मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हॅलो, मी विठ्ठलपंत पंढरपूरकर...

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  हॅलो, मी विठ्ठलपंत पंढरपूरकर...  नमस्कार समस्त सज्जनहो. मी पंढरपूरहून बोलतोय. हो, हो मीच तो. तुम्ही मला अनेक नावांनी ओळखता. विठ्ठल, पांडुरंग, विठूमाऊली, विठुराया , कोणी सावळे परब्रह्म म्हणतं आणि आणखी खूप काही. आता आलं ना लक्षात मी कोण बोलतोय ते ! गमंत सांगू का ? यातलं एकही नाव माझं नाहीये. म्हणजे तशी सगळी नावं माझीच आहेत. पण ती तुम्ही मला प्रेमानं दिलेली. ज्याला जे नाव आवडेल, त्याने त्या नावानं मला हाक मारावी. कोणत्याही नावानं हाक मारली तरी मी उत्तर देतोच. कारण मी बांधलेला आहे हो. अहो, तुम्ही समजता तसा बांधलेला नाही म्हणजे कोणी मला बांधून ठेवले आहे असा जर तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. कारण काय आहे की मला कोणी बांधून ठेवू शकत नाही. हो, पण एका गोष्टीने मी बांधला जाऊ शकतो. ते माझ्या भक्तांचं माझ्यावर असलेलं प्रेम. त्यात मात्र मी बांधला जातो. कसा म्हणून विचारताय ? सांगतो, तुमच्या रोजच्या व्यवहारातील उदाहरणं देऊन सांगतो. हत्ती केवढा बलवान असतो, माहितीये ना..? पण एखाद्या छोट्याशा दोरखंडाने किंवा साखळदंडाने तो बांधला जातोच की नाही ! त...

ऋण मैत्रीचे.. न कधीही फिटायचे...

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  ऋण मैत्रीचे.. न कधीही फिटायचे...  सोनं शुद्ध आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याला अग्निपरीक्षा द्यावी लागते. शुद्ध सोनं असलं तर अग्निपरीक्षेतून ते उजळून निघते. मैत्रीचंही तसंच आहे. मैत्री शुद्ध आणि निरपेक्ष असेल तर ती खरी मैत्री. जसं खऱ्या सोन्यात हिणकस असं काही नसतं. तसंच खऱ्या मैत्रीत कोणतेही अपेक्षा, कोणताही स्वार्थ नसतो. मैत्रीला देणं माहिती असतं. कुठलीही अपेक्षा न करता. अशी मैत्री अनेक कसोट्यातून उजळून निघते आणि झळाळून उठते. मैत्रीचं नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ. रक्ताच्या नात्यापलीकडे असणारं . मैत्रीला जातपात, उच्चनीच, लहानमोठा, स्त्रीपुरुष असं काही म्हणजे काही बंधन नसतं. जी मैत्री अशी निरपेक्ष असते, ती चिरकाल टिकते. तो मित्र असताना तर ती असतेच असते पण जेव्हा काही कारणाने त्याचा वियोग होतो, तेव्हाही ही टिकून असते. एखाद्या फुलाचे निर्माल्य झाले तरी त्याचा सुगंध कायमच दरवळत राहावा तसेच अशा मैत्रीचे असते.  आज मी तुम्हाला अशाच एका मैत्रीची कथा सांगणार आहे. या कथेची सुरुवात होते विदर्भातल्या खामगाव इथे. संतश्रेष्ठ श्री ग...

अचपळ मन माझे...

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव.  अचपळ मन माझे...  असं म्हटलं जातं की एकवेळ जग जिंकणं सोपं आहे पण मनाला जिंकणं ही गोष्ट सगळ्यात कठीण.  मन स्थिर राहत नाही. सारखं मन  विचारांच्या मागे धावत राहतं .  सारखं इथून तिथे, तिथून आणखी कुठेतरी. बहिणाबाई म्हणतात  मन पाखरू पाखरू  काय सांगू याची मात  आता होतं भुईवर  गेलं गेलं आभाळात.  वाऱ्यापेक्षाही वेगवान कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आपलं मन. अशा या मनाला समजावणं किती कठीण..! म्हणून तर एखाद्या कवीला म्हणावं लागतं ' माझिया मना, जरा थांबना , तुझे धावणे अन मला वेदना..' गेले काही दिवस माझंही मन असंच काहीसं होतंय. समर्थ रामदास म्हणतात, ' मना सज्जना भक्तिपंथेचि जावे.' हे त्यांचं म्हणणं पटतंय. बुद्धीला पटतंय. मनाला मात्र खूप समजवावं लागतंय. मग अशा वेळी समर्थ रामदासांची करुणाष्टकं आठवत राहतात. त्यात सुरुवातीलाच ते म्हणतात  अनुदिन अनुतापें तापलो रामराया  परमदिनदयाळा निरसी मोहमाया  अचपळ मन माझे नावरे आवरिता  तुजविण सिण होतो धावरे धाव आता  समर्थ रामदास. त्यांच्या नावात...

मला आवडणारी त्रिमूर्ती ...

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव  मला आवडणारी त्रिमूर्ती ...  महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी तशीच या महाराष्ट्राला थोर लेखक आणि आणि वक्त्यांची परंपरा आहे. आचार्य अत्रे, पुल देशपांडे यांच्यासारखी मंडळी उत्तम लेखक तर होतीच पण ती अष्टपैलू व्यक्तिमत्वे होती. ख्यातनाम वक्ते म्हणूनही ते प्रसिद्ध होते. त्याशिवाय प्रा शिवाजीराव भोसले , प्राचार्य राम शेवाळकर यासारखे दिग्गज वक्ते आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. त्यापैकी पुल देशपांडे, राम शेवाळकर यांना प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. तशी आमची चाळीसगावची भूमी सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न. लहानपणापासून आमच्या चाळीसगावच्या सरस्वती व्याख्यानमालेत मी ग दि माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, कविवर्य कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर, शंकर पाटील,डॉ यु म पठाण, डॉ यशवंत पाठक, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आदी नामवंत लेखक, वक्ते आणि कवींना जवळून पाहण्याचा आणि ऐकण्याचा योग्य आला हे माझे केवढे भाग्य..!  पण आज मी सांगणार आहे ते वेगळ्या तीन व्यक्तिमत्वांबद्दल. ही तीन व्यक्तिमत्वे म्हणजे आजच्या घडीचे तीन उत्कृष्ट वक्ते. त्यातील पहिले व्यक्तिमत्व...

उगवतीचे रंग - शिक्षित, सुशिक्षित आणि अशिक्षित

उगवतीचे रंग   विश्वास देशपांडे, चाळीसगाव  अशिक्षित कोण...?  काल मी ' घरगाणी ...मनातली ' हा लेख लिहिला होता. त्या लेखात सुरुवातीला बहिणाबाईंच्या ' खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला..' या कवितेचा उल्लेख केला होता. नंतर बहिणाबाईंबद्दल लिहिताना असेही म्हटले होते की बहिणाबाई या अशिक्षित होत्या पण त्यांच्या प्रतिभेची झेप प्रचंड होती. वाचक म्हणून तुमचं नी  माझं विश्वासाचं नातं आहे. त्याच नात्यातून तुमच्याशी बोलतोय. तुम्हाला सांगू , बहिणाबाईंबद्दल अशिक्षित शब्द वापरताना माझा हात क्षणभर थरथरला होता. आणि नंतर काल आणि आज दिवसभर त्या शब्दानं माझा पिच्छा पुरवला. बहिणाबाईंच्या एक एक कविता आठवू लागल्या. त्या कवितांमधलं शहाणपण, त्यांचं तत्वज्ञान, एखादा विषय उदाहरण देऊन समजावून सांगण्याची पद्धत या गोष्टी मला पुन्हा जाणवल्या. मग माझं मनच मला म्हणालं की त्या केवळ शाळा कॉलेजात  गेल्या नाहीत, चार अक्षरे लिहावाचायाला शिकल्या नाहीत, म्हणून तू त्यांना लागलीच अशिक्षित ठरवून मोकळा होतोस ? माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. अशा काही अवघड प्रश्नांची उत्तरं नाही देता येत मला....

