मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नात्यांचं महावस्त्र – भाग अठरा : 'समाज'

उगवतीचे रंग ​नात्यांचं महावस्त्र – भाग अठरा : 'समाज' (माणूसपणाला आकार देणारे विशाल महावस्त्र) ​प्रिय वाचकहो, प्रत्येक भागागणिक नात्यांच्या महावस्त्राचे विविध पदर उलगडून पाहण्याचा प्रयत्न आपण अखंडपणे करत आहोत. हा भाग लिहिताना मनात असा विचार आला की, या नात्यांच्या महावस्त्रामध्ये 'समाज' या घटकाचा अंतर्भाव करावा का? मग अधिक विचार करताना असं लक्षात आलं की, माणूस वाढतो आणि घडतो तो समाजातच! त्याचं कर्तृत्व, त्याचे विचार आणि त्याचे संपूर्ण अस्तित्व विकसित होते ते केवळ आणि केवळ समाजामध्येच. ​एखादं अवाढव्य यंत्र असावं आणि त्याचे अनेक बारीक-सारीक भाग त्याच्याभोवती समन्वयाने सतत फिरत राहावेत; अगदी तसंच माणूस आणि समाज यांचं अतूट नातं आहे असं मला वाटतं. त्या यंत्रातील एखादा जरी लहानसा भाग बिघडला तरी संपूर्ण यंत्राचे कार्य थांबतं. त्याप्रमाणेच आपण सगळे या समाजरूपी महायंत्राचा एकेक अविभाज्य घटक आहोत; म्हणजेच आपल्या प्रत्येकाची समाजाप्रती काहीएक निश्चित जबाबदारी आहे. मग या समाजाचा विचार 'नात्यांचं महावस्त्र' विणताना का करू नये? आणि म्हणूनच आजचा हा लेख! जेव्हा समाजाचा विचार...

नात्यांचं महावस्त्र – भाग सतरा : 'शेजारी'

उगवतीचे रंग ​नात्यांचं महावस्त्र – भाग सतरा : 'शेजारी' (घराच्या उंबरठ्याबाहेरचा खरा आप्त) ​'नात्यांचं महावस्त्र' विणताना आपण पहिल्या टप्प्यात कौटुंबिक रक्ताच्या नात्यांचे पदर अनुभवले, तर दुसऱ्या टप्प्यात आत्मिक दृष्टी देणारे 'गुरू' आणि जीवाभावाचा सखा असणारा 'मित्र' हे रक्तापलीकडचे वैश्विक बंध पाहिले. या महावस्त्रातील पुढचा अत्यंत जिव्हाळ्याचा, रोजच्या जगण्याशी निगडित आणि घराच्या अगदी उंबरठ्याशी जोडलेला पदर म्हणजे साक्षात आपले सख्खे  'शेजारी' ! ​माणूस नवीन घर घेताना किंवा भाड्याने राहायला जाताना घराचे बांधकाम, वास्तू, रंगरूप याबरोबरच सर्वात आधी एकच गोष्ट बारकाईने पाहतो. ती म्हणजे आपल्या  शेजारी कोण राहतं ?  कारण चार भिंतींचे घर आपण सिमेंट-विटांनी बांधू शकतो, पण त्या घराभोवतीची खरी सुरक्षितता, सुख-समाधान आणि शांतता मात्र नाही म्हटलं तरी शेजाऱ्यांवरच अवलंबून असते. म्हणूनच जुनी जाणती माणसे नेहमी म्हणतात, "घर बघावं बांधून आणि शेजारी बघावा पारखून !" ​माझी आई नेहमी एक गोष्ट आवर्जून सांगायची, "माणसाने आयुष्यात शेजाऱ्यांचा नेहमी थोडा का...

नात्यांचं महावस्त्र – भाग सोळा : 'मित्र'

  उगवतीचे रंग ​नात्यांचं महावस्त्र – भाग सोळा : 'मित्र' (रक्तापलीकडचे वैश्विक नाते) ​'नात्यांचं महावस्त्र' या लेखमालेची सुरुवात करताना मी मैत्रीबद्दल असं म्हटलं होतं की, "नात्यांच्या महावस्त्राची मोरपंखी किनार म्हणजे मैत्री!" मैत्रीला यापेक्षा दुसरी सुंदर उपमा असूच शकत नाही. जगातील सर्वात सुंदर आणि निखळ नाते म्हणजे मैत्री. ​जगातील सगळ्या नात्यांना कुठली तरी अट, कुठले तरी बंधन किंवा मर्यादा असते. परंतु मैत्री हे एकच असे नाते आहे की ज्याला कसलीही अट नाही आणि कोणतेही बंधन नाही. वय, लिंग, जात-पात, धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाणारे हे एक वैश्विक नाते आहे. हे एक असे हक्काचे नाते, जिथे माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षाही एक अशी व्यक्ती मिळते, जिच्याजवळ मनातील सर्व भावना अतिशय मोकळेपणाने व्यक्त करता येतात. या अथांग मानवी प्रवासात खांद्याला खांदा लावून चालणारा, सुख-दुःखात हक्काने पाठीशी उभा राहणारा आणि स्वतःच्या पसंतीने निवडलेला सर्वात सुंदर बंध कोणता असेल, तर ती म्हणजे साक्षात 'मैत्री' ! ​माणूस जन्माला येतो, तेव्हा अनेक नाती त्याला आधीच ठरवून दिलेली असतात. आई...

