मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मृत्यूकडून जीवनाकडे...

 उगवतीचे रंग  मृत्यूकडून जीवनाकडे...  कधी कधी हे सत्य हे कल्पनेपेक्षा भयानक असते. आपण स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही अशा गोष्टी प्रत्यक्षात घडतात. अशीच ही एका मुलीची कथा. अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून वाचलेली. जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती कोणता चमत्कार घडवू शकते, त्याचे प्रत्यंतर देणारी. ही घटना आहे २४ डिसेंबर १९७१ ची.  ज्युलियन कोपकी, एक १७ वर्षांची मुलगी. पेरू देशाची राजधानी लिमा येथे शिक्षणासाठी आलेली.  नुकतेच हायस्कुलचे शिक्षण पूर्ण झालेले. तिचे आईवडील तेथून जवळच असलेल्या अमेझॉनच्या जंगलात एक प्रयोगशाळा स्थापून प्राणिशास्त्र आणि पक्षीशास्त्रावर संशोधन करीत असतात. तिची आई काही कामानिमित्त लिमा येथे आलेली होती. नाताळचा सण फक्त काही दिवसांवर आलेला होता. ज्युलिअनच्या डोळ्यात नाताळ साजरा करण्याची स्वप्ने तरळत होती. आपल्या वडिलांना भेटण्यासही ती उत्सुक होती. खरे तर तिच्या आईला आपले काम संपवून १९ किंवा २० डिसेंबरला परत आपल्या प्रयोगशाळेकडे जायचे होते . पण ज्युलिअनच्या शाळेत पदवीदान समारंभ २३ डिसेंबरला असल्याने ती थांबते आणि दोघीही तो कार्यक्रम आटोपल्यावर आपल्या...

जैसी गंगा वाहे...

 उगवतीचे रंग  जैसी गंगा वाहे...  गेल्या महिन्यात सकाळी दहा अकराच्या सुमारास माझा फोन वाजला. पाहतो तर फोनवर माळी गुरुजी, वाडे असे नाव सेव्ह केलेले होते. मला अत्यंत आदरणीय आणि प्रिय असलेल्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा फोन पाहून मला खूप आनंद झाला. त्यांचा फोन घेतल्याबरोबर सुरुवातीला फक्त विश्वास असा प्रेमळ शब्द आणि नंतर ऐकू येतं ते अकारण आणि अकृत्रिम निर्मळ हास्य. सगळ्यांचे ते आदरणीय अण्णा. माझ्या वडिलांचे मित्र. माझे वडील आता नाहीत. पण अण्णांचा फोन आला की नकळत मला माझ्या वडिलांची आठवण होते आणि डोळे पाणावतात. अण्णांचा फोन आला की त्यांचे बोलणे ऐकत राहावे. आपण कल्पना करू शकणार नाही की आपल्याशी बोलणाऱ्या या समोरच्या व्यक्तीचे वय फक्त ९४ वर्षे आहे .  मी अण्णांना म्हटले की अण्णा या वयातही किती छान बोलता तुम्ही. बोलण्यात कुठेही विसंगती नाही. पुन्हा मग अण्णा निर्मळ हसतात. ते म्हणतात, ' अरे, ही साधनेची शक्ती. ' मग अण्णांच्या बोलण्यातून वेदांतातील, गीतेतील तत्वज्ञान सहज उलगडू लागते. त्यातल्या गोष्टी त्यांच्या स्वानुभवाचं रूप घेऊन प्रकटतात. आपण जणू एखादे ...

पौराणिक खलपुरुष आणि त्यांच्या पत्नी - भाग तीन ( अंतिम )

उगवतीचे रंग  पौराणिक खलपुरुष आणि त्यांच्या पत्नी - भाग तीन ( अंतिम )  आधीच्या दोन भागात आपण रामायणातील खलपुरुष रावण आणि वाली तसेच जालंधर आणि हिरण्यकश्यपू यांची आणि त्यांच्या पतिव्रता असलेल्या पत्नींची माहिती पाहिली. आजच्या भागात आपण श्रीकृष्ण चरित्रात येणाऱ्या शंबरासुर, वासुदेव पौंड्रक आणि महाभारतातील धृतराष्ट्र आणि त्यांच्या पत्नींविषयी माहिती घेणार आहोत.  शंबरासुर हा श्रीकृष्णाच्या प्रमुख शत्रूंपैकी एक होता. तो स्वतःला सर्वशक्तिमान समजत असे. अनेक मायावी विद्यांमध्ये तो निपुण होता. त्याच्या पत्नीचे नाव मायावती होते. शंबरासुराच्या अंगी असलेल्या अपार शक्तीमुळे तो देवांना तो अजेय झाला होता. श्रीकृष्ण आणि रुख्मिणीचा प्रथम पुत्रच त्याचा वध करेल असा त्याला शाप होता. त्यानुसार श्रीकृष्ण आणि रुख्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्न याच्या हाती त्याचा वध होतो. त्याचे मायासुर, कुम्भकेतू इ पुत्रही युद्धात मारले जातात. या शंबरासुराची पत्नी मायावती ही धर्मपरायण आणि पतिव्रता असते. तिला आपल्या पतीचे वागणे आवडत नाही. श्रीकृष्णाशी शत्रुत्व पत्करू नका असे ती अनेकदा त्याला समजावते. पण आपल्या सामर्थ...

पौराणिक खलपुरुष आणि त्यांच्या पत्नी - भाग दोन

 उगवतीचे रंग  पौराणिक खलपुरुष  आणि त्यांच्या पत्नी - भाग दोन  परवाच्या लेखामध्ये आपण रामायणातील रावण आणि वाली यांच्या पत्नी अनुक्रमे मंदोदरी आणि तारा यांच्याबद्दल माहिती घेतली. आज पुराणकथांमधील जालन्धर आणि हिरण्यकश्यपू यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. हिरण्यकश्यपू आणि जालंधर हे दोघेही दैत्य. दोघेही परमेश्वराच्या वरदानामुळे देवांनाही अजिंक्य झालेले. रावण आणि वाली यांच्या पत्नीप्रमाणेच त्यांच्या पत्नी देखील पतिव्रता आणि धर्मपरायण होत्या.  जालंधरची कथा स्कंद पुराण, पद्म पुराण, शिव पुराण आणि देवी पुराणात येते. जालंधर हा प्रत्यक्ष शिवशंकराच्या अंशापासून उत्पन्न झालेला असुर होता. पुराणातील कथेनुसार शंकरानी आपले तेज समुद्रात विसर्जित केले असताना त्या तेजापासून जालंधरचा जन्म झाला. हे लिहीत असताना मला प्रश्न असा पडला की प्रत्यक्ष शंकरांच्या अंशापासून उत्पन्न झालेला हा जालंधर धार्मिक, सात्विक आणि सर्वांना वंदनीय असा का झाला नाही ? तर त्याचे उत्तर असे मिळते की तो शंकरांच्या क्रोधाग्नीपासून उत्पन्न झाला होता. त्यामुळेच सात्विकता, धर्मपारायणता हे गुण त्याच्या...

पौराणिक खलपुरुष आणि त्यांच्या पत्नी - भाग एक

 उगवतीचे रंग  पौराणिक खलपुरुष आणि त्यांच्या पत्नी - भाग एक  या लॉकडाऊनच्या कालावधीत काही धार्मिक धारावाहिक पुन्हा पाहण्यात आल्या. रामायण, महाभारत, विष्णुपुराण इ. या सगळ्या मालिका पाहत असताना, पूर्वी लक्षात न आलेल्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. त्यातील काही सामायिक दुवे, त्या त्या धारावाहिकेतील नायक, खलनायक आणि त्यांच्या सहधर्मचारिणी, त्या पुराणातील नायक श्रीराम, श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णू यांच्या अवतारामागील भूमिका, त्यांनी सांगितलेले तत्वज्ञान या सगळ्या गोष्टी छानपैकी लक्षात आल्या. पूर्वी या मालिका पाहिल्या होत्या. पण त्यावेळी एखादे लहान मूल कसे एखादी गोष्ट उत्सुकतेने ऐकते, तशा त्या पाहिल्या गेल्या. जशी रामायणाचा नायक म्हणून श्रीरामाला प्रसिद्धी मिळाली, तशीच त्याच्याबरोबर रावणाला आणि अनीतीने वागणाऱ्या वानरराज वालीला.  श्रीकृष्ण मालिकेत तर अनेक खलपुरुष येतात. ते म्हणजे कंस, शिशुपाल, जरासंध, कालयवन, शंबरासुर आणि भगवान वासुदेव पौंड्रक. तर महाभारतात येणारे खलपुरुष दुर्योधन, दुःशासन, शकुनी, धृतराष्ट्र आदी. विष्णुपुराण किंवा भागवतात येणारे खलपुरुष म्हणजे हिरण्यकश्यपू, ...