उगवतीचे रंग - घरगाणी मनातली...

उगवतीचे रंग  विश्वास देशपांडे, चाळीसगाव.  घरगाणी मनातली...  लहानपणची एक आठवण आहे. आमच्या शेताला लागून एक दुसरे शेत होते. त्या शेतात एक पडकी  विहीर होती. तिच्या भोवती दाट झाडेझुडपे वाढल्याने आम्हाला त्या विहिरीजवळ जायला भीती वाटायची. पण कधी काळी त्या विहिरीजवळ गेलोच तर त्या विहिरीच्या काठाला एका झाडाला सुगरण पक्ष्यांची घरटी होती. ती घरटी अशी काही कौशल्याने बांधली होती की कोणीही त्या घरट्यांजवळ जाऊ शकत नसे. त्या झाडाची एक फांदी विहिरीवर झुकलेली होती आणि त्या फांदीला बरीच घरटी दाटीवाटीने बांधलेली होती. त्या घरट्यात त्या पाखरांची पिल्लं सुरक्षित राहत होती. निसर्ग प्राण्यांना सुद्धा आपल्या घरट्याची बांधणी आणि संरक्षण करायची बुद्धी देतो. अशा वेळी बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी आठवतात.  अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिल्लासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिल्लं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला बहिणाबाई एक अशिक्षित कवयित्री. पण प्रतिभेची झेप केवढी. दुसरं कडवं बघा. त्या झाडावर अधांतरी असलेल्या खोप्याला तिने झुलता बंगला म्हटले आहे. ...

चालायला लागा....

उगवतीचे रंग   विश्वास देशपांडे, चाळीसगाव  चालायला लागा....  एकदा एक तरुण वयातील रुग्ण एका डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर त्याच्या चांगल्या ओळखीचे होते. डॉक्टरांना त्याचा दिनक्रमही माहित होता. तो तरुण डॉक्टरांकडे आपल्या तक्रारीचा पाढा वाचू लागला. माझे हे दुखते, ते दुखते. हा त्रास होतो, तो त्रास होतो वगैरे. डॉक्टरांनी शांतपणे त्याच्या तक्रारी ऐकून घेतल्या. आणि ते त्याला म्हणाले, ' चालायला लाग आणि पुन्हा माझ्याकडे येऊ नकोस. ' आता आश्चर्यचकित होण्याची वेळ त्या तरुणाची होती. त्याला वाटले डॉ आपल्या तक्रारी ऐकून घेतील . आपल्याला काहीतरी गंभीर आजार नक्कीच असला पाहिजे असे त्या तक्रारींवरून त्यांना वाटेल. कदाचित ते आपल्याला काही तपासण्या करायला सांगतील. काही गोळ्या, औषधं, टॉनिक वगैरे लिहून देतील. पण झाले भलतेच. त्याला असे बुचकळ्यात पडलेले पाहून ते म्हणाले, ' माझ्या तरुण मित्रा, कसली चिंता करतोस एवढी. काही झालेलं नाहीये तुला. मी काही औषधे वगैरे सांगत नाही. तू आता चालायला लाग. म्हणजे चालायला सुरुवात कर. दररोज सकाळी उठून फिरायला जा. दोन महिन्यांनी माझ्याकडे ये. त्यावेळी तुझ्या काही तक्...

उगवतीचे रंग - आरोग्याची सप्तपदी चालताना...

