मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दक्षिण भारतातील अप्रतिम मंदिरे

 उगवतीचे रंग  दक्षिण भारतातील अप्रतिम मंदिरे - भाग एक  मुलाची बदली बंगलोर येथे झाल्यामुळे आम्ही ही २०२४ ची दिवाळी बंगलोर येथे घालवण्याचे ठरवले. मुलालाही दोन तीन दिवस सुटी असल्याने बंगलोर येथून साधारणपणे २०० किमी अंतरावर असलेल्या हसन येथे जाऊन आम्ही तेथील मंदिरे पाहण्याचे ठरवले. मंदिरे पाहण्याचे काही नियोजित नव्हते पण ही सुदैवाने ही संधी चालून आली. मंदिरे पाहिल्यानंतर आपण योग्य तोच निर्णय घेतला याचा आनंद झाला.  या मंदिरांबद्दल पूर्वी कधीतरी ऐकलेलं होतं पण ती पाहण्याचा योग आता जुळून आला होता. या मंदिरांची वास्तूरचना, बांधणी, त्यावरील अप्रतिम शिल्पकाम पाहून थक्क झालो. त्यांच्या अनुपम सौंदर्याचे वर्णन करणे आणि शब्दातून ते सांगण्याचा प्रयत्न करणे खरोखर कठीण आहे कारण ती पाहण्याची आणि अनुभवण्याचीच गोष्ट आहे. तरी देखील माझ्या दृष्टीला ती जशी वाटली तशी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न आहे. साधारणपणे हजार बाराशे वर्षांपूर्वी ज्या होयसळ राजांनी ती बांधली त्यांच्या रसिकतेचे, कलाप्रेमाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हजार-बाराशे वर्षांपूर्वीचा इतिहास आज आपल्...

थोर देशभक्त रवींद्रनाथ

उगवतीचे रंग रवींद्रनाथ वारसा आणि कार्य : भाग ३६ थोर देशभक्त रवींद्रनाथ  रवींद्रनाथ टागोरांना आपण थोर कवी, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ आणि एक महान प्रतिभाशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो. त्यांच्या ' गीतांजली ' या काव्यसंग्रहाला नोबेल पुरस्कार मिळाला हेही आपल्याला माहीत असते आणि आपले राष्ट्रगीत जनगणमन हे त्यांनी लिहिले हेही आपण जाणतो. परंतु या पलीकडे जाऊन रवींद्रनाथांची ओळख एक रोमारोमात देशभक्ती असलेली व्यक्ती म्हणूनही आहे हे आपल्याला फारसे माहिती नसते. त्यांचा देशाभिमान, स्वराज्य आणि स्वदेशी बद्दलचे असलेले प्रेम आणि त्याचा आपल्या जीवनामध्ये अवलंब करणारे महान व्यक्तिमत्व म्हणून परिचय करून देण्याचा प्रयत्न या लेखामध्ये आहे. रवींद्रनाथांच्या जडणघडणीत त्यांच्या कुटुंबाची असलेली पार्श्वभूमी अतिशय महत्त्वाची आहे. त्यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर म्हणजे कलकत्त्यातील अतिशय प्रभावशाली असे व्यक्तिमत्व होते. ' राजा ' या उपाधीने त्यांचा गौरव केला जात होता. प्रसिद्ध समाज सुधारक राजा राममोहन राय यांच्या सती विरोधी मोहिमेत त्यांचा सहभाग होता. ' प्रेस ऍक्ट ' जो काळा कायदा म्हणून ओळखला ज...
 उगवतीचे रंग  स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित दोन प्रेरणादायी पुस्तके...  या महिन्यात १७ नोव्हेंबर २०२४ या दिवशी डॉक्टर मीना श्रीवास्तव यांनी हेमंत सामंत यांच्या मराठी लेखांच्या केलेल्या हिंदी अनुवादाची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यातील पहिले म्हणजे भारतीय स्वतंत्रता आंदोलन की अनकही कहानिया आणि दुसरे पुस्तक आहे ते म्हणजे भारतीय स्वतंत्रता संग्राम के अनदेखे समरांगण. मुंबईतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि ज्यांनी आपल्या वयाची १०० वर्षे पूर्ण केले आहे असे डॉ. जी जी पारिख यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन झाले ही विशेष आनंद आणि अभिमानाची गोष्ट. ज्येष्ठ साहित्यिक हेमंत बावनकर यांनी या पुस्तकांना प्रस्तावना लिहिली आहे. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला. आपल्या या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली, आपल्या सुखावर, घरादारावर तुळशीपत्र ठेवले. ज्यांनी ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी त्याग केला, त्यांची आठवण ठेवणे, त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करणे आणि त्यांनी केलेल्या बलिदानाची जाणीव ठेवून आपल्या देशाप्रती आपले कर्तव्य बजावणे हे...

