मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दिगूची मुशाफिरी

उगवतीचे रंग  दिगूची मुशाफिरी  मायानगरीत राहून दिगूला आता कंटाळा आला होता. एकतर भयानक उष्म्यामुळे अंगाची काहिली होत होती. त्यातच भोवतालच्या त्याच त्या वातावरणालाही तो कंटाळला होता. काही गोष्टी फारशा गांभीर्याने न घेता करमणूक म्हणून घ्यायच्या ठरवल्या तरी त्यालाही काही मर्यादा असतेच. दिगुने हिमालयाएवढी उंची असणारे नेते पाहिले होते. आता भोवताली असणाऱ्या खुज्या नेत्यांचे दर्शन त्याला घडत होते. एक पत्रकार म्हणून तो सगळ्या गोष्टी जरी निर्विकारपणे टिपत असला तरी आतमध्ये कुठेतरी अस्वस्थता होती. अस्सल जातिवंत वाघ दिगुने पाहिले होते. वाघाची डरकाळी, दरारा त्याला परिचित होता. पण आता अस्सल वाघ त्याला दिसेनासे झाले होते. मांजराची लक्षणे त्याला दृग्गोचर होत होती.  मांजराची पिले सुद्धा वाघाचा आव आणून गुरगुरण्याचा प्रयत्न करीत होती पण त्यात फारसा दम नव्हता. एकेकाळी धनुष्यातून सुटल्यावर  आपल्या लक्षाचा अचूक वेध घेणारे बाण आपली दिशा सोडून भलत्याच लक्ष्यावर आदळत होते. कोविडमुळे काही काळ गाड्या बंद झाल्याने  इंजिन देखील आपल्या जागेवर शांतच होते. पण आता थोडे इंधन मिळाल्याने इ...

गेले द्यायचे राहून...

उगवतीचे रंग  गेले द्यायचे राहून...  कवी आरती प्रभू यांची एक सुंदर कविता आहे.   गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्राचे देणे  माझ्यापाशी आता कळ्या आणि थोडी  ओली पाने.  कधी कधी असं सुंदर, आवश्यक असलेलं नक्षत्रांचं देणं राहून जातं. हातात फार काही उरत नाही. काळ हातातून निसटून गेलेला असतो. राहून गेलेल्या गोष्टींची बोच मात्र मनाला लागून राहते.  कधी कधी मला वाटतं की आपलं आयुष्य एखाद्या क्रेडिट कार्डसारखं आहे. काय हवं ते आपल्याला आधी देऊन टाकलेलं असतं. नंतर आपल्याला ते फेडायचं असतं. आपण ते ऋण कसं फेडतो यावर पुढील सगळा व्यवहार अवलंबून असतो. आईवडील आपल्याला शिकवतात, मोठं करतात. गुरुजन ज्ञान देतात. शेतकऱ्याने शेतात अन्न पिकवल्याने आपल्याला खायला मिळतं. मित्र, समाज, आप्तेष्ट या साऱ्या साऱ्यांचं आपल्यावर ऋण असतं. ते जमेल तसं आपल्याला परत करायचं असतं. त्याच्यासाठी मुदत दिलेली नसते, ठराविक असं व्याज नसतं आणि फेडलं नाही तर काही गुन्हा दाखल होण्याची शक्यता फारशी नसते. पण परत करणं हे आपलं नैतिक कर्तव्य असतं. आपल्यावरचे संस्कार किती प्रभावी आहेत त्यावर हे ठरतं...

लेबल्स..

 उगवतीचे रंग  लेबल्स..  सध्या लेबल्सचा जमाना आहे. जिकडे पाहावं तिकडे कुठलं ना कुठलं लेबल.  घरातल्या वस्तूंवर गृहिणी लेबल लावून ठेवते. पटकन सापडाव्यात म्हणून. याचा उपयोग तिलाच होतो असं नाही. ती घरी नसेल तेव्हा तिचा नवरा, मुलं या सगळ्यांना त्याचा उपयोग होतोच. पण कधी कधी गंमतही होते. वर लेबल लावलेलं असतं वेगळं आणि आतमध्ये वस्तू असते वेगळीच ! मग होते गडबड. कधी साखरेऐवजी मीठ पडतं तर कधी ज्वारीच्या पिठाऐवजी डाळीचं पीठ. भाकरी बनवणारा म्हणतो की आज भाकरी का जमत नाहीये ? अशी चिकट का होतेय ? ही सगळी गडबड झाली ती चुकीच्या लेबलामुळे. एक वेळ लेबल नसते लावले तरी चालले असते. कारण मग माणूस ती वस्तू पाहून घेतो. पण लेबल असले की निश्चिन्त असतो. त्याने गृहीत धरलेलं असतं की इथे साखर म्हणजे साखरच असणार, डाळीचं पीठ म्हटलं की डाळीचं पीठ असणार !  ' लेकिन दाल में कुछ काला हैं...' हे ती वापरल्याशिवाय कळत नाही. असंच माणसांचंही होतं बरं का ! आपल्याला सवयच झालेली असते ना सतत प्रत्येकाला लेबल चिकटण्याची. काही काही संवाद बघा नेहमी आपल्या कानावर पडतात... तुमच्याही आजूबाजूला ते नक्कीच घडत असणार. ...

