मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आनंदाच्या गावा जावे...

उगवतीचे रंग  आनंदाच्या गावा जावे ... मराठी आणि हिंदी चित्रपटातील काही गाणी रसिकांची हमखास आवडती असतात. कोणाला दर्दभरी गाणी आवडतात तर कोणाला आनंदी मूड असणारी. मी पण सगळ्या प्रकारची गाणी ऐकतो. पण माझी आवड म्हणजे मूड आनंदी करणारी गाणी. मग ती मराठी, हिंदी कोणतीही असो. अशी खूप आवडीची गाणी आहेत. काही गाण्यांबद्दल मी मागे लिहिलं आहे. जसं ' साथी ' चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायिलेले ' ये कौन आया रोशन हो गयी ..' या गाण्यातल्या सिमी गरेवालचा चेहरा पाहत राहावा इतका आनंदी आणि प्रसन्न आहे. तर ' लव्ह इन टोकियो ' मधलं लताजींनीच गायीलेलं ' मुझे तुम मिल गये हमदम ...' या गाण्याच्या वेळी आशा पारेखचा अभिनय बघत राहावा असा अप्रतिम. एकाच वेळी चेहऱ्यावर आनंद आणि अश्रू अशा दुहेरी भावना दाखवण्याची तिची किमया लाजवाब. तोडच नाही. या गाण्यांबद्दल माझ्या पहिल्या पुस्तकात म्हणजे ' कवडसे अंतरीचे..सोनेरी ' मध्ये मी एक खास लेख सविस्तर लिहिला आहे.  रसिकहो, आणखी काही गाण्यांचा उल्लेख मी थोडक्यात करणार आहे. पण लेख मात्र गाण्यांवर नाही बरं ..! आपल्याला जायचं आहे ते आनंदाच्या गावाला...

उगवतीचे रंग - सिद्धी आणि प्रसिद्धी ...

उगवतीचे रंग  सिद्धी आणि प्रसिद्धी ...  स्वामी परमहंस योगानंद यांच्या ' ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी ' पुस्तकातील ही गोष्ट आहे. त्यांचे गुरु श्री युक्तेश्वर यांनी सांगितलेली ही कथा आहे. ही गोष्ट आहे एका मुसलमान फकीराची. त्याचं नाव अफझल खान. प. बंगालमध्ये कोलकाता आणि सेरामपूर या परिसरातली ही कथा. हा अफझल खान लहान असताना एक भ्रमण करणारा संन्यासी त्याच्या गावात येतो. तो उन्हात चालून थकलेला असतो. आणि त्याला तहान लागलेली असते. तेव्हा तो या छोट्या अफझलकडे प्यायला पाणी मागतो. लहानगा अफझल जरा गोंधळतो. एका हिंदू संन्याशाने आपल्याकडे पाणी मागावं आणि आपण ते कसं द्यावं हा प्रश्न त्याच्या मनात येतो. तो तसं त्या संन्याशाला विचारतो. संन्याशी म्हणतो, ' मी जातपात, धर्म, स्पृश्यास्पृश्य इ काहीच मानत नाही. तेव्हा तू मला पाणी दे.' अफझल त्याला पाणी आणून देतो. त्या संन्याशाची तहान भागलेली असते. तो तृप्त होतो. आणि तो संन्याशी अध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रगत असल्याने त्या मुलाचा पूर्वजन्म इ गोष्टी जाणून घेतो. तो त्या मुलाला म्हणतो,  ' मी तुला एक सिद्धी शिकवणार आहे. त्या सिद्धीच्या जोरावर तू अदृश्य...

उगवतीचे रंग - राहिले दूर घर माझे.

उगवतीचे रंग  राहिले दूर घर माझे...  कोरोनाची मगरमिठी दिवसेंदिवस घट्ट होत चालली आहे. जवळपास दोन महिन्यांपासून घरातच अडकून पडलेल्या आपणा सर्वांना आज ना उद्या चांगली बातमी मिळेल आणि लॉक डाऊन उठेल आणि काही दिवसात पुन्हा सगळे पूर्ववत होईल ही आशा आहे. पण पेपरमधील किंवा टीव्हीवरील बातम्या पाहिल्या की रोजची ही आशा निराशेत बदलते. आणि मग आपण म्हणतो, की वाचन करून किती करणार, टीव्ही किती पाहणार, मोबाईलचा सुद्धा कंटाळा येतो. सगळ्या गोष्टी करून झाल्या. आता तरी लवकरात लवकर आपले जीवन पूर्वीसारखे व्हावे. माझा एक मित्र आहे. तो पुण्यात राहतो. तो आज माझ्याशी फोनवर बोलताना तक्रार करत होता. त्याला गेली चाळीस वर्षे झाली स्विमिंगची सवय. दररोज सायकलिंग करत स्विमिंगला जायचा. म्हणाला, '' घरात बसून अंगात खूप आळस आला आहे. माझी बँकांची कामं होत नाहीत. बाहेर पडता येत नाही. गाड्या दाराशी तशाच पडून आहेत. त्यांच्या टायर मधली हवा संपली आहे. काय करावं काही सुचत नाही. ' त्याचं म्हणणं खरं आहे. सगळ्यांचीच ही अवस्था आहे. काही जणांची तर मानसिक अवस्था नाजूक झालीय. कोणाला आता मरणाची भीती जाणवते तर त्या भीतीने कोणी...

