उगवतीचे रंग
विश्वास देशपांडे, चाळीसगाव
महानायक आजारी पडतो तेव्हा...
चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ अर्थात बिग बी स्मॉल बी, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांच्यासह कोरोनाची बाधा झाल्यामुळे मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. या प्रसंगी त्याला राजकारणी आणि सिने क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती भेटायला येतात. त्यांच्यामध्ये काय काय संवाद होतात ते बघा.
सुरुवातीला नानावतीचे डॉक्टर, ' बच्चनसाब, आपका बेड कहा लगवा दु ? '
' ये भी कोई पुछनेकी बात है डॉक्टरसाहब ? आप तो जानते है की हम जहाँ खडे ( अब पडे ) होते है, लाईन वहींसे शुरु होती है.'
अमिताभला स्पेशल रूम दिली जाते. तो बेडवर पडलेलाच असतो तेवढ्यात त्याला भेटायला राजेश खन्ना येतो.
' ए बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये. लंबी नही ये तो मेरा डायलॉग है. मेरी जगह तुमने कैसे ले ली बाबू मोशाय.? मै जानता हूं तुम्हे कुछ नही होगा. भगवान तुम्हारे सारे दुख मुझे दे दे और तुम्हे लंबी आयु दे. '
तो जात नाही तोपर्यंत शशी कपूर येतो. अमिताभला बेडवर पाहून त्याला वाईट वाटते. तो म्हणतो
' मेरे भाई, तुम्हारी जगह यहा नही है. शायद तुम गलतीसे आ गये हो. '
अमिताभ त्याला म्हणतो, ' हां, होता है ऐसा कभी कभी. ये सब तकदीर का खेल है मेरे भाई. तुम कहते थे ना, तुम्हारे पास क्या है ? तो लो आज सून लो. मेरे पास कोरोना है. बिलकुल नजदिक मत आना. वरना ये तुम्हे भी पकड लेंगा. '
शशी कपूर घाबरतच निघून जातो. तेवढ्यात धर्मेंद्रचे आगमन होते.
' जय, ये कैसे हो गया जय ? क्या हमारी दोस्ती को तुम भूल गये ? तुम्हे याद है ना वो गाना जो हम कभी गाया करते थे. ये दोस्ती हम नही तोडेंगे. मै तुम्हे अकेला नही लडने दूंगा इस बिमारीसे . तुम बिलकुल अकेले नही हो मेरे दोस्त. हम दोनो मिलके इसे खत्म करेंगे.'
एवढ्यात तिथे संजीवकुमारचे आगमन होते. त्याने अंगावर शाल पांघरलेली असते. धर्मेंद्रचे बोलणे त्याच्या कानावर पडलेले असते. तो दातओठ खाऊन म्हणतो
' तुम उसे नही मारोगे. तुम उसे पकडकर मेरे हवाले करोगे. इन हाथोमे अब भी बहुत ताकत है. '
धर्मेंद्र आणि अमिताभ म्हणतात, ' हम कोशिश जरूर करेंगे, ठाकूरसाहब. लेकीन ये अब बहुत कठीन लगता है.'
' कोशिश नही, तुम उसे पकडकर मेरे हवाले करोगे. हमे उसे इस दुनियासे खत्म करना है. और ध्यान रहे की आसान कामोके लिये इतने पैसे नही दिये जाते. '
ठाकूरसाब उर्फ संजीवकुमार गेल्यानंतर तिथे गब्बरचे आगमन होते. ( इथे गब्बर म्हणजे कोरोना आहे असे आपण समजू. ) सगळे नर्सेस, वॉर्डबॉय घाबरून एका कोपऱ्यात लपतात. डॉक्टर्स त्यांच्या रुममध्येच असतात. त्याची एंट्री झाल्याबरोबर ते विशिष्ट संगीत वाजते. नंतर ऐकू येते ते गब्बरचे गडगडाटी हास्य.
' आ गये ना इधर ? अपनेको मालूम था भिडू की एक दिन तुम इधरच आनेवाला है. जो अपने पीछे पडता है, उसका यही अंजाम होता है. पता है तुम्हे की घरमे जब बच्चा रोता है और बाहर जाने की जिद करता है, तो माँ उसे कहती है की बेटा बाहर मत जा. कोरोना तुम्हे पकड लेगा. जो नही सुनता है उसका यही हाल होता है. कितना इनाम रखा है सरकारने हमारे सरपर, लेकिन अभीतक कोई हमारी दवा नही बना पाया . ' असे म्हणून तो घोड्यावर स्वार होऊन तेथून निघून जातो.
काही वेळाने त्या ठिकाणी अमरीश पुरीचे आगमन होते. गेटच्या बाहेरूनच त्यांचा खर्जातला आवाज ऐकू येतो. हॉस्पिटलच्या रिसेप्शन काउंटरवर कोणी तरी त्यांचे ओळखपत्र मागतं.