देखो रुठा ना करो...

 उगवतीचे रंग  देखो रुठा ना करो...  पुणे तेथे काय उणे असे म्हणतात ते उगीच नाही. झालं असं की परवाच्या दिवशी ( हा ' परवाच्या दिवशी ' फार सोयीस्कर शब्द आहे बरं का ! यात खरोखरच्या परवाच्या दिवसापासून तो थेट आठवडा, पंधरवडा एवढंच काय वर्ष दोन वर्ष देखील खपून जातात. ही गोष्ट नक्की केव्हा घडली हे सांगण्याची आवश्यकता राहत नाही. ) पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी जे काही सांगितले ते अतिशय महत्वाचे आहे. अशा पद्धतीने आजपर्यंत ( आणि तेही एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने अधिकारवाणीने सांगणे )कोणी सांगितले नव्हते.  ते म्हणाले, " नवरा बायकोच्या भांडणाच्या खूप तक्रारी आमच्याकडे येतात. पण माझ्या मते सगळ्या पुरुषांनी जर आपल्या बायकांचे ऐकले तर भांडणे होणार नाहीत. " तात्पर्य म्हणजे असा सल्ल्ला त्यांनी समस्त पुरुष वर्गाला दिला आहे. पण त्यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने देखील हे सांगावे म्हणजे त्यात निश्चितपणे काही तरी अर्थ असलाच पाहिजे असा अर्थ आमच्या सुमार बुद्धीनुसार आम्ही काढला. अर्थात तुम्हाला म्हणून सांगतो आम्ही आयुष्यभर हेच करत आलो आहोत. आमच्यात भांडणे...

लावण्याचा गाभा : पं शिवकुमार शर्मा

 उगवतीचे रंग  ( प्रिय रसिक वाचक. काल रात्री उशिरापर्यंत बसून लिहिलेला लेख आपल्यासमोर ठेवताना मला एक प्रकारचा वेगळा आनंद आहे. माझा हा लेख पुढे पुस्तकात येईल न येईल पण आपल्यासारखे माझ्याशी वेगवेगळ्या कारणाने जोडले गेलेले वाचक या लेखाचे प्रथम वाचक आहेत याचा हा आनंद ! मी कोणी मोठा लेखक नाही पण लहान मूल ज्या प्रेमाने आपल्या आईवडिलांना म्हणते, " आता तुम्हाला माझे ऐकावे लागेल बरं..." आणि ते मूल लहान असतानाही आईवडील कौतुकाने ते बोबडे बोल गोड करून घेतात. त्याच प्रेमाच्या धाडसातून मी तुमच्याशी बोलत आहे. माझ्या विचारमंथनातून प्रकटलेला नवनीतरूपी  ' लावण्याचा गाभा " आपल्यासमोर याच प्रेमाने आणि धाडसाने ठेवत आहे. )  लावण्याचा गाभा : पं शिवकुमार शर्मा  कविवर्य बा भ बोरकरांच्या ' लावण्यरेखा ' या कवितेच्या सगळ्याच ओळी कवितेच्या नावाप्रमाणे लावण्यखाणी आहेत. पण परवा परवा पं शिवकुमार शर्मा आपल्यातून गेले आणि मला बोरकरांच्या या कवितेतल्या शेवटच्या दोन ओळी आठवल्या. बोरकर म्हणतात  देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. पंडितजी गेले. सुरांचा सूर्...

ब्रायटनची ब्राईट कहाणी... !

