मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उगवतीचे रंग वक्ता दशसहस्त्रेषु

उगवतीचे रंग  वक्ता दशसहस्त्रेषु  बऱ्याच वेळा टीव्ही वरचे रटाळ कार्यक्रम पाहिले की माझ्या मनात असा विचार येतो की खरोखर एखादे टीव्ही चॅनेल आपल्या  मालकीचे असायला हवे होते. खरं तर हे एक अत्यंत प्रभावी माध्यम. पण व्यापारी आणि स्पर्धात्मक मनोवृत्तीने यातली मजा आणि आनंद हरवला आहे. बोटांवर मोजण्याइतके क्वचितच काही चांगले कार्यक्रम बघायला मिळतात. विनोदी कार्यक्रमातही तेच ते रटाळ विनोदी प्रसंग,अचकट विचकट आणि अश्लीततेकडे झुकणारे विनोद बघायला मिळतात. कधी कधी हे  विनोदी कार्यक्रम हाच एक मोठा विनोद वाटावा अशी परिस्थिती आहे. पण अशा वेळी दोनच पर्याय तुमच्या हातात असतात आणि ते म्हणजे मुकाट्याने हे कार्यक्रम पाहणे ( ते छान आहेत असा समज करून घेऊन पाहणे ) आणि दुसरा पर्याय म्हणजे रिमोट तुमच्या हातात असते. तुम्ही ते बंदही करू शकता. बरेच वेळा हा दुसरा पर्याय मला अवलंबावा लागतो. आपण मराठीतील काही दर्जेदार विनोदी लेखकांचे साहित्य वाचले असेल तर आपल्या लक्षात येईल तो दर्जा आता राहिला नाही. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, द मा मिरासदार, राम गणेश गडकरी ( बाळकराम ), चिं वि जोशी आदींच्या विनोदातील ख...

उगवतीचे रंग आँखोंसे जो उतरी हैं दिलमें...

उगवतीचे रंग  आँखोंसे जो उतरी हैं दिलमें...  माझ्यासाठी वाचन हा दिव्यानंदाची अनुभूती देणारा अनुभव आहे.  एखादी छान पौर्णिमेची रात्र असावी आणि खिडकीतून चांदणं आत झिरपत यावं तसा शांत, दिव्य आणि प्रसन्न अनुभव वाचन आपल्याला देतं. या प्रसन्न अनुभवाचं माध्यम असतं एखादं आवडतं पुस्तक, कथा किंवा कविता. डोळ्यांच्या मार्गानं हे चांदणं थेट आतपर्यंत झिरपतं आणि आत्मानंदाचा प्रसन्न अनुभव देतं . एखाद्या पट्टीच्या गायकाला जसा मैफलीत सूर गवसावा आणि मैफल उत्तरोत्तर रंगत जावी तसाच हा अनुभव असतो. या मैफलीत श्रोते जसे सुरांच्या वर्षावाने सचैल न्हाऊन निघतात, तसाच आनंद चांगल्या पुस्तकाचं वाचन आपल्याला देतं.  बरं हे वाचन आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे. मार्ग वेगवेगळे आणि माध्यमही वेगवेगळे. पण परिणाम मात्र एकच असतो आणि तो म्हणजे आनंदाची अनुभूती. जेव्हा मी माझ्यासाठी वाचतो, तेव्हा पुस्तकातील ती अक्षरे अमूर्त रूप धारण करून डोळ्यांच्या खिडकीवाटे थेट मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. येताना ती अक्षरे एकेकटी येत नाहीत. ते आपल्यासोबत आनंद, प्रसन्नता कणाकणाने घेऊन आत शिरतात. काळोख्या रात्रीत जसे एखाद्या क...

शाश्वत समाधानाचे मुक्त विद्यापीठ : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

उगवतीचे रंग  शाश्वत समाधानाचे मुक्त विद्यापीठ : ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज   धर्म, अध्यात्म यांच्या नावावर बऱ्याच ठिकाणी बाजार मांडलेला पाहिला जात असताना, लोकांना साधी सोपी उपासना सांगणाऱ्या मुक्त विद्यापीठाचे नाव आहे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. प्रपंचात राहून परमार्थ कसा साधावा, प्रपंच आणि परमार्थ एकमेकात कसा मिसळून द्यावा याचे सोप्या भाषेत लोकांना ज्ञान देणारे विद्यापीठ म्हणजे गोंदवलेकर महाराज. तुम्ही गरीब असा की श्रीमंत, शिकलेले असा की अशिक्षित, स्त्री असा की पुरुष, पंडित असा वा सामान्य व्यक्ती तुमची कोणतीही पात्रता पाहिल्याशिवाय प्रवेश देणारे एकमेक मुक्त विद्यापीठ म्हणजे गोंदवलेकर महाराज. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात जे थोर संत होऊन गेले त्यातील सर्वात सोपी शिकवण देऊन लोकांना परमार्थ मार्गाकडे वळवणारे महान संत म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज.  सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गोंदवले हे महाराजांचे गाव. गणेश रावजी घुगरदरे असे त्यांचे मूळ नाव होते. महाराजांच्या घरात परंपरेने चालत आलेली विठ्ठलभक्ती आणि पंढरीची वारी होती. कुल्कर्णीपण होते. म...

उगवतीचे रंग - कृतज्ञता

उगवतीचे रंग  कृतज्ञता  माझ्या उगवतीचे रंग या सदराचे विविध विषय असतात हे आपण जाणत. आजचे उगवतीचे रंग मात्र कृतज्ञतेच्या रंगात रंगलेले आहेत. माझ्या जीवनात नुकत्याच घडून गेलेल्या एका घटनेच्या निमित्ताने मी ही कृतज्ञता व्यक्त करतो आहे. खरं तर आजचा लेख हा नेहमीप्रमाणे एखाद्या विशिष्ट विषयावर लिहिलेला लेख नाही तर या घटनेच्या निमित्ताने मी तुमच्याशी साधलेला मनमोकळा संवाद आहे. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या इतकाच हेतू या लेखनाचा आहे. आपल्या मनातील गोष्टी एखाद्याला सांगितल्या की जसे आपल्याला मोकळे वाटते तीच भावना यामागे आहे.  लेखनाच्या निमित्ताने माझी शेकडो व्यक्तींशी जिव्हाळ्याची नाती जोडली गेली. लेखकआणि वाचक एवढीच ती मर्यादित राहिली नाहीत. ही नाती रक्तापलीकडची आणि प्रसंगी रक्ताच्या नात्यापेक्षाही बळकट असणारी असतात याचा अनुभव मी घेतला आहे, घेतो आहे.   प्रसंग आहे २ डिसेंबर २०२२ चा. मी नाशिकला एका मुंजीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. तो कार्यक्रम आटोपून मी आणि माझी सौ. श्रद्धा असे आम्ही दोघे कारने चाळीसगावकडे परत येण्यासाठी निघालो. आम्ही निफाड, लासलगाव, मनमाड मार्गे...