मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उद्याच्या आशेचे प्रसन्न चेहरे

 उगवतीचे रंग उद्याच्या आशेचे प्रसन्न चेहरे काही दिवसांपूर्वी मी  इस शहरमें हर  शख़्स  परेशान सा क्यूँ हैं या नावाचा लेख लिहिला होता हे आपल्याला आठवत असेलच. ते एका प्रसिद्ध आणि सुंदर अशा गजलेचे रसग्रहण होते असे म्हणता येईल. पण सुंदर गझल हा एक भाग सोडला तर ते पूर्णपणे खरं नाही. प्रत्यक्षात पाहिलं तर आपल्याला असंही म्हणावं लागेल की      “हर तरफ़ उदासी है मगर, किसी कोने में कोई ख़ुशबू बाक़ी है अभी...” इस शहर में कुछ लोग अब भी मुस्कुराते हैं –  हो, हे अगदी खरं आहे… आणि हीच या काळया ढगाची रुपेरी किनार आहे. त्या प्रसिद्ध गजलेतील शब्द आहेत “इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है..? शहराच्या गर्दीत, आवाजात, आणि झगमगाटात हरवलेले चेहरे… पण त्या सगळ्यांच्या मध्ये, अजून काही चेहरे आहेत — जे अजूनही हसतात. काही लोक अजूनही रस्त्यावरच्या झाडांना पाणी घालतात, काही अजूनही अनोळखी माणसांना ‘नमस्कार’ करतात, काही अजूनही पुस्तकांच्या शेवटच्या पानात आशा शोधतात. कसलीही शंका न घेता मदतीचा हात देणारे. ही बघा काही उदाहरणे... एका गर्दीच्या रस्त्यावर स्कूटर घसरते, अनेक जण केवळ ब...

अस्वस्थ आत्मे

उगवतीचे रंग अस्वस्थ आत्मे... सध्या कोणालाच थांबायला वेळ नसतो आणि कोणीच अजिबात धीर धरायला तयार नसतो याची अनेक उदाहरणे मला अनुभवाला आली आणि येतात. तुम्हालाही ती तशी येत असतील. माझ्या घरासमोर काही छोटी शाळेत जाणारी मुले राहतात. सकाळी त्यांना शाळेत नेण्यासाठी ज्या रिक्षा आणि बस येतात त्या लांबूनच हॉर्न वाजवत येतात. त्या गाड्यांचे हॉर्न एवढे मोठे आणि कर्कश आहेत की लांबूनच ते ऐकू येतात. तरी एकदा वाजवून ते थांबत नाहीत. ते त्या मुलाच्या घराजवळ आले की तो मुलगा येईपर्यंत पुन्हा पुन्हा हॉर्न वाजवत राहतात. एक दूधवालाही त्याच प्रकारातला. तोही लांबूनच हॉर्न वाजवत येतो. आपण घरातून भांडे घेऊन येईपर्यंत त्याला दम निघत नाही. पुन्हा पुन्हा तो हॉर्न वाजवत राहतो.  एके दिवशी समोरचा एक मुलगा माझ्याकडे माझ्या झाडाचे लिंबू मागायला आला. मुलगा छोटा होता. ९- १० वर्षांचा असेल. तो आला त्यावेळी माझ्या घराचे दार बंद होते आणि मी वॉशरूमला गेलो होतो. घरी दुसरे कोणीच नव्हते. तेवढ्या दोन मिनिटात मी दार उघडेपर्यंत त्याने तीन ते चार वेळा सलग बेल वाजवली. बाहेर कोण आले आहे आणि एवढे अर्जंट कोणाचे काय काम आहे हे समजायला काह...

एक अजरामर कव्वाली : निगाहें मिलाने को जी चाहता है...

