मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समर्पित जीवनाचा आदर्श : माँ उर्फ मीरा अल्फासा ( उत्तरार्ध )

 उगवतीचे रंग   समर्पित जीवनाचा आदर्श : माँ उर्फ मीरा अल्फासा ( उत्तरार्ध )  मीरा अल्फासा उर्फ माँ उर्फ माताजी या योगी अरविंदांच्या कार्याचा एक अविभाज्य भाग आहेत. समर्पित आणि कृतार्थ जीवनाचा आदर्श म्हणजे माताजी. श्रीअरविंदांच्या तोंडून एकदा त्यांच्यासाठी ' मदर ' हे शब्द उस्फुर्तपणे ओठांवर आले आणि त्या क्षणापासून त्या सर्वांच्याच माताजी झाल्या. एखाद्या व्यक्तीला मदर, माँ किंवा माताजी ही उपाधी उस्फुर्तपणे प्राप्त होणे ही किती भाग्याची गोष्ट ! कदाचित ही उपाधी प्राप्त करणे सोपे असू शकते पण ती निभावणे महाकठीण. पण माताजींनी ही उपाधी सार्थ ठरवली. त्या सर्वांच्याच आई झाल्या.  श्रीअरविंदांच्या आश्रमात माताजींचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक तासनतास न कंटाळता तिष्ठत उभे असत. त्यांची एक नजर, एक प्रेमळ कटाक्ष, एक प्रेमळ स्मित, आशीर्वादाचा पाठीवर फिरणारा हात यासाठी साधक आसुसलेले असत. त्यांची प्रेमळ नजर, आश्वासक हास्य, धीराचा पाठीवर फिरणारा हात दुःखितांचं दुःख हरण करी. त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला की साधक धन्य होत. जणू जगातील काहीतरी मौल्यवान गोष...

समर्पित जीवनाचा आदर्श : माँ उर्फ मीरा अल्फासा ( पूर्वार्ध )

 उगवतीचे रंग   समर्पित जीवनाचा आदर्श : माँ उर्फ मीरा अल्फासा ( पूर्वार्ध )  ( परवा म्हणजे २१ फेब्रुवारीला माँ उर्फ मीरा अल्फासा यांची जयंती होती. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचं हे यथाशक्ती केलेलं स्मरण )  आपण सगळ्यांनी योगी अरविंद यांचे नाव ऐकले असेल. योगी अरविंद म्हणजे अरविंद घोष. पूर्वाश्रमीच्या आपल्या आयुष्यात जहाल क्रांतिकारी विचारांचे असणारे अरविंद घोष पुढे काही काळानंतर आपल्या आध्यात्मिक ध्येयपूर्तीसाठी राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ सोडून पॉंडिचेरीला स्थायिक झाले. त्यांचे आध्यात्मिक कार्य एवढे महान आणि प्रभावी होते की मीरा अल्फासा ही पॅरिसमध्ये जन्मलेली तरुणी सातासमुद्रापार भारतात आली आणि नंतर अरविंदांच्या कार्याने प्रभावित होऊन कायमस्वरूपी पॉण्डेचेरीला स्थायिक झाली. मीरा अल्फासा या विवाहित होत्या. त्यांचे पती पॉल रिचर्ड  यांच्यासोबत त्या भारतात आल्या. योगी अरविंद यांचे कोणतेही चरित्र मीरा अल्फासा उर्फ माँ यांचा उल्लेख केल्याशिवाय लिहिले जाऊ शकत नाही एवढे त्यांचे कार्य महान आहे.  मीरा अल्फासा यांचे पती पॉल रिचर्ड हे एक महान फ्रेंच विचारवंत...

माणसं तशी चांगली असतात...