उगवतीचे रंग  ब्रायटनची ब्राईट कहाणी... !  युद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचे स्मारक भारतात असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. ते आपले कर्तव्यही आहे. भारतात युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक नुकतेच इंडिया गेटजवळ बांधण्यात आले आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मारक कारगिलजवळ द्रास या ठिकाणी आहे. आपले कुटुंब, सणवार सगळं सगळं बाजूला ठेवून कोणत्याही देशाचे सैनिक प्रतिकूल परिस्थितीही आपले कर्तव्य बजावत असतात. या सैनिकांचा सन्मान करणे, त्यांच्या प्रति कृतज्ञ राहणे हे सरकारचे आणि आपलेही परम कर्तव्य आहे. भावी पिढीला त्यांच्या त्यागापासून प्रेरणा मिळावी हाही एक त्यामागील उद्देश असतो.  आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की पहिल्या महायुद्धात इंग्लंडसाठी लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे एक अतिशय सुंदर स्मारक इंगलंडमधील ब्रायटन या शहराजवळ आहे. इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी हे स्मारक आहे अशा ब्रायटन गावाची आधी आपण थोडक्यात माहिती घेऊ. ब्रायटन हे इंग्लंडच्या दक्षिणेला समुद्रकिनारी वसलेले एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव. ब्रिटिशांसाठी ए...

चष्मा... !

 उगवतीचे रंग  चष्मा... !  मी लावतो चष्मा निरनिराळ्या रंगाचा  मग मला हवे तसे दिसतात रंग भोवतालचे  कधी कधी मला सोयीसाठी हिरवा रंग हवा असतो  मग मी हिरव्या रंगाचा चष्मा परिधान करतो.  आता हिरव्या रंगाशी माझी जवळीक असते  मग हिरवी रोषणाई, हिरवे झेंडे, सारे कसे  हिरवे हिरवे  रंगून जातो मग मी हिरव्या रंगात ईद रमजान अन डोक्यावर गोल टोपी मोठया थाटात ।। १ ।।  कधी कधी मी लावतो भगव्या रंगाचा चष्मा  मग भवतालच होऊन जातो अवघा भगवा  भगवे ध्वज, भगव्या मिरवणुका, भगवे कपडे  दिसू लागतात भगवे तांडे  भावी विजयाचे मनात मांडे ।। २ ।। वाटलं तर लावतो निळ्या रंगाचा चष्मा कधी कधी  मग होऊन जातो भवताल निळा  कपाळाला निळाच टिळा  मग आठवते प्रज्ञा, शील, करुणा  ' बुद्धम शरणं गच्छामि..' चा घोष मनात घुमू लागतो. ।। ३ ।।  माझ्याजवळ फक्त चष्मेच नसतात  असतात निरनिराळ्या प्रकारचे फिल्टर्स सुद्धा  मला हवे तसे फिल्टर्स मी कानावर चढवतो  मग त्यातून गाळून येतात आवाज  तेच फक्त की जे मला ऐकायचे असतात. ।।...

जागते रहो...

उगवतीचे रंग  जागते रहो...  आजकाल आपण सगळे बाजारू संस्कृतीच्या विळख्यात सापडलो आहोत. सकाळी उठल्यावर हातातल्या वृत्तपत्रापासून ते बाहेर कुठेही पडलो तरी विविध प्रकारच्या जाहिराती आपल्या डोळ्यासमोर नाचत असतात. जरा विरंगुळा म्हणून टीव्ही लावला तरी विविध चॅनल्सवर विविध प्रकारच्या जाहिराती आपल्या कानीकपाळी आदळतात. आणि तुम्हाला आम्हाला जे काही हवं असतं ते या जाहिरात नामक मायाजालात हरवून जातं. तुमची आणि आमची या प्रकारातून सुटका होण्याचा काही मार्ग दिसत नाही. मला वाटतं त्यासाठी विरक्ती पत्करून वनातच जायला लागेल. पण गंमत अशी की तिथेही या जाहिराती कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपला पाठलाग करतीलच.  डोक्यात एक मजेदार कल्पना आली की रामायण काळात इंटरनेट आणि जाहिराती असत्या तर...! काही गमतीदार बोर्ड वाचायला मिळाले असते. येथे शबरीची बोरे मिळतील. ( येथे शेगावची कचोरी मिळेळच्या धर्तीवर ), गुहकाच्या नौकेतून करा प्रवास ! समुद्रावर सेतू बांधू शकणारे नल , निल आदी तंत्रज्ञ उपलब्ध ! संपर्क जांबुवंतराव. येथे रामायणातील गोष्टींचा उपहास करणे हा उद्देश नाही. पण खरोखरोच पूर्वीचे जनजीवन किती सुखी होत...