मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ८

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ८ देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी | मना सज्जना हेची क्रीया धरावी | मना चंदनाचे परी त्वां झिजावे | परी अंतरी सज्जना नीववावे |८| अर्थ : हे मना ( सज्जन माणसा ), तुझी वागणूक अशा प्रकारे असू दे की मृत्यू पावल्यानंतरही तुझी कीर्ती मागे राहील. सुगंध देण्यासाठी चंदन ज्याप्रमाणे स्वतःला झिजवते अशाच प्रकारे तू देखील इतरांसाठी झिजून सज्जनांना संतोष होईल अशा प्रकारे वागावे.  माणसाचा देह नाशिवंत आहे. जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यू निश्चित आहेच. जीवन आणि मृत्यू यांच्या दरम्यानचा कालावधी म्हणजे आपले आयुष्य. एखादी व्यक्ती किती जगली यापेक्षाही ती कशी जगली हे अधिक महत्त्वाचे. शंभर वर्षांचे दीर्घायुष्य मिळवून आपले आयुष्य मौजमजेत घालवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अल्पायुष्य लाभलेल्या परंतु इतरांच्या सेवेत आपले जीवन घालवणाऱ्या व्यक्तीचे जीवन कधीही श्रेष्ठ ! स्वामी विवेकानंदांना उणेपुरे चाळीस वर्षांचे आयुष्य लाभले परंतु या आयुष्यात त्यांनी जी मानवतेची सेवा केली ती अनेक जन्म घेऊनही इतरांना करणे कठीण आहे. आपले आयुष्य सत्कारणी लावायचे असेल तर त्यासाठी इतरां...

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ७

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ७ मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे |  मना बोलणे नीच सोशीत जावे | स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे | मना सर्व लोकांसि रे निववावे |७ | अर्थ : हे मना तू धीराचा अंगीकार कर म्हणजेच तुझ्या ठायी धैर्य असू दे. लोकांनी निंदा किंवा टीका केली तरी ती सहन कर. बोलताना नेहमी नम्रतेनेच बोल आणि आपल्या बोलण्याने आणि वागण्याने लोक संतुष्ट होतील असे वाग. या श्लोकात समर्थांनी मनाला फार सुंदर उपदेश केला आहे. तो लक्षात घेण्याआधी मागील श्लोकाचा संदर्भ घेऊया. मागील श्लोकात समर्थ म्हणतात," साधकाने काम क्रोध मोह इत्यादी विकारांपासून दूर राहिले पाहिजे." अर्थात हे दूर राहणे सोपे नाही. त्यासाठी काय करायला हवे ते समर्थ या श्लोकात आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, "आपण धैर्याचा अंगीकार करायला हवा. जीवनामध्ये अनेक संकटे येतात, मोहाचे प्रसंग येतात, आपली परीक्षा पाहणारे प्रसंग येतात. या सगळ्या प्रसंगामध्ये आपले मानसिक धैर्य टिकवून ठेवणे आवश्यक असते. ही एक प्रकारची साधना आहे जी सरावाने जमू शकते.  ज्याला प्रवाहविरुद्ध पोहायचे आहे आणि काही विशेष कर्तृत्व करून दाखवाय...

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ६

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ६ नको रे मना क्रोध हा खेदकारी | नको रे मना काम नाना विकारी | नको रे मदा सर्वदा अंगीकारू | नको रे मना मत्सरू दंभ भारू ||६|| अर्थ : हे मना, क्रोधाला स्थान देऊ नकोस; तो शेवटी खेद आणि दुःख देणाराच आहे. कामवासना नाना प्रकारचे विकार निर्माण करते. मद (अहंकार), मत्सर आणि दंभ ( ढोंगीपणा ) या विकारांपासून दूर राहा असा समर्थांचा स्पष्ट उपदेश आहे. मागील श्लोकात समर्थांनी “पापसंकल्प” सोडण्याची सूचना केली. येथे ते त्या पापसंकल्पांचे मूळ असलेल्या विकारांकडे आपले लक्ष वेधतात. मनाच्या अध:पतनाला कारणीभूत ठरणारे हे विकार म्हणजेच षडरिपूंपैकी प्रमुख काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ. त्याबद्दल समर्थ प्रामुख्याने या ठिकाणी सांगतात. क्रोध हा खरोखरच खेदकारी आहे. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द आणि केलेली कृती अनेकदा नंतर पश्चातापाला कारणीभूत ठरतात. हातातून सुटलेला बाण जसा परत येत नाही; तसेच रागाच्या भरात बोललेले शब्दही. क्रोध हा क्षणिक असतो; पण त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ मनात जखम करतात. म्हणूनच मोठी माणसे आपल्याला सांगतात की राग आला की थोडा थांबा, एक ते दहा अंक मोजा, ...

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग - ५

  उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक  भाग - ५ मना पापसंकल्प सोडून द्यावा |  मना सत्यसंकल्प जीवी धरावा | मना कल्पना ते नको विषयांची | विकारी घडे हो जनी सर्व ची ची |५ | अर्थ : समर्थ मनाला बजावत आहेत की हे मना तू पापसंकल्प ( वाईट विचार )सोडून दे आणि त्या जागी सत्यसंकल्पांना ( सद्विचार किंवा परमात्मास्वरूपाचे ज्ञान ) स्थान दे. हे मना तू विषयांची कल्पना देखील करू नकोस कारण विषयातून नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. आणि मग तशा प्रकारची कृत्ये हातून घडतात. त्यामुळे लोकांमध्ये छी थू होते. आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात," मना अंतरी सार विचार राहो " मग मनामध्ये हे सार विचार म्हणजेच चांगले विचार कायमस्वरूपी राहावेत म्हणून काय करायला हवे ते समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. त्यासाठी सुरुवातीला पापसंकल्प म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करावा लागेल. प्रत्येकाच्या मनात चांगले वाईट असे विचार येतच असतात. त्यातही वाईट विचार लवकर येतात आणि ते नैसर्गिक असते. मग असे विचार घालवले तर त्या जागी दुसरे काहीतरी हवे कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते असे आपण म्हणतो. म्हणून समर्थ म्हण...

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग ४

 उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक  भाग - ४ मना वासना दुष्ट कामा नये रे | मना सर्वथा पापबुद्धि नको रे | मना धर्मता नीती सोडू नको हो | मना अंतरी सार विचार राहो ||४|| अर्थ : हे मना, दुष्ट वासना, अहितकारक इच्छा मनात येऊ देऊ नकोस. पापबुद्धीला स्थान देऊ नकोस. धर्म आणि नीती कधीही सोडू नकोस. अंतर्यामी जे खरे, श्रेष्ठ आणि शाश्वत आहे त्याचाच विचार नांदू दे. मनाच्या श्लोकांची एक साखळी आहे. मागील श्लोकात समर्थांनी सांगितले—“सदाचार हा थोर सांडू नये तो.”या  श्लोकात ते त्या सदाचाराची अंतर्गत पायाभरणी स्पष्ट करतात. सदाचार बाह्य वर्तनातून दिसतो खरा; पण त्याची सुरुवात मनातून होते. आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, "गमू पंथ अनंत या राघवाचा." एक वेळ भ्रष्टाचार, अनितीने वागणे हे लौकिक व्यवहारात खपून जाईलही पण राघवाच्या पंथावर चालायचे तर मनामध्ये वाईट विचार आणि अनितीची वागणूक कशी बरं चालेल ? मन अत्यंत चंचल आहे. तेच आपले मित्र आणि तेच आपले शत्रू. म्हणूनच आपण म्हणतो “मन चिंती ते वैरी न चिंती.” कधी कधी मनात येणारे विचार इतके तीव्र, भयंकर आणि नकारात्मक असतात की आपण स्वतःच दचकतो. पण असे विचार य...