उगवतीचे रंग - थेंबातला सागर..

उगवतीचे रंग  थेंबातला सागर...  हे विश्व ज्यात आपण राहतो, ते खरोखर अद्भुत आहे. थेंबाथेंबानी सागर बनतो आणि थेंबाथेंबात सागरही असतो. आपले डोळे हा एक अनोखा चमत्कार आहे.  या छोट्याशा दोन डोळ्यात सारे विश्व सामावते. अदृश्य असणारे मन सगळ्या विश्वाला व्यापूनही दशांगुळे उरते. जेव्हा मी आकाशाकडे पाहतो, तेव्हा तो विस्तीर्ण पट माझ्या डोळ्यात सामावते. रात्रीचे आकाश पाहताना, नभातले चन्द्र, तारे दृष्टी जाईल तेथपर्यंत डोळ्यात सामावतात . खरे तर आपल्याला दिसते त्यापलीकडे देखील हे विश्व असते. पण आपल्याला जे दिसते ते सुद्धा थोडे नसते. आपण समुद्रावर गेलो तर, क्षितिजापर्यंत अफाट पसरलेला आणि आपल्या विशालकाय लाटांची गर्जना करणारा सागर आपल्या डोळ्यात भरतो. पण हा विशाल सागर थेंबानीच बनलेला असतो. एवढा मोठा सागर पाहून खरं म्हणजे यावर विश्वास ठेवणं कठीण जातं . कारण थेंब तो केवढासा ! पण निसर्गाची किमया बघा. अशाच थेंबाथेंबानी तो बनलेला असतो. नदी बनलेली असते. एवढेच काय पण आपल्या घरातला साधा नळ सुरु राहिला, आणि रात्री जर त्याच्याखाली एखादी बादली आपण ठेवलेली असेल, तर ती सकाळपर्यंत भरून जाते. आपल्य...

उगवतीचे रंग ध्येय निश्चितीकडे वाटचाल - भाग सात

उगवतीचे रंग  ध्येय निश्चितीकडे वाटचाल - भाग सात  ( शेवटचा भाग ) कालच्या लेखात आपण ध्येयनिश्चितीकडे वाटचाल ही एक प्रकारची साधनाच आहे हे पाहिले होते. कालच्या लेखात आपण लता मंगेशकर, एकलव्य आणि आशा भोसले यांची ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करतानाची उदाहरणे पाहिली. ही साधना करताना आपल्या ध्येयाचा ध्रुवतारा अखंड डोळ्यासमोर ठेवून छोट्यामोठ्या सुखांकडे दुर्लक्ष करायचे असते, तरच ध्येय साध्य होऊ शकते हे पाहिले. तसेच कायम आनंदी आणि उत्साही असण्यासाठी काही वाक्ये देखील स्वतःशी अनेकवेळा म्हणायला सांगितली होती. आजच्या या ' ध्येयनिश्चितीकडे वाटचाल ' या मालेतील शेवटच्या भागात मी आपल्याला असे काही नियम सांगणार आहे, की जे आपल्याला आपले ध्येय गाठून देण्यास मदत तर करतीलच, पण आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्यही उत्तम ठेवतील. आणखी एक गोष्ट. ही लेखमाला मी कोणताही विशिष्ट वयोगट डोळ्यापुढे ठेवून लिहिली नाही. ती सर्वांसाठी आहे. पण ज्यांना आपल्या जीवनाची सुरुवात करायची आहे, त्यांच्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरेल असे वाटते.  माणसाचं जीवन हा एक प्रवास मानला, तर तो आनंदी आणि सुखाचा व्हावा असं कोणालाही वाटेल...

