मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उगवतीचे रंग एक लढा असाही - भाग सहा

 उगवतीचे रंग  एक लढा असाही - भाग सहा  मागील पाच भागात हिमालयातील विविध भागात होणाऱ्या वृक्षतोडीवर स्त्री पुरुषांनी दिलेला लढा आपण पाहिला. अमृता देवी, गौरा देवी, किंकरी देवी यासारख्या स्त्रियांचे हे वृक्ष वाचवण्यातील योगदान आपण पाहिले. या स्त्रियांच्या नावापुढे देवी हा शब्द आला आहे. खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणासाठी झगडणाऱ्या आणि आपले आयुष्य वेचणाऱ्या या देवीच आहेत. त्यांचे योगदान अमूल्य आहे.  दशौली ग्रामस्वराज्य संघ या सारख्या स्थानिक पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्या संघाना म्हणजेच त्यातील काही सदस्यांना सरकारने त्यांच्या मागणीनुसार जंगलातील प्रत्येकी एक हेक्टर जमीन ९९ वर्षांच्या कराराने दिली आहे. या जमिनीवर या लोकांनी विविध वृक्षांची लागवड करून पुन्हा जंगलांना त्यांची समृद्धी प्राप्त करण्याचा निश्चय केला आहे. ही  झाडे लावताना या लोकांच्या दैनंदिन गरजा भागतील असे वृक्ष लावण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यात अंगू, ओक, भीमल आदी वृक्षांची लागवड केली आहे. हे वृक्ष खाद्य, चारा, सरपण इ गरजा भागवतात. जंगलतोडीने उघडेबोडके झालेले डोंगर या लोकांनी मोठया कष्टाने पुन्हा हिरव...

एक लढा असाही - भाग पाच

उगवतीचे रंग  एक लढा असाही - भाग पाच   महिलांचा आंदोलनातील सहभाग - अशिक्षित किंकरी देवीचे योगदान  विकासाच्या चक्रात ( विकास म्हणायचा का हा प्रश्नच आहे ) पर्यावरणाचे अतोनात नुकसान माणसाने केले. वृक्षराजी असलेले हिरवेगार जंगल नष्ट होऊन काँक्रीटची जंगले उभे राहू लागली. नदीकाठी, समुद्रकाठी कारखाने उभे राहू लागले. आपला घातक विषारी धूर वातावरणात सोडून वातावरण दूषित करू लागले. आपले केमिकलयुक्त सांडपाणी सरळ नद्यांमध्ये किंवा समुद्रात सोडून देऊ लागले. या सगळ्या गोष्टींनी पर्यावरणावर जीवघेणे प्रहार केले. पण तुम्हाला आम्हाला याची सवय झाली. विकास प्रक्रियेत हे चालायचेच असे समजून आम्ही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू लागलो. पण हिमाचलमधील किंकरी देवी हे सहन करू शकली नाही. तिने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. साधारणपणे आपण असे समजतो की सुशिक्षित लोक अन्यायाविरुद्ध चांगले लढू शकतात. अशिक्षितांना काय कळणार कसे लढायचे ते ? हा समज किंकरी देवीने खोटा ठरवला. मी तर शिकलेली नाही, मी कसे लढू हा प्रश्न तिला पडला नाही. माझे काय होईल, लोक साथ देतील का असे प्रश्न तिला पडले नाहीत. कदाचित असा एखादा दु...

एक लढा असाही - भाग चार महिलांचा आंदोलनातील सहभाग

उगवतीचे रंग  एक लढा असाही - भाग चार  महिलांचा आंदोलनातील सहभाग - गौरा देवी  हिमालयातील जंगले जसजशी नष्ट होत गेली तसतशी तेथे राहणाऱ्या स्थानिक लोकांवर संकटे एकामागून एक येत राहिली. सुरुवातीला त्यांचा रोजगार आणि उपजीविकेची साधने हिरावून घेतली गेली. पुराच्या पाण्याने शेतीची वाताहत झाली. दरडी कोसळून गावांची, घरांची वाट लागली. गंगा, यमुनेसारख्या नद्या अंगावर खेळणाऱ्या हिमालयात तेथील जंगलात राहणाऱ्या लोकांना पिण्याच्या पाण्याची देखील मारामार पडू लागली यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही पण हे वास्तव आहे. या सगळ्या परिस्थितीचे चटके जेवढे पुरुषांना बसले, त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त स्त्रियांना सोसावे लागले. कामाच्या शोधार्थ गावातील बरीचशी पुरुषमंडळी शहराकडे निघून गेली. कोणी सैन्यात भरती झाले. वर्षातून एकदा ही मंडळी गावाकडे येत. पण त्यांच्या अनुपस्थितीत स्त्रियांनाच तेथील सगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागे.  मुलांचे लटांबर सांभाळत तुटपुंज्या शेतीवर राबावे लागे किंवा ठेकेदाराकडे मोलमजुरी करावी लागे. त्यातील बऱ्याचशा स्त्रिया तर कधी शाळेतही जाऊ शकल्या नव्हत्या. त्यांच्या मुलाबा...

