मुख्य सामग्रीवर वगळा

ध्येय निश्चितेकडे वाटचाल - भाग सहा

उगवतीचे रंग

  ध्येय निश्चितेकडे वाटचाल - भाग सहा

भाग पाचमध्ये आपण स्वतःच स्वतःवर घातलेल्या मर्यादा किंवा बंधने आपल्यालाच कशी अडचणीची ठरतात ते पाहिले. आणि ते तोडण्यासाठी दुसरे कोणी येणार नाही तर आपल्यालाच ती बंधने तोडावी लागतील. कारण आपणच ती घालून घेतलेली असतात. आपण ध्येय मार्गावर वाटचाल तर सुरु केलीच आहे. ती करत असताना त्या मार्गावर दृढ राहण्यासाठी काय काय करावं लागेल ते आपण आज पाहू या. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेऊ या. ती म्हणजे ध्येय मार्गावरील वाटचाल ही एक साधना आहे, तपश्चर्या आहे. आणि तपश्चर्येशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही हा एक साधा नियम आहे. तो आपण कायम लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला कोणती साधना किंवा तपश्चर्या करायची आहे ? ऋषीमुनी, योगिजन आपल्या अध्यात्मिक उन्नतीसाठी करतात तशा प्रकारची तपश्चर्या या ठिकाणी अपेक्षित नाही. ही तपश्चर्या किंवा साधना आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी करायची आहे. एकलव्याचे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एकट्याने आणि एकाग्रतेने केलेली  साधना म्हणजे एकलव्याचे उदाहरण आहे. आपल्यालाही आपले ध्येय साध्य करण्यासाठी एकलव्य बनायचे आहे. तो ध्यास महत्वाचा आहे.

प्रख्यात गायिका लता मंगेशकर कोणाला माहिती नाहीत ? त्यांचे जीवन म्हणजे एक साधना आहे. आणि ही साधना वयाच्या नव्वदीनंतरही त्या अजून करतच आहेत. म्हणजे एक ठराविक ध्येय गाठले किंवा वय झाले म्हणजे साधना संपते असे नाही. ज्या व्यक्तीला मोठे ध्येय गाठायचे असते, त्या व्यक्तीला आपल्या किरकोळ सुखांना बऱ्याच वेळा तिलांजली द्यावी लागते. मला जर चांगले गायक व्हायचे असले तर माझ्या घशासाठी , गळ्यासाठी मला काही पथ्य पाळावी लागतील. आपण त्यांना क्षणिक सुखे म्हणू या. मग अति तेलकट, तिखट, मसालेदार खाणे, थंड पदार्थ मला वर्ज्य करावे लागेल. नाहीतर ऐन मैफलीत माझा गळा मला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. मला आयुष्यात एक यशस्वी व्यक्ती व्हायचे असेल, तर टीव्ही, मोबाईल, झोप इ गोष्टींवर किती वेळ घालवायचा हे मला ठरवावे लागेल. याचा अर्थ असा नाही की आपण जीवनाचा आनंद घ्यायचा नाही. पण आनंद घेताना ध्येयाचा ध्रुवतारा आपल्या डोळ्यासमोर नक्कीच असू द्या. म्हणजे आपण भरकटणार नाही.

बऱ्याचदा गल्लीगल्लीत, चौकात काही तरुणांचे घोळके आपल्याला दिसतात. येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल करणे, मुलींना, महिलांना बघून अचकट विचकट बोलणे, नको ते हातवारे करणे या सगळ्या गोष्टी कोणाही चांगल्या व्यक्तीला चीड आणणाऱ्या आहेत. ज्यांच्याकडे राष्ट्र मोठ्या आशेने भविष्यातील जबाबदार नागरिक म्हणून पाहते आहे, अशा तरुणाईची ही ऊर्जा अनाठायी खर्च होताना पाहून वाईट वाटते. दुसरीकडे आपल्या ध्येयमार्गावर निष्ठेने वाटचाल करणारे तरुणही मी पाहिले आहेत. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी तासंतास अभ्यास करणारे, आपले शरीर सुडौल बनवण्यासाठी जिममध्ये घाम गाळणारे तरुण आहेत. आज देशावरच नव्हे तर सगळ्या जगावर ओढवलेल्या कोरोनासारख्या आपत्तीत लोकांच्या मदतीला धावून जाणारे तरुणही आहेत. ही सगळी मंडळी खरोखरच प्रशंसेला पात्र आहेत.

