मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जा ओलांडूनिया सरिता सागरा

उगवतीचे रंग  जा  ओलांडूनिया सरिता सागरा  दसरा आला की माणिक वर्मा यांनी गायिलेले ' विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी...' हे गाणं आठवतंच. आणखी एक गाणं आठवतं. ' अजि सोनियाचा दिन...' ही ज्ञानेश्वर माउलींची प्रासादिक रचना. या  दोन्हीही रचना एका महत्वाच्या अध्यात्मिक गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करतात. पहिल्या रचनेत श्रीराम रावणावर विजय मिळवून परतले आहेत. ते अयोध्येत परतले. पण प्रभू आले मंदिरी म्हणजे आपल्या  हृदयमंदिरात आजच्या या पवित्र दिवशी त्यांची स्थापना, त्यांचे आवाहन करायला  खरा दसरा. दुसऱ्या रचनेत माउली म्हणतात, ' सबाह्य अभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी...' अखिल विश्वात तोच भरून राहिला आहे याची जाणीव ज्याला झाली त्याला तोच मुरारी आपल्या देखील अंतर्यामी भरून राहिला आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. ही जाणीव जेव्हा होते, ती वेळ म्हणजे दसरा. तेच खरे सीमोल्लंघन.  खरं तर दसरा या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. दहा गोष्टींवर केंद्रित झालेलं आपलं लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित करणं म्हणजे दसरा. त्यालाच ' दशहरा ' असेही म्हटलं जातं. दशहरा म्हणजे  माझ्या ...

उगवतीचे रंग - ऐसी अक्षरे रसिके

उगवतीचे रंग ऐसी अक्षरे रसिके शर्वरी. एक अत्यंत उत्साही आणि सतत हसतखेळत राहणारी तरुणी ! तिच्या लाघवी स्वभावाने सगळ्यांनाच आपलंसं करून घेणारी. तिचं बोलणं ऐकण्यासाठी सगळेच उत्सुक असायचे. पण अचानक एक मोठा अपघात झाला. शर्वरीची वाचा हरपली. बोलकी शर्वरी एकदमच शांत शांत राहू लागली. तिची जिवलग मैत्रीण सुषमा तिला भेटायला आली. शर्वरी काही बोलू शकत नव्हती. शर्वरीचे डोळे भरून आले. सुषमा आणि शर्वरी एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या. शर्वरी थोडी शांत झाल्यावर सुषमाने आपल्या पर्समधून एक नवीकोरी डायरी आणि पेन काढले. शर्वरीच्या हातात ठेवले. एक पाटी पेन्सिल सुद्धा तिच्या हाती दिली. ' शर्वरी, काही काळजी करू नकोस. जशी तुझी वाचा अचानक अपघाताने गेली, तशीच ती एक दिवस परत सुद्धा येईल. मला विश्वास आहे. पण तोपर्यंत तू तुला जे काही सांगायचं ते या पाटीवर लिहून सांगत जा. जेव्हा तुला वेळ असेल तेव्हा तुझ्या भावना या डायरीत लिहीत जा. ' सुषमा म्हणाली. तशाही परिस्थितीत शर्वरीचा चेहरा खुलला. तिनं पाटीवर लिहिलं, ' सुषमा, बस थोडा वेळ. तू आल्यानं मला किती आनंद झाला ! आपण दोघी थोडी थोडी कॉफी घेऊ या. तू बोलत जा. ...