एक लढा असाही : भाग तीन चिपको आंदोलन

 उगवतीचे रंग  एक लढा असाही : भाग तीन  चिपको आंदोलन  हिमालयातील वृक्षतोडीचा परिणाम गावागावांवर होऊ लागला. गढवाल-कुमाऊं परिसरातील आठ हजार फूट उंचीवर वसलेले लस्यालगाव गाव नावाचे एक छोटेसे पहाडाच्या कुशीत बसलेले निसर्गरमय गाव. वस्ती जेमतेम पन्नास-शंभर घरांची. डोंगरउतारावर शेती करून त्यावर उपजीविका करणे यावरच तेथील लोकांचे जीवन आधारले होते. डोंगरावरून खाली वाहत येणाऱ्या ओढ्यांमुळे गावात पाण्याची कमतरता नव्हती. त्याच ओढ्यांच्या पाण्यावर उतारावरची शेतीही पिकत होती. पण जसजशी डोंगरावरील झाडे नष्ट होत गेली, मातीचे संरक्षक आवरण नष्ट होत गेले तसतसे हे जीवनदायी असणारे ओढे जीवघेणे ठरू लागले. दोन्ही काठांच्या मधून नियमितपणे वाहणाऱ्या ओढ्यानी काठाची बंधने झुगारून दिली. आजूबाजूच्या डोंगरउतारावर असणाऱ्या छोटया छोट्या शेतांवर त्यांनी आक्रमण केले. तेथील माती, पिके उध्वस्त केली आणि आधीच जगण्याची मर्यादित साधने हाती असणाऱ्या गावकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावून घेतला.  अशी हिमालयातील अनेक गावं. लोकांच्या हाती उपजीविकेची साधने न उरल्यामुळे आपलं गाव, आपल्या जमिनी सोडाव्या लागल्या. वर्षानु...

एक लढा असाही - भाग दोन ( जंगलतोडीचे भीषण दुष्परिणाम )

 उगवतीचे रंग  एक लढा असाही - भाग दोन  जंगलतोडीचे भीषण दुष्परिणाम वाचकहो, मागील पहिल्या भागात आपण पाहिले की हिमालयातील विशेषतः उत्तराखंडातील समृद्ध जंगले इंग्रजांनी कशा प्रकारे नष्ट करण्यास प्रारंभ केला. पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा ही जंगलतोड थांबली नाही. तेथील वनखात्याने, सरकारने ब्रिटिशांचाच वारसा पुढे चालवला. आपल्या हाताने आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ लागलो. ब्रिटिशांनी चीड, देवदार, साग, साल आदी वृक्षांच्या लागवडीला आणि वृक्षतोडीलाही उत्तेजन दिले कारण ते त्यांच्या व्यावसायिक उपयोगाचे होते. आम्हालाही तेच वृक्ष महत्वाचे वाटले. पण जंगलात राहणाऱ्या स्थानिक आदिवासी आणि पहाडी लोकांच्या गरजा भागवणारे पमनी, बांज, बुरांझ यासारख्या रुंदपर्णी जीवनदायी वृक्षांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. जंगले साफ करण्यासाठी या वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली. या वृक्षांवर रोजीरोटी अवलंबून असणारा स्थानिक गरीब माणूस आपल्या अन्नपाण्याला मुकला. या प्रचंड जंगलतोडीने स्थानिक लोकांचा रोजगार हिरावून घेतला. अनेकांना स्थलांतर करण्याची वेळ आली. पोटाला अन्न, हाताला काम उरले ...
उगवतीचे रंग  एक लढा असाही ( भाग १ ) नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आपण जसा स्वातंत्र्यलढा पाहिला ( अर्थात विशाल अर्थाने हा स्वातंत्र्य संग्राम आहे ) तसे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लढे भारताने अनादी काळापासून अनुभवले आहेत. कधी तो १८५७ चा लढा असेल ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ' १८५७ चे स्वातंत्र्यसमर ' असे म्हटले आहे. कधी लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला विदेशी वस्तूंच्या वापराविरुद्धचा लढा असेल वा पुढे  गांधीजींनी  सुरु केलेली  वेगवेगळी आंदोलनं असतील, गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती लढा असेल, अशा अनेक असंख्य लढ्याची पार्श्वभूमी आपल्या इतिहासाला आहे. आज आपण या सर्वांपेक्षा आगळावेगळा असा एक लढा पाहणार आहोत. हा लढा निसर्गावर होणाऱ्या मानवाच्या आक्रमणाविरुद्ध आहे. या लढ्यात जसे पुरुष सामील आहेत, तशाच  स्त्रियाही सामील आहेत. किंबहुना महान लढवय्या स्त्रियांच्या प्रेरणादायी त्यागाने हा इतिहास भरलेला आणि भारलेला आहे. अशा काही स्त्रियांचा परिचयही या लेखमालेद्वारे करून द्यायचा प्रयत्न असणार आहे.  खरं तर या लढ्याला ' चिपको आंदोलन ' किंवा '...