 उगवतीचे रंग  माणसं तशी चांगली असतात...  परवा मी दोन माणसांना  माझ्या घराजवळून जाताना पाहिलं  दोघं आपसात बोलत चालली होती.  एक दुसऱ्याला म्हणत होता...  ' त्याच्या डोळ्यात पाणी आलं  मी त्याला म्हटलं तुला काही हवं का ? '  त्या माणसांचं एवढंच बोलणं मला ऐकू आलं  ती कोणाबद्दल बोलत होती  मला काहीच माहीत नव्हतं.  पण एवढं मात्र कळलं होतं की  माणसं तशी चांगली असतात. ।। १ ।। मला आठवला दुर्योधन  महाभारतातला खलनायक  कळत होतं त्यालाही की  करतो आहोत आपण पांडवांवर अन्याय.  तसा कृष्णाला म्हणालाही होता एकदा  मी काय करू तूच सांग  तू बोलतोस ते कळतंय रे मला  पण मला तशी बुद्धीच होत नाही.  दुर्योधनालाही आपल्या चुका कळत असतात   कारण माणसं तशी चांगली असतात. ।। २ ।।  धृतराष्ट्राचे तरी काय वेगळे होते  त्याच्याकडे तर सत्ता, संपत्ती, विवेक,विचार सगळे होते  पांडुपुत्र त्याचे देखील होतेच ना कोणीतरी  नेत्रहीन असला तरी नव्हते का कळत सगळे ! दुर्योधन शकुनीला जरी असे स्वार्थापायी...

कलंदर कवी कवाफी आणि इथाका

उगवतीचे रंग  कलंदर कवी कवाफी आणि इथाका  विसाव्या शतकात कवाफी ( Cavafy  )नावाचा एक कलंदर कवी होऊन गेला. त्याच्या कविता आज जगभर प्रसिद्ध आहेत. एकट्या इंग्रजी भाषेत त्याच्या कवितांची एक डझनाहून जास्त भाषांतरे उपलब्ध आहेत. त्याच्या कवितांचा मोह भल्याभल्याना पडला आणि त्यांनी आपल्या आवाजात त्याच्या कवितांचे वाचन केले. या कविता, हे वाचन यु ट्यूबवर उपलब्ध आहेत.   कवाफीला कलंदर म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्या कविता त्याने त्याच्या हयातीत कधीही प्रसिद्ध केल्या नाहीत. एवढेच नव्हे तर एखाद्या कवितेच्या तो काही ओळी लिहायचा आणि पाकिटात बंद करून ठेऊन द्यायचा. पुढे कधीतरी काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी तो आपली ही कविता पूर्ण करायचा. ' वन नाईट ' या नावाच्या त्याच्या कवितेच्या काही ओळी त्याने १९०७ मध्ये लिहिल्या आणि ही कविता त्याने १९१६ मध्ये पूर्ण केली. कवाफीच्या काही कविता त्याच्या हयातीत खाजगी वितरणासाठी मात्र प्रसिद्ध झाल्या होत्या. पण पुढे या कवितेतली ताकद, त्यात व्यक्त झालेला आशावाद, मानवी भावभावनांचे बारकावे वाचकांच्या लक्षात आले आणि कवाफीला एक आधुनिक कवी म्हणून प्र...

भारतीय संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक : कमळ

उगवतीचे रंग  भारतीय संस्कृतीचे एक सुंदर प्रतीक : कमळ   भारतीय संस्कृतीची काही प्रतीके अतिशय सुंदर आणि  आहेत. कमळ, कासव, स्वस्तिक, रांगोळी  इ. तशी तर ही प्रतीके धार्मिक दृष्ट्या महत्वाची मानली जातातच पण आपल्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टीही ते आपल्याला शिकवत असतात. ही सगळी प्रतीके म्हणजे सत्य, सुंदर आणि शिवाची आराधना ! अंधारातून प्रकाशाकडे, असत्याकडून सत्याकडे, क्षुद्रतेतून उदात्ततेकडे ही प्रतीके आपल्याला घेऊन जातात. यातीलच एक महत्वाचे प्रतीक म्हणजे कमळ.  कमलपुष्पांनी भरलेले एखादे सरोवर आपले मन मोहून टाकते. क्वचित काही बंगल्यांच्या आवारातही कमलपुष्पे आपल्याला दिसतात. पण वनामध्ये किंवा एखाद्या बागेत किंवा एखाद्या सरोवरात फुललेल्या कमलपुष्पांचे दृश्य मनाला प्रसन्न करते. तशी तर सगळी फुले सुंदरच असतात पण कमलपुष्प काही वेगळेच ! त्याच्या त्या तलम पाकळ्या, सुंदर आणि आकर्षक पाने, कमलपुष्पातील हे तंतू सगळेच भाग कमालीचे सुंदर. आपली सगळी पुराणे, वेद, देवदेवतांची स्तोत्रे कमळविषयक उपमांनी भरलेली आहेत. बहुतेक सगळ्या देवांचे आवडते पुष्प म्हणजे कमळ. भगवान विष्णूंच्या हातात क...