उगवतीचे रंग  एक अजरामर कव्वाली : निगाहें मिलाने को जी चाहता है...  ' राज की बात हैं ...' अशी सुरुवात करत आपल्या काळजात रुतून बसणारी ही कव्वाली. प्रेमाच्या तरल, रेशमी, हळुवार भावनांचा स्पर्श वाऱ्याच्या एखाद्या मंद झुळकेसारखा आपल्या हृदयाला स्पर्श करून जातो. ' जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा ...' त्यासारखा हा वारा अवखळ नाही. कपाळावरील बटांना हलकेच स्पर्श करून आपल्या प्रेमाचा गंध  घेऊन येणारा हा अनिल ! १९६३ मध्ये आलेल्या ' दिल ही तो हैं ' या चित्रपटातील ही अजरामर कव्वाली. आशा भोसलेंचा लडिवाळ, खट्याळ आणि काहीसा बंडखोर स्वर !त्यातली गोडी अवर्णनीय ! पडद्यावर सादर करणारी अभिनेत्री नूतन. नैसर्गिक सौंदर्य आणि तेवढाच नैसर्गिक अभिनय. म्हणूनच ' नित्यनूतन '. आशाताईंच्या स्वरातली मधाळ गोडी आणि नूतनचं सादरीकरण याचं मिश्रण इतकं एकजीव झालंय की मस्त घट्ट बासुंदीच तयार झाली. वाटी उचलावी आणि सरळ तोंडाला लावावी.  साहिर लुधियानवी यांच्या जादुई शब्दांना सुरांचा साज चढवला आहे संगीतकार रोशन यांनी. इतकं सुंदर संगीत आणि चाल दिली आहे  की गाणं खरोखरीच ' रोशन ' झालं आहे....

शब्दांची गुंतवणूक

उगवतीचे रंग  शब्दांची गुंतवणूक  शब्दांची गुंतवणूक ? आश्चर्य वाटले ना ! गुंतवणूक पैशाची होते, सोन्याची होते किंवा शेती, घर, जमीन यासारख्या मालमत्तेची होते पण शब्दांची गुंतवणूक कशी शक्य आहे ? तर संत तुकाराम महाराज म्हणतात आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥ शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||२|| तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥ शब्द इतके मौल्यवान आहेत की शब्दांनाच ते रत्न म्हणून संबोधतात. जेव्हा समाजाला काही सांगण्याची वेळ येईल, त्यावेळी त्याच शब्दांचा शस्त्र म्हणून आम्ही वापर करू. शब्दच आमचे जीवन आहेत आणि हेच शब्दरूपी धन आम्ही लोकांना वाटू. शब्द हेच परमेश्वर आहेत असे सुंदर विचार या अभंगात तुकाराम महाराज व्यक्त करतात. २३ एप्रिलला आपण जागतिक पुस्तक दिन साजरा करतो. तर शब्दात म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या पुस्तकात आपण ही गुंतवणूक करतो का ? हा प्रश्न या निमित्ताने मनात आला. पुस्तकांमध्ये मोठे विचारधन दडलेले आहे. परवा सहज ' चिकन सूप फॉर द सोल ' हे पुस्तक वाचत होतो. त्यात एक सुंदर कथा वाचायला मिळाली.  एक समाजशास्त्राचे...

अनोखे अंदमान - भाग सहा

  उगवतीचे रंग    अनोखे अंदमान – भाग ६  जंगलाच्या छायेत – बारटांग बेट दिनांक २५/२/२०२५. अंदमान मधील ठिकाणे पाहण्याचा आजचा हा शेवटचा टप्पा. या दिवशी आम्हाला सकाळी चार वाजताच उठून तयार राहायला सांगितले होते त्याप्रमाणे आम्ही आवरून तयार झालो. आमचा पुढचा प्रवास आता बसने होणार होता. साधारणपणे दोन तासांचा हा प्रवास होता. आम्ही निघालो तेव्हा अंधार होता परंतु लवकरच उजाडले. अंदमानमध्ये तसा सूर्योदय लवकर होतो. आणि आम्हाला लक्षात आले की आमची गाडी पोर्ट ब्लेअर शहर सोडून जंगलाच्या दिशेने धावत आहे. आजूबाजूला गर्द झाडी होती. रस्ता चांगला परंतु लहान होता आणि एवढ्या जंगलाच्या अंतर्भागातही वाहनांची येजा सुरू होती.  सकाळी लवकर जंगलातील मार्गाने (Jarawa Reserve Forest) जाण्याचा अनुभव काही वेगळाच. विशेष शासकीय परवानगी, वेळेचं काटेकोर पालन आणि त्या रस्त्यावरची शिस्त – हे सर्व पाळत आम्ही हळूहळू आदिवासी भागातून पुढे जात होती. गाडीची आणि गाडीतील प्रवाशांची कागदपत्रे तपासून मगच वाहने पुढे जाऊ दिली जात होती. त्या ठिकाणी वाहनांची प्रचंड रांग होती पण कोणीही गडबड करीत नव्हते. उगीचच ...

