मुख्य सामग्रीवर वगळा

मनाचे श्लोक भाग १९०

उगवतीचे रंग

मनोपनिषद अर्थात मनाचे श्लोक भाग १९०

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता ।

परेहूनि पर्ता न लिंपे विवर्ता ।

तया निर्विकल्पासि कल्पित जावे ।

परी संग सोडूनि सूखे राहावें ।।१९०।।

अर्थ : परमेश्वर सृष्टीचा निर्माता किंवा भरणपोषणकर्ता नाही. तो परावाणीच्याही पलीकडे आहे. त्यास भ्रमाचा स्पर्श होऊ शकत नाही. सर्व कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या या परमेश्वराची कल्पना करण्यासाठी आपल्या कल्पनेचा आश्रय घ्यावा. सर्व पाश तोडून त्याची आराधना करावी आणि सुखी व्हावे. 

( कार्यकर्ता - विश्वाचा निर्माता, सृष्टिभर्ता - सृष्टीचे भरणपोषण करणारा, परा - परावाणी, पर्ता - पलीकडे असलेला, न लिंपे - त्याला स्पर्श होत नाही/कशानेही लिप्त होत नाही/अलिप्त राहतो, विवर्ता - भास/भ्रम, निर्विकल्प - ज्याची कल्पना करता येत नाही, कल्पित जावे - कल्पनेने जाणून घ्यावे )

विवेचन 

या श्लोकात परमात्म्याचे सर्वश्रेष्ठ स्वरूप समर्थ आपल्याला समजावून सांगत आहेत. कळण्यास थोडा कठीण आणि विरोधाभासी वाटणारा हा श्लोक परमेश्वराचे खरे आणि सत्यस्वरूप आपल्याला सांगतो. आपण सगळे या मायेच्या जाळ्यात अडकलेले जीव आहोत. माया म्हणजे भगवंताची सावली असे मानले जाते. त्या सावलीलाच आपण सत्य समजतो. हे जग म्हणजे एक प्रकारची मायेची सावलीच आहे असे म्हणता येईल. या जगाला आपण सत्य मानतो. पण ब्रह्म सत्य आहे. हे जग म्हणजे भासमान किंवा भ्रम आहे. हे जग आपल्याला खरे वाटते आणि जेव्हा या जगाचा निर्माता कोण असेल त्याचा आपण विचार करू लागतो, तेव्हा साहजिकच तो परमेश्वर आहे असे आपण मानतो. परंतु ही सृष्टी म्हणजे भगवंताची केवळ एक लीला आहे. तो त्याहून पलीकडे आहे. वस्तू आणि तिचा निर्माता असा कार्यकारण भाव त्याच्याबाबत लागू होत नाही. तो सृष्टीचे भरणपोषणही करीत नाही. 

या सगळ्या गोष्टी परस्परविरोधी वाटतात. पण त्या तशा नाहीत. त्यात एकवाक्यता आहे. मायेच्या अधीन असल्याने आपण ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रयीला विश्वाचा निर्माता, पोषण करणारा आणि संहार करणारा मानतो. पण मूळ देव किंवा समर्थांनी आधीच्या श्लोकात ज्याचा थोरला देव म्हणून उल्लेख केला आहे, तो याच्या पलीकडे आहे. आपण बोलताना वैखरी वाणीचा वापर करतो. पण परा वाणी म्हणजे वाणीचे अत्यंत सूक्ष्म आणि शुद्ध स्वरूप मानले जाते. ते देवी शारदेचे अधिष्ठान मानले जाते. परंतु परमात्मा हा या परेहुनही परता म्हणजे पलीकडे आहे. कारण त्याच्या स्वरूपाचे वर्णन करताना वेदसुद्धा ' नेती नेती ' म्हणतात.

निर्गुण ब्रह्माच्या अधिष्ठानाने सर्व गोष्टी घडतात पण ते स्वतः कशानेही लिप्त होत नाही. ज्ञानेश्वर माउली म्हणतात,' हे मज कारणे झाले परी म्यां नाही केले.'ज्याप्रमाणे सिनेमाच्या पडद्यावर किंवा टीव्हीच्या पडद्यावर आपण अनेक घडामोडी पाहतो. पण त्या पडद्याला त्यांचा स्पर्शही होत नाही. तो अविचल, अलिप्त असतो. तसेच हे परमेश्वराचे स्वरूप आहे. तो कशानेही लिप्त होत नाही. 

आपण मायेच्या अधीन असल्यामुळे परमेश्वर या सर्व गोष्टींचा कर्ता आहे असे मानतो. पण तो काही करत नाही. तो अधिष्ठानमात्र असतो. महाभारतात कौरव आणि पांडवांचे युद्ध झाले. तेव्हा भीष्म, गांधारी यांच्यासारखी अनेक पात्रे श्रीकृष्णाला म्हणतात की तुझी इच्छा असती तर तू हे युद्ध थांबवू शकला असतास. पण श्रीकृष्ण म्हणतो,' मी ते थांबवण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु या सर्वांच्या कर्माचा परिपाक म्हणजे युद्ध. कौरव आणि पांडवांच्या वागण्यामुळे, कर्मामुळे हे युद्ध अटळ झाले. तात्पर्य माणूस स्वतःच आपल्या कर्माने आपली नियती ठरवतो. 

परमेश्वर हा आपल्या कल्पनेच्याही पलीकडे आहे. म्हणूनच या श्लोकात त्याला ' निर्विकल्प ' म्हटले आहे. परंतु त्याच्यापर्यंत पोहोचायचे तर कल्पनेचाच आश्रय घ्यावा लागतो. समजा आपल्याला दिल्लीला जायचे आहे. दिल्ली आपल्याला माहिती नाही, आपण कधी पाहिलेली नाही. पण तरीही आपण दिल्लीला जायचे ठरवतो. मग आपण रेल्वेने जातो किंवा विमानाने. त्या साधनांच्या साहाय्याने आपण काही तासांत दिल्लीला पोहोचतो. त्याप्रमाणे कल्पनेच्या आधारे भगवंतापर्यंत पोहोचता येते. त्यासाठी गोंदवलेकर महाराज म्हणतात तशी ' नामस्मरणाची गाडी पकडावी. त्या गाडीत बसावे. ती गाडी एक दिवस आपल्याला निश्चित भगवंतापर्यंत पोहोचवेल.' त्यासाठी देहाचा संग म्हणजे देहबुद्धी सोडून परमेश्वराचे नामस्मरण करावे आणि सुखात राहावे असे समर्थ आपल्याला सांगतात.

स्वसंवाद 

१. जगतातील घडामोडींचा व माझ्या व्यक्तिगत सुखदुःखांचा दोष ईश्वराच्या माथी मारण्याऐवजी, तो केवळ अलिप्त अधिष्ठान असून सर्व काही माझ्याच कर्मांचा परिपाक आहे हे मी मान्य करतो का?

२. सिनेमाच्या पडद्याप्रमाणे जगातील सुखदुःख, मान-अपमान या घडामोडी केवळ साक्षीभावाने पाहत, अंतरी कोणत्याही विकाराने लिप्त न होता अलिप्त राहण्याचा सराव मी करतो का?

३. वाणी, बुद्धी आणि सर्व मानवी कल्पनांच्या पलीकडे असणाऱ्या त्या निर्विकल्प परब्रह्माचे अनुसंधान साधण्यासाठी संतांनी सांगितलेल्या 'सात्त्विक कल्पनेचा' व ध्यानाचा आधार मी घेतो का?

४. देहबुद्धी व ऐहिक आसक्तीचा संग सोडून, श्री गोंदवलेकर महाराजांच्या शिकवणीनुसार त्या अथांग परमात्म्याशी ऐक्य साधण्यासाठी मी 'नामस्मरणाची गाडी' अखंडपणे पकडून ठेवतो का?

( क्रमशः )

© विश्वास देशपांडे, चाळीसगाव.