राम गाणी - मनातली

 उगवतीचे रंग  राम गाणी - मनातली   श्रीराम आणि श्रीकृष्ण ही दोन भारतीय संस्कृतीला पडलेली मधुर स्वप्ने आहेत. या दोघांच्या दिव्य व्यक्तिमत्वाने अनेकांना प्रेरणा दिली आणि महर्षी वाल्मिकींपासून महर्षी व्यासांपर्यंत आणि गोस्वामी तुलसीदासांपासून ते अगदी आजच्या ग दि माडगूळकरांच्या गीतरामायणापर्यंत हा मधुर भक्तीरस युगानुयुगे पाझरत राहिला आहे. आपल्यासारखे अनेक भ्रमर या गीतांचे मधुर रसपान करीत आले आहेत. रामकथेचे सव्वीस भाग आतापर्यंत आपण पाहिलेत.   ' समस्तांमध्ये कथा गोड या राघवाची असे समर्थ रामदास म्हणतात ते श्रीरामाच्या गाण्यांच्या बाबतीतही खरे आहे. एखादी पूजा संपन्न झाल्यावर जशी आपण त्या देवतेची आरती करतो, तशीच रामकथा संपन्न झाल्यावर ही गीतरूपी श्रीरामाची आरती समजू या. आज मला आवडणारी काही राम गीते आणि त्यातील सौंदर्य आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. ग दि माडगूळकरांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी अजरामर केलेले गीतरामायण आज हजारो भारतीयांच्या ओठावर आहे. त्याबद्दल बोलणे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. त्यामुळे आज श्रीरामाशी संबंधित इतर गीतांबद्दल बो...

रामकथा - भाग सव्वीस ( अंतिम )

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग सव्वीस ( अंतिम )  आतापर्यंत रामकथेचे पंचवीस भाग झाले. या भागातून आपण रामायणातील निरनिराळ्या पात्रांवर आणि त्यांच्या एकमेकांशी असलेल्या नातेसंबंधावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. उत्तररामायणातील लवकुश यांनी गायिलेल्या ' हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की...' या गीताचा मी सुरुवातीला उल्लेख केला होता. आज या लेखामालेच्या समाप्तीच्या वेळा तो उल्लेख पुन्हा करतो आहे. याचे कारण ही कथा का ऐकायची हे मला या शेवटच्या भागात पुन्हा सांगायचे आहे. कदाचित माझ्याकडे पुनरुक्तीचा दोष येईल पण तो दोष स्वीकारूनही मी ते सांगणार आहे.  रामायण म्हणजे जणू वैदिक वांड्मयाचे नवनीत. रामायणात काय नाही ? स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात सांगायचे तर ' जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते ' सर्व या ग्रंथात आले आहे. रामायणाकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी वेगवेगळी असू शकते. पण तुम्ही कोणत्याही दृष्टीने पाहिले तरी ते तुमच्या अपेक्षा पूर्ण करील. त्याकडे जर तुम्ही एक महाकाव्य म्हणून पाहाल तर महाकाव्यांचा मेरुमणी म्हणजे रामायण. महाकाव्याच्या वा...

रामकथा - भाग पंचवीस ( रामायणातील ज्ञात अज्ञात गोष्टी भाग दोन )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग पंचवीस ( रामायणातील ज्ञात अज्ञात गोष्टी भाग दोन ) ' समस्तांमधे कथा गोड या राघवाची ' असे समर्थ रामदास म्हणतात खरेच आहे. रामकथेची गोडी अवीट आहे. पण ज्यांना केवळ दोष पाहण्याची सवय असते, त्यांना रामकथेतील चांगल्या गोष्टी न दिसता त्यातील शंकास्थाने दिसतात. शंका घ्यायला हरकत नाही. शंकेचे निरसनही व्हायलाच हवे. पण जेव्हा आपण रामकथेबद्दल बोलतो तेव्हा दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली म्हणजे रामायण घडले त्याला आज पाच ते सहा हजार वर्षे होऊन गेली. जेव्हा रामायण घडले तेव्हा त्याकाळी अशी कोण व्यक्ती होती की जिने हे प्रत्यक्ष पाहिले आणि लिहून ठेवले ? या प्रश्नाचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे महर्षी वाल्मिकी. त्यामुळे जे वाल्मिकी रामायणात आहे ते प्रमाण मानायला हवे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे की आपल्याला श्रीराम हवे आहेत, त्यांचे  गुण हवे आहेत, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्याला आपले जीवन सार्थकी लावायचे आहे. त्यामुळे नको त्या गोष्टीत लक्ष घालून आपला बुद्धिभेद करून घेऊ नये. तरी काही गोष्टींचे ...

रामकथा - भाग चोवीस ( रामायणातील काही ज्ञात /अज्ञात गोष्टी भाग एक )

 उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग चोवीस ( रामायणातील काही ज्ञात /अज्ञात गोष्टी भाग एक )  जय श्रीराम. रामकथा लिहीत असताना मला काही वाचकांकडून रामायणातील काही गोष्टींबद्दल विचारणा झाली. अशा बऱ्याच गोष्टी वाचकांनी विचारल्या की ज्यांचा उल्लेख मूळ वाल्मिकी रामायणात नाही. त्यात नेहमी विचारल्या जाणाऱ्या काही गोष्टी अशा. श्रीरामाला बहीण होती का ? असली तर ती कोण ? वालीचा वध श्रीरामाने कपटाने का केला ? लंका विजयानंतर अयोध्येत परतल्यावर श्रीरामाने सीतेचा त्याग का केला ? हा तिच्यावर अन्याय नाही का ? शंबुक प्रकरणात शंबुक नावाच्या शूद्राची हत्या श्रीरामाने केली असे म्हटले जाते. यावरून पुरोगामी म्हणवणारे आणि श्रीरामावर श्रद्धा नसणारी मंडळी श्रीरामावर ते  स्त्री शूद्र विरोधी होते अशा प्रकारची टीका करून त्यांना दोषी ठरवून मोकळे होतात. कैकेयी आणि बिभीषण यांच्यावर अनेक आरोप केले जातात. त्या आरोपांचे खंडन करण्याचा प्रयत्न मी त्यांचे व्यक्तिचित्र रेखाटताना करण्याचा प्रयत्न केला आहे.  मी कोणी विद्वान नाही. रामायणाचा एक वाचक या नात्याने वरील का...

रामकथा - भाग तेवीस ( कैकेयी )

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव   रामकथा - भाग तेवीस ( कैकेयी )  रामायणात सर्वात जास्त गैरसमज आणि अन्याय कोणत्या पात्रावर  झाला  असेल, तर ते पात्र म्हणजे कैकेयीचे होय. आपण रामायणातील श्रीरामासह अनेक  महत्वाच्या पात्रांबद्दल यापूर्वीच्या लेखातून चर्चा केली आहे. परंतु कैकेयीबद्दल लिहायचे राहिले. त्यामुळे आज तिच्या व्यक्तिमत्वावर थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू या.  कैकेयीला रामायणात अन्यायी, पापी, चांडाळणी इ शब्दांनी निर्भत्सना करून श्रीरामाच्या वनवासासाठी दोषी ठरवण्यात आले आहे. पण तिला दोष देण्यापूर्वी दोन गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे ती श्रीरामाची सावत्र असली तरी आई आहे. तिचे अपार प्रेम श्रीरामावर आहे. दुसरे म्हणजे तिने श्रीरामाला वनवासात पाठवणे यामागे विधिलिखित होते असे म्हणायला हरकत नाही. कारण तिने जर श्रीरामाला वनवासात पाठवले नसते, तर पुढचे रामायण घडलेच नसते. अन्यायी, अत्याचारी रावणाचा वध झालाच नसता. आणखी एक गोष्ट. श्रीराम, लक्ष्मण आणि भरत, शत्रुघ्न यासारख्या भावंडांची माता होण्याचे भाग्य लाभणे ही गोष्ट कोणत्य...