अनोखे अंदमान - भाग ५

उगवतीचे रंग   अनोखे अंदमान – भाग ५  हॅवलॉक आणि नील आयलंड दिनांक २३ आणि २४ फेब्रुवारी २०२५ हे आमचे दोन दिवस खऱ्या अर्थाने निळाईच्या कुशीत गेले असं म्हणावं लागेल. अंदमानमधील सर्वच ठिकाणे सुंदर आहेत. पण हॅवलॉक आणि नील बेटांचे सौंदर्य अनुपम. अंदमानच्या प्रवासात एक क्षण असा येतो, जेव्हा आपण नुसते प्रवासी राहत नाही, तर निसर्गाचे एक शांत साक्षीदार होतो. हॅवलॉक आणि नील आयलंड – ही दोन बेटं अशीच एक अनुभूती देतात, जिथे समुद्राचा निळा श्वास, वाळूचे गंधाळलेले शब्द, आणि झाडांची सावली मनाशी संवाद साधते. फेब्रुवारीतही उन्हाचे चटके जाणवतात पण या निसर्गाच्या कुशीत आणि मोकळ्या समुद्रवाऱ्याच्या संगतीने आपण ते सहज सुसह्य करू शकतो. सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या बेटांचे नामकरण आता ' स्वराज द्वीप ' असं करण्यात आलं आहे.  या हॅवलॉक बेटांवर जाण्यासाठी आम्ही सकाळी पाच वाजताच पोर्ट ब्लेअर सोडले. आता पुढचा प्रवास एका क्रूझमधून होणार होता. सुरुवातीला आमच्या कागदपत्रांची तपासणी होऊन आम्हाला पुढे सोडण्यात आले. आमचा हा अडीच तासांचा प्रवास आम्हाला समुद्रप्रवासाची अतिशय सुंदर अनुभूती देणार...

इस शहरमें हर शख़्स परेशान सा क्यूँ हैं...

उगवतीचे रंग  इस शहरमें हर  शख़्स  परेशान सा क्यूँ हैं...  १९७८ मध्ये आलेल्या ' गमन ' या चित्रपटातील ही नितांतसुंदर गझल. कुंवर अखलाक मुहम्मद खान उर्फ ' शहरयार ' या टोपणनावाने काव्यलेखन करणाऱ्या कवीची ही गझल. तिच्यात जेवढा ' दर्द ', अस्वस्थता आणि आजच्या दाहक वास्तवाची जाणीव कवी करून देतो, तेवढ्याच परिणामकारकपणे सुरेश वाडकर यांनी ती गायली आहे. ती ऐकल्यावर तिचे सूर थेट हृदयापर्यंत पोहोचतात. ऐकणाऱ्याला अस्वस्थ करण्याची ताकद या शब्दांमध्ये आहे. १९७८ मध्ये जरी हा चित्रपट आला असला तरी, या गाण्यातील वास्तव, दाहकता आजही कायम आहे, किंबहुना ती दिवसेंदिवस वाढतेच आहे.  नोकरीच्या शोधार्थ एक तरुण मुंबईत येतो. त्याला काम मिळतं. तो टॅक्सी चालवतो. तसं जीवन सुरु आहे. खायची प्यायची ददात नाही. पण मनातून कुठेतरी अस्वस्थ आहे. तो स्थलांतरित आहे. त्याच्या वेदना आणि संवेदना या गीतातून प्रकट होतात. पण खरंच या त्याच्यापुरत्याच मर्यादित राहतात का ? त्याच्याशी आमची कुठेतरी जवळीक आहे, म्हणून तर त्या थेट आपल्या हृदयाला हात घालतात. म्हणूनच तर कवी म्हणत नसेल ना "   इस शहरमें हर  शख...