ध्येय निश्चितेकडे वाटचाल - भाग सहा

उगवतीचे रंग   ध्येय निश्चितेकडे वाटचाल - भाग सहा भाग पाचमध्ये आपण स्वतःच स्वतःवर घातलेल्या मर्यादा किंवा बंधने आपल्यालाच कशी अडचणीची ठरतात ते पाहिले. आणि ते तोडण्यासाठी दुसरे कोणी येणार नाही तर आपल्यालाच ती बंधने तोडावी लागतील. कारण आपणच ती घालून घेतलेली असतात. आपण ध्येय मार्गावर वाटचाल तर सुरु केलीच आहे. ती करत असताना त्या मार्गावर दृढ राहण्यासाठी काय काय करावं लागेल ते आपण आज पाहू या. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेऊ या. ती म्हणजे ध्येय मार्गावरील वाटचाल ही एक साधना आहे, तपश्चर्या आहे. आणि तपश्चर्येशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही हा एक साधा नियम आहे. तो आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला कोणती साधना किंवा तपश्चर्या करायची आहे ? ऋषीमुनी, योगिजन आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी करतात तशा प्रकारची तपश्चर्या या ठिकाणी अपेक्षित नाही. ही तपश्चर्या किंवा साधना आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी करायची आहे. एकलव्याचे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकट्याने आणि एकाग्रतेने केलेली  साधना म्हणजे एकलव्याचे उदाहरण आहे. आपल्यालाही आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकलव्य बनायचे आहे. तो ...

उगवतीचे रंग ध्येय निश्चितीच्या मार्गावर - भाग पाच

उगवतीचे रंग  ध्येय निश्चितीच्या मार्गावर  - भाग पाच  कालच्या लेखात स्वतःसाठी वेळ देणे आणि संयम, शक्ती,  ऊर्जा , उत्साह याबरोबरच मनाचा कणखरपणा आणि साहस हे गुण अंगी बाणवणे आणि त्या गुणांनी आपले व्यक्तिमत्व समृद्ध करण्याबद्दल आपण वाचले. हे गुण म्हणजे पुढील आयुष्याची शिदोरी असते. आयुष्यभर पुरणारी ऊर्जा असते. आपल्या ध्येयपूर्तीसाठी हे गुण सहाय्यकारक ठरतात. त्या गुणांनी मंडित झालेली व्यक्तिमत्वे स्वामी विवेकानंद, मेरी कोम आणि शिवाजी महाराज यांची उदाहरणेही आपण पाहिली .  आता मी जे सांगणार आहे, ते थोडेसे धक्कादायक आहे. विचित्र वाटेल, पण खरे आहे. आपल्या ध्येयपूर्तीच्या आड कोणती गोष्ट येते माहिती आहे ? तर आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला घालून घेतलेली मर्यादा, स्वतःच घालून घेतलेलं कुंपण. आपण सारखे असं म्हणत असतो, की ते माझे काम नाही. मला जमणार नाही. आणि त्यासाठी विविध कारणे सुद्धा पुढे करत असतो. मी गरीब आहे. म्हणून मला अमुक एक गोष्ट जमणार नाही. पण गरिबीतूनच पुढे आलेली आणि यशस्वी झालेली अनेक व्यक्तिमत्वे समाजात आपल्या अवतीभवती असतात. पण आपल्याला फक्त त्यांचे यश दिसते....

उगवतीचे रंग ध्येय निश्चितीच्या मार्गावर : भाग चार

उगवतीचे रंग  ध्येय निश्चितीच्या मार्गावर : भाग चार  कालच्या लेखात आपण छोटी किंवा मोठी उद्दिष्टे कशी ठरवायची आणि ती साध्य करण्यासाठी काय काय करायचे हे पाहिले . तरी थोडक्यात त्याची उजळणी करू. आपले ध्येय सतत डोळ्यांसमोर ठेवणे, ते एखाद्या वहीत किंवा डायरीत लिहून ठेवणे, त्यासंबंधी आवश्यक ती माहिती किंवा चित्रे त्या वहीत लावणे, आपण साध्य करणार असलेल्या ध्येयाबाबत आपल्या संबंधितांना माहिती देणे आणि त्यासंबंधी एक कालमर्यादा ठरवून घेणे या त्या गोष्टी होत्या.   एकदा का आपण  हे ध्येय मनाशी ठरवले, तर त्या दृष्टीने प्रयत्नांचे सातत्य ठेवावे लागणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा सततचा विकास किंवा स्वतःमध्ये सतत सुधारणा करीत राहणे हे आपल्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने आवश्यक ठरते. ही  वैयक्तिक सुधारणा आहे आणि ती करण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी काही वेळ द्यावा लागणार आहे. एक महत्वाची गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे आपल्याला जर बाह्य जगात यश मिळवायचे असेल तर, आधी आपल्याला आपले अंतरंग सुधारले  पाहिजे. कारण आपण स्वतः जर स्वतःमध्ये सुधारणा करू शकलो नाही, त...

ध्येय निश्चितीच्या मार्गावर - भाग तीन

उगवतीचे रंग   ध्येयनिश्चितीच्या मार्गावर - भाग तीन ध्येयनिश्चितीच्या मार्गावर या लेखमालेचे भाग एक आणि भाग दोन आपण पाहिले . आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे तीन स्तरावर परीक्षण कसे करायचे हे आपण पहिल्या भागात पाहिले. दुसऱ्या भागात आपली एकाग्रता कशी वाढवता येईल आणि तिचा उपयोग आपल्या आवडीच्या कला किंवा छंद जोपासण्यासाठी कसा करता येईल हे पाहिले . ती कला किंवा तो छंद आपल्या जीवनाला आकार देऊ  शकतो असा असावा. हळूहळू त्यात सरावाने परिपूर्णतेकडे वाटचाल होऊ लागते. आपल्याला आपले ध्येय ठरवण्याच्या दृष्टीने काही गोष्टी आज जाणून घ्यायच्या आहेत. खरं म्हणजे त्यासाठी स्वतःला वेळ द्यायला हवा. या दृष्टीने कोरोना ही इष्टापत्ती म्हटली पाहिजे. कारण आपण सगळे घरी निवांत आहोत आणि आपल्याजवळ स्वतःला देण्यासाठी भरपूर वेळ आहे. मागच्या एका लेखात मी श्रेयस आणि प्रेयस म्हणजे काय हे सांगितले होते. ज्यांनी ते वाचले नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात पुन्हा सांगतो. श्रेयस म्हणजे ज्या गोष्टी अंतिमतः आपल्या हिताच्या आहेत अशा गोष्टी. आणि प्रेयस म्हणजे आपल्याला प्रिय असणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टी. आपल्याला आवडणाऱ्या गोष्...

ध्येय निश्चितीच्या मार्गावर - भाग दोन

उगवतीचे रंग ध्येय निश्चितीच्या मार्गावर - भाग दोन कालच्या लेखात आपण ध्येय निश्चिती करण्यापूर्वी स्वतःच्या प्रतिमेचे एकदा अवलोकन करावं असं पाहिलं होतं . त्यासाठी चिनी माणसं तीन स्तरावर आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाचं निरीक्षण, परीक्षण करतात हे ही आपण पाहिलं. त्यातील पहिला स्तर म्हणजे मी स्वतःला काय  समजतो. दुसरा स्तर म्हणजे लोक मला काय समजतात ? आणि तिसरा स्तर म्हणजे आरसा . म्हणजे सत्य परिस्थिती. कारण तुम्ही काय आहात हे सत्य आरसा तुम्हाला लक्खपणे दाखवतो. इथे आरसा म्हणजे आपले मन. ते आपल्याला स्वतःबद्दल सत्य काय आहे ते सांगते. या तीन स्तरांमधला पहिला स्तर अत्यंत महत्वाचा. कारण तुम्ही स्वतःला काय समजता, त्यावर खूप काही अवलंबून आहे. तुम्ही स्वतःला जे काही समजाल, तसे तुम्ही व्हाल. आता आजच्या विषयाकडे वळू या. एकदा हे आपलं परीक्षण आपण केलं की मग पुढची वाट आपल्याला स्पष्ट दिसू लागते. आपल्याला नेमके काय करावे लागेल, हे समजते. मग स्वतःबद्दल फाजील अहंकार किंवा न्यूनगंड सुद्धा असल्यास निघून जायला मदत होते. ध्येयनिश्चितीच्या मार्गावर वाटचाल करताना आपण सुरुवातीला एकाग्रता म्हणजे काय आण...

समृद्धीचे महावृक्ष - भाग दोन

उगवतीचे रंग  समृद्धीचे महावृक्ष - भाग दोन  माझ्या सुदैवाने मला अशी अनेक समृद्ध झाडं पाहण्याचं भाग्य लाभलं आहे. त्यांच्या सोबतीत मी काही काळ घालवला आहे. जो जो मी त्यांच्या सावलीत बसायचो ,  तो तो मला वाटायचं ,  की अरे आपण फारच कमी वेळ देतोय यांना . समुद्र किनाऱ्यावर बसावं आणि खेळण्यासाठी हातात वाळू घ्यावी ,  पण ती वाळू आपल्या हातातून निसटून जाते ,  तसे अनेक मौल्यवान क्षण माझ्या हातून निसटून गेले. कदाचित वाळूच्या ऐवजी रत्न माझ्या हाती लागली असती. पण बऱ्याच वेळेला मी ती संधी गमावली.  आमचे एक फॅमिली डॉक्टर होते. डॉ श्यामकांत देव. नावाप्रमाणेच देवमाणूस. मध्यम उंची ,  चेहऱ्यावर विलक्षण तेज. आणि काही शब्दातच समोरच्याचं मन जिंकून घेण्याची शक्ती असं लाघवी बोलणं. कोणालाही त्यांचा सहवास हवाहवासा वाटे असं त्यांचं लोभस व्यक्तिमत्व होतं. उतारवयात त्यांची अर्धांगिनी त्यांना सोडून गेली. त्यांच्या सौ. या मराठीच्या नामवंत प्राध्यापिका. त्यांच्याबद्दल बोलणे हा ही एक स्वतंत्र लेखाचा विषय.  तर या डॉ देवांना पत्नीचे निधन झाल्याने आणि मुले बाहेरगावी ...

ध्येयनिश्चितीच्या मार्गावर... भाग एक

उगवतीचे रंग  ध्येयनिश्चितीच्या मार्गावर... भाग एक आपल्याला आयुष्यात काही करायचे असेल, तर डोळ्यापुढे काहीतरी निश्चित ध्येय असणे आवश्यक असते. ध्येयहीन माणूस म्हणजे दिशाहीन प्रवाशासारखा. एखादा माणूस प्रवासाला निघाला आहे, आणि कुठे जायचे हेच माहिती नाही, तर तो भरकटणार, त्याची फरफट होणार. म्हणून आपल्या डोळ्यांसमोर ध्येय तर असलेच पाहिजे. पण ध्येय कोणी ठरवायचे आणि ते ठरवण्याची योग्य वेळ कोणती ? आपला साधारणपणे असा समज असतो, की लहान मुले, विद्यार्थी, युवक यांनी लहानपणीच आपले ध्येय ठरवून त्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे. पण ध्येयाचा  हा  फार मर्यादित अर्थ  झाला . ज्याला असे वाटते की मला माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन करायचे आहे, चांगले करायचे आहे, अशी कोणीही व्यक्ती आपले ध्येय निश्चित करू शकते. त्यासाठी वयाची अट नाही. आणि योग्य वेळ कोणती असे विचाराल तर ती आताची, या क्षणापासूनची. असं म्हणतात की '  It is never too late . ' ही ध्येयनिश्चिती कारण्याआधीची एक छोटीशी पायरी आपण समजून घेऊ या. ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची  . मी एका ठिकाणी वाचले होते की चिनी माणसे स...

समृद्धीचे महावृक्ष - भाग एक

उगवतीचे रंग  समृद्धीचे महावृक्ष - भाग एक आपण जंगलात गेलो की विविध प्रकारची झाडं आपल्याला दिसतात. लहान ,  मोठी. काही उंचच उंच सरळ वाढलेली ,  तर काही विशाल ,  डेरेदार. अशा झाडांची सावली पण दाट    पडते. उंचच उंच आणि सरळसोट वाढलेल्या झाडांच्या सावलीत कोणी बसत नाही. कारण ते फारशी सावली देऊ शकत नाही. काही तरी देण्यासाठी खाली वाकावंच लागतं ना ! आकाशातल्या मेघाला सुद्धा धरतीला जीवन देण्यासाठी खाली झुकावं    लागतं. बालकवींची एक कविता आहे. थबथबली ,  ओथंबून खाली आली जलदाली ,  मज दिसली सायंकाळी. जे खाली झुकत नाहीत ,  ते कसे देणार  ?  घेणारा आणि देणारा दोघांचंही नातं जमलं पाहिजे. म्हणून मेघ आणि धरणी यांचं नातं जमून येते. धरतीने आपली ओंजळ पसरलेली असते. आणि मेघराजा कृपावंत होऊन ती ओंजळ भरून देतो. देणारा भरभरून बरसतो आणि घेणारा तृप्त होतो. मग सर्वत्र नवचैतन्य फुलतं . नवीन बीजारोपण होतं . नवीन अंकुर फुटतात. जीवन चैतन्य आकाराला येतं .  या अंकुरलेल्या बीजांची मग हळूहळू वाढ होते. त्यांना जमीन ,  प्रकाश ,  ख...