रवींद्रनाथ टागोर: वारसा आणि कार्य -भाग ३०

उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य- भाग ३० नाटककार रवींद्रनाथ - भाग पाच  रवींद्रनाथांनी निर्माण केलेली नाट्यसंपदा गेल्या काही  भागांपासून आपण पाहत आहोत. आज प्रामुख्याने त्यांच्या दोन महत्त्वाच्या नाटकांची कथानके  आपण जाणून घेऊया. ही दोन नाटके आहेत ' रक्तकरबी ' आणि ' रथेर रशी '. मुळातच कवी हृदयाचे असलेल्या रवींद्रनाथांचे मन कमालीचे संवेदनशील होते. एखादे छोटेसे दृश्य किंवा निसर्गातील एखादी छोटीशी घटना देखील त्यांच्यासारख्या प्रतिभाशाली साहित्यिकाला प्रेरणा देण्यासाठी पुरेशी ठरायची. ' रक्तकरबी ' या नाटकाच्या निर्मितीची कथा तर मोठी मनोरंजक आहे. ' रक्तकरबी ' म्हणजे लाल कण्हेर. हे लाल कण्हेरीचे झाड  आपल्यापैकी बहुतेक प्रत्येकाने पाहिलेले असते. पण रवींद्रनाथांना ते ज्या परिस्थितीत आढळले ती परिस्थिती अतिशय वेगळी होती. शांतिनिकेतन मध्ये असलेल्या आपल्या पर्णकुटीच्या बाहेर ते एकदा बसलेले होते. ती सकाळची वेळ होती. पलीकडच्या बाजूला निरुपयोगी लोखंड आणि लाकडांचा एक ढिगारा पडलेला होता. त्या ढिगार्‍यातून डोके वर काढून रक्तकरबीचे एक झाड फुलले होते आणि त्याला च...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग २९

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य भाग २९ नाटककार रवींद्रनाथ - भाग चार  वाल्मिकी प्रतिभा, कालमृगया, प्रकृतीर प्रतिशोध, मायार खेला या संगीत नाटकानंतर रवींद्रनाथांचा विविध विषयांवर आणि विविध सामाजिक प्रश्न घेऊन नाटके लिहिण्याचा आणि दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच होता. इंग्रज राजवटीने भारतीय कला आणि संस्कृती यांच्यावर आक्रमण केले होते. भारतीय कलांचा ऱ्हास होत होता. गौरवशाली असलेली भारतीय नाट्यपरंपरा लयास चालली होती. रवींद्रनाथांच्या नाटकांमुळे या नाट्यपरंपरेला संजीवनी मिळाली. तिचे पुनरुज्जीवन झाले. १८८७ मध्ये त्यांनी ' राजर्षी ' ही लघु कादंबरी लिहिली. पुढे त्या कादंबरीचे नाट्यरूपांतर करावे असे त्यांना वाटले आणि मग १८९० मध्ये त्यांनी ' विसर्जन ' या नावाने ते प्रसिद्ध केले. रवींद्रनाथांसारख्या प्रतिभाशाली साहित्यिकाला एखादी छोटीशी घटना देखील एखादा कथा विषय देऊन जाते. या नाटकाच्या संदर्भात अशीच गोष्ट घडली. योगी अरविंद यांचे आजोबा ( आईचे वडील ) राजनारायण बोस यांना ते एकदा भेटायला गेले होते. त्यांचा प्रवास आगगाडीने झाला. येताना या आगगाडीच्या प्रवासात ...

तस्मात उत्तिष्ठ कौंतेय

 उगवतीचे रंग  तस्मात उत्तिष्ठ कौंतेय...  अर्जुन रात्री बराच वेळ टीव्ही पाहत बसला होता. त्याच त्या रटाळ बातम्या पाहून त्याला फारच वैताग आला होता. पण मीडिया त्यांना हव्या तशा सोयीस्कर बातम्या दाखवतच राहणार याचे त्याला भान नव्हते. मीडियाला ना लोकांच्या हिताशी देणेघेणे, ना राष्ट्रहिताशी. त्यांच्या निष्ठा वेगळ्याच. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उगीचच जागा राहिलेला अर्जुन सकाळचे सात वाजले तरी अंथरुणात लोळतच पडला होता. एवढ्यात त्याला काहीतरी आवाज ऐकू आला. कुठून तरी बासरीचे सूर कानी येत होते. त्या सुरांमध्ये एवढी ताकद होती की अर्जुन काही वेळ आपले देहभान विसरला. तोच त्याला एक आवाज ऐकू आला. ' पार्था, अरे ऊठ. ही झोप फार वाईट बरं. झोपलास की संपलास. तू निद्रेवर विजय मिळवला होतास म्हणून महाभारतात तुझा उल्लेख गुडाकेश असा आहे. तेव्हा अशी निद्रा तुला शोभत नाही.'  खरं तर उलटच झालं होतं. सकाळी लवकर जागं होऊन केशवाला जागं करायचं आणि ' जागो मोहन प्यारे..' असं आपण म्हणायचं तर तो मोहनच येऊन अर्जुनाला जागं करीत होता. अर्जुनाच्या डोळ्यापुढे एक दिव्य प्रकाश प्रकटला. त्यात त्याला काही दिसेना. अर...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग २८

उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग २८ नाटककार रवींद्रनाथ - भाग तीन  १८८१ ते १८८२ च्या दरम्यान रवींद्रनाथ इंग्लंडमध्ये राहून भारतात कोलकत्याला परत आले होते. त्या काळात त्यांच्यावर युरोपियन ऑपेरांचा प्रभाव होता. पण त्या प्रभावात ते कधीच वाहून गेले नाहीत. त्यातील चांगले तेवढे त्यांनी घेतले आणि भारतीय परंपरेशी त्याचा सुंदर मिलाफ घडवून आणला. त्यांची दोन नाटके याच कालावधीत निर्माण झाली. ती म्हणजे प्रतिभा विलास आणि कालमृगया. ' प्रतिभा विलास ' या संगीत नाटिकेबद्दल मागील भागात आपण जाणून घेतले. या भागात ' कालमृगया ' आणि ' मायेर खेला ' या दोन नाटकाबद्दल जाणून घेऊया. प्रतिभा विलास आणि कालमृगया ही दोन्हीही नाटके म्हणजे एक प्रकारचे ऑपेराच आहेत. संगीत नाटिका आहेत. रवींद्रनाथांनी कवितेसह साहित्याचे सर्व प्रकार जरी हाताळले असले तरी त्यांची मूळ प्रकृती ही कवीची होती. त्यामुळे त्यांच्यातील नाटककार हा प्रामुख्याने कवी आहे. त्यामुळे त्यांची नाटके पाहताना प्रेक्षकांनी हे भान ठेवणे आवश्यक आहे. या नाटकांमधील संगीत आणि काव्याचा आस्वाद जर घेता आला तर त्या नाटकांचा आनंद ...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य भाग - २७

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य भाग - २७ नाटककार रवींद्रनाथ - भाग दोन  एखाद्या साहित्यिकाने साहित्यनिर्मिती किती केली किंवा त्याच्या साहित्यकृतीची संख्या किती आहे त्यापेक्षाही त्या कशा आहेत हे जास्त महत्त्वाचे. म्हणूनच साहित्यनिर्मिती हा हृदयसंवाद आहे असे रवींद्रनाथ म्हणत. ऋषिकेश मुखर्जींच्या ' आनंद ' या चित्रपटात राजेश खन्नाच्या तोंडी एक वाक्य आहे, " जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिये." थोडक्यात म्हणजे आयुष्य असो की साहित्य, त्याच्या लांबीपेक्षा त्याची खोली, सकसता अधिक महत्त्वाची. या अर्थाने रवींद्रनाथांच्या सगळ्या साहित्यकृती लार्जर दॅन लाईफ अशा आहेत असं म्हणता येईल. त्यातही त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, त्यांची सौंदर्यासक्ती, जीवनाचे आणि जगण्याचे तत्त्वज्ञान उलगडून सांगणारा त्यांच्यातील तत्त्वचिंतक या सगळ्या गोष्टींना मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी नाटक हे सशक्त माध्यम होते आणि त्याचा त्यांनी अतिशय सुयोग्य वापर करून घेतला. रवींद्रनाथ म्हणजे बहुश्रुत व्यक्तिमत्व होते. लोकसाहित्य, लोकनाट्य, परंपरा, रामायण महाभारतासारख्या विविध धार्मिक ग्रंथांचे  वाचन यात...

रवींद्रनाथ टागोर :वारसा आणि कार्य-भाग २६

 उगवतीचे रंग  रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -भाग २६ नाटककार रवींद्रनाथ - भाग एक  रवींद्रनाथांनी ज्या ज्या साहित्याच्या प्रांतात आणि कलेच्या शाखेत स्वच्छंदपणे मुशाफिरी केली, त्याचा यथाशक्ती आढावा आपण घेत आहोत. खरे तर त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे साहित्य यांची व्याप्ती सागरासारखी अमर्याद आहे. त्याचा थोडक्यात आढावा घेणे म्हणजे ओंजळीत समुद्र घेण्याचा प्रयत्न करण्यासारखेच आहे. या आधीच्या काही भागांमध्ये आपण त्यांच्या कविता, कथा आणि कादंबरी याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या भागात या आणि पुढील भागात आपण त्यांच्या नाटकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. भारतीय नाट्यसृष्टीत रवींद्रनाथांचे योगदान एवढे प्रचंड आहे की त्यांना भारतीय नाट्यसृष्टीचा तारणहार म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. रवींद्रनाथ ज्या कालखंडात जन्माला आले आणि वाढले त्या कालखंडामध्ये आपल्या देशावर इंग्रजांची सत्ता होती. भारतावर राज्य करण्यासाठी आपल्या देशाची सांस्कृतिक अस्मिता नष्ट करणे त्यांना आवश्यक वाटत होते आणि त्यांनी सर्व बाजूंनी तो प्रयत्न केला. त्यातून पूर्वीच्या काळी समृद्ध परंपरा असलेल्या भार...