अनोखे अंदमान : भाग चार

  उगवतीचे रंग  अनोखे अंदमान : भाग चार रॉस आयलंड आणि नॉर्थ बे  आमच्या अंदमान ट्रीपचा दुसरा दिवस उजाडला. आमचे गाईड आनंद दवे एकदा मला म्हणाले होते की अंदमान इतकं सुंदर आहे की कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही. त्याचा प्रत्यय खरोखरच अंदमानमध्ये आला. तेथील निसर्ग सौंदर्य अत्यंत विलोभनीय आहे.  सेल्युलर जेलच्या दर्शनाने भारावलेले आम्ही दुसऱ्या दिवसापासून अंदमानचे निसर्ग सौंदर्य पाहायला सुरुवात करणार होतो. २२ फेब्रुवारी २०२५ हा आमचा अंदमानमधील दुसरा दिवस होता आणि आजच्या दिवशी नॉर्थ बे आणि रॉस आयलँड ही दोन ठिकाणे पाहण्याचे आमचे नियोजन होते. अंदमान मधील सगळेच समुद्रकिनारे सुंदर आहेत. त्यातील नॉर्थ बे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचे आयोजन केले जाते. त्या ठिकाणी जाण्याची आणि तेथील वॉटर स्पोर्ट्स मध्ये भाग घेण्याची उत्सुकता आम्हाला होती तेथे ज्यांच्या वतीने या खेळांचे आयोजन केले जाते त्यांचा एक प्रतिनिधी आदल्या दिवशी रात्रीच आमच्या हॉटेलवर आला होता आणि त्याने आम्हाला तिथे कोणकोणते वॉटर स्पोर्ट्स आहेत, त्यात कोण कोण भाग घेऊ शकतो आणि त्याचे दर कसे आहेत अशी सगळी माहिती दिली.  दुसऱ्...

लक्ष्मण होना कठीन

  उगवतीचे रंग लक्ष्मण होना कठीन... काही दिवसांपूर्वी सोनी टीव्हीवर श्रीमद रामायण या नावाची एक मालिका सुरू होती. रामायण किंवा रामकथा कोणीही आणि कोणत्याही प्रकारे सांगितली तरी तिची गोडी अवीट आहे. श्रीमद रामायण ही सिरीयल मी सुरुवातीपासून पाहत असल्यामुळे तिच्या पुढच्या भागात काय होते अशी उत्सुकता नेहमीच असायची. पण मध्यंतरीच्या काळात मी ती नियमितपणे पाहू शकलो नाही. आता ते धारावाहिक सोनी टीव्ही वरती नियमितपणे सुरू आहे का हेही मला माहिती नाही. परंतु त्याचे मागील काही भाग युट्युब वर उपलब्ध आहेत. त्यातील एक भाग मी पाहिला. त्या भागात प्रत्यक्ष श्रीराम भरताला असे सांगतात की राम होना सरल है, लक्ष्मण होना कठीन हैं. हे वाक्य ऐकले आणि मी आश्चर्यचकित झालो. खरोखरच राम होणं साधं सरळ आणि सोपं आहे का आणि लक्ष्मण होणं कठीण ?असं होऊ शकतं का ? पण ज्या अर्थी प्रत्यक्ष प्रभू श्रीराम असं म्हणतात तेव्हा त्यात काहीतरी तथ्य नक्कीच असलं पाहिजे. आणि मी जसजसा विचार करू लागलो, तसतशी या विधानातील सत्यता माझ्या लक्षात येत गेली. पण हे सांगण्यापूर्वी मी या वाक्यामागील थोडी पार्श्वभूमी आपल्याला सांगतो. म्हणजे आपल्याला ...

अनोखे अंदमान - भाग ३

  उगवतीचे रंग  अनोखे अंदमान : भाग तीन  सेल्युलर जेलला भेट  स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोठडी पाहून आल्यानंतर खाली एका हॉलमध्ये सेल्युलर जेलचे मॉडेल आपल्याला बघायला मिळते. पूर्वी या ठिकाणी सात इमारती होत्या. आता त्यातील तीनच शिल्लक आहेत. एखाद्या विशाल चक्राभोवती सात आरे असावेत अशा येथील या सात इमारती आहेत आणि मध्यभागी त्या सात इमारतींना जोडणारी आणि त्या सातही इमारतींवर एकाच ठिकाणाहून लक्ष ठेवता येईल अशी मध्यवर्ती इमारत किंवा टॉवर. सेल्युलर जेल म्हणजे  सेल्युलर जेल मधील या कोठड्यांच्या रचनेचा उद्देश होता — पूर्ण एकाकीपणा. कैद्याला ना संवाद, ना सोबत, ना आधार. ही केवळ शारीरिक शिक्षा नव्हे, तर मानसिक छळ होता .   आणि त्या कोठडीतून दुसऱ्या कोणत्याही कैद्याला पाहता येणार नाही. आता येथे असलेल्या तीन इमारतींपैकी पहिल्या इमारतीतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ज्या ठिकाणी ठेवले होते तीच कोठडी आपल्याला पाहता येते. अन्य कोठड्या बंद आहेत परंतु गजांच्या दारातून त्या पाहता येतात. या कोठड्या आज मूक असल्या तरी एकेकाळी क्रांतिकारकांच्या झालेल्या छळाच्या त्या साक्षीदार आहेत . सेल...

आनंदयात्री रवींद्रनाथ पुस्तकात शेवटच्या पानावर घ्यावयाची कविता

आनंदयात्री रवींद्रनाथ पुस्तकात शेवटच्या पानावर घ्यावयाची कविता   पु ल देशपांडे यांच्या ' वंगचित्रे ' या पुस्तकात त्यांच्या ' शूरेर गुरु दाव गो शूरेर दिख्खा ' या कवितेचा उल्लेख करून त्याचे पुढीलप्रमाणे भाषांतर दिले आहे. तीच प्रार्थना आपण गुरुदेवांना करू या  सुरांच्या गुरुराया मला दीक्षा द्या सुरांची  मी भिकारी सुरांचा - भिक्षा वाढा सुरांची - शिकवलेत जे सूर मंदाकिनीच्या धारेला  शिकवलेत जे गाणे पहाटेच्या शुक्र ताऱ्याला  सोनचाफ्याच्या कानाकानात भरलेत जे सूर  ते मला शिकवा.  तुमच्या सुरांनी भरून घेऊन मन  जाईन जिथे असेल बेसुरपण  जिथे माजला असेल कोलाहल  जिथे असतील उठले भवरे  घेऊन जा तिथे हवं तर  वीणेची घ्यावया परीक्षा  पण सुरांच्या गुरुराया  पदरात सुरांची वाढा भिक्षा.  ( वंगचित्रे - पु ल देशपांडे )

अनोखे अंदमान - भाग दोन

  उगवतीचे रंग अनोखे अंदमान - भाग २ सेल्युलर जेलला भेट  अंदमान आणि निकोबार बेटांचा विचार करताच डोळ्यांपुढे उभं राहतं ते निळ्याशार समुद्राचं, उबदार वाऱ्याचं आणि हिरव्यागार निसर्गाचं सुंदर चित्र. पण या स्वर्गासारख्या बेटांमध्ये एक अशी वास्तू आहे, जी फक्त सौंदर्य नव्हे, तर इतिहासाची जिवंत आठवण म्हणून उभी आहे –  सेल्युलर जेल , जी पोर्ट ब्लेअरमध्ये स्थित आहे. ही माझी पहिली अंदमान भेट होती आणि सेल्युलर जेलला भेट देणं हा त्या प्रवासाचा अविभाज्य भाग होता. २१ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता सेल्युलर जेलला भेट देण्यासाठी आम्ही एका छोट्या बसमधून निघालो. आता आम्ही सर्व २९ जण बरोबर होतो. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर वातावरण आल्हाददायक होतं. समुद्राच्या लाटा शांतपणे किनाऱ्यावर आदळत होत्या आणि वाहणारा उबदार वारा काहीतरी वेगळं अनुभवायला मिळणार याची जणू जाणीव करून देत होता. पोर्ट ब्लेअरच्या रस्त्यांवरून आमची बस सेल्युलर जेलच्या दिशेने जसजशी पुढे जात होती, तसतशी मनात एक वेगळीच थरारक भावना दाटून येत होती. ज्या अंदमानबद्दल आणि सेल्युलर जेल बद्दल आपण लहानपणापासून ऐकत आणि वाचत आलो, ते ठिकाण आता प्रत्...