कधी कधी मला वाटतं...

उगवतीचे रंग  कधी कधी मला वाटतं...   कधी कधी मला वाटतं  विद्यार्थी व्हावं अन  विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं  ' कोणाकडून काय घ्यावं..'  ते त्यांनी शिकवावं.  वर्गातून बाहेर पडताना   विंदांची कविता घ्यावी  आयुष्यभरासाठी अखंड  गुणगुणत राहावी. ।। १ ।। कधी कधी मला वाटतं  साने गुरुजींच्या वर्गात बसावं  श्यामची आई लिहिणाऱ्या  श्यामला अनुभवावं.  त्यांच्या डोळ्यातलं  अपार प्रेम, माया अनुभवावी.  ' खरा तो एकची धर्म'  शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. ।। २ ।। कधी कधी मला वाटतं  बोरकरांच्या वर्गात बसावं  त्यांचे सागरासारखे  गहिरे डोळे अनुभवावे  ' जीवन त्यांना कळले हो '    ते मलाही शिकवाल का  विचारावं. ।। ३ ।।  कधी कधी मला वाटतं  कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं  कशास आई भिजविसी डोळे  त्यांच्याकडून ऐकावं  रात्रीच्या गर्भातील उषा:कालाची  आशा जागवीत निघावं.  पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा  ' लढ रे पोरा...' ऐकताना  ' कणा ' ताठ व्...

अखेरचा हा तुला दंडवत...!

उगवतीचे रंग  अखेरचा हा तुला दंडवत...! रविवार दि ६फेब्रुवारी २०२२ चा दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी अघटित अशी बातमी कानावर पडली. गानसम्राज्ञी लतादीदी गेल्या.  अवघा देश शोकसागरात बुडाला. जे स्वर ऐकत सकाळ व्हायची त्या स्वरांची संध्याकाळ झाला होती. गानसूर्य अस्ताला गेला. जणू दिवसातले, नव्हे जगण्यातलेच चैतन्य कोणीतरी काढून घेतले होते. संपूर्ण दिवसच उदासवाणा झाला होता. दिनकर मावळला आणि लतादीदी पंचत्वात विलीन झाल्या. सूर निमाले.  कविवर्य भा रा तांबेंचं एक गीत लतादीदींनी गाऊन अजरामर केलं आहे. ' मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडून दोन्ही करा...' दीदींच्या रूपाने हा गानसूर्य मावळला होता. याच गाण्यात सुंदर ओळी आहेत  जो तो वंदन करी उगवत्या  जो तो पाठ फिरवी मावळत्या  रीत जगाची ही रे सवित्या  स्वार्थपरायणपरा.  उगवत्या सूर्याला वंदन करणे आणि मावळत्या सूर्याकडे पाठ फिरवणे ही जगाची रीतच आहे. पण हा गानसूर्य अस्ताला गेल्यावर जगाने आपली ही रीत बदलली. या मावळत्या दिनकराला डोळे भरून बघण्यासाठी माणसांनी दाटी केली. घराघरात टीव्हीसमोर बसून या मावळत्या दिनकराचे अनेकां...

माझिया मना...

उगवतीचे रंग  माझिया मना...  काही दिवसांपूर्वी अनिल अवचट गेले. अनिल अवचट म्हणजे एक बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्व होते. डॉक्टर, लेखक,  चित्रकार,बासरीवादक, समाजसुधारक आणि एक तेवढाच कलंदर माणूस. ते गेल्यानंतर त्यांचे आणि त्यांच्याबद्दलचे अनेक लेख समाजमाध्यमांवर फिरत होते. त्यांनी केवळ लिहायचं म्हणून लिहिलं नाही तर आतून जे वाटलं ते ते लिहीत गेले म्हणूनच त्यांच्या लिखाणाला मोल प्राप्त झाले. सहजसुंदरता, ओघवती शैली ही त्यांच्या लिखाणात त्यामुळेच आली आहे.  ' थांबणे ' या नावाचा त्यांचा एक लेख माझ्या वाचनात आला. ( त्याचं शब्दांकन सुभाष अवचट यांनी केलं आहे )आपल्यापैकी पुष्कळांनी तो कदाचित वाचला असेलही. त्या लेखात त्यांनी जीवनामध्ये आपण कुठे थांबलं पाहिजे हे अतिशय सुंदर उदाहरणे देऊन स्पष्ट केलं आहे. त्यांनी विंदा करंदीकर, तात्या माडगूळकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आदींची उदाहरणे दिली आहेत. ही सगळी मोठी माणसं एका ठराविक ठिकाणी थांबली. लोकांना आवडते म्हणून ते लिहीत राहिले असते तर लोकांना ते हवेच होते. पण जीवनात किती धावायचे, कुठं थांबायचे हे त्यांना कळले होते. नाहीतर माणू...

वाचन बिचन...

उगवतीचे रंग  वाचन बिचन...  मुकेश यांनी गायिलेलं  एक गाणं रेडिओवर लागलं होतं. ' झुमती चली हवा, याद आ गया कोई...' गाणं फार सुंदर आहे. आता या गाण्याचा आणि या लेखाचा काय संबंध आहे असा प्रामाणिक प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असणार...! पण काय करणार आम्हाला अशी सुतावरून स्वर्ग गाठायची सवयच आहे. पण सांगतो. त्या गाण्यात या ओळी आहेत...  खो गयी हैं मंजिल, मीट गये हैं रास्ते  गर्दिशेही गर्दिशे अब हैं मेरे वास्ते...  म्हणजे कुठे जायचं माहीत नाही. रस्ते जणू नाहीसे झालेले. माझ्यासाठी आता ' गर्दिशे ' म्हणजे संकटंच  संकटं माझ्या  पुढ्यात वाढून ठेवली आहेत. अहो, असंच सगळं वातावरण सध्या आपल्या भवताली आहे, नाही का ? कोरोना काय, नवीन सादर झालेला अर्थसंकल्प काय,  सरकारचे एकेक निर्णय काय...! अर्थात अर्थांसंकल्पातलं मला शून्य कळतं म्हणा. पण उगीच प्रसारमाध्यमांवर मध्यमवर्गीयांसाठी यात काही नाही, मध्यमवर्गीयांची निराशा वगैरे असं वाचलं. पण कोणताही अर्थसंकल्प पूर्णपणे कधीच वाईट नसतो असंही ऐकलं आहे. असो. माझा तो विषय नाही.  सरकारचा एक न...

तुफानातील दीप : डॉ टायरॉन हेज

उगवतीचे रंग  तुफानातील दीप : डॉ टायरॉन हेज  कीटकनाशकं आणि तणनाशकं यांचा वापर आपल्याकडे अनेक वर्षांपासून शेतकरी करीत आहेत. ही उत्पादनं निर्माण करणाऱ्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनाची उपयुक्तता पटवून देऊन ते वापरण्यासाठी राजी करतात. परंतु टण आणि कीटक यांचा नाश करतानाच ही रसायनं मानवी जीवनावर आणि पर्यावरणावर भयंकर घातक परिणाम करतात याची जाणीव बहुतेकांना असत नाही. स्वित्झर्लंडमधील सिंजेटा ही अशीच उत्पादनं निर्माण करणारी बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनी. या कंपनीने निर्माण केलेले अट्रॅझिन हे तणनाशक अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते. त्याचा वापर केवळ अमेरिकेतच नव्हे तर जगातील इतर अनेक देशात आणि आपल्या भारतातही ऊस आणि मका पिकवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. या अट्राझीनच्या वापराबद्दल आणि त्याच्या  दुष्परिणामांबद्दल संशोधन करून जगाला त्याचे दुष्परिणाम पटवून दिले ते अमेरिकेतील कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ डॉ टायरॉन हेज यांनी. त्यांच्या या लढ्याची कहाणी मोठी रोचक आहे.  फारसे शिक्षण न घेतलेल्या कृष्णवर्णीय आईवडिलांच्या पोटी टायरॉन यांचा जन्म झाला...