गुलमोहर गर तुम्हारा नाम होता…

  उगवतीचे रंग ​ गुलमोहर गर तुम्हारा नाम होता… ​“गुलमोहर गर तुम्हारा नाम होता, मौसम-ए-गुल को हँसाना भी हमारा काम होता…” ​सत्तरच्या दशकातील एका सुरेल चित्रपटातलं हे गीत कानावर पडलं की मन नकळत एका केशरी-लाल बहराच्या दुनियेत जाऊन विसावतं. प्रेयसीला गुलमोहराची उपमा देणाऱ्या त्या शब्दांमधली कोमलता आणि झाडाचं विलोभनीय सौंदर्य मनाला एका वेगळ्याच प्रसन्नतेने भरून टाकतं. ‘गुलमोहर’ हा मूळचा उर्दू शब्द. ‘गुल’ म्हणजे फूल आणि ‘मोहर’ म्हणजे मोर किंवा मुकुट; थोडक्यात सांगायचं तर फुलांचा मोर! आपल्या पिसार्‍यातील मोहक रंग उधळून मोर जसा रानावनात थुईथुई नाचताना देखणा दिसतो, अगदी तसाच हा वृक्ष एप्रिल-मेच्या रखरखत्या उन्हात लाल-केशरी फुलांचा मनमोहक पिसारा फुलवून उभा असतो. ​उन्हाळ्याच्या दुपारची काहिली होत असताना, जेव्हा सृष्टी निष्पर्ण आणि उदास वाटू लागते, तेव्हा हा गुलमोहर मात्र स्वतःच्या अंगावर रंगांची आगळीवेगळी होळी खेळत असतो. पूर्ण बहरलेलं हे झाड पाहिलं की मनात एक गमतीदार विचार येतो—जणू या झाडाने आपली हिरवीगार पाने शेजारच्या इतर झाडांना काही काळासाठी उसनी दिली असावीत आणि त्या बदल्यात त्यांच्याक...

मनाचे श्लोक भाग १६५

उगवतीचे रंग ​ मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १६५ देह्यादीक प्रपंच हा चिंतियेला । परी अंतरी लोभ निश्चित ठेला । हरीचिंतने मुक्तिकांता वरावी । सदा संगती सज्जनाची धरावी ।।१६५।। अर्थ : माणूस आयुष्यभर देहाची व संसाराची (प्रपंचाची) चिंता वाहून सगळा व्यवहार करीत असतो, तरीही त्याच्या मनातील विषयांचा व धनाचा लोभ कमी होत नाही. तो लोभ सुटण्यासाठी परमेश्वर चिंतन करून मुक्तीरूपी स्त्रीला वरावे आणि यासाठी नेहमी सज्जनांची (संतांची) संगत धरावी. ( चिंतियेला - सारखा एखाद्या गोष्टीचा विचार करणे, निश्चित - दृढ/घट्ट, मुक्तिकांता - मुक्तीरूपी पत्नी ) विवेचन  जन्माला आल्यापासून संसार माणसाच्या पाठीमागे लागलेलाच आहे. संसार म्हणजे प्रपंच. तो फक्त लग्न झाले म्हणजे असतो असे नाही. विवाहित असो वा असो अविवाहित, प्रत्येकाच्या पाठीमागे काहीतरी विवंचना सारखी लागलेली असते. विवाहित माणसाचा फरक एवढाच पडतो की त्याला पत्नी, पत्नीकडील नातेवाईक, त्याशिवाय आपली मुले आणि नातेवाईक हे सगळे आपले वाटू लागतात. त्यांच्याशी त्याचे नाते एवढे घट्ट होत जाते की हे सगळे माझे आहेत असे त्याला वाटायला लागते. एक प्रकारचा मोहाचा पडदा त्याच...

