*आई*
आई, कशी गाऊ तुझी थोरवी शब्दातून ?
तू तर सदैव माझ्या रोमारोमातून.
आई तुझ्या नेत्रातून पाझरे अपार स्नेह
आई तुझ्याच दुधाने पोसलेला माझा देह.
आई तुझिया स्पर्शाने पावन मज वाटे.
तू जवळ असता पंढरीचे सुख थिटे.
कसा गाऊ तुझा महिमा, काय शब्दांचा तो पाड ?
तू तर आहेस आई एक चंदनाचे झाड.
© *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*
*मो.९४०३७४९९३२*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा