उगवतीचे रंग
माझे पहिले प्रेम...
लेखाचे शीर्षक वाचून चक्रावला असाल ना ? आज यांना काय झाले ? ' व्यवस्थित ' तर आहात ना ..? नेहमी साधारणपणे गंभीर विषयांवर लिहिणारे हे लेखक महाशय आज चक्क ' माझे पहिले प्रेम ' या विषयावर लिहिणार ? हो, आहे बुवा तसंच . आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या प्रेमाबद्दलच सांगणार आहे. पण थांबा जरा. त्या आधी मला सांगा तुम्हाला तो एक दुजे के लिये चित्रपट आठवतो का ? त्यात लता मंगेशकरांचे मला एक फार आवडणारे गाणे आहे. ते म्हणजे ' ऐ प्यार तेरी पहली नजर को सलाम...' त्या गाण्यात त्या चित्रपटाच्या नायिकेला तिच्या पहिल्या प्रेमाची संधी ज्या ज्या गोष्टींनी प्राप्त करून दिली त्या त्या गोष्टींना ती सलाम करते. मग पहली नजर, नंतर ' जिसने हमे मिलाया उस वक्त, उस घडी, उस डगर को सलाम ..' असं ती म्हणते. ती कृतज्ञ आहे त्याबद्दल. आपल्या प्रेमाला साहाय्यभूत ठरणाऱ्या पहिल्या आणि सुरुवातीच्या सगळ्या गोष्टींना ती सलाम करते. आणि केलाच पाहिजे ना. ज्यांनी आयुष्यभरासाठी प्रेमाची एवढी मोठी दौलत दिली, त्यांना सलाम नाही तर काय करणार ?
मी तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही. सांगून टाकतो माझ्या पहिल्या प्रेमाबद्दल. माझं पहिलं प्रेम म्हणजे पुस्तक. पुस्तकांशिवाय मला दुसरं काहीही अधिक प्रिय नाही. कोणाकोणाच्या काही कल्पना असतात ना.. ! म्हणजे अमुक एक स्वप्न पूर्ण व्हायचं राहिलं आहे. मला जर संधी मिळाली तर मी अमुक करीन , टमूक करीन . थोडक्यात म्हणजे इंग्रजीत त्याला बकेट लिस्ट असा शब्द आहे. तर माझ्या बकेट लिस्ट मध्ये असं स्वप्न आहेच. आता कोरोनामुळे काही जणांना क्वारंटाईनं करतात ना..! तसं जर माझ्याबाबतीत करायचं झालं ( अर्थात कोरोनामुळे तसं करण्याची वेळ न येवो ) तर, मी सांगेन की एखाद्या खोलीत किंवा वाचनालयात माझ्यासाठी एक टेबल खुर्ची, एखादं वही पेन, विश्रांतीसाठी एखादा बेड आणि माझ्या अवतीभोवती माझी आवडती पुस्तक ठेवा. दिवसभर मी आणि ती पुस्तकं . बस. फक्त अधूनमधून मला जेव्हा कंटाळा येईल तेव्हा माझी आवडती गाणी ऐकायची सोय ठेवा. आणि जेवण्याखाण्याच्या माझ्या फार आवडीनिवडी नाहीत. त्यामुळे जेवण साधेच दोन वेळेला मिळाले तरी चालेल. आणि दोन वेळेला चहा.. ! पहा बरं एवढ्याच माफक माझ्या अपेक्षा आहेत. मग मला दुसरे काही नाही मिळाले तरी चालेल. ही माझ्या बकेट लिस्ट मधली पहिली पसंती.
म्हणूनच त्या वरच्या गाण्यात जसा प्रत्येक पहिल्या गोष्टीला सलाम आहे ना, तसा माझा सलाम त्या व्यक्तींना की ज्यांनी मला सुरुवातीला वाचनाची सवय लावली. मग त्यात माझे आईवडील, माझे शिक्षक आले. माझा पहिला सलाम त्या पुस्तकांना की ज्यांनी मला वाचनाची गोडी लावली, मला वाचायला शिकवलं. माझा पहिला सलाम त्या जागेला की जिथं बसून मी पहिलं पुस्तक वाचलं . मी का सलाम करतोय त्या सगळ्या गोष्टींना ? कारण मी त्यांचा ऋणी आहे. वाचन आणि पुस्तकं या दोन गोष्टींनी माझं आयुष्य समृद्ध केलं आहे. पुस्तकं नसती तर काय झालं असतं , आयुष्य किती रटाळ बनलं असतं सांगवत नाही. मग हळूहळू पुस्तकांच्या त्या दुनियेनं मला झपाटून टाकलं. पुस्तकांचं भूत माझ्या मानगुटीवर कायमचं स्वार झालं. विक्रम वेताळाच्या गोष्टीसारखं. तो वेताळ जसा विक्रम राजाला एक एक गोष्ट सांगायचा ना तशी पुस्तकं मला गोष्ट सांगू लागली. पुस्तकं माझा श्वास झाला, पुस्तकं माझा ध्यास झाला. मला कुठलं नवीन पुस्तक मिळणार असेल ना तर मी अक्षरशः वेडा व्हायचो ते मिळवण्यासाठी. अजूनही पुस्तक हा माझा वीकपॉइंट आहे.