नात्यांचं महावस्त्र – भाग पंधरा : 'गुरू' (अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा चैतन्यदीप)

उगवतीचे रंग नात्यांचं महावस्त्र – भाग पंधरा : 'गुरू' (अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा चैतन्यदीप) 'न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते'.  ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या विश्वात दुसरी कोणतीही नाही, असा भगवद्गीतेतील हा अमर श्लोक आहे. असे हे परमपवित्र ज्ञान ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त होते, ती पूजनीय व्यक्ती म्हणजे 'गुरू'! पंचमहाभूतांपासून बनलेल्या आपल्या या नश्वर देहात डोळ्यांची केवळ एक बाह्य दृष्टी असते; परंतु अज्ञानाचा पडदा दूर करून ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडून देणारी आणि आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचे दर्शन घडवणारी व्यक्ती जर कोणी असेल, तर ती म्हणजे गुरू! म्हणूनच गुरूचा महिमा अपरंपार आहे; त्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतात. आजच्या या भागात आपले ज्यांच्याशी जन्माजन्मांतराचे आत्मिक नाते असते, अशा गुरूंबद्दलच जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू या. 'नात्यांचं महावस्त्र' विणताना आपण आतापर्यंत आई, बाबा, आजी, आजोबा, मामा, मावशी, आत्या, काका, बहीण-भाऊ, पती-पत्नी, आई-मुलगी, बाप-लेक आणि वडील-मुलगी या कौटुंबिक व रक्ताच्या रेशमी पदरांचा समृद्ध प्रवास अनुभवला. हे सर्व पदर...

मनाचे श्लोक भाग २०५

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २०५   मनाची शते ऐकता दोष जाती । मतिमंद ते साधना योग्य होती । चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी । म्हणे दास विश्वासतां मुक्ति भोगी ।।२०५।। अर्थ : हे दोनशे पाच मनाचे श्लोक श्रवण केले तर दोष निघून जातात. अज्ञानी माणसे भक्तिमार्गाला लागतील. आपल्याला ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य प्राप्त होईल. समर्थ म्हणतात यावर विश्वास ठेवून वागल्यास नक्कीच मुक्तीचे अधिकारी व्हाल. ( मनाची शते - मनाचे हे दोनशे पाच श्लोक, मतिमंद - अज्ञानी/ आपले हित न कळणारे, विश्वासतां - विश्वास ठेवला असता, मुक्ति भोगी - आत्मिक समाधान प्राप्त करणे  ) विवेचन  मनाच्या श्लोकांमधील हा शेवटचा श्लोक. ज्याप्रमाणे एखाद्या स्तोत्र किंवा पुराणाच्या शेवटी त्याची फलश्रुती दिलेली असते, तशीच फलश्रुती समर्थांनी इथे दिली आहे. परंतु ही फलश्रुती अवास्तव किंवा काही चमत्कार घडेल असे सांगणारी नाही. यात कोणत्याही भौतिक सुखांचे आश्वासन नाही. मनाच्या श्लोकांमधून समर्थांनी मनाला जो उपदेश केला त्याचाच परिणाम म्हणून या श्लोकात सांगितलेली गोष्ट घडणार आहे. ते ऐकून आपल्या वागण्यात बदल घडणे अपेक्षित आह...

मनाचे श्लोक भाग २०४

उगवतीचे रंग मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग २०४ मना संग हा सर्व संगास तोडी । मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी । मना संग हा साधकां सीघ्र सोडी । मना संग हा द्वैत निशेष मोडी ।।२०४।। अर्थ : हे मना, संतांचा संग इतर सर्व संग तोडतो. अरे मना, संतांचा संग हा तात्काळ मोक्षप्राप्ती करून देणारा आहे. हे मना, संतांचा संग माणसाला इतर सर्व बंधनांपासून मुक्त करतो. आणि हे मना, संतांचा संग हा भगवंत आणि आपण यांच्यातील असलेलं द्वैत समूळ नष्ट करतो. (संग - संतांचा सहवास, सर्व संग - ऐहिक गोष्टी/देहबुद्धी, तोडी - नष्ट करतो, मोक्ष - अज्ञानापासून मुक्ती, जोडी- प्राप्त करून देतो, सीघ्र - त्वरेने, सोडी - बंधनांपासून सोडवतो, नि:शेष - मुळापासून/संपूर्णपणे  ) विवेचन आपण आता मनाच्या श्लोकातील शेवटच्या श्लोकाच्या आधीचा श्लोक पाहत आहोत. २०२ आणि २०३ या श्लोकांमध्ये सत्संगतीचा महिमा समर्थांनी आपल्याला सांगितला. या श्लोकात ते संतसंगतीने कोणत्या गोष्टी प्राप्त होतात ते आपल्याला सांगत आहेत. पहिल्या ओळीत समर्थ सांगतात की हे मना संतांचा संग, त्यांचा सहवास इतर सर्व गोष्टींचा संग तोडणारा आहे. एक संतांचा संग इतका प्रभावी आहे की त...