मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जॅकपॉट

 उगवतीचे रंग  जॅकपॉट  ही गोष्ट आहे साधारण पाच वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी ' घे भरारी ' या नावाचा लेख नुकताच लिहिला होता आणि तो समाज माध्यमांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचला होता. हा लेख ' सीबिस्कीट ' या चित्रपटाशी संबंधित होता. या चित्रपटात असे दाखवले आहे की सीबिस्किट या नावाचा एक अश्व रेस खेळताना जबर जायबंदी होतो. सगळ्यांना असे वाटते की यापुढे हा रेस मध्ये भाग घेऊ शकणार नाही. परंतु आश्चर्य म्हणजे त्यातूनही तो उभा राहतो भरारी घेतो आणि रेस जिंकतो. एका दुर्दम्य इच्छाशक्तीची ही अत्यंत प्रेरणादायी अशी कथा आहे. एके दिवशी हा लेख वाचून मला एका वाचक भगिनीचा फोन आला. त्या म्हणाल्या," नमस्कार, मी सरिता वाकलकर पुण्याहून बोलते आहे. मी आपला ' घे भरारी ' हा लेख वाचला. आपण हॉर्स रेसिंगशी संबंधित आहात का ? आपण रेस खेळता का ?" असे प्रश्न त्यांनी विचारले आणि मी आश्चर्यचकित झालो. मी म्हटले," नाही बुवा. मी फक्त त्या चित्रपटाबद्दल लिहिले. हॉर्स रेसिंग बद्दल मला फारशी माहिती नाही आणि मी कधी रेस खेळलो नाही. पण आपण असे का विचारता आहात ? " त्या म्हणाल्या," कारण मी हॉ...

तुम्हीच आहात त्रिदेव

 उगवतीचे रंग  तुम्हीच आहात त्रिदेव  ब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले   मला हे दत्तगुरु दिसले  हे गाणं ऐकत होतो आणि मनात विचार आला की ब्रह्मा विष्णू आणि महेश हे एकत्र गुरुदत्ताच्या ठायी विराजमान आहेत. मानवातही परमेश्वर आहे असे आपण म्हणतो. मग माणसातही ते असतील का ? उत्पत्ती, स्थिती आणि लय या जगाच्या तीन अवस्था असतात असं आपण ऐकलेलं असतं. त्याचप्रमाणे या तिन्ही अवस्थांचे जनक अनुक्रमे ब्रह्मा, विष्णू आणि महेश असतात हेही आपण ऐकलेलं असतं. ब्रह्मदेव जगाची निर्मिती करतात, भगवान विष्णू पालन पोषण करतात आणि शंकर जगाचा लय किंवा संहार घडवून आणतात. हे सगळं आपण वेळोवेळी ऐकतो, वाचतो. आपली अशी समजूत होते की हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश दूर कुठेतरी वास्तव्य करीत असावेत. ब्रह्मदेव स्वर्गात, विष्णू क्षीरसागरात आणि शंकर हिमालयात. पण खरे पाहता हे त्रिदेव आपल्या अंतरातच वास करत असतात असाही त्याचा अर्थ घेता येईल. आपल्या स्वतःच्या आणि स्वतःभोवतीचे जग, परिस्थिती आपणच निर्माण करत असतो. तिचे पोषणही आपल्याकडूनच होते आणि विनाशही. कसे ते समजून घेऊ या.  " तूच आहेस तुझ्या जीवनाचा ...