पण हे सगळे करताना गंभीर राहण्याची आवश्यकता नाही. जणू काही सगळ्या जगाची चिंता माझ्या शिरावर अशासारखे काही वागत आणि जगत असतात. आपल्याला गंभीरराव व्हायचे नाही. खंबीरराव व्हायचे आहे. हे जीवन म्हणजे आपल्याला मिळालेली एक अमूल्य भेट आहे. ते हसतखेळतच जगले पाहिजे. तुम्ही प्रख्यात गायिका आशा भोसलेंना टीव्ही वरील अनेक रिऍलिटी शो मध्ये पाहिले असेल. आज त्यांचे वय पंच्याऐशी वर्षांचे आहे. पण त्यांची एनर्जी लेव्हल काय जबरदस्त आहे. अजूनही हसतात, नाचतात, गातात . त्यांच्यासारख्या फार कमी  व्यक्ती आपण पाहिल्या असतील की ज्या वयाच्या या कालावधीत एवढ्या कार्यरत राहणाऱ्या असतील ! कसं जगावं ? तर असं जगावं . त्या आहेत त्याचं मूर्तिमंत उत्तर. त्यांना आयुष्यात दुःख, संकटं आली नाहीत, असं आपल्याला वाटतं का ? नक्कीच आलीत. पण त्या सगळ्यातून बाहेर पडून त्यांनी आपली जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती कोमेजू दिली नाही. त्यांचा चेहरा बघा आजही कसा प्रफुल्लित असतो. हे प्रफुल्लित असणं वरवरचं नसतं. ते आतून, अंतरंगातून एखाद्या फुलासारखं फुलून येतं . म्हणून तर आपल्याला आपलं अंतरंग समृद्ध करायचं आहे. त्यांनी त्यांचं ' आशा ' हे नाव अगदी सार्थ केलं आहे. हीच ' आशा ' आपल्यालाही आपल्या आतमध्ये जागवायची आहे. आणि जिथे उत्कट आशा असते, तिथे निराशेला थारा नसतो.

दिल है छोटासा, छोटीसी आशा
मस्ती भरे मन की भोली सी आशा
चाँद तारोंको छुने की आशा
आसमानोमे उडने की आशा

या गाण्याचे बोल फार साधे,सोपे पण सुंदर आहेत. छोटीसी आशा कोणती ? तर ' चाँद तारोंको छुनेकी, आसमान छुनेकी. ' म्हणजेच काहीतरी मोठे कार्य करून दाखवण्याची. ही आशा स्वतःमध्ये जागवतानाच स्वतःला सांगा, " मी म्हणजे अक्षय ऊर्जेने भारलेले व्यक्तिमत्व आहे. मला अशक्य असे काही नाही. माझ्यात कोणतेही कार्य करण्याची अमर्याद ऊर्जा ठासून भरली आहे." ही तीन वाक्ये दिवसातून अनेक वेळा एखाद्या मंत्रासारखी स्वतःशी म्हणा. आणि तो उत्साह, ती ऊर्जा जागवा. Empower yourself with these positive thoughts . आणि मग बघा तुमच्या व्यक्तिमत्वात कसे जादुई परिवर्तन घडून येते ते.. ( क्रमशः )

- *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.*
   *९/५/२०२०*
  *भ्रमणध्वनी* *९४०३७४९९३२*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...