उगवतीचे रंग  आरोग्याची सप्तपदी चालताना...  एकदा अकबराने बिरबलाला तीन प्रश्न विचारले होते. घोडा का अडला ? भाकरी का करपली ? पान का सडले  ? आणि अकबराने बिरबलाला या तिन्ही प्रश्नांचं उत्तर फक्त  तीन शब्दात द्यायला सांगितले. चतुर बिरबलाने पटकन सांगितले, ' वेळेवर न फिरवल्यामुळे. ' किती सुदंर उत्तर आहे नाही ..! आपण ही लहान मुलांची गोष्ट म्हणून बऱ्याच वेळेला सोडून देतो. पण त्यात किती मतितार्थ भरला आहे ! प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करायला हवी. भाकरी वेळीच फिरवली नाही, तर ती करपेल. पान सडेल आणि घोडा अडून राहील. हा न्याय आपल्या जीवनाला सुद्धा लागू होतो. आज आपले आरोग्य बिघडले आहे. दवाखान्यांमध्ये गर्दी वाढते आहे, इतकी की नवीन पेशंटसाठी जागा नाही. अनेक आजार वाढले आहेत. कोणालाही विचार की आज असे का होत आहे ? तो लहान मुलगा असला तरी आपल्याला सांगेल की, ' अहो काका, टेन्शन किती वाढलंय हल्ली ! शिवाय प्रदूषण केवढं वाढलंय ..! मग होणारच ना आजार. ' खरे आहे. हे सांगायला काही कोणा फार मोठ्या तज्ज्ञाची जरुरी नाही. मग पुन्हा अकबरासारखाच प्रश्न मनात येतो. कोणी वाढवले हे ताणतणाव, कोणी वाढवलं प्रद...

उगवतीचे रंग - तीर्थ, तीर्थरूप आणि तीर्थक्षेत्र...

उगवतीचे रंग   तीर्थ, तीर्थरूप आणि तीर्थक्षेत्र...  कालचा दिवस तसा अनेक अर्थांनी स्मरणीय होता. कालची तारीख होती २१ जून. हा दिवस सगळ्यात मोठा दिवस. २१ जून हा दिवस योगदिन सुद्धा. कालचाच दिवस ' फादर्स डे ' सुद्धा होता आणि कालच या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुद्धा होते. कालपासूनच सूर्याचे दक्षिणायनाही सुरु झाले. इतके सगळे योग या योगदिनाच्या दिवशी योगायोगाने एकत्र आले. तर काल होते सूर्यग्रहण. सूर्यग्रहणाची पर्वणी साधून अनेकांनी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केले आणि परमेश्वराचे दर्शन घेतले. अर्थात अशा लोकांची संख्या यंदा कोरोनामुळे खूपच कमी होती हा भाग वेगळा. तसेच कालच फादर्स डे सुद्धा होता. म्हणून काल ' तीर्थ ' आणि ' तीर्थरूप ' यांचा दिवस होता असे म्हणायला हरकत नसावी. या निमित्ताने बातम्यांमध्ये नासिकच्या गोदावरीत रामकुंडावर स्नानासाठी बऱ्याच लोकांनी गर्दी केल्याचे दाखवले. कोणी त्या पाण्यात स्नान करत होते, तर कोणी तेथे बसून जपजाप्य. ग्रहणकाळात असे तीर्थक्षेत्री स्नान आणि जपतप करणे पुण्यप्रद मानले जाते. पण तरीही कोरोना सारख्या महामारीच्या साथीत लोकांनी ही हिंमत केलेली पाहून...

उगवतीचे रंग - कथा एका शापित गंधर्वांची...

उगवतीचे रंग  कथा एका शापित गंधर्वांची...  नंदिनी आणि अविनाश बर्वे या आगळ्यावेगळ्या दाम्पत्याची ही प्रेरणादायक कथा. ही कथा आहे त्यांनी नियतीशी दिलेल्या झुंजींची. हताश न होता, शस्त्र खाली टाकून न देता लढलेल्या लढाईची. अर्जुनासारखी गलितगात्र अवस्था त्यांचीही सुरुवातीला झाली होती. पण गीतेतील ' तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय: ' या वचनावर श्रद्धा ठेवून हे दोघेही पती पत्नी युद्धाला सज्ज झाले. असे काय वेगळे घडले होते त्यांच्या जीवनात  ?  नंदिनी आणि अविनाश यांच्या संसारवेलीवर दोन फुले उमलली. मोठा मुलगा मिलिंद आणि धाकटा त्याच्याहून नऊ वर्षांनी लहान कौस्तुभ. या दोघांमध्ये जमीन अस्मानाचा फरक. मोठा मिलिंद कुशाग्र बुद्धी असलेला. आणि हा लहान त्याच्या पाठीवर आलेला कौस्तुभ मतिमंद. दोघेही दोन टोकाचे. एकाच्या पंखात गरुडभरारी घेण्याचे सामर्थ्य तर दुसरा जन्मतःच उडण्यास असमर्थ. नंदिनी आणि अविनाश दोघेही अगदी सामान्य कुटुंबातून आलेले. परिस्थिती बेताचीच. दोघेही पेशाने शिक्षक. पण आता नियतीने त्यांची परीक्षा पाहायची ठरवली होती. पत्त्याच्या डावात आपल्या हाती जे पत्ते येतील, ते घेऊन खे...