आनंदनिधान दोन शब्द... पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी

आनंदनिधान  दोन शब्द... पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी  प्रिय रसिक वाचक  माझं नवीन पुस्तक ' आनंदनिधान ' आपल्या हाती देताना विशेष आनंद होत आहे. जॉन किट्स नावाचा कवी म्हणतो A thing of beauty is joy forever, ' आपल्या भाषेत सांगायचं तर हीच गोष्ट ' सत्यं शिवं सुंदरम ' अशी सांगता येईल. सत्य, शिव आणि सुंदराचा मिलाफ असलेली कोणतीही गोष्ट ही चिरंतन आनंदाचा स्रोत असते. आनंदनिधान म्हणजे अशाच चिरंतन आनंद देणाऱ्या गोष्टी. कोणकोणत्या गोष्टी अशा आनंदनिधान असू शकतात याबद्दल मी ' आनंदनिधान ' या लेखात सविस्तरपणे लिहिले आहे. त्याची आता पुनरावृत्ती करीत नाही. आपण ते जरूर मुळातून वाचावं.  मानवी जीवन सुखदुःखांनी भरलेले असते. आपण कधी निराश होतो, तर कधी आनंदी. आपण सारखा सुखाचा शोध घेत असतो. पण सुखदुःखाचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. सुखाचे क्षण किनाऱ्यावर बसून वाळूचे कण हाती घ्यावे आणि हातातील वाळू जशी निसटून जाते, तसेच तेही आपल्या हातातून निघून जातात. तर कधी हुलकावणी देतात. म्हणून सुखाच्या शोधात असलेल्या मानवाला नेमकं सुख म्हणजे काय, ते कशात आहे हे शेवटपर्यंत उमजत नाही. पण जर आनंदा...

अजूनही चांदरात आहे - दोन शब्द

 अजूनही चांदरात आहे  दोन शब्द  आज कोजागिरी पौर्णिमेच्या सुमुहूर्तावर हे  पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे. त्याचबरोबर आपल्याला आवडणाऱ्या अशा प्रकारच्या ललित लेखनाचे हे नवीन पुस्तक आपल्या हाती सोपवताना हा आनंद द्विगुणित होत आहे. दुधात साखर म्हणतात ते हेच असावे ! ' अजूनही चांदरात आहे ' हे या पुस्तकाचे नाव वाचून कोणाला हा कथासंग्रह आहे असे वाटेल तर कोणाला हा एखादा कवितासंग्रह आहे असे वाटू शकेल. पण हा माझ्या इतर पुस्तकांप्रमाणेच विविधरंगी ललित लेखांचा गुच्छच मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. मानवी जीवन हेच मुळी सुखदुःख, आनंद, उल्हास, आशा निराशा, चिंता, भय यासारख्या अनेक गोष्टींनी आणि भावभावनांनी भरलेले असते. जीवन एकांगी किंवा सरळसोट अशा प्रकारचे कधीच नसते आणि नसावे. तीच तर खरी त्यातील गंमत आहे.  या विविध प्रसंगांना, घटनांना सामोरे जाताना मानवी मनात विविध भावभावनांचे तरंग उठणे हे अगदी स्वाभाविक असते. संवेदनशील मनाला तर जीवनातील विविध प्रसंग स्पर्शून जातात. कधी अस्वस्थ करतात, कधी निराशा जागवतात, कधी आनंदी करतात. पण असे असले तरी माणूस जगत असतो ते उद्याच्या आशेवर. त्याला...

चांदणे शब्दफुलांचे मनोगत

चांदणे शब्दफुलांचे  दोन शब्द... पुस्तकाच्या अंतरंगात शिरण्यापूर्वी  मुळात चांदणं हा शब्दच किती आल्हाददायक ! त्यात हे चांदणं शब्द फुलांचं ! आपल्या असामान्य कार्यकर्तृत्वाने काळाच्या पडद्यावर आपल्या ठसा उमटवून जाणाऱ्या काही व्यक्तींच्या जीवनगाथेची ओझरती का होईना पण ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे हा एक सुखद योगायोग ! कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बहरून आलेले हे ' चांदणे शब्दफुलांचे ' आपल्यासारख्या रसिक वाचकांच्या हाती सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे.   हे पुस्तक म्हटलं तर ललित लेखन आहे पण यातील विविध व्यक्तिरेखांचे मनोहर कोलाज आपल्याला भावविभोर करतील. या पुस्तकात अगदी राम, कृष्ण, गणेश, परशुराम, संत ज्ञानेश्वर, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यासारख्या अध्यात्मिक आणि पौराणिक व्यक्तिरेखा तर आहेतच. त्याशिवाय बालगंधर्व, पंडित शिवकुमार शर्मा, बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारखा अलीकडच्या काळातील आपापल्या क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या व्यक्तींची शब्दचित्रेही रेखाटण्याचा मी  प्रयत्न केला आहे. समर्पित जीवनाचा आदर्श असलेल्...