रामकथा - भाग बावीस ( रामायणकालीन शिक्षण )

 उगवतीचे रंग  विश्वास  देशपांडे, चाळीसगाव  रामकथा - भाग बावीस  ( रामायणकालीन शिक्षण ) शिक्षण ही मनुष्याच्या जीवनाला उन्नत करणारी सर्वात सुंदर गोष्ट आहे. रामायणकालीन संस्कृती ही एक अद्वितीय संस्कृती होती. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रामायणकालीन शिक्षण पद्धती. खाणीतून बाहेर काढलेल्या हिऱ्याला सुद्धा पैलू पाडावे लागतात. मनुष्य ही परमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती आहे. प्राणिमात्रातील तो हिराच आहे. रामायणकाल म्हणजे तर अशा एकापेक्षा एक सुंदर हिऱ्यांची खाणच होती. त्या काळात अशा हिऱ्यांना पैलू पडणारे कुशल हातही अस्तित्वात होते. म्हणून श्रीराम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांच्यासारखे दैदिप्यमान हिरे निर्माण झाले. त्यांचे तेज आजही फिके झालेले नाही.  इंग्रजी शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध असे विष्णुशास्त्री चिपळूणकर म्हणत असत. जो ते प्राशन करील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. पण रामायणकालीन शिक्षण म्हणजे जणू कामधेनूचे दूध असे मी म्हणेन. गायीला आपण कामधेनू सुद्धा म्हणतो. गायीचे दूध बालकाला बुद्धिमान आणि तेजस्वी बनवते. हीच बुद्धिमत्ता आणि तेजस्विता त्या काळातील शिक्ष...

रामकथा -भाग एकवीस ( कुटुंबसंस्था )

  उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  रामकथा -भाग एकवीस ( कुटुंबसंस्था )  विवाहसंस्था किंवा कुटुंबव्यवस्था कशी असावी याचे उत्तर रामायणात आपल्याला मिळते. कुटुंब हा समाजाचा  एक छोटा  आणि मूलभूत घटक आहे.  अनेक कुटुंबे मिळून समाज तयार होतो. कुटुंबातील व्यक्तींचा विकास झाला तर आपोआपच समाजाचा आणि देशाचा विकास होतो. हा विकास केवळ आर्थिक स्तरावर नव्हे तर बौद्धिक, भावनिक आणि एकूणच व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास येथे अपेक्षित आहे. असा विकास ज्या व्यक्तीचा झालेला असतो, तिला आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव असते. माझे कुटुंबाप्रती, समाजाप्रती, देशाप्रतीअसणारे कर्तव्य कोणते याची जाण जर मला असेल तर मी जबाबदारीने वागेन. ही जी जबाबदारीची, कर्तव्याची भावना आहे ती रामायणकालीन कुटुंबात लहानपणापासून जोपासण्यात येत असे.  विवाहसंस्था का निर्माण झाली असावी ? तर स्त्री आणि मुले यांची काळजी घेणे, भरण, पोषण करणे आणि त्यांना संरक्षण पुरवणे त्याचबरोबर समाजाचा आणि व्यक्तीचा विकास करणे हाही विवाह संस्थेचा उद्देश आहे. केवळ व्यक्तीच्या सुखासाठी विवाहसंस्थेची निर्मिती झाल...