उगवतीचे रंग विश्वास देशपांडे, चाळीसगाव रामकथा - भाग वीस ( रामायणकालीन शासन व्यवस्था ) आधीच्या लेखात आपण रामायणकालीन समाजाची थोडक्यात माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. रामायणकालीन समाजाची काही मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा समाज मानवी समाजाच्या एका प्रगत पातळीवर जगत होता. आज आपल्याला अक्षरशः स्वप्नवत वाटेल अशा प्रकारचे जीवन या लोकांचे होते. उच्च नैतिक मूल्यांचे पालन, आपल्या कार्याला धर्माचे अधिष्ठान, त्याग, सेवावृत्ती आणि सहकार्य यावर आधारित जीवनशैली त्यांची होती. सर्वात महत्वाचे म्हणजे मी समाजाचे काही देणे लागतो, ही भावना प्रत्येकामध्ये न सांगताही जागृत होती. याच भावनेतून लोक स्वेच्छेने कर ( व्हॉलंटरी टॅक्स पेयिंग ) देत होत होती. या रामायणकालीन जनतेचे मला काही विशेष वाटेल असेल तर ते हे आहे की ही जनता आनंदी होती. रामराज्यात दीन, दुःखी, भिकारी, लाचार असा कोणी नव्हता. आज संयुक्त राष्ट्रांतर्फे जगातील आनंदी राष्ट्रांची यादी जाहीर केली जाते. त्याला आनंदाचा निर्देशांक ( हॅपिनेस इंडेक्स ) म्हटले जाते. रामराज्यात हा आनंदाचा निर्देशांक सर्वात जास्त होता म्हणून तर रामराज्...