उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव भारतरत्नावली द्रष्टा अभियंता : सर विश्वेश्वरैय्या - भाग चार ( अंतिम ) विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून मौलिक स्वरूपाचे कार्य केले आणि आपल्या अनुभवाचा आणि ज्ञानाचा फायदा या संस्थांना करून दिला. याशिवाय देशभरातील विविध नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले. विश्वेश्वरैयानमध्ये एक उत्तम लेखकही दडलेला होता. त्यांनी लिहिलेली ' रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया ', प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेमॉयर्स ऑफ माय वर्किंग लाईफ ही पुस्तके आजही त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या कार्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना ' सर ' ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी लिट ही पदवी देऊन गौरविले. विश्वेश्वरैयाना भारताचा सर्वोच्च सन्मान देण्याचे भारत सरकारने ठरवले. त्यासाठी त्यांची संमती घेणारे पत्र सरकारने त्यांना पाठवले. त्या पत्राला विश्वेश्वरैय्यानी दिलेले उत्तर पुरस्का...