून अवघ्या ९३ तासात ३८०० किमीचे अंतर पार करून भारतात परतला. या बातमीत पुढे म्हटले आहे की या पक्ष्याने एवढ्या मोठ्या प्रवासात कुठेही न थांबता सरासरी ४१ किमीचा ताशी वेग कायम राखला. म्ह...

' मानवी ' मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम

 उगवतीचे रंग  ' मानवी ' मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम  श्रीराम हा माझ्या आवडीचा आणि श्रद्धेचा विषय. टीव्ही वर जेव्हा जेव्हा ' रामायण ' किंवा ' श्रीमद रामायण ' यासारखे धारावाहिक बघायला मिळाले तर मी ते आधी पाहिले असले तरी पुन्हा पुन्हा पाहतो. कारण रामकथेची गोडी अवीट आहे. ' समस्तांमधे कथा गोड या राघवाची ' असे समर्थ रामदास म्हणतात ते उगीच नाही. परवाही असाच रामायण धारावाहिकाचा एक भाग पाहत होतो. त्यात शबरीची भेट, रामाशी हनुमानाची होणारी प्रथम भेट, सुग्रीवाशी होणारी भेट हे सगळे प्रसंग पाहिले. श्रीराम आणि हनुमान यांची भेट तर अत्यंत हृद्य अशी आहे. याप्रसंगी प्रेमभावनेने डोळे नकळत ओलावतात. रामाचे हनुमानाशी बोलणे, सुग्रीवाशी बोलणे मोठे मधुर आहे. कसं बोलावं, बोलताना इतरांचा मान कसा राखावा याचं ते उत्तम उदारहरण आहे.  खरं तर राम अयोध्येचा राजपुत्र. दशरथासारख्या महान सम्राटाचा ज्येष्ठ पुत्र. पण त्याच्या वागण्याबोलण्यात हा अहंकार कुठेच दिसत नाही. वनात राहणाऱ्या आदिवासी शबरीशी सुद्धा तो किती आदराने आणि प्रेमाने बोलतो ! तिला माता म्हणून हाक मारतो. सगळंच अनुकरणीय. हे सगळं पाह...

आई

 *आई*  आई, कशी गाऊ तुझी थोरवी शब्दातून ? तू तर सदैव माझ्या रोमारोमातून. आई तुझ्या नेत्रातून पाझरे अपार स्नेह आई तुझ्याच दुधाने पोसलेला माझा देह. आई तुझिया स्पर्शाने पावन मज वाटे. तू जवळ असता पंढरीचे सुख थिटे. कसा गाऊ तुझा महिमा, काय शब्दांचा तो पाड ? तू तर आहेस आई एक चंदनाचे झाड.  © *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*  *मो.९४०३७४९९३२*

स्वातंत्र्याची पहाट

  उगवतीचे रंग स्वातंत्र्याची पहाट स्वातंत्र्याची पहाट उजळली सूर्यप्रभा सोनेरी सडा रांगोळी करून दारी तिरंगा फडके घरावरी. दिवाळी दसरा आम्हासाठी तसाच असे हा स्वातंत्र्यदिन किंचित झुकवूनी मान तयाला राष्ट्रध्वजा या करू नमन. दिवस आजचा अती पवित्र बांधले तोरण स्वातंत्र्याचे पत्करले हौतात्म्य ज्यांनी स्मरण त्या शूरवीरांचे. देशाने मज काय दिधले नका विचारू असे कुणी देशासाठी तन-मन माझे सदैव त्याचा असे ऋणी. जगी थोर  हा देश माझा उन्नत ठेवू त्याचा माथा बलाढ्य असो जरी शत्रू कितीही आम्हांपुढे त्याची काय कथा. ही भारतमाता मजला प्यारी लेकरे तिचीचआम्ही सारी देहात वसे या प्राण जोवरी करू गर्वाने तिची चाकरी. वेदमंत्राहून वंद्य आम्हाला वंदे मातरम प्रिय असे कोटी कोटी कंठातून घुमते मातृगान हे सुंदरसे. गंगा यमुना कृष्ण कोयना गाती गीत खळखळते उज्वल दिव्य परंपरेचे रक्त नसानसातून सळसळते. देश रक्षणासाठी सदैव सिद्ध हिमालयाचे धवल कडे देशासाठी प्राणही द्याया पाऊल मराठी पडते पुढे. या रे यारे सारे यारे या तिरंग्या ध्वजातळी नमन करू त्या क्रांतीवीरांना माती भूमीची लावू भाळी. ©...

ट्युलिप्स आणि रानफुले

 उगवतीचे रंग ट्युलिप्स आणि रानफुले   परवा टीव्ही पाहत असताना सिलसिला या चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित केलेलं ' देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए ' हे गाणं लागलं होतं. त्यातील नयनरम्य ट्युलिप्सचा फुलांनी लक्ष वेधून घेतलं. यश चोप्रा निर्मित या चित्रपटाचं चित्रीकरण नेदरलॅंड्स मध्ये झालं आहे. पूर्वी तो चित्रपट पाहिला तेव्हा असं वाटलं होतं की अशी सुंदर फुलं आणि बागा केवळ परदेशातच आहेत. पण नंतर जेव्हा काश्मीरला जाण्याचा योग आला, तेव्हा  श्रीनगरमधील दल सरोवराजवळील इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप्स गार्डन पाहण्याचे भाग्य लाभले. ट्युलिप्सची फुलं त्यांच्या तेजस्वी रंगछटा आणि नाजूक पाकळ्यांनी आपल्याला आकर्षित करतात. या देखण्या बागा आणि फुले पाहण्यासाठी दरवर्षी मार्च, एप्रिलच्या महिन्यात इथे गर्दी करतात. खरंतर ट्युलिप्स बागा ही पूर्वी फक्त युरोपची मक्तेदारी होती. पण भारताने त्याच्या वैविध्यपूर्ण हवामान आणि भौतिक समृद्धी याच्या जोरावर भारतातही या बागा यशस्वीरीत्या फुलवल्या आहेत. या बागा म्हणजे केवळ आकर्षक फुलांचे मळे नाहीत, तर ते निसर्ग, संस्कृती आणि पर्यटनाचे उ...