' तुम्हारी हिम्मत कैसे हुई ? मुझसे मेरा पहचानपत्र मांगते हो ? खबरदार अगर किसीने भी मुझे रोकने की कोशिश की तो. ' सगळे घाबरून बाजूला होतात. अमरीश पुरींचा प्रवेश थेट अमिताभच्या रूममध्ये होतो. आपल्या खर्जातल्या आवाजात अमिताभला मोठे डोळे करून विचारतात
' ऐसे क्या देख रहे हो ? क्या मै तुम्हे मिलने नही आ सकता ? देखो, इस वक्त तुम बिमार हो. मुगाम्बो खुश हुआ ये तो नही कह सकता ना...! मै तुम्हे एक हफ्ते की मोहलत और देता हूँ. इतने समयमे अगर तुम ठीक नही हुए तो मूझेही कुछ करना पडेगा. '
अशातच बातमी येते की माननीय मुख्यमंत्री अमिताभच्या भेटीला येताहेत. नर्सेस, वॉर्डबॉय यांची धावपळ सुरु होते. डॉक्टर्स आपलं ते पीपीई की काय ते किट घालून तयार असतात. साफसफाई करणाऱ्यांवर उगीचच आरडाओरडा केला जातो. अमिताभची रूम स्वच्छ असली तरी परत एकदा जंतुनाशकाचा फवारा मारून आणि फरशा स्वच्छ पुसून चकाचक केली जाते. मुख्यमंत्री थेट अमिताभच्या खोलीत येतात. सोबत डॉक्टरांची टीम आहेच. अमिताभ त्यांना पाहिल्यानंतर उठून नमस्कार करण्याचा प्रयत्न करतो.
' अरे आप उठीये मत. आराम किजीये . आपको जल्दी ठीक होना है. अब कैसा लग रहा है आपको ? '
' जी मै बिलकुल ठीक हूँ. '
' कोई परेशानी तो नही ना..? अगर हो तो हमे बताओ. '
डॉक्टरांकडे वळून, ' हे बघा, यांची नीट काळजी घ्या. अभिषेक, ऐश्वर्या आणि आराध्या यांच्याकडेही नीट लक्ष द्या. मला कोणतीही तक्रार यायला नको आहे. '
प्रमुख डॉक्टर, ' साहेब, आम्ही आमच्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करतो आहोत. आपण कोणतीही काळजी करू नका. '
मुख्यमंत्री ' मग ठीक आहे. प्रयत्न करताय ना. केलेच पाहिजे. काळजी घेताय ना ? काळजी तर घेतलीच पाहिजे. काळजी घेतल्याशिवाय कसं चालणार ? काळजी घेणंच फार महत्वाचं आहे. कोरोनाचं संकट आपल्या सर्वांवरच आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यावर मात केली पाहिजे. त्याशिवाय तो जाणार कसा ? ' डॉक्टरांना सूचना देऊन मा मुख्यमंत्री आपल्या ताफ्यासह निघून जातात.
दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलच्या बाहेर अजून कडक बंदोबस्त दिसतो. सुरक्षा वाढवली जाते. ब्लॅक कॅट कमांडो इमारतीचा ताबा घेतात. बातमी येते की मा पंतप्रधान अमिताभची विचारपूस करण्यासाठी येत आहेत. सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला त्यांचे आगमन होते. आपल्या सुरक्षा पथकाला बाहेरच ठेवून ते एकटेच अमिताभच्या भेटीला येतात. प्रवेशद्वारावर डॉक्टरांची टीम त्यांचं अदबीनं स्वागत करते. चालता चालता ते डॉक्टरांना विचारतात
' कहिये, सब ठीक तो है ? '
सगळे डॉक्टर्स एका आवाजात, ' एस सर. एव्हरीथिंग इस ओके. वी आर ट्राईन्ग अवर बेस्ट. '
अमिताभच्या रूममध्ये येतात. अमिताभ आधीच बेडवर उठून बसलेला असतो. त्यांना पाहिल्यावर हात जोडून नमस्कार करतो.
' कैसे हो ? यहां कोई कमी तो नही ? 'मा पंतप्रधान
' जी नही. आप हमे देखने आये ये हमारा सौभाग्य है. '
' अरे ऐसे क्यू कहते हो अमितजी ? आपकी ओर तो पुरे देश का ध्यान लगा हुआ है. आपको जल्दी ठीक होना है और लोगोंको बताना भी है की कोरोना महामारी का मुकाबला आपने कैसे किया. तो आप जल्दी ठीक हो जाईये. '
मग एका हॉलमधेय मा पंतप्रधान हॉस्पिटलच्या नर्सेस, वॉर्डबॉय आणि डॉक्टर्सना पाच मिनिट संबोधित करतात.
' भाइयों और बहनो, मै जानता हूँ की इस परीक्षा की घडी मे आप सब जी जानसे मेहनत कर रहे हो. ध्यान रहे की कोरोना को हमे हर हाल मे हराना है. दुनिया की ऐसी कोई बिमारी नहीं है की जो ठीक नहीं हो सकती. हमे सावधानी बरतनी होगी. अपनी इम्युनिटी बढानी होगी. योग और प्राणायाम के नियमित करनेसे हमे इसे दूर रखनेमे सहायता होगी. जल्दी ही हम इस बिमारी पर काबू पाने की कोशिश करेंगे और दुनिया को ये दिखा देंगे की भारत के पास हर समस्या का समाधान है और हम दुनियाको भी मार्गदर्शन कर सकते है. जय हिंद. आप सभी को मेरी शुभ कामनाये. '
अशा रीतीने मा पंतप्रधानांच्या भेटीने अमिताभला भेटणाऱ्यांची सांगता झाली. नंतर डॉक्टरांनी इतरांना भेटीची मनाई केली आहे. रेखा वगैरे मंडळी आधीच भेटून गेली होती. त्यांची माहिती उपलब्ध नाही.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
१५/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित शेअर करावा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा