मुख्य सामग्रीवर वगळा

तस्मात उत्तिष्ठ कौंतेय

 उगवतीचे रंग 

तस्मात उत्तिष्ठ कौंतेय... 

अर्जुन रात्री बराच वेळ टीव्ही पाहत बसला होता. त्याच त्या रटाळ बातम्या पाहून त्याला फारच वैताग आला होता. पण मीडिया त्यांना हव्या तशा सोयीस्कर बातम्या दाखवतच राहणार याचे त्याला भान नव्हते. मीडियाला ना लोकांच्या हिताशी देणेघेणे, ना राष्ट्रहिताशी. त्यांच्या निष्ठा वेगळ्याच. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उगीचच जागा राहिलेला अर्जुन सकाळचे सात वाजले तरी अंथरुणात लोळतच पडला होता. एवढ्यात त्याला काहीतरी आवाज ऐकू आला. कुठून तरी बासरीचे सूर कानी येत होते. त्या सुरांमध्ये एवढी ताकद होती की अर्जुन काही वेळ आपले देहभान विसरला. तोच त्याला एक आवाज ऐकू आला. ' पार्था, अरे ऊठ. ही झोप फार वाईट बरं. झोपलास की संपलास. तू निद्रेवर विजय मिळवला होतास म्हणून महाभारतात तुझा उल्लेख गुडाकेश असा आहे. तेव्हा अशी निद्रा तुला शोभत नाही.' 

खरं तर उलटच झालं होतं. सकाळी लवकर जागं होऊन केशवाला जागं करायचं आणि ' जागो मोहन प्यारे..' असं आपण म्हणायचं तर तो मोहनच येऊन अर्जुनाला जागं करीत होता. अर्जुनाच्या डोळ्यापुढे एक दिव्य प्रकाश प्रकटला. त्यात त्याला काही दिसेना. अर्जुन स्वतःशीच म्हणाला, ' हे काय झालं ? मला तर काहीच दिसत नाही. ' तोच त्याला केशवाचा सुमधुर आवाज ऐकू आला. ' पार्था, अरे नीट बघ. मी आलोय. तुला दोन गोष्टी युक्तीच्या सांगाव्यात असे वाटले. महाभारत काळात तुझ्या डोळ्यांवर आपल्याच आप्तेष्टांचा संमोहाचा पडदा होता. त्यावेळी आपले हातपाय गाळून आणि कर्तव्य विसरून तू बसला होतास. आज तुझ्या डोळ्यांवर अज्ञानाचा आणि विस्मृतीचा पडदा आहे. ' उघडा डोळे, बघा नीट ' असं नुसतं म्हणून चालत नाही. त्यासाठी दृष्टी असावी लागते. ती दृष्टी नसेल तर ते दाखवतील तेच नीट बघावं लागतं. म्हणून म्हणतो जागा हो. ' 

' केशवा, तू काय बोलतोस ते मला काही म्हणजे काही कळत नाही. जरा नीट उलगडून सांगशील का ? 'अर्जुन म्हणाला. 

' सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐक. पाच हजार वर्षांपूर्वी मी गीता सांगितली होती. त्यातील शिकवण तू विसरलास. तू म्हणजे तुम्ही सारे. नुसतेच गीता हा श्रेष्ठ धर्मग्रंथ आहे असे म्हणून चालत नाही. त्यातील शिकवण आचरणात आणावी लागते. तुम्ही लोक एक वेळ गीतेचा उपदेश विसरलात ते मी समजू शकतो पण अरे इतिहासही तुम्ही विसरता. इतिहासापासून काहीतरी धडा घ्यायचा असतो. जी माणसे आपल्या इतिहासापासून काही शिकत नाहीत, त्यांचे अध:पतन होते ही काळ्या दगडावरची रेघ आहे रे पार्था. '

' अहिंसा परमो धर्म : ' हे वचन अगदी बरोबर आहे पण केव्हा ? जेव्हा तुम्ही सामर्थ्यवान असता तेव्हा. दुर्बळांच्या तोंडी हे वचन शोभत नाही. क्षमा हे वीराचे भूषण आहे असे तुम्ही म्हणता त्याचा अर्थ हाच आहे. तुमचा धर्म संकटात आहे आणि तुम्ही ' अहिंसा परमो धर्म : ' चा जप करत बसलात तर तुम्ही संपून जाल. स्वधर्मे निधनं श्रेय : । पर धर्मो भयावहः ।। हे लक्षात ठेव. 

तुम्हाला तुमचे सण समारंभ साजरे करायचे असतील, तर सुरक्षित आणि निर्भय वातावरण हवे. तसे निर्भय वातावरण कायम राहील याची काळजी तुम्ही सर्वांनी नागरिक म्हणून घ्यायला नको का ? शत्रूला ओळखायला शिका. आज शत्रू दारापर्यंत आला आहे. उद्या तो तुमच्या घरात शिरेल. मग काय हातावर हात धरून बसणार का ? तुमच्या सगळ्या देवदेवतांच्या हातात कुठलं ना कुठलं तरी शस्त्र आहे. ते शत्रूचा निःपात करण्यासाठीच. ते काही शोभा म्हणून त्यांनी हातात धरलं नाही. 

सहिष्णू, धर्मनिरपेक्ष वगैरे शब्द म्हणजे केवळ मखलाशी आहे. तुम्हीच का धर्मनिरपेक्ष असायचे ? त्यांना कधी वाटते का आपणही धर्मनिरपेक्ष असावे म्हणून ? जे तुम्हाला धर्मनिरपेक्षतेचा उपदेश करतात, ते कधी त्यांनाही हा उपदेश करतात का ? नियम तर सर्वांना सारखेच लागू करायचे असतात. ते कधी तुमच्या उत्सवात, आनंदात सामील झाले ? तुम्ही मात्र त्यांच्यात जाता आणि आपला धर्म विसरता. 

मी मघा जे म्हणालो की शत्रू ओळखायला शिका ते नीट समजून घे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळीच हा धोका ओळखला होता. त्यांच्या राज्यात मावळा एक झाला होता. आज मावळ्यांमध्ये फूट पडलीय. मावळा जातीजातीत विभागला गेलाय. मग स्वराज्य कसे टिकवणार ? समर्थ रामदासांनी सांगितले की ' मराठा तितुका मेळवावा ' त्याचा अर्थ हाच आहे. तुम्ही सगळ्यांनी आपापले भेद विसरून एकत्र यायला हवे. United we stand, divided we fall या इंग्रजी वाक्याचा अर्थ ठाऊक आहे ना ? की ते फक्त बोलण्यापुरतेच वापरायचे ? 

खरोखरच तुम्ही लोक इतिहास विसरता. जेव्हा शत्रू बाहेरचा असतो तेव्हा पाच पांडव आणि शंभर कौरव एकत्र येतात आणि आम्ही एकशे पाच म्हणतात. पण तुम्ही शंभर आणि पाच असे वेगवेगळे राहिलात तर पुन्हा वेगळे महाभारत होईल. यावेळी पाचांचा विजय होईलच असे नाहीत. संख्येने जे जास्त असतील ते जिंकतील. म्हणून सावध हो. 

भूतकाळात तुम्हाला प्रिय असलेल्या देवतांच्या मंदिरांचा विनाश शत्रूने केलाच ना ? तुम्ही एक नसल्याने आणि आपले स्वत्व गमावल्याने हे घडले. तुमची सुंदर मंदिरं, लेण्या तोडून छिन्न्नविछिन्न करण्यात आल्या. ज्या रामाने दुराचारी रावणाचा वध केला, त्याचं मंदिर व्हायला पाचशे वर्षे जावी लागली. नालंदा, तक्षशिला विद्यापीठे आणि तेथील अपार ग्रंथसंपदा आक्रमकांनी नष्ट केली. एवढा शूर आणि उदार पृथ्वीराज चव्हाण पण त्याच्या औदार्यामुळे त्याच्या हातून मोठी चूक घडली. क्रूर आक्रमक अशा मोहंमद घोरीला त्याने सोळा वेळा सोडून दिले. त्याच घोरीने विजय मिळताच पृथ्वीराजाला कैद केले. त्याने औदार्य नाही दाखवले. तुम्ही विसरता हा इतिहास. या आक्रमकांच्या हल्ल्यात तुमच्या मायबहिणी सुरक्षित राहिल्या नाहीत. अनेक स्त्रीलंपट आक्रमकांमुळे राणी पद्मिनीसारख्या हजारो तेजस्वी स्त्रियांना जोहार पत्करावा लागला. अकबर जोधाच्या प्रेमाचे कसले गोडवे गाता ? अकबराच्या जनानखान्यात तीनशेच्या वर स्त्रिया होत्या. हाच अकबर स्वतःला गाझी म्हणवून घेत होता. गाझी म्हणजे जो अल्लाला मानत नाही त्याचा वध करणारा. अकबर आणि हेमू यांच्या युद्धात बेशुद्ध झालेल्या हेमू उर्फ हेमचंद्राचे शीर अकबराने तलवारीने  धडावेगळे केले आणि स्वतःला गाझी म्हणवून घेतले. 

तुम्हा हिंदूंना अनेक देशातून परागंदा व्हावं लागलं आहे, ते तुमच्यात एकी नसल्यामुळे आणि परकीयांचा धोका वेळीच न ओळखल्यामुळे. पाकिस्तानातून, काश्मीरमधून अनेक हिंदू आपलं घरदार सोडून गेले किंवा त्यांना घालवलं गेलं. अनेक महिलांवर अत्याचार झाले. हा तर ताजा इतिहास आहे. यातूनही तुम्ही काही शिकला नाहीत. हे असंच सुरु राहिलं तर उद्या पश्चिम बंगाल, हैदराबाद, केरळ आदी ठिकाणांहूनही तुम्हाला घालवलं जाईल. म्हणून म्हणतो ' तस्मात उत्तिष्ठ कौंतेय. ' आजच्या काळात तुम्हाला तलवार, बंदुका हाती घेण्याची गरज नाही. तुमच्या हातात नागरिक म्हणून काही अधिकार संविधानाने दिले आहेत. त्याचा यथायोग्य वापर करा. एक सजग नागरिक म्हणून आपल्या देशाप्रतीचे आपले कर्तव्य पार पाडा. धर्मो रक्षति रक्षित: हे लक्षात ठेवा.  

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव 

१९/११/२०२४

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता

 उगवतीचे रंग  लोकमाता अहिल्यामाई होळकर : जीवन, कार्य, विचार आणि आजची प्रस्तुतता पुण्यश्लोक किंवा लोकमाता म्हणून मिरवावे ते फक्त अहिल्याबाईंनीच ! ही विशेषणे त्यांनाच शोभून दिसतात. त्यांची देवतातुल्य वागणूक पाहून प्रजेनेच आपल्या हृदय मंदिरात त्यांची ' देवी ' म्हणून स्थापना केली. देवी म्हणून प्रजेच्या हृदयातील सर्वोच्च स्थानावर एवढ्या आदराने विराजमान होणाऱ्या त्या एकमेव महाराष्ट्रकन्या - माळवासम्राज्ञी आहेत. त्यांचा गौरव पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला आहे. सर जॉन माल्कम त्यांच्याबद्दल लिहिताना म्हणतात , " Ahilyabai's name is sainted and she is styled as Avatar or incarnation of the Divinity." तर स्कॉटलंडची कवयित्री जोना बेली हिने  ' Ahilyabai A Poem या नावाचे दीर्घ काव्य त्यांच्यावर लिहिले आहे. त्यांना Divine Personality, Saint, Seer, Avatar यासारखी विशेषणे वापरून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आत्मभान असणारा आणि भूतकाळापासून धडे घेणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आज दुर्दैवाने हे आत्मभान आपण हरवत चाललो आहोत. राजकीय आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांकडे देखील ...

आनंदयात्री

 उगवतीचे रंग  आनंदयात्री  मंगेश पाडगावकर यांच्या ' आनंदयात्री ' कवितेची आठवण व्हावी असे एक जोडपे काल भेटले. त्यांच्या संगतीत कालचा दिवस सोनेरी झाला. त्यांच्यासोबत आम्हीही आनंदयात्री झालो. समयीतल्या दोन वाती एकत्र येऊन त्यांनी सुंदर प्रकाश द्यावा तसे ते दोघं प्रकाशमान भासले. हे जोडपं म्हणजे माझी मानलेली बहीण विभाताई आणि तिचे यजमान डॉ गोपाळराव देशपांडे. कर्माचा सिद्धांत मला मान्य आहे. आपण जसे कर्म करतो तसे फळ मिळते. तसंच मागच्या जन्मी म्हणा किंवा या जन्मी म्हणा काहीतरी सत्कृत्य माझ्या हातून झालं असलं पाहिजे , म्हणूनच अशी माणसं माझ्या वाट्याला आली. ऋणानुबंधाच्या गाठी पडल्या.  विभाताई आणि डॉ गोपाळराव हे दाम्पत्य तसे मुंबईकर. पण पुण्यात त्यांचे घर आहे. त्यांना दोन मुली. रेणू आणि श्वेता. दोघीही डॉक्टर आहेत. दोघीही अमेरिकेत असतात. गोपाळराव मुंबईत डॉ जी के देशपांडे या नावाने प्रख्यात आहेत. अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि अभिनेते, गायक, कलाकार  ज्यांचे पेशंट होते आणि आहेत असे हे धन्वन्तरी. विभाताईंचे वडील विदर्भातील प्रख्यात वकील तर डॉ गोपाळरावांचे वडील मोठे सरकारी अधिकारी ...

पुत्र व्हावा ऐसा...

उगवतीचे रंग  पुत्र व्हावा ऐसा... आपल्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात  पुत्र व्हावा ऐसा गुंडा  ज्याचा तिन्ही लोकी झेंडा... या ओळीचा अर्थ असा नाही की पुत्र वाईट किंवा गुंड असावा, तर याचा अर्थ आहे की पुत्र असा असावा जो आपल्या कर्तृत्वाने, पराक्रमाने, किंवा गुणांनी इतका प्रभावी आणि धाडसी असेल की जणू काही तो "गुंड" ( इथे पराक्रमी, धाडसी, आपल्या तत्त्वांवर ठाम या अर्थाने) असावा. त्याची किर्ती तिन्ही लोकात पसरावी. थोडक्यात, पुत्र असा असावा जो समाजासाठी आणि धर्मासाठी काहीतरी मोठे कार्य करेल आणि कोणालाही घाबरणार नाही. तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवाच एक कविता वाचनात आली. कविता कसली ? प्रार्थनाच ती ! एका कवीने देवाला केलेली ! अमेरिकेचे नामवंत माजी  लष्करप्रमुख डग्लस मॅकआर्थर यांनी देवाजवळ आपल्या मुलासाठी केलेली ही प्रार्थना – परंतु ती कोणत्याही काळात, कोणत्याही संस्कृतीत, प्रत्येक संवेदनशील पालकाच्या अंत:करणातून उमटू शकेल, प्रत्येक मातापित्याला आपल्याच भावना त्यात दिसतील अशी आहे. म्हणूनच त्याबद्दल तुमच्याशी संवाद साधावा असे वाटले. त्या कवितेचा ह...