उगवतीचे रंग
काल दंड गहि काहु न मारा ! हरइ धर्म बल बुद्धी बिचारा !
निकट काल जेहि आवत साई ! तेहि भ्रम होइ तुम्हारीहि नाई !!
' काळ काठी घेऊन कोणाला मारीत नाही. तो धर्म, बुद्धी, बल आणि विचार यांचे हरण करतो. हे स्वामी ! ज्याचा काळ ( मरण ) निकट येतो त्याला आपल्या प्रमाणेच भ्रम होतो. '
म्हणतात ना काळाचा मार किंवा काठी दिसत नाही. तसेच रावणाचे झाले आहे. पुढे अंगदाने त्याला परोपरीने समजावले. अंगद म्हणतो मी तुझ्यासारख्याला मारून, तुझ्या सेनेचा संहार करून, तुझी लंका नष्ट करून सीताजींना घेऊन जाईन . आणि असे केले तरी काही गैर नाही . पण मी तुला आता मारीत नाही. त्याचे कारण तो फार छान सांगतो
वाममार्गी, कंजूष, कामी , अत्यंत मूढ, अति दरिद्री, बदनाम, अत्यंत म्हातारा, सदा आजारी, नेहमी क्रोधयुक्त राहणारा, भगवान विष्णूशी विन्मुख झालेला, वेद आणि संतांचा विरोधी , आपलेच शरीरपोषण करणारा, दुसऱ्यांची निंदा करणारा, आणि पापांची खाण म्हणजे महान पापी हे चौदा गुणलक्षण असलेले प्राणी जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच आहेत. अशा लोकांमध्येच तुझी गणना होते.
अंगदाने वर्णन केलेले हे चौदा गुणलक्षण आपणही एकदा विचार करावा असे आहेत. म्हणून या ठिकाणी मी त्यांचा उल्लेख केला.
रावणासारखे लोक आपल्याबरोबरच आपल्या राष्ट्राला, आपल्या प्रजाजनांना, आपल्या नातेवाईकांना विनाशेच्या गर्तेत घेऊन जातात. असे लोक सत्तास्थानी असणे हे त्या राष्ट्राचे दुर्दैव असते. असे लोक लंकेसारख्या सोन्याच्या राष्ट्राचा सुद्धा विनाश करतात. आणि सोन्यासारख्या गोष्टींची माती करतात.
तर ज्या रामाला तो सारखा वनवासी, मानव म्हणून हिणवतो, तो राम सद्गुणांची खाण आहे. हनुमान, अंगद यांच्यासारखे महापराक्रमी, बुद्धिमान सेवक, सुग्रीवसारखा मित्र आणि त्यांची सगळीच सेना श्रीराम देव म्हणून त्याच्या बरोबर आलेली नाही. श्रीरामाचे गुण आणि पराक्रम पाहून ही सगळी मंडळी त्याच्या पाठीशी उभी राहिली आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. राम हा आपले वचन पाळणारा, शरणागताला आश्रय देणारा होता . सज्जनांना अभय देणारा होता. म्हणून तो सगळ्यांना प्रिय होता.
रावणासारख्या असुर प्रवृत्तीच्या विरोधात तो आपले धनुष्य घेऊन उभा आहे. अशा वीरांची साथ देवही देतो. असेच लोक नराचा नारायण होतात. प्रातःस्मरणीय होतात. वंदनीय होतात. ही धरती, ही मायभूमी अशाच सुपुत्रांची अपेक्षा करीत असते. अशी माणसे युगानुयुगे तुमच्या आमच्या मनावर राज्य करत राहतात. राज्य करीत राहतील.
विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
रामकथा - भाग सात (रावण )
रावण हे रामायणातील महत्वाचे पात्र आहे. रावणाशिवाय रामायण पूर्ण होऊ शकत नाही. राम, लक्ष्मण, सीता इ रामायणातील व्यक्तिरेखा जशा अमर झाल्या आहेत, तशीच रावणाची व्यक्तिरेखा त्यांच्यासोबत अमर झाली आहे. राम हा सद्गुणांचा प्रतिनिधी आहे. तर रावण हा दुर्गुणांचा. दुसऱ्या शब्दात बोलायचे तर राम आणि रावण या प्रवृत्ती आहेत. सुष्ट आणि दुष्ट, चांगले आणि वाईट या त्या प्रवृत्ती. या प्रवृत्ती अनादिकालापासून चालत आल्या आहेत. फरक एवढाच आहे की प्रत्येक युगात त्यांचे प्रमाण कमी जास्त होत असते. कलियुगात मात्र या प्रवृत्तीचा प्रभाव वाढला आहे.
रावण हा रामायणकाळातील एक महापुरुष होता. ' महापुरुष ' हा शब्द येथे रावणाचा गौरव करण्यासाठी वापरला नाही. तर त्याचे त्या काळातील स्थान सांगण्यासाठी वापरला आहे. त्याला महापुरुष म्हणण्याचे कारण असे की तो अत्यंत विद्वान, शूर, बुद्धिमान, चार वेद आणि सहा उपनिषदे यात पारंगत असलेला होता. त्याला संगीताचे ज्ञान होते. रावणाच्या नावावर रावणसंहिता हा ज्योतिषशास्त्रावरील ग्रंथ, कुमारतंत्र, सामवेदातील ऋचा, शिवतांडव स्तोत्र आणि वीणा, बुद्धिबळ यांची निर्मिती या गोष्टींचे श्रेय जाते. तो दशानन म्हणजे खरोखर दहा तोंडे असणारा असा शब्दशः अर्थ न घेता चार वेद आणि सहा उपनिषदे त्याला मुखोद्गत होती, या अर्थाने घेतला पाहिजे. दहा विद्वानांची विद्वत्ता त्याच्या ठायी एकवटली होती या अर्थाने दशानन हा शब्द घेता येईल. लंकेसारख्या समृद्ध राज्याचा तो स्वामी होता. इंद्रादी देवांना सुद्धा त्याने बंदी बनवले होते. तो अत्यंत धार्मिक असून शंकरांचा परमभक्त होता. एवढे सगळे गुण त्याच्यात असूनही तो दुर्गुणांचे प्रतीक ठरला. त्याचे कारण म्हणजे तो स्त्रीलंपट होता. यक्ष, देव, दानव, मानव या सगळ्या जमातीतल्या कुठल्या ना कुठल्या स्त्रीवर त्याने अत्याचार केला होता. परिणामी त्याला ब्रह्मदेवाकडून शापही मिळाला होता. म्हणूनच तो सीतेवर बळजबरी करू शकत नव्हता. त्याच्या या कामुक प्रवृत्तीने त्याच्या सर्व सद्गुणांवर बोळा फिरवला होता. अन्यथा खरोखरीच रावणाचे नाव त्या काळातील महापुरुषात घेतले गेले असते.
रावण हा पुलस्त्य ऋषींचा नातू आणि विश्रवा ऋषींचा मुलगा होता. त्याची आई कैकसी मात्र दानव कुळातील होती. रावणामध्ये जे चांगले गुण आपल्याला दिसतात, ते त्याला त्याच्या पित्याकडून वारशाने मिळाले होते असे म्हणता येतील. त्याची भक्ती, धार्मिक प्रवृत्ती, विद्वत्ता, वेद, उपनिषदांचे ज्ञान त्याला आपल्या पित्याकडून वारशाने मिळाले होते. पण त्याच्यातील स्त्रीलंपटता, दंभ, अहंकार इ गोष्टी त्याच्या आईकडून म्हणजे दानव कुळातील असलेले दुर्गुणही त्याच्यात उतरले होते. रावणाला जरी लंकाधीश म्हटले जात असले तरी तो मूळ लंकेचा राजा नव्हता. लंकेचे राज्य त्याने आपला मोठा भाऊ कुबेर याच्याकडून बळजबरीने हस्तगत केले होते. रावणाचा भाऊ जो बिभीषण, त्याने मात्र आपल्या वडिलांकडील सगळे गुण घेतले होते. म्हणूनच बिभीषण हा सात्विक प्रवृत्तीचा होता. रामाचा भक्त होता. पण रावणाचा भाऊ कुंभकर्ण, बहीण शूर्पणखा इ नी राक्षसकुळाचाच वारसा पुढे चालवला होता. राक्षसकुळातील दुर्गुण त्यांच्यातही उतरले होते.