उगवतीचे रंग - कहानी घर घर की...

उगवतीचे रंग  कहानी घर घर की...  कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे घराघरात वेगळी कहाणी दडलेली आहे. या प्रत्येक कहाणीला एक हळवा कोपरा आहे. प्रत्येकाचे दुःख आणि समस्या वेगळ्या आहेत. पण सूर निराशेचे आणि दुःखाचेच आहेत. माणसे हतबल झालेली आहेत. काही मनाने मोडून पडली आहेत. त्यांना मदतीचा आणि माणुसकीचा हात पुढे करण्याची गरज आहे. कोकणात झालेल्या वादळाने शेतकऱ्यांचे आणि गरीब माणसांचे अपरिमित नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. तर बऱ्याच लोकांच्या डोक्यावरील निवारा हरवला आहे. त्यांना राहायला घर नाही. अशा काही कुटुंबांनी एस टी स्टॅण्डवर तात्पुरता निवारा शोधला आहे. ते दिवसरात्र तिथे राहत आहेत. खाण्यापिण्याचे, झोपण्याचे हाल वेगळेच आहेत. काही ठिकाणी बळीराजाचा माल कोरोनामुळे विक्रीसाठी जाऊ शकला नाही. शेतात, घरात माल आहे पण मालाला गिऱ्हाईक नाही. हाती पैसा नाही अशी स्थिती आहे.   परवा बातम्यांमध्ये मुंबईतली काही घरं दाखवली होती.. एका घरात एक आजी वय सत्तर वर्षांच्या पुढे. त्यांचे मिस्टर साधारण ७४/७५ च्या आसपास वय असणारे. दोघेही हृदयविकाराचा त्रास असलेले. शिवाय वृद्...

उगवतीचे रंग - शिकण्याची प्रक्रिया...

उगवतीचे रंग  शिकण्याची प्रक्रिया...  शिकवणं किंवा शिकणं हे कसं असतं ते सांगताना प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर त्यांच्या शिक्षकांचं उदाहरण दिलं होतं . त्यांची शाळा साधी मराठी माध्यमाची होती. पण त्यांना जे विज्ञानाचे शिक्षक, भूगोलाचे शिक्षक मिळाले होते, त्या शिक्षकांनी त्यांना केवळ वर्गाच्या चार भिंतीत शिकवलं नाही. भूगोलाचे शिक्षक त्यांना पर्यावरण, समुद्र इ शिकवताना सहलीला म्हणून बाहेर घेऊन जात. तेथे पर्यावरणाच्या, समुद्राच्या निरीक्षणातून त्यांचे शिक्षण घडत होते. भूगोल शिकता शिकता पक्षी जगत, वनस्पती इ बद्दल सुद्धा शिकायला मिळत असे. खरा शिक्षक तोच असतो जो विषयांची एकमेकात सांगड घालतो. मी फक्त भूगोलाचा शिक्षक आहे असे म्हणून त्याला चालणार नाही. त्यांचे विज्ञानाचे शिक्षक त्यांना साबण बनवण्याची प्रक्रिया समजावून देताना साबणाच्या कारखान्यात घेऊन गेले. तिथे मुलांनी ती सगळी प्रक्रिया आपल्या डोळ्यांनी अनुभवली. बहिर्गोल भिंगातून प्रकाशकिरण एकत्र केले की त्यांची शक्ती वाढते. ते एकवटले की कागद सुद्धा जाळू शकतात. हे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना वर्गाच्या बाहेर नेऊन सांगितले. मुलांना...