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक – भाग ३

 उगवतीचे रंग  मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक - भाग ३ प्रभाते मनी राम चिंतीत जावा | पुढे वैखरी राम आधी वदावा | सदाचार हा थोर सांडू नये तो | जगी तोचि तो मानवी धन्य होतो ||३|| अर्थ : पहाटेच्या वेळी मनात श्रीरामाचे चिंतन करावे. त्यानंतर वाणीने त्याचे नाम उच्चारावे. जगात सदाचाराला अत्यंत महत्त्व आहे; तो कधीही सोडू नये. सदाचाराने वागणारा मनुष्यच खऱ्या अर्थाने धन्य ठरतो. पहाटेची वेळ किती रम्य आणि शांत असते! आपल्या संस्कृतीत तर या वेळेला “रामप्रहर” असे सुंदर नाव आहे. रात्रीच्या विश्रांतीनंतर पहाटे मन स्वच्छ, प्रसन्न आणि स्थिर असते—जणू एखाद्या शांत डोहातील निर्मळ पाणी. म्हणूनच दिवसाची सुरुवात भगवंताच्या चिंतनाने करावी, असे समर्थ सांगतात. चिंतन म्हणजे एखाद्या गोष्टीचा विचार. प्रभाती मनात रामाचे स्मरण केले, त्याचे नाम घेतले, तर त्या नामाचा संस्कार दिवसभर मनावर राहतो. सकाळी ऐकलेले एखादे गाणे जसे दिवसभर ओठांवर रेंगाळते, तसेच पहाटे घेतलेले भगवन्नाम मनात गुंजत राहते. जसे एखादा रुग्ण सकाळी घेतलेल्या औषधामुळे दिवसभर सुदृढ राहतो, तसेच प्रभातीचे नामस्मरण मनाला अंतर्गत बळ देते. समर्थ पुढे सांगतात—“प...

मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’ (भाग १)

 उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा | मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा | नमू शारदा मूळ चत्वार वाचा | गमू पंथ अनंत या राघवाचा |१| अर्थ : जो गणांचा अधिपती आहे, जो सर्व गुणांचा स्वामी आहे आणि निर्गुण परब्रह्माचा मुळारंभ आहे, अशा श्रीगणेशाला वंदन. तसेच परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणींचे मूलस्रोत असलेल्या देवी शारदेला नमस्कार करून आपण राघवाच्या अर्थात ईश्वराच्या अनंत मार्गावर वाटचाल सुरू करूया. मनाच्या श्लोकांतील पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी ईश्वरकृपेची आवश्यकता असते. म्हणून कोणत्याही चांगल्या कार्याचा प्रारंभ मंगलभावनेने अर्थात ईश्वर प्रार्थनेने आपण करतो.  समर्थ रामदासांनीही मनाच्या या महाग्रंथाची सुरुवात गणेश व शारदा यांच्या वंदनाने केली आहे. सर्वात आधी आपण श्रीगणेशाचे स्मरण करतो. समर्थांनीही मनाच्या श्लोकांचा प्रारंभ श्रीगणेशाच्या नमनाने केला आहे. श्रीगणेश हा विघ्नहर्ता आहे. आपल्या कार्यातील अडथळे तो दूर करतो, मार्ग सुकर करतो आणि साधकाचे रक्षण करतो. समर्थ श्रीगणेशाला “सर्वा गुणांचा ईश” म्हणतात. येथे के...

मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’ (भाग २)

