मुख्य सामग्रीवर वगळा

मो. रफी - एक महान कलाकार

 उगवतीचे रंग 

मो.रफी-एक महान कलाकार


     परवा प्रवासात येताना गाडीमध्ये शास्त्रीय गाण्यांची एक सी डी  ऐकत होतो. त्यातील पहिल्याच गाण्याने मन  आकर्षून घेतले. गीत होते " मन तडपत हरी दर्शन को  आज. " बैजू बावरा या चित्रपटातील हे  गीत गायले आहे मोरफीने. या गीताचे संगीतकार आहेत  नौशाद .  लिहिले आहे हिंदी  चित्रपट सृष्टीतील महान गीतकार शकील बदायुनी यांनी. श्रीकृष्ण भक्तीचे हे गीत इतके अप्रतिम आहे की ऐकताना जणू समाधी लागते. नादब्रह्म म्हणजे काय याचा प्रत्यय हे गीत ऐकताना येतो. 

    हे गीत  तयार करणारे हे तिन्ही कलाकार धर्माने मुस्लिम  पण त्यांचा धर्म हे गीत सादर करताना कुठेही आड आला नाही. मोरफीने हे गीत अक्षरशः जीव  ओतून गायले आहे. त्यातील ईश्वर भक्तीची आर्तता मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. मालकंस रागावर आधारित हे गीत आहे. या गीताबद्दल संगीतकार नौशाद म्हणतात , "  यात मी विशेष काही केले नाही. ही तर रफीसाहेबांची कमाल आहे. " मोरफी म्हणतात की , यामध्ये मी विशेष असे काही केलेले नसून ही राग मालकंसची कमाल आहे. हे सगळे एवढे महान कलाकार आहेत की स्वतःकडे मोठेपणा घ्यायला  नाही. 
 
     मोरफीबद्दल नौशादजी म्हणतात, " असा कलाकार शेकडो वर्षातून एखादाच जन्माला येतो.  आजही भारतातले लाखो लोक आहेत की ज्यांचा दिवस मोरफीच्या आवाजाने सुरु होतो आणि रात्रही त्यांच्याच आवाजाने .  दुनियेत करोडो लोक आहेत की  रफी साहेबांचे चाहते आहेत. " मोरफी कलाकार म्हणून जेवढे श्रेष्ठ होते तेवढेच एक माणूस म्हणूनही महान होते. अनेक  गरजूना त्यांनी कोणतीही जाहिरात न करता मदत केली.  किस्सा कोहिनुर चित्रपटातील मोरफीच्या गाण्याचा आहे. मधुबन मे राधिका नाचे रे .सुरुवातीला हे गीत गाण्यास कठीण आणि त्यातील शास्त्रीय संगीतामुळे लोकांना कितपत आवडेल  होता. त्यामुळे चित्रपट निर्मात्याने हे गीत असे ठरवले. पण मोरफीनी  त्यांना विनंती  केली,मला हे गीत गाऊ द्या. हे गीत लोकप्रिय  झाले तर मी माझे मानधन घेईन. रफींनी हे गीत गायले आणि  प्रचंड गाजले. याही गीताच्या लोकप्रियतेबद्दल त्याचे  श्रेय घेण्यास ना संगीतकार नौशाद तयार होते ना मोरफी. इतकी ही मंडळी महान होती.  निर्मात्यांनी मोरफींना  त्यांची फी विचारली तर ते म्हणाली की , मला  माझी फी मिळाली आहे. लोकांनी हे गाणे पसंत केले हीच माझी फी आहे. ती मला मिळाली. 

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...