रवींद्रनाथ टागोर वारसा आणि कार्य- भाग 57

  उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 57 गुरुदेवांचे संस्मरणीय विचार  गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आज आपल्यात नसले तरी त्यांनी चिरंतन साहित्यसंपदा मागे ठेवली आहे. आणि त्यातील विचार हे चिरंतन आहेत. संस्मरणीय आहेत. त्यातीलच काही विचारांचा घेतलेला हा मागोवा. १. ' देखा ' पाहणे अशा शीर्षकाचा त्यांचा एक सुंदर निबंध आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की प्रकाश रोज एकच संदेश घेऊन येत असतो. पाहा ! बस. एकवार न्याहाळून पाहा. प्रकाशाचे येण्याचे प्रयोजन आपण पाहावे. हे अंत:चक्षूंनी वगैरे नव्हे. साध्या निसर्गदत्त डोळ्यांनी. विधात्याने हा जो काही सारा पसारा मांडला आहे, तो काय उधळपट्टी करायची हौस म्हणून नव्हे. रोज इतका प्रकाश ओतला जातो, तो काय केवळ सूर्यमाला तयार झाल्या म्हणूनच का ? हा सारा प्रकाश ओरडत असतो - की ' पाहा '. रोपटे त्या प्रकाशाकडे पाहत असते. पाहता पाहता तो प्रकाश देहात साठवता साठवता एके दिवशी फूल उमलते. ते फूलही पाहू लागते. फळ पाहू लागते. त्याचे बीज जमिनीत जाते. प्रकाशाला भेटायची ओढ त्याला मातीतून वर ओढून आणते. असे हे पाहणे. आकाशातल्या नक्षत्रलीलांपासून मलेरियाच्या...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 56

  उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 56 देखणा देहान्त तो... गुरुदेवांचे संपूर्ण जीवन म्हणजे कर्मयोगाचा अखंड वाहणारा निर्मळ झरा. हे निर्मल जल अखेरपर्यंत प्रवाहित होते. ते कुठे थांबले नाही. पाणी एका ठिकाणी साचून राहिले की त्याचे डबके तयार होते. असे पाणी मग वापरण्यायोग्य राहत नाही. साचलेल्या पाण्यात जीवजंतू तयार होतात. वाहते पाणी आरोग्यदायी असते. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत हा महामानव कार्यरत राहिला. सतत नवनवीन कल्पना, प्रयोग त्यांच्या मनात आकार घेत होते. नियतीने जणू चिरंतन प्रतिभाशक्तीचे वरदान त्यांना बहाल केले होते. ७ मे १८६१ रोजी त्यांचा जन्म आणि ७ ऑगस्ट १९४१ या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. जन्म आणि मृत्यू दोन्ही सात तारखेला. जणू सप्तपदी ! विवाहप्रसंगी सप्तपदीला केलेला निश्चय आयुष्यभर पाळायचा असतो, तसा त्यांनी आपल्या आयुष्याशी जणू एक अलिखित करार केला होता. 'अखेरच्या श्वासापर्यंत माझी साहित्याशी, माझ्या देशाशी, माझ्या शिक्षणविषयक विचारांशी आणि माझ्या नवनिर्मितीच्या मंगल, उदात्त कल्पनांशी माझी बांधिलकी कायम राहील. ' हाच जणू त्यांचा निर्धार होता...