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक - भाग २ मना सज्जना भक्तीपंथेची जावे | तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे | जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे | जनी वंद्य ते सर्वभावे करावे |२| अर्थ : हे सज्जन मना, तू भक्तीमार्गानेच वाटचाल कर. त्या मार्गावर चालल्यास तुला निश्चयाने परमेश्वराची प्राप्ती होईल. समाजासाठी घातक ठरणाऱ्या गोष्टींचा त्याग कर आणि समाजहिताची, कल्याणकारी कर्मे पूर्ण भावाने आचर. या श्लोकात समर्थ रामदासांनी मनाला “सज्जन” असे संबोधले आहे, हे अत्यंत अर्थपूर्ण आहे. एखाद्याला सज्जन म्हटले, की त्याच्याकडून सज्जनासारखेच वर्तन अपेक्षित धरले जाते. कदाचित म्हणूनच समर्थांनी मनाला सज्जन म्हटले असावे—मनावर विश्वास ठेवत, पण त्याचबरोबर त्याला जबाबदारीची जाणीव करून देत. मन स्वभावत: चंचल आहे. त्याच्या असंख्य वाटा आहेत. परंतु त्या सर्व वाटांमधून अंतिमतः हितकारक ठरणारी वाट म्हणजे भक्तीमार्ग हे समर्थ येथे ठामपणे सांगतात. ईश्वरप्राप्तीसाठी ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तीमार्ग असे तीन मार्ग सांगितले जातात. त्यापैकी सर्वसामान्य माणसाला सहज आचरता येणारा, जीवनाशी सलग राहणारा आणि व्यवहारात उतरवता येणारा मार्...

​मला आवडलेले एक व्यक्तिचित्र : डॉ. वसंतराव डोक्रस

  उगवतीचे रंग ​मला आवडलेले एक व्यक्तिचित्र : डॉ. वसंतराव डोक्रस ​ “माणूस असावा तर असा आणि एखाद्या संस्थेचा प्रमुख असावा तर असा” — ​असं वाटायला लावणारी माणसं आयुष्यात फार क्वचित भेटतात. अशाच थोडक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे डॉ. वसंतराव डोक्रस. व्यक्तीचित्र म्हटलं की सहजपणे पु. ल. देशपांडे यांनी रंगवलेली अंतू बरवा, हरी तात्या, सखाराम गटणे यांसारखी अजरामर पात्रं डोळ्यांसमोर उभी राहतात. पुलंनी माणसांच्या स्वभावरेषा ज्या सूक्ष्मतेने आणि जिवंतपणे रेखाटल्या, ती उंची गाठणं अवघडच. तरीही इतर लेखकांच्या लिखाणातही अशी काही व्यक्तीचित्रं आढळतात, जी वाचकाच्या मनात कायमची घर करून राहतात. ​अशाच लक्षात राहणाऱ्या व्यक्तीचित्रांपैकी एक म्हणजे डॉ. विजय देशपांडे यांनी आपल्या ‘माणूस नावाची शाळा’ या पुस्तकात रेखाटलेले डॉ. वसंतराव डोक्रस यांचे व्यक्तिचित्र. ते वाचताना क्षणोक्षणी असं वाटत जातं की नेतृत्व, विद्वत्ता आणि माणुसकी यांचा सुरेख संगम म्हणजे डॉ. डोक्रस. ​डॉ. वसंतराव डोक्रस हे नागपूरच्या विश्वेश्वरय्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज (व्हीआरसीई) चे माजी प्राचार्य. आज हेच महाविद्यालय विश्वेश्वरय्य...

मनाचे श्लोक - एक सार्वकालिक 'मनोपनिषद' ( भाग २ )

 उगवतीचे रंग  मनाचे श्लोक - एक सार्वकालिक 'मनोपनिषद' (प्रास्ताविक भाग २ ) मनाचे श्लोक समर्थ रामदासांनी कसे आणि कोणत्या परिस्थितीत लिहिले त्याची कथा मोठी रंजक आहे. समर्थांनी चाफळला श्रीराम नवमीचा उत्सव सुरू केला होता. या उत्सवा दरम्यान परिसरातील आणि आजूबाजूच्या गावातील शेकडो लोक दर्शनासाठी आणि प्रसादासाठी त्या ठिकाणी एकत्र येत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना या उत्सवाबद्दल जेव्हा कळले तेव्हा त्यांनी दरवर्षी या उत्सवाला मदत देण्याचे ठरवले. दरवर्षी महाराजाकडून या उत्सवासाठी धान्य, शिधा, पैसे इ. स्वरूपात नियमितपणे मदत येत होती. परंतु एकदा मात्र काही कारणाने ही मदत पोहोचू शकली नाही. कदाचित महाराज मोहिमेत गुंतले असल्यामुळे असे झाले असावे. परंतु हा उत्सव कसा पार पडेल याची शिष्यांना मात्र चिंता लागली होती. त्यांनी समर्थांच्या कानावर हा विषय घातला. समर्थ म्हणाले, " कर्ता करविता राम आहे. हा त्याचाच उत्सव आहे. तोच आपल्याकडून हे कार्य करून घेईल. " त्याच दिवशी रात्री समर्थांनी रात्री आपला पट्ट शिष्य कल्याणस्वामी यांना बोलावले आणि त्यांना येताना लेखनसामग्री घेऊन येण्यास सांगितले. स...

आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक

 उगवतीचे रंग आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची प्रेरणा ज्यांच्या रक्तात होती आणि जेजुरीच्या खंडेरायाचा भंडारा ज्यांच्या भाळी होता, अशा एका शूरवीराचा आज स्मृतिदिन आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडणारी पहिली ठिणगी ज्यांनी पेटवली, त्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा आज बलिदानस्मरणाचा दिवस. १७९१ साली पुरंदरच्या पायथ्याशी वसलेल्या जांभूळवाडी गावात उमाजी नाईकांचा जन्म झाला. आईने त्यांच्या जीवनात शक्ती आणि भक्ती या दोन दीपांची ज्योत अखंड पेटती ठेवली. वडील दादोजी नाईक यांनी त्यांना शस्त्र चालवण्याचे शिक्षण दिले. त्यामुळेच उमाजी शस्त्रविद्येत पारंगत झाले, अंगी धैर्य आले आणि मनात स्वाभिमान रुजला. उमाजी उंचपुरे आणि धडधाकट होते.  ज्या रामोशी- बेरड समाजातून ते आले होते त्यांच्यातील काही लोकांवर पुरंदरच्या किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी परंपरागत होती. या लोकांचे शौर्य आणि धैर्य ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या सैन्यात या समाजातील काही लोकांचा समावेश केला होता. उमाजींचे वडीलही या किल्ल्यावर संरक्षणाचे काम क...

मनाचे श्लोक - एक सार्वकालिक 'मनोपनिषद' ( भाग १ )

उगवतीचे रंग मनाचे श्लोक - एक सार्वकालिक 'मनोपनिषद' (प्रास्ताविक भाग १ ) ​अनेक दिवसांपासून मनाच्या श्लोकांवर काहीतरी लिहावे अशी माझी इच्छा होती. परंतु समर्थांच्या प्रचितीतून आणि अनुभवातून आलेले हे दिव्य श्लोक ! त्यावर खरोखरीच मी काही लिहू शकेन किंवा तसे लिहिण्याची माझी पात्रता आहे का हाही प्रश्न माझ्या मनात होता. तो अजूनही आहे. परंतु तरीसुद्धा मला जसे सुचेल आणि आकलन होईल तसे त्यावर लेखन करावे असा कौल माझ्या मनाने मला दिला. जसे समर्थ म्हणतात ' कर्ता करविता राम आहे.' तसेच मी सुद्धा म्हणतो की हे माझ्याकडून लिहून घेणारे समर्थ आहेत त्यांच्या कृपेनेच मी काही थोडे बहुत लिहिण्याची हिंमत करतो आहे. काही चुकले तर ते मला सांभाळून घेतील आणि आपणही सुज्ञ वाचक मला सांभाळून घ्याल. समर्थ रामदासांनी विपुल साहित्य रचना केली आहे. त्यामध्ये दासबोध, करुणाष्टके, आत्माराम, मनाचे श्लोक,  एकवीस समासी, मानपंचक, मानसपूजा अनेक देवी-देवतांची स्तोत्रे आणि आरत्या असे समृद्ध साहित्य आहे. या त्यांच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने अध्यात्म विषयाचे प्रतिपादन केलेले असले तरी नानाविध विषय समर्थांनी हाताळले आहे...