नवरात्र पर्व - शक्तीचा जागर

उगवतीचे रंग   नवरात्र पर्व– शक्तीचा जागर पावसाळा संपण्याच्या बेतात आहे. सगळीकडे वातावरणात चैतन्य भरून राहिले आहे. शेतातील पिके काढण्यासाठी तयार झाली आहेत. अशाच सुंदर वातावरणात अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रची सुरुवात होते. नवरात्री म्हणजे केवळ उत्सव नाही तर दैवी रूपातील स्त्री शक्तीची पूजा, शक्ती रूपात असलेल्या देवीची उपासना आणि अंतरातील शक्ती जागवण्याचा हा पर्वकाळ ! अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी घराघरात घट बसवला जातो. या घटस्थापनेचा संबंध हा थेट आपल्या कृषी संस्कृती आणि शेतकऱ्यांशी येतो. आपल्या शेतात जी पीकं पिकवली जातात, ज्यातून आपलं पोट भरतं त्याबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या काळात शेतातील पिकांची कापणी झालेली असते, घरी नवीन धान्य आलेलं असतं. घटस्थापनेला घटासमोर शेतातील माती आणली जाते. त्यामध्ये हे नवीन धान्य पेरलं जातं. एक प्रकारे हे बीज परीक्षणच असतं. दसऱ्यापर्यंत ते पीक त्या घटासमोर उगवतं. या नऊ दिवसात आदिमाया, आदिशक्तीची उपासना करताना आपल्या शेतातील धान्यांचीही पूजा केली जाते. देवघरात ठेवलेला कलश, वाजणारे शंख-घंटानाद आणि मनात जागणारा उत्साह – हे ...

एका थरारक प्रवासाचा साक्षीदार होताना...

उगवतीचे रंग   एका थरारक प्रवासाचा साक्षीदार होताना... माझ्या डोळ्यासमोर घडलेली ही घटना !नुकत्याच पडलेल्या पावसानं पोर्च ओलीचिंब झाला होता. मातीचा सुगंध हवेत दरवळत होता. गार वाऱ्याने अंगावर शिरशिरी आणली. मी खुर्चीत बसून पावसाचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात माझ्या नजरेला तो दिसला – लहानसा मिलीपीड ! मराठीत ज्याला आपण वाणी किंवा पैसा म्हणतो. आपल्यापैकी अनेकांनी तो पाहिला असेल. त्याचीच ही गोष्ट ! आपण त्याला हात लावल्याबरोबर तो आपले शरीर आक्रसून गोलाकार करून घेतो. एखाद्या नाण्यासारख्या दिसतो. म्हणून त्याला पैसा म्हणत असावेत. काळसर शरीर, शरीराच्या खालच्या दोन्ही बाजूला एक पिवळसर रंगाची पट्टी, डोक्यावर अँटेनासारखे दिसणारे दोन संवेदनावाहक, आणि शेकडो पायांची एकसंध लयबद्ध चाल. अगदी छोटासा जीव, पण कसा निर्धाराने पुढे चालत होता ! जणू स्वतःशीच म्हणत होता "चला, आजचा प्रवास सुरू!" त्याच्या हालचालीतून जणू मला त्याचा उत्साह जाणवला. पण त्याची वाटचाल सोपी नव्हती. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे पाण्याचे एक छोटेसे तळे साचले होते. पावसाचे थेंब अजूनही त्यावर नाचत होते. तो मनाशी म्हणाला, " ही तर ...

कागज के फूल

उगवतीचे रंग  कागज के फूल  परवा मला एका गृहस्थांचा सकाळी सकाळी फोन आला. माझा लेख त्यांना आवडला होता म्हणून त्यांनी फोन केला. मग त्यांनी माझ्या पुस्तकांची चौकशी केली. कोणती पुस्तके आहेत, कोणत्या विषयावर लिहिलेली आहेत वगैरे. मला आनंद झाला पण तो आनंद क्षणिकच टिकला. कारण ते मला म्हणाले मला पुस्तके नकोत. मला असे लेख असतील तर पाठवत जा. मला त्यांच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले आणि वाईटही. माझे पुस्तके नकोत म्हणून वाईट नाही वाटले. परंतु पुस्तकांना नाकारण्याची ही प्रवृत्ती मला योग्य वाटली नाही. परंतु मी म्हटले की ठीक आहे मी तुम्हाला लेख पाठवत जाईन.  दुसरे एक गृहस्थ माझ्या गावातीलच होते. ते देखील माझ्या लेखांचे वाचक होते. एकदा ते मला भेटले आणि म्हणाले की तुमचे लेख मी नेहमी वाचतो. खूप छान असतात. तुमची पुस्तके कुठे मिळतील ? मी त्यांना म्हटलं की माझ्याकडे पुस्तके आहेत. तुम्हाला देऊ का ? मग म्हणाले," मला विकत नको. लायब्ररीत पुस्तके आहेत का तुमची ? म्हटलं हो आहेत. मग म्हणाले," मी तिथून घेऊन वाचेन. " मी स्वतःशी म्हणालो," हरकत नाही. कुठून का होईना, पुस्तक घेऊन वाचल्याशी कारण !"  का...

आजी-आजोबा : वटवृक्षाची सावली

उगवतीचे रंग  आजी-आजोबा : वटवृक्षाची सावली  सुमारे ६०-६२ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळी एका छोट्याशा खेड्यात राहत होतो. वय असेल ७/८ वर्षांचे. एकदा आई कुठल्यातरी कारणाने मामांकडे गेली होती. वडील, आजी आणि मी असे तिघेच घरी असायचो. त्यातही वडिलांच्या मागे शेतीची कामे, तसेच ते गावाचे पोलीस पाटील असल्याने तालुक्याच्या गावी त्यांना  जावे लागत असे. मग काय माझी आणि आजीची गट्टी असायची. आजीच्या हातच्या स्वयंपाकाला फार छान चव होती. उपासाच्या दिवशी ती जी फोडणीची वरई करायची तिची चव अजूनही माझ्या जिभेवर आहे. आजी फारशी शिकलेली नव्हती पण तिला लिहावाचायाला येत होते. ती कुठल्याही शाळा कॉलेजात गेली नव्हती पण जीवनाच्या विद्यापीठाची डॉक्टरेट तिच्याकडे होती. कुठलीही गोष्ट कशी समजावून सांगायची याचे कौशल्य तिच्याजवळ होते. संस्काराचे विद्यापीठ होती आजी.  मी मित्रांमध्ये खेळून यायचो, जवळपासच्या शेतात जाऊन हुंदडायचो, उन्हात फिरल्याने, खेळल्याने प्रचंड तहान लागायची. धावत घरात आलो की माठाजवळ जायचो आणि पाणी प्यायचो. पण आजी मला थांबवायची. अरे थांब, तसाच माठाजवळ जाऊ नकोस. कुठून कुठून भटकून आल...

उदरभरण नोहे …

 उदरभरण नोहे … आपल्याकडे जेवताना म्हणायचा एक श्लोक आहे.   "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ।  सहज हवन होते नाम घेता फुकाचे ॥   जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म ।  उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म ॥ जेवण करणे म्हणजे केवळ पोट भरणे नव्हे. त्याला यज्ञकर्माची सुंदर उपमा दिली आहे. ते पूर्णब्रह्म आहे. वदनी ' कवळ ' म्हणजे घास घेताना श्रीहरीचे नाव घेऊन जेवायला सुरुवात करावी वगैरे वगैरे. आता तर काळाच्या ओघात आम्ही हा श्लोकच विसरलो आहोत बुवा ! अहो, कसले यज्ञकर्म अन कसले काय घेऊन बसलात ! आम्ही पडलो पोटार्थी ! आम्हाला हे यज्ञकर्म वगैरे असलं काही अजिबात मानवत नाही. ताकाला जायचं अन भांडं कशाला लपवायचं ? त्यामुळे आम्ही सरळ जेवायलाच जातो. उदरभरणासाठी. यज्ञकर्म वगैरे ज्याला वाटेल त्याने ते खुशाल करत बसावं. आम्हाला हॉटेलातलं जेवण अतिप्रिय ! म्हणजे काय तर तसं घरी जमतच नाही बघा. घरी कांदाभजी केली, मिसळ केली किंवा आणखी ढोकळे की काय म्हणतात ते केले तरी त्याला हॉटेलसारखी चव थोडीच येणार ? घरी भाजी कोणतीही बनवा. ती होणार अगदी सपक, मिळमिळीत. त्यामुळे आठवड्यातून एक दोन वेळा तरी आम्ही...