१५/९/२०२६

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस

उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग एकोणचाळीस रंगुनी रंगात साऱ्या... ' रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ' अशी कवी आणि गझलकार सुरेश भटांची एक सुंदर गझल आहे. ती चपखलपणे लागू पडते. आजपर्यंत त्यांनी हजारो गीतं गायली. पण तरीही आपलं वेगळेपण, आपल्यातलं माणूसपण त्यांनी टिकवून ठेवलं आहे. लहानपणापासूनच वेगवेगळ्या प्रकारचे भलेबुरे अनुभव अनुभव घेऊनही त्यांच्या स्वभावात कडवटपणा आलेला नाही. त्यांच्या स्वभावातील खेळकरपणा, जीवनाचा आनंद घेण्याची वृत्ती, हास्यविनोदाला दाद देण्याची वृत्ती तशीच टिकवून ठेवली आहे. आजच्या या भागात त्यांच्या याच वेगळेपणाची माझ्या परीने दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. कारण दीदींचं जीवन, त्यांचं गाणं आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे सारं सारं शब्दात बांधणं अवघड आहे. या गानसम्राज्ञीच्या आतमध्ये काव्याचा आस्वाद घेणारा आणि त्यासंबंधीच्या आपल्या भावना शब्दात तरलपणे व्यक्त करणारा एक साहित्यिक, समीक्षक किंवा एक जाणकार रसिक दडला आहे असे मला वाटते. गंमत म्हणजे ' रंग माझा वेगळा ' या सुरेश भटांच्या काव्यसंग्रहाला त्यांनी जी प्रस्तावना दिली आहे, ती त्यांच्य...

आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस

  उगवतीचे रंग भारतरत्नावली आनंदघन : लता मंगेशकर - भाग चाळीस तृप्त मी, कृतार्थ मी... आज लतादीदी ९२ वर्षांच्या आहेत. पंचाहत्तर वर्षे एवढी प्रदीर्घ त्यांची गायन कारकीर्द आहे. आजच्या घडीला त्यांनी आपल्या गत आयुष्याकडे जर मागे वळून पाहायचं ठरवलं तर नक्कीच ' तृप्त मी, कृतार्थ मी... ' अशी त्यांची भावना असणार आहे. आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी रसिकांवर जो सुरांचा अमृतमय वर्षाव केला आहे, त्याबद्दल त्यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार पुरस्कार म्हणजे रसिकांचे प्रेम. तसा तर दीदींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला आहे. दीदींना पुरस्कार मिळाले असे म्हणण्यापेक्षा दीदींना मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली असे म्हणायला हरकत नाही. या स्वरसम्राज्ञीला किती आणि कोणते पुरस्कार मिळाले ते सांगण्याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये अहमहमिका लागलेली असते आणि ते साहजिकच आहे. दीदींना त्याबद्दल विचारले तर त्या हसून हा प्रश्न उडवून लावतात आणि मला त्याबद्दल फारसे आठवत नाही असे सांगतात. दीदींची स्मरणशक्ती उत्तम असली तरी एक गोष्ट मात्र खरी की त्यांनी या सगळ्या पुरस्कारांची जाणीवपूर्वक नोंद...

रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य - भाग 45

 उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -  भाग 45 श्रीनिकेतनची स्थापना  या लेखमालेच्या मागील भागांमध्ये आपण रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन आणि विश्वभारतीची स्थापना कशी आणि का केली ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय संस्कृती आणि परंपरांची जगाला ओळख व्हावी, भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांचा ओढा भारताकडे लागावा आणि विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा बौद्धिक भावनिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने रवींद्रनाथांनी विश्वभारतीची स्थापना केली. पण एवढ्याने रवींद्रनाथांचे समाधान झाले नाही. केवळ विद्यार्थ्यांचे हित न पाहता ज्या समाजात आपण राहतो त्या स्थानिक समाजाचाही विकास व्हावा, त्यांची भौतिक प्रगती व्हावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आणि वैज्ञानिक प्रगतीची योग्य ती माहिती मिळावी आणि शेती आणि उद्योगधंद्याच्या कामात योग्य ते मार्गदर्शन मिळावे असे त्यांना वाटत होते. या उद्देशानेच शांतिनिकेतन पासून जवळ असलेल्या सुरुल या ठिकाणी त्यांनी ग्रामीण क्षेत्रात कल्याणकारी कामे करणारा विद्यापीठाचाच एक विस्तारित विभाग सुरू ...