रावणाने घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांची कृपा प्राप्त केली होती. पण त्याला भगवान शंकरांकडून जे वरदान मिळाले होते, त्यामुळे तो उन्मत्त झाला होता. रावणासारख्या ज्या ज्या असुरांनी देवांकडून वरदान मिळवले, ते पुढे उन्मत्त होऊन ज्यांनी त्यांना शक्ती प्रदान केली त्यांनाच आव्हान द्यायला निघाले. परिणामी त्यांनी नाश ओढवून घेतला. रावणाची कथा सुद्धा त्याच प्रकारची आहे. रावण एवढा उन्मत्त झाला होता की त्याला जी स्त्री आवडली तिला तो बळजबरी उचलून घेऊन जात असे. पण याची परिसीमा त्याने जेव्हा सीतेसारख्या पतिव्रतेला पळवून नेले तेव्हा झाली. तेथूनच त्याच्या अध:पतनास सुरुवात झाली.
रावणाच्या पूर्वपुण्याईने त्याला मंदोदरीसारखी सुशील, धार्मिक आणि पतिव्रता पत्नी लाभली होती. मंदोदरी ही मयासुराची कन्या. तिने रावणाची पत्नी म्हणून दोन्ही प्रकारे आपले कार्य उत्तम बजावले. पहिले म्हणजे वेळोवेळी त्याला त्याच्या कर्तव्याची, चुकीची जाणीव करून दिली. सीतेला रामाकडे परत पाठवा असे तिने रावणाला वेळोवेळी निक्षून सांगितले आहे. दुसरे म्हणजे पत्नीधर्म म्हणून तो चुकतो आहे हे माहित असूनही ती रावणाच्या पाठीशी प्रत्येक वेळा उभी राहिली आहे. मंदोदरीची गणना ज्या प्रसिद्ध पाच पतिव्रता होऊन गेल्या त्यामध्ये होते. रावणाने अशा आपल्या या पत्नीच्या सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि सर्वनाश ओढवून घेतला.
विनाशकाले विपरीत बुद्धी. रामचरितमानस मध्ये एक श्लोक आहे. तो मंदोदरीच्या तोंडी आहे. ती म्हणते
काल दंड गहि काहु न मारा ! हरइ धर्म बल बुद्धी बिचारा !
निकट काल जेहि आवत साई ! तेहि भ्रम होइ तुम्हारीहि नाई !!
' काळ काठी घेऊन कोणाला मारीत नाही. तो धर्म, बुद्धी, बल आणि विचार यांचे हरण करतो. हे स्वामी ! ज्याचा काळ ( मरण ) निकट येतो त्याला आपल्या प्रमाणेच भ्रम होतो. '
म्हणतात ना काळाचा मार किंवा काठी दिसत नाही. तसेच रावणाचे झाले आहे. पुढे अंगदाने त्याला परोपरीने समजावले. अंगद म्हणतो मी तुझ्यासारख्याला मारून, तुझ्या सेनेचा संहार करून, तुझी लंका नष्ट करून सीताजींना घेऊन जाईन . आणि असे केले तरी काही गैर नाही . पण मी तुला आता मारीत नाही. त्याचे कारण तो फार छान सांगतो
वाममार्गी, कंजूष, कामी , अत्यंत मूढ, अति दरिद्री, बदनाम, अत्यंत म्हातारा, सदा आजारी, नेहमी क्रोधयुक्त राहणारा, भगवान विष्णूशी विन्मुख झालेला, वेद आणि संतांचा विरोधी , आपलेच शरीरपोषण करणारा, दुसऱ्यांची निंदा करणारा, आणि पापांची खाण म्हणजे महान पापी हे चौदा गुणलक्षण असलेले प्राणी जिवंत असूनही मेल्याप्रमाणेच आहेत. अशा लोकांमध्येच तुझी गणना होते.
अंगदाने वर्णन केलेले हे चौदा गुणलक्षण आपणही एकदा विचार करावा असे आहेत. म्हणून या ठिकाणी मी त्यांचा उल्लेख केला.
रावणासारखे लोक आपल्याबरोबरच आपल्या राष्ट्राला, आपल्या प्रजाजनांना, आपल्या नातेवाईकांना विनाशेच्या गर्तेत घेऊन जातात. असे लोक सत्तास्थानी असणे हे त्या राष्ट्राचे दुर्दैव असते. असे लोक लंकेसारख्या सोन्याच्या राष्ट्राचा सुद्धा विनाश करतात. आणि सोन्यासारख्या गोष्टींची माती करतात.
तर ज्या रामाला तो सारखा वनवासी, मानव म्हणून हिणवतो, तो राम सद्गुणांची खाण आहे. हनुमान, अंगद यांच्यासारखे महापराक्रमी, बुद्धिमान सेवक, सुग्रीवसारखा मित्र आणि त्यांची सगळीच सेना श्रीराम देव म्हणून त्याच्या बरोबर आलेली नाही. श्रीरामाचे गुण आणि पराक्रम पाहून ही सगळी मंडळी त्याच्या पाठीशी उभी राहिली आहेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. राम हा आपले वचन पाळणारा, शरणागताला आश्रय देणारा होता . सज्जनांना अभय देणारा होता. म्हणून तो सगळ्यांना प्रिय होता.
रावणासारख्या असुर प्रवृत्तीच्या विरोधात तो आपले धनुष्य घेऊन उभा आहे. अशा वीरांची साथ देवही देतो. असेच लोक नराचा नारायण होतात. प्रातःस्मरणीय होतात. वंदनीय होतात. ही धरती, ही मायभूमी अशाच सुपुत्रांची अपेक्षा करीत असते. अशी माणसे युगानुयुगे तुमच्या आमच्या मनावर राज्य करत राहतात. राज्य करीत राहतील.
रावणाचा भाऊ बिभीषण याने सुद्धा सीतेला परत करून श्रीरामांना शरण जा असा सल्ला रावणाला दिला होता. पण जी व्यक्ती अहंकाराच्या नशेत चूर असते, तिला कोणाचेच चांगले म्हणणे पटत नाही. अशी व्यक्ती आपल्याच धुंदीत असते. रावणही अशाच धुंदीत होता. राम लक्ष्मणासारखे मानव आणि सुग्रीवाच्या नेतृत्वाखाली असणारी वानरसेना आपले काही बिघडवू शकेल असे त्याला वाटले नाही. रावणासारख्या अन्यायी आणि अत्याचारी प्रवृत्तीच्या नाशासाठीच तर श्रीरामांचा जन्म होता. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे पारिपत्य हे त्यांचे ब्रीद होते. जो जो त्यांना शरण आला, त्याचे रक्षण त्यांनी केले.
रावण नष्ट झाला तरी ती प्रवृत्ती मात्र समाजातून नष्ट झाली नाही. रावण हा असुर होता. असुर म्हणजे डोक्यावर दोन शिंगे असणारे, प्रचंड धिप्पाड, अक्राळविक्राळ असेच असतात असे नाही. ते चांगले कपडे परिधान केलेले, चांगल्या गाड्यातून फिरणारे, शिकलेले अशाही वेशात असू शकतात.असुर प्रवृत्तीचा नाश व्हायला हवा असेल तर श्रीरामाचे गुण अंगी बाणवावे लागतील. श्रीरामाची फक्त पूजा करून चालणार नाही. त्याच्या गुणांची पूजा बांधली पाहिजे.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव
३१/०७/२०२०
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा