आनंदयात्री रवींद्रनाथ पुस्तकात शेवटच्या पानावर घ्यावयाची कविता
पु ल देशपांडे यांच्या ' वंगचित्रे ' या पुस्तकात त्यांच्या ' शूरेर गुरु दाव गो शूरेर दिख्खा ' या कवितेचा उल्लेख करून त्याचे पुढीलप्रमाणे भाषांतर दिले आहे. तीच प्रार्थना आपण गुरुदेवांना करू या
सुरांच्या गुरुराया मला दीक्षा द्या सुरांची
मी भिकारी सुरांचा -
भिक्षा वाढा सुरांची -
शिकवलेत जे सूर मंदाकिनीच्या धारेला
शिकवलेत जे गाणे पहाटेच्या शुक्र ताऱ्याला
सोनचाफ्याच्या कानाकानात भरलेत जे सूर
ते मला शिकवा.
तुमच्या सुरांनी भरून घेऊन मन
जाईन जिथे असेल बेसुरपण
जिथे माजला असेल कोलाहल
जिथे असतील उठले भवरे
घेऊन जा तिथे हवं तर
वीणेची घ्यावया परीक्षा
पण सुरांच्या गुरुराया
पदरात सुरांची वाढा भिक्षा.
( वंगचित्रे - पु ल देशपांडे )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा