मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असे देश असे नेते - भाग एक

उगवतीचे रंग  असे देश असे नेते - भाग एक  सिंगापूरचा भाग्यविधाता - ली क्वान यू   जगातील अनेक देशांवर ब्रिटिशांचे साम्राज्य होते. पण हळूहळू हे देश पारतंत्र्याच्या बंधनातून मुक्त झाले. हे देश जसजसे स्वतंत्र झाले, तसतशी त्यांच्या क्षमतेनुसार, नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार त्यांनी प्रगती केली. अनेक अविकसित राष्ट्रांचे विकसित राष्ट्रात रूपांतर झाले. या प्रगतीत त्या त्या देशातील जनता आणि त्या जनतेला दिशा देणारे नेतृत्व यांचा मोठ्या प्रमाणावर हात होता.  आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले.  त्यानंतर १८ वर्षांनी स्वातंत्र्य आणखी एका देशाला स्वातंत्र्य मिळाले. आग्नेय आशियातला हा टिकलीएवढा देश. ना शेतीयोग्य जमीन, ना नैसर्गिक साधनसंपत्ती. क्षेत्रफळ म्हणाल तर भारतातील एखाद्या राज्याएवढे. केवळ ७१०चौ. किमी चे हे बेट. त्याच्याजवळील ६३ बेटांचा समावेश या देशात होता. किमी. लोकसंख्या असेल साधारणपणे ५८ लक्ष. त्यातही विविध  धर्म, विविध भाषिक, विविध वंशाचे लोक, गरिबी पाचवीला पुजलेली, अशिक्षित लोक, भ्रष्टाचाराची बजबजपुरी, अस्वच्छतेचे माहेरघर अशा समस्यांन...

उगवतीचे रंग - देणाऱ्याचे हात हजारो ...

उगवतीचे रंग  देणाऱ्याचे हात हजारो...  अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने असं परमेश्वराच्या बाबतीत म्हटलं जातं. त्यानं द्यायचं ठरवलं तर त्याचे देणारे हजारो हात आणि घेणारे आपले फक्त दोन. मग कसा मेळ घालणार ? ओंजळ अपुरीच पडणार ना ! प्रसिद्ध कवी ग दि माडगूळकर आपल्या एका सुंदर कवितेत म्हणतात ' देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी. ' मला ही कविता आठवण्याचं एक निमित्त झालं. ' द हिडन लाईफ ऑफ ट्रीज ' हे पुस्तक मी नुकतंच वाचायला घेतलं आहे. त्यातील सुरुवातीची दोन तीन प्रकरणं वाचतानाच मी चक्रावून गेलो. मुखपृष्ठावर दिल्याप्रमाणे ' झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन ' या पुस्तकात लेखकानं घडवलं आहे. त्या सुरुवातीच्या दोन तीन प्रकरणातच मी एवढी माहिती वाचली की आपण ती माहिती गोळा करायची ठरवली तर एका आयुष्यात तरी हे काम होणार नाही. दोन तीन आयुष्य त्यासाठी खर्ची घालावी लागतील. त्या पुस्तकाच्या शेवटी संदर्भाची एक भली मोठी तीन चार पानी यादी दिली आहे. त्यात एकूण ७६ नावे आहेत. इतकी सारी माहिती शोधून त्या लेखकाने ( पीटर वोहलबेन आणि मराठी अनुवाद गुरुदास नूलकर ) फक्त एका दोनशे...
उगवतीचे रंग  माणसं तशी चांगली असतात...  माणसं तशी चांगली असतात  थोडीफार वांगली असतात.   परवा माझ्या घराजवळून जाताना  दोन माणसं बोलत होती  ती कोणाबद्दल बोलत होती  त्याला कोणता संदर्भ होता   काहीच नव्हते मला ठाऊक.  एक जण दुसऱ्याला सांगत होता  ' बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू आले  मी त्याला म्हटले तुला काही हवे का ? '  एवढेच शब्द माझ्या कानावर पडले  मी म्हटले खरेच आहे  दुसऱ्याचे अश्रू यांना दिसतात कारण  माणसे तशी चांगली असतात. ।। १ ।। जगात वाईट वागणाऱ्यांची कमी नाही  तसे चांगले वागणारेही थोडे नाहीत  खरी गोष्ट एवढीच असते की  वाईट वागणाऱ्या माणसांनाही  त्यांचे वागणे मनातून खटकते  पण असला विचार ते दडपून टाकतात  नाहीतर माणसे तशी चांगली असतात. ।। २ ।।  महाभारतात श्रीकृष्णाने दुर्योधनाला  न्याय काय अन्याय काय खूप समजावले होते  दुर्योधनाला ते पटलेही होते  तो म्हणाला तू म्हणतोस ते पटते  पण मला तसे करण्याची बुद्धीच होत नाही.  स्वार्थामुळे त्यांचे निर्...

आणिक स्मृती ठेवुनी जाती...

 उगवतीचे रंग  आणिक स्मृती ठेवुनी जाती...  एके दिवशी सकाळी सहा वाजताच फोन वाजला. एवढ्या सकाळी कोणाचा फोन  पाहावं म्हटलं  तर तो फोन होता माझे मित्र राजेंद्र चिमणपुरे यांचा. एवढ्या सकाळी काय महत्वाचे असावे असे वाटून मी फोन घेतला. म्हणाले, ' सर, आस्था चॅनल लावा. रामदेवबाबा पोटाच्या तक्रारींवर योगासने आणि औषधे सांगताहेत. सकाळी पाच पासूनच आस्था चॅनलवर त्यांचे मार्गदर्शन सुरु असते. ' ही माहिती मला नवीन होती. एवढ्या सकाळी उठून मी कधी टीव्ही पाहिला नव्हता. एवढ्या तळमळीने आणि आठवणीने फोन करणारा प्रेमळ मित्र दुर्दैवाने आता या जगात नाही.  कधी कधी आपल्या एखाद्या जिवलग मित्राचे असे अचानक अकाली निघून खूप वेदनादायी असते. आपले एखादे जवळचे नातेवाईक गेल्याचे जेवढे दुःख असते, तेवढेच दुःख अशा प्रसंगी होते. तसंच मला या प्रसंगी झालं. आम्ही सगळेच माझ्या या प्रेमळ मित्राला आदराने आणि प्रेमाने ' दादा ' म्हणून हाक मारायचो. दादांची मूर्ती लहान होती. जेमतेम पाच फूट उंची असेल. पण त्याच्या कर्तृत्वाची उंची भल्याभल्यानाही लाजवणारी होती. परमेश्वर काही व्यक्तींच्या बाबतीतही काहीतरी उणे ठेवत...