आज आहे २३ एप्रिल. जागतिक पुस्तक दिन. हा दिवस जगप्रसिद्ध नाटककार शेक्सपिअरच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तसेच आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचाही हा जन्मदिन. तो सुद्धा वाचन दिवस म्हणून साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनाही पुस्तके फार प्रिय होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीही पुस्तके म्हणजे जीव की प्राण होती.असं म्हणतात की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना लहानपणापासून वाचनाचे इतके वेड होते, की ते आपल्याला पुस्तक मिळावे म्हणून लोकांची घरातली, शेतातली कामे करून देत. लाकडे फोडून देत. आज तर तशी वेळ नाही. सुदैवाने आपल्याला आज पुस्तकं मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. आपणच कमी पडतो ती वाचायला.
आज आपण पुस्तक दिन साजरा करीत आहोत. अर्थात घरीच. या कोरोनामुळे काही तोटे झाले असले तरी काही फायदे निश्चित झाले आहेत. त्याने वाचनप्रेमींना घरी वाचनासाठी अधिक वेळ उपलब्ब्ध करून दिला आहे. आज पुस्तकांचे वाचन काही प्रमाणात कमी झाले असले तरी ' वाचन ' नावाची गोष्ट कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुरूच आहे. मग ते मोबाईल, लॅपटॉप, कॉम्पुटर किंवा किंडल यासारख्या माध्यमावर उपलब्ध होणाऱ्या इ बुक्सचे असेल किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या निरनिराळ्या माहितीपूर्ण लेखांचे असेल. ते सुरु आहे. फक्त माध्यम बदलले आहे. आणि या पुढचा काळ आणि येणारी पिढी कदाचित खरेखरे पुस्तक फार कमी हातात घेईल आणि इ बुक्सच्या माध्यमातून आपले वाचन करील.
खरं तर आज तुम्हाआम्हाला वाचनासाठी खरीखुरी पुस्तकंच आवडतात. आपल्यासमोर जर पुस्तक, मोबाईल, लॅपटॉप इ गोष्टी ठेवल्या आणि जर आपल्याला त्यातून निवड करायची झाली, तर आपण आधी पुस्तकच हातात घेऊ. याचं कारण म्हणजे लहानपणापासून आपली वाचन हे संज्ञा पुस्तकांशी निगडित आहे. पण भविष्यकाळात तसे राहणार नाही. पुस्तक प्रकाशकांना देखील इ बुक्स काढणे सोयीचे होणार आहे कारण छापील पुस्तकांप्रमाणे त्यांची ने आण करणे, हिशेब ठेवणे या गोष्टी त्यांना जिकिरीच्या होत आहेत. पण स्वरूप कोणतेही असो. वाचनाला पर्याय नाही.
शाळेतले, कॉलेजातले औपचारिक शिक्षण आपले काही वर्षांनी संपते. पण अनौपचारिक शिक्षण आयुष्यभर सुरूच राहते. या वाटचालीत आपल्याला शिकवतात ती पुस्तकं , शिकवतं ते वाचन. ती आपले मित्र असतात, मार्गदर्शक असतात आणि गुरुही असतात. एखादी वाहणारी नदी जशी आपल्या काठावरची गावे ,शेते समृद्ध करीत जाते, तशी ही वाचनगंगा आपल्या आयुष्यभर आपण जर वाहती ठेवली तर ती आपलेही जीवन समृद्ध करील यात शंका नाही. आज हा जागतिक पुस्तक दिन माझा देखील जन्मदिन आहे हा एक सुखद योगायोग मला वाटतो.
©️ विश्वास देशपांडे, चाळीसगाव.
९४०३७४९९३२

आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण छान लिहिले आहे.तसेच तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.सुप्रभात सर.आणि नमस्कार सर.
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